नमस्कार मंडळी,
मी छोटी टिंगी. सरत्या वर्षाच्या पुर्वसंध्येला मी प्रथमच मिसळपावाला भेट दिली.
तसा पुर्वीपासून आपल्या "मायबोली"तून स्वतःचे "मनोगत" व्यक्त करीतच होतो. परंतु कुठे ती मिसळपाव आणि कुठे ते अळूचं फदंफदं......
असो, सालाबादाप्रमाणे आम्ही या वर्षीदेखील काही संकल्प "सोड"लेले आहेत (कॄपया शब्दश। अर्थ घेणे आणि ह.घ्या.) त्यांचे तपशील पुढीलप्रमाणे -
१. या वर्षी आम्ही शिवराळ/ द्वैअर्थी भाषा अजिबात वापरणार नाही.
अपवाद : चुकुन तोंडातून निघाल्यास आणि मिसळपावावर आल्यानंतर........च्यामारी आता मिसळपावावर तात्या वगैरे लोकांच्या संगतीत आल्यावर 'घंटा' ही सवय सुटणार?
२. या वर्षी आम्ही मांसाहार अजिबात करणार नाही.
अपवाद : दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार आणि सध्या विलायतेत वास्तव्यास असल्यामुळे म्याकडी वा बर्गर किंगात चुकून अभक्ष्याचं भक्षण झाल्यास.......असो, सध्या शुद्ध शाकाहारी मिसळपाव खाण्याचा प्रयत्न चालुच आहे.
३. या वर्षी आम्ही सुरापान/धुम्रपान अजिबात करणार नाही.
अपवाद : एखादा वीकएंड (मराठी शब्द?) वा फुकटची मिळाल्यास किंवा कार्यालयात ग्राहकाने(क्लायंटने) आग्रह केल्यास केवळ वरिष्ठ अधिकार्यांचा मान राखण्याकरिता......
४. या वर्षी आम्ही अजिबात थापा मारणार नाही.
अपवाद : रजा, राजकारण आणि बढती मिळण्यासाठी......
असो.....हे झाले दरवर्षी प्रमाणे मी "सोड"लेले दरवर्षीचेच काही संकल्प.
मंडळी आपले काय काय संकल्प आहेत?
आपला,
(संकल्पित) छोटी टिंगी
प्रतिक्रिया
4 Jan 2008 - 5:31 am | विसोबा खेचर
'सोड'लेले संकल्प चांगले आहेत परंतु तुमच्या लेखनावरून तुमचे नांव 'छोटा टिंगी' असायला हवे होते असे वाटते ते 'छोटी टिंगी' कसे काय?, हे कळले नाही! :)
असो,
आपला,
(पुल्लिंगी!) तात्या.
4 Jan 2008 - 5:49 am | ब्रिटिश टिंग्या
असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेला तर मग मी 'किस' (तसला नव्हे) झाड की पत्ती ?
आपला,
(नामनिराळा) छोटी टिंगी
4 Jan 2008 - 11:35 am | इनोबा म्हणे
टिंग्या,
हे वाक्य लिहिल्यानंतर त्या पामराने खाली आपलेच नाव लिहिले ना.
असो!या वर्षी आम्ही कोणताही संकल्प न करण्याचा संकल्प सोडला आहे,माझ्या मते संकल्प हे केवळ सोडण्यासाठीच असावेत म्हणूनच 'संकल्प सोडणे' हा वाक्यप्रकार उपजला असावा.
मागील वर्षी आम्ही बटाट्याच्या चाळीतील आचार्य बाबा बार्व्यांच्या पावलावर पाऊल ठेवत एकूण नऊ भाषांमध्ये मौन पाळायचा संकल्प सोडला होता....बर्यापैकी जमले.
-इनोबा
4 Jan 2008 - 12:21 pm | छोटा डॉन
"असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेला तर मग मी 'किस' (तसला नव्हे) झाड की पत्ती "
च्यायला कोण हा शेक्सपियर ?
२ पेग झाल्यावर आमच्या तोंडून असली मौलीक वचने निघतात व हे असले भूरटे आपल्या नावावर खपवतात....
त्यामुळेच आम्ही वर्षातून फक्त २ दिवस पिण्याचे ठरवले आहे ..... एक म्हणजे जेव्हा माझा वाढदिवस असतो त्या दिवशी व दुसरे म्हणजे ज्या दिवशी माझा वाढदिवस नसतो त्या दिवशी ....
काय समजले ?
4 Jan 2008 - 12:56 pm | इनोबा म्हणे
च्यायला,इथं समदे छोटे का हाय तेच कळंत न्हाय्.म्होठ्याना इथं ऍडमिसन नाय का?
जावू दे!छोट्या शेक्सपियर तुला नाय कळायचा(आमाला तरी कुटं कळलाय) तु आपला भिकू म्हात्रेचा करियर विषयक मार्गदर्शन करणारा 'भिकू म्हणे' किंवा 'मै डॉन बनता चाहता हूं' नाहितर 'सत्या'च्या मार्गाने जिवन जगण्यासाठीचा मार्गदर्शक 'सत्याचा मार्ग' वाच आणी 'म्होठा' हो.
4 Jan 2008 - 6:08 pm | सखाराम बाइंडर
च्यायला,इथं समदे छोटे का हाय तेच कळंत न्हाय्.म्होठ्याना इथं ऍडमिसन नाय का?
नाय.... चला फुटा बरे नाय तर छोटा विन्या हे नाव घ्याः)
खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
4 Jan 2008 - 6:34 pm | इनोबा म्हणे
बाळ डॉन्या,
तुझ्यावानी किती आलं आणी गेलं,पण आपूण इथंच हाय.तुमी भाय(बाय) लोकांनी इथं पण खंडणी मागयची सुरुवात केली का काय?येनकाऊंटरची आर्डर काढाया पाहिजे.
आपूण,आपूण हाय...बाकी समदे ढेकूण हाय...
6 Jan 2008 - 10:36 pm | ब्रिटिश टिंग्या
आपूण,आपूण हाय...बाकी समदे ढेकूण हाय...
हा हा हा हा!!!! छान वाक्य आहे ;)
4 Jan 2008 - 6:36 pm | अरविन्दनरहरजोशी
अरविन्द
ह्या वर्षात व्यायाम करणार आहे.
4 Jan 2008 - 6:46 pm | इनोबा म्हणे
अरविन्दा,
यायाम कर लेका,पर तेच्याबरुबर थोडं खात्-पित जा,नायतर काय उपेग नाय्.
(तालमीचा वस्ताद)-इनोबा
4 Jan 2008 - 8:37 pm | देवदत्त
अस्मादिकांच्या संकल्पाविषयी येथे वाचावे.
5 Jan 2008 - 12:26 pm | विकि
केलाच नाही त्यामुळे लिहायचा प्रश्नच येत नाही.
आपला
कॉ.विकि
6 Jan 2008 - 11:32 pm | सागर सुभाष राणे
जमेल तेवढे मराठी सिनेमा पहा तिकीत काढून
कारण आपणच मराठी सिनेमाना नवी संजीवनी देऊ शकतो
सागर राणे
29 Dec 2009 - 5:06 pm | परिकथेतील राजकुमार
माननीय श्री. ब्रिटिश टिंग्या-जी ह्यांचे ह्या नव वर्षीचे संकल्प वाचायला आवडतील.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
29 Dec 2009 - 8:42 pm | टारझन
धागा वर काढल्यामुळे आम्हाला आमचा मित्र इन्याच्या डोक्यातला हा ढेकूण वाचायला मिळाला =)) =)) =)) =))
धन्यवाद परा ... असेच पुण्यकर्म काही महिण्यांपुर्वी सौ.धागाराम वरकाढणे उर्फ || उपास || ह्यांनी चालू केल्याचे स्मरते.
अंमळ खपलो =)) =)) =))
- टारझन
मी मी आहे .. बाकी सगळे नी आहे :)
(ह.घेणे)
30 Dec 2009 - 9:33 am | विजुभाऊ
रा रा परा ( हे यमक नाहिय्ये) जी
तुम्ही हा धागा वर आणल्यामुळे अनेक साक्षात्कार झालेत.
ब्रीटीश टिंग्याने ब्रीटन सोडतासोडता( तो थोडासाच मोठा झाल्यामुळे) छोटी टिंगी हे नाव सोडून ब्रीटीश टिंगी हे नाव धारण केले. तो आता इतिहास झाला.
असो.
दुसरा साक्षात्कार हा की दोन वर्षापूर्वी नव्या वर्षाच्या निमित्ताने केलेल्या किती संकल्पांचे त्यानी आपण होऊन आणि कितींचे नाईलाजाने पालान केले याचा त्याना पत्ता आहे का? याचा अढावा त्यांच्या कडे असेलच. पिणे केले नाही कारण कोणी ऑफरच केली नाही.
( हे म्हणज ब्रम्हचारी राहिलो कारण लग्न जमत नव्हते असे म्हणण्यासारखे आहे ) असेही असु शकते.
असो.
तिसरा साक्षात्कार.
ब्रीटीश टिंगी हे आडनाव बदलून आले त्यापूर्वी त्यानी जालावर लेखन करत होते. नाव बदलल्यावर मात्र ते केवळ खरडमात्र राहिले आहेत.
या वर्षात त्यानी खरडमात्र हा हा त्यांच्या नावाला लागलेला बट्टा पुसून नवनवे बरेच काही लिहायचा रट्टा मारावा.
चौथा साक्षात्कार
मिपाच्या खजिन्यात असे बरेच काही आहे की जे वाचायचे बाकी आहे.
30 Dec 2009 - 9:55 am | आशिष सुर्वे
मूळ विषय राहिला बाजूलाच (मंडळी आपले काय काय संकल्प आहेत?)
तिच्याआयला.. चर्चापुराण भलतीकडेच चाललंय ब्वा!
माझ्या अनेक संकल्पापैकी एक संकल्प असा आहे की, 'मिपा'वर मी स्वत:चा एक तरी लेख लिहीणार.. मग तो लेख असो, कविता (!) असो , पाककॄती असो, प्रवासवर्णन असो वा अजून काही!..
एकुदा तरी माझा 'वरिजीनल' लेख लिवनारच!!
-
कोकणी फणस
30 Dec 2009 - 3:40 pm | पर्नल नेने मराठे
मंडळी आपले काय काय संकल्प आहेत?
चुचु
30 Dec 2009 - 5:10 pm | टारझन
तुमच्या मंडळीचे काय काय संकल्प आहेत ?
झुझु
30 Dec 2009 - 5:21 pm | पर्नल नेने मराठे
सढ्या आम्हाला खोकला झालाय सो झोपुन राहु घरात
खुखु
30 Dec 2009 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार
चुचु मामी,
अहो टार्या तुमच्या 'ध्यान'संकल्पा बद्दल विचारत आहे हो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
30 Dec 2009 - 6:31 pm | अवलिया
यावर्षी तरी चड्डी घालण्याचा (निदान) संकल्प करा टिंगोजीराव.
--अवलिया