'माल' वून टाक 'दीवज' (विडंबन)

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
9 Jan 2024 - 1:49 pm

मालदीववर भारतीयांचा संताप, EaseMyTrip कडून सर्व बूकिंग्स रद्द; सीईओ म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या…" | EaseMyTrip suspends all Maldives flight bookings over anti-PM Modi remarks - https://www.loksatta.com/desh-videsh/easemytrip-suspends-all-maldives-fl...

'माल' वून टाक 'दीवज',चेतवून जंग जंग,
राजसा किती मतांत, चालता टूरिझम बंद...

त्या तिथे व्हिलाव्हिलात, पेंगते अजून रात,
हाय तू करू नकोस, एवढयात दिवाळभंग...

ते तुला कसे कळेल, कोण तिकडे वळेल,
सांग का कुणी खरेच, घेतला मोदींशी पंंग !

काय हा तुझाच tweet, खवळे इथे प्रवासी,
बोल रे हळू उठेल, आयुष्यातूनी मलंग...

विडम्बनकविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

10 Jan 2024 - 8:47 pm | कर्नलतपस्वी

आता येउद्या.....

सर्वच पात्रं पात्र झाली......

चौथा कोनाडा's picture

12 Jan 2024 - 5:11 pm | चौथा कोनाडा

मस्त, झकास.... फर्मास !

मुक्त विहारि's picture

12 Jan 2024 - 6:21 pm | मुक्त विहारि

ये नया भारत हैं