✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शाळा की मंदिर

ट
टीपीके यांनी
Sun, 01/07/2024 - 13:26  ·  लेख
लेख
थोडा विस्कळीत आहे हा लेख पण समजूत घ्याल अशी अपेक्षा सध्या राम मंदिर एकदम हॉट टॉपिक आहे त्या मुळे, मंदिर कशाला त्या पेक्षा शाळा , इस्पितळे यावर खर्च केला पाहीजे अशी वाक्य परत ऐकू यायला लागली आहेत. मला खरंच माहीत नाही काय योग्य आणि अयोग्य , एखाद्यावेळेस इतिहासच याचे उत्तर देईल. पण मला मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि माणूस केंद्रित विचार करायला आवडतो. सगळीच माणसे वेगळी वेगळी असतात. त्यांचे ज्ञान आणि शिकणेही वेगळे असते. अगदी प्रज्ञा पण ९ प्रकारच्या असतात. कोणी गणित , शास्त्र लवकर शिकू शकतो, कोणी भाषा, कोणी शारीरिक कामे जसे खेळ , कोणी चित्रकला, कोणी संगीत तर कोणी शिल्पकला. त्यातही एखाद्याला चित्रकलेत गती असली म्हणजे लगेच तो पिकासो होत नाही. त्यातही प्रत्येकाची पातळी वेगळी असू शकते. काही लोकांना एकाहून अधिक विषयात गती असू शकते. समजा एखाद्याला एखाद्या विषयात गती नाही पण त्यातच शिक्षण आणि कारकीर्द करायला जबरजस्ती केली तर त्याची प्रगती होणे खूप कठीण आहे. परंतु सध्याच्या व्यवस्थेत हेच होत आहे , फक्त गणित , विज्ञान, हिशेबनीस , संगीत , अभिनय इत्यादी मोजक्याच विषयात यशस्वी कारकीर्द करता येते, पण बाकीच्यांनी काय करायचे? एका सुदृढ समाजात खरंतर सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या विषयात संधी मिळाली पाहिजे, पण त्यातील काही ठिकाणी राजाश्रय पण जरुरी असतो, म्हणून इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या यशस्वी राजाबद्दल बोलताना त्याच्या राजाबद्दल बोलताना भरभराट आणि त्याने विविध कलावंतांना दिलेला राजाश्रय आणि बांधलेली मंदिरे, विहिरी, महाल या बद्दल लिहिले असायचे. सांगण्याचा उद्देश म्हणजे जो पर्यंत अति होत नाही तो पर्यंत मंदिरे किंवा तत्सम गोष्टी समाजाच्या किंवा राजाश्रयाने बांधणे काहीच वाईट नाही. खरं तर जातीनिहाय सर्वेक्षणाऐवजी , प्रज्ञा निहाय सर्वेक्षण केले पाहिजे म्हणजे तसे शिक्षण तयार करता येईल आणि समाजाचीही अधिक गतीने प्रगती होईल आपला काय विचार ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29667 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

प्रज्ञा निहाय सर्वेक्षण

कर्नलतपस्वी
Mon, 01/08/2024 - 14:26 नवीन
मापदंड काय...
  • Log in or register to post comments

असे प्रश्न पडताहेत म्हणजे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/08/2024 - 14:43 नवीन
असे प्रश्न पडताहेत म्हणजे आपला देश बौध्दीक पातळीवर अजून बराच मागे आहे. नी आपण विश्वगूरू बनण्याची स्वप्ने पाहतोय. वाचीव रे देवा वाचीव.
  • Log in or register to post comments

'

वामन देशमुख
Mon, 01/08/2024 - 15:49 नवीन
'
शाळा की मंदिर
शाळा की मंदिर असा प्रश्न पडणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग करावा असा प्रश्न पडतो. दोन्ही गोष्टी mutually exclusive नाहीत. पुढील तुलना करून पहा - शाळा की महाविद्यालय शाळा की दवाखाना शाळा की रोजगार हमी अन्न की वस्त्र की निवारा कोलगेट की झंडू बाम अशा इतर असंख्य बदमाश / बाळबोध तुलना '
  • Log in or register to post comments

बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग

वामन देशमुख
Mon, 01/15/2024 - 14:21 नवीन
शाळा की मंदिर असा प्रश्न पडणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग करावा असा प्रश्न पडतो.
चर्चा खूप झाली, पण हा प्रश्न काही अजून सुटला नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

कधीच सूटलाय. कर्मठ

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 14:49 नवीन
कधीच सूटलाय. कर्मठ मनूवाद्यांना मंदीर हवंय तर हिॅदूंना शाळआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

>>> कर्मठ मनूवाद्यांना मंदीर

वामन देशमुख
Mon, 01/15/2024 - 19:41 नवीन
>>> कर्मठ मनूवाद्यांना मंदीर हवंय तर हिॅदूंना शाळआ. छान विनोद करत आहात, अजून येऊ द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हिंदू सुधारतोय/सुधारलाय हा

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 19:50 नवीन
हिंदू सुधारतोय/सुधारलाय हा तुम्हाला विनोद वाटतोय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हिंदूंना मंदिर नको आहे

वामन देशमुख
Tue, 01/16/2024 - 03:57 नवीन
हिंदूंना मंदिर नको आहे म्हणताय? बालदिन साजरा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ह शाळा नी मंदिर विचारलं तर

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/16/2024 - 08:50 नवीन
ह शाळा नी मंदिर विचारलं तर आम्ही हिंदू शाळा मागू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

मंदिर सनातनींना हवं असतं.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/16/2024 - 08:51 नवीन
मंदिर सनातनींना हवं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस

विवेकपटाईत
Mon, 01/08/2024 - 17:33 नवीन
लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस, हज अनुदान का दिले जातात, असे प्रश्न मनात येत नाही. देशांत धार्मिक मदरस्यांना हजारों कोटी दिले जातात.काही राज्यांत मौलवी आणि इतर कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. तेंव्हा प्रश्न मनात येतच नाही. हिंदू मंदिरांचा काही हजार कोटी राज्य सरकार वापरतात तेंव्हा मंदिरांचा पैसा सरकार का वापरते, मनात प्रश्न येत नाही. हिंदू स्व:खर्चाने मंदिर बांधतात. तेंव्हाच मनात प्रश्न येतात. बाकी हिंदू मंदिरे बिना धार्मिक भेदभाव शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल चालवतात,तेंव्हा मनात प्रश्न येत नाही. रोज लाखों लोकांची भूक मंदिरे भागवितात, लाखो गरीब मुलींच्या लग्नाचा खर्च ( त्यात इतर धर्मीय ही असतात) मंदिरे उचलतात, तेंव्हा मनात प्रश्न येत नाही. आज हिंदूंच्या मंदिरांचा धार्मिक पर्यटन आणि व्यापार सात लाख कोटीहून जास्त आहे. आज उत्तम रस्ते रेल्वे विमानतळ बांधले जात आहे.पाच वर्षांत १५ लाख कोटींच्या वर होईल. देशात सर्वात जास्त रोजगार देणारा प्रकल्प म्हणजे हिंदूंची मंदिरांचे दर्शन पर्यटन इतिहासाचे सांगतो, मंदिर अर्थव्यवस्थेची धुरी होती. मंदिर सोबत धर्मशाळा, विहीर तलाव गुरुकुल, व्यापारिक केंद्र इत्यादी राहत असे. पूर्वी सामाजिक आणि आर्थिक समरसता मंदिरांच्या माध्यमातून साध्य होत होती आणि आज ही होते.
  • Log in or register to post comments

+१०८

वामन देशमुख
Mon, 01/08/2024 - 19:32 नवीन
मंदिर अर्थव्यवस्थेची धुरी होती. मंदिर सोबत धर्मशाळा, विहीर तलाव गुरुकुल, व्यापारिक केंद्र इत्यादी राहत असे. पूर्वी सामाजिक आणि आर्थिक समरसता मंदिरांच्या माध्यमातून साध्य होत होती आणि आज ही होते
शतशः सहमत. पण, गाढवाला गुळाची चव काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

काय बनवा बनवी चालली आहे

सर टोबी
Mon, 01/08/2024 - 21:10 नवीन
या आयडी कडून. एक्स्पर्ट मार्केट रिसर्च कडून धार्मिक पर्यटनाच्या बाजारपेठेचा धांडोळा घेतला गेलाय. हि संपूर्ण बाजारपेठ आजघडीला ४.८४ लाख कोटींची आहे आणि यात सर्व धर्मियांचा देश आणि परदेश प्रवास आणि त्या निमित्ताने होणारा खर्च यांचा समावेश आहे. पटाईत साहेबांच्या कथित अनुमानापेक्षा हि रक्कम सहजच दीड लाख कोटींहून कमी आहे. हि रक्कम जवळपास भारतीय लष्कराच्या वार्षिक अंदाजपत्रकाएवढी असावी. धार्मिक पर्यटनची बाजारपेठ सरासरी दहा टक्के वेगाने वाढत आहे. म्हणजे पटाईत काकांचा पंधरा लाख कोटींचा अंदाजही निव्वळ कल्पनाविलास आहे. बाकी भारत सरकार मंदिरांचा पैसा वापरते यावर पटाईत काका नेमकं भाष्य करतील का? धार्मिक संस्थांवरील करातून कोणत्याही धर्माला सुट नाही असं आंतरजालावरील माहितीतून दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

तुम्ही दिलेल्या आकड्यात फक्त

विवेकपटाईत
Tue, 01/09/2024 - 09:50 नवीन
तुम्ही दिलेल्या आकड्यात फक्त ट्रान्सपोर्टचा आणि हॉटेल खर्च आहे इतर व्यवसाय भागातील शेती भाजीपाला दुग्ध सर्व प्रकारचे लघु उद्योग वस्त्र उद्योग इत्यादीही साडे तीन लाख कोटी होतो.बाकी पुढील पाच वर्षांत वाढत्या जीवनमान आणि उन्नत रस्ते रेल्वे मुळे १५ लाखच्या वर सहज जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

आपल्या माहितीचा स्रोत कोणता आहे?

सर टोबी
Tue, 01/09/2024 - 10:43 नवीन
इतकी धुव्वाधार आकडे फेकत आहात तर स्रोत स्पष्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

बाकी भारत सरकार मंदिरांचा

अहिरावण
Tue, 01/09/2024 - 10:41 नवीन
बाकी भारत सरकार मंदिरांचा पैसा वापरते यावर पटाईत काका नेमकं भाष्य करतील का? धार्मिक संस्थांवरील करातून कोणत्याही धर्माला सुट नाही असं आंतरजालावरील माहितीतून दिसते. आंतरजालापेक्षा एखाद्या मोठ्या मंदिराच्या विश्वस्त किंवा लेखा परिक्षकाला समक्ष भेटला असता तर बरे झाले असते असे सुचवतो. तसेच एखाद्या मदरसा, वक्फच्या अधिका-याला भेटलात तर बरीच माहिती मिळेल. चाटजीपीटी पेक्षा प्रत्यक्ष चाट केलेले बरे.. कसे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

अहिरावण

सर टोबी
Wed, 01/10/2024 - 13:31 नवीन
पटाईत यांच्या मुद्द्यांचा मी मला माहित झालेल्या माहितीच्या आधारावर समाचार घेतला आहे आणि त्या माहितीचा स्रोत देखील सांगितला आहे. तुम्हाला माझ्या मताचा प्रतिवाद करायचा असेल तर तो याच पद्धतीने करावा अशी अपेक्षा आहे. याला भेटा, त्याला माहिती विचारा असा शहाजोगपणाचा सल्ला देऊ नये. कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

त्यांचं तसंच आहे. सरकारवर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/10/2024 - 14:05 नवीन
त्यांचं तसंच आहे. सरकारवर टिका केली की ह्याला जाऊन भेटा त्याला जाऊन भेटा. ह्याची बुध्दी काढ त्याची काढ. पीव्वर प्रातशाखीय विचारसरणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

अरे नका भेटू जबरदस्ती नाही.

अहिरावण
Sat, 01/13/2024 - 13:57 नवीन
अरे नका भेटू जबरदस्ती नाही. पण उगा काही टिका करु नका. अर्थात तुम्हाला काही फरक पडत नाही. कारण तुम्ही महान पुरोगामी आहात. तुम्हाला वंदन करतो. खुश? आता तरी ओका-या बंद करा हिंदूंवरच्या !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अरेरे

अहिरावण
Sat, 01/13/2024 - 13:55 नवीन
रागावलांत का? राग चांगला नसतो. काळ्या मनुका भिजवून सकाळी खात जा. पित्त कमी होईल राग चिडचिड कमी होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

गोरा मनूका खाल्ला तर काय होईल

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 14:50 नवीन
गोरा मनूका खाल्ला तर काय होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

गोरी मनुका नसते. काळी असते

अहिरावण
Mon, 01/15/2024 - 19:50 नवीन
गोरी मनुका नसते. काळी असते किंवा तपकिरी. तपकिरी सर्वसाधरण बेदाणा नावाने परिचित आहे. पांढरी द्राक्षे नसत्तात त्यामुळे गोरी मनुका बनत नसते. आपली शिकण्याची अभिलाषा छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

शाळा की मदिरालये असा प्रश्न

अहिरावण
Mon, 01/08/2024 - 19:47 नवीन
शाळा की मदिरालये असा प्रश्न नाही पडला तुम्हाला कधी?
  • Log in or register to post comments

आलयं....

कर्नलतपस्वी
Mon, 01/08/2024 - 22:13 नवीन
देवालय,विद्यालय,मदिरालय सर्वच चांगली. भक्ताने ठरवायचंय कुठे रमायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

दक्षिणा

उनाड
Mon, 01/08/2024 - 20:14 नवीन
समाजातील ज्या वर्गाला काहीही न करता देवळात बसून दक्षिणा मिळते तो वर्ग मंदीरेच बांधा असे म्हणणार, शाळा वाढल्या व लोक विवेके झाले व दक्षिणा बंद झाल्या तर ? फॉलो द मनी !
  • Log in or register to post comments

आकडेवारी आहे का ...

नठ्यारा
Mon, 01/08/2024 - 22:34 नवीन
उनाड, तुम्ही फॉलो द मनी असं सुचवता आहात. तर मग जो काहीही न करता देवळात बसून दक्षिणा मिळणारा वर्ग आहे, त्यासंबंधी काही आकडेवारी आहे का? मला तरी हिंदू देवळांत असा काही वर्गबिर्ग आढळून आला नाही. मात्र पोपच्या कळपांत असे अनेक नमुने दिसून येतात. त्यांना रोमन क्याथलिक प्रिन्स म्हणतात. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.catholicculture.org/culture/library/dictionary/index.cfm?id=35782 -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

+१ ऊनाड

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 09:04 नवीन
+१ ऊनाड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

शाळा उघडण्यासाठी मंदिर

विवेकपटाईत
Tue, 01/09/2024 - 09:54 नवीन
शाळा उघडण्यासाठी मंदिर बांधावे लागतात. बाकी मोठे मंदिरे सरकारी किंवा ट्रस्ट चे असतात. मंदिर हीते म्हणून कारोना काळात कुणी उपाधी राहिले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

मंदिर हीते म्हणून कारोना

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 10:06 नवीन
मंदिर हीते म्हणून कारोना काळात कुणी उपाधी राहिले नाही. दिल्ली नी महाराष्ट्रात मंदिरे बंदं होती तिथे अनूक्रमे केजरीवाल नी ऊध्दव ठाकरे हेच देवरूपाने लोकांसाठी धीवून येऊन कुणालाही ऊपाशी ठेवले नाही तिथे मंदीरे धावून आली नाहीत. मंदिरे हे फक्त काही लोकांची दक्षीणा घेऊन पोट भरण्याची जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

खिक्क

अहिरावण
Tue, 01/09/2024 - 10:38 नवीन
करोना काळात केंद्र सरकारने (तिथे कोण होते हे इंटरनेटवर कळेल) गरीबांसाठी राज्यसरकार जे रेशनवर अंत्योदय (३५ किलो) आणि प्राधान्य लाभार्थी (माणशी ३ किलो गहू + २ किलो तांदूळ) धान्य देते त्यात केंद्राची भर म्हणुन अतिरिक्त मोफत धान्य दिले. महाराष्ट्रात तेच मोफत धान्य फक्त महाराष्ट्राचे म्हणून दिले गेले आणि आधी उल्लेखलेले दिलेच नाही. तेव्हा कोण मुख्यमंत्री होते ते इंटरनेटवर क्ळेलच राहाता राहिली दिल्लीचि बाब-- करोनाकाळातील दारुचा घोटाळाच सध्या चर्चेत आहे.. ज्यांना वाटते की मंदिरे पोट भरण्याची जागा आहे त्यांच्यासाठी विशेष माहिती - सध्या बांधकाम चालू असलेले राममंदीर, तिथे काम करत असलेले सर्व जण विशिष्टच "काही" लोक आहेत आणि त्यांनी सगळ्या देशाला वेठीस धरले आहे. चला ते नरकात जावे यासाठी आपण प्रार्थना करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

केंद्राने राज्याचा जीएसटी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 12:37 नवीन
केंद्राने राज्याचा जीएसटी अडवून धरला होता. वरून एक रूपयाची मदत नाही. फक्त त्रास देणेच सुरू होते. गुजरातला रेमडेसूवीर का नाही म्हणून इथल्या सरकारशी भांडनारेही पाहीले. कोरोना नी केंद्र अश्या अस्मानी नी सूलतानी संकटातून महाराष्ट्र वाचवनारे मुख्यमंत्री ठाकरे नी केजरीवाल होते. ना मंदिर कामी आले ना कोणी पुजारी कामी आला. कामी आली ती फक्त आपली माणसे….!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

असो. राजकिय होईल. पण देवरूपी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 12:40 नवीन
असो. राजकिय होईल. पण देवरूपी माणसे ही खरी मंदिरे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

>>>केंद्राने राज्याचा जीएसटी

अहिरावण
Tue, 01/09/2024 - 14:15 नवीन
>>>केंद्राने राज्याचा जीएसटी अडवून धरला होता आपल्या बौद्धिक क्षमतेबद्दल आदर आहेच. फक्त एक विनंती - आपल्या आजुबाजुला कुणी जीएसटी भरणारा व्यापारी, उद्योजक, सेवापुरवठादार असेल तर करोना काळात त्यांनी जीएस्टी भरणा आणि रिटर्न सादर केले होते की केंद्राने यासाठी खुप मोठी मुदत देऊन करोना काळात व्यापारी, उद्योजक, सेवापुरवठादार यांना सवलत दिली होती ते तपासा. आणि मग जर रिटर्न सादर झाले नसतील तरी राज्याचा वाटा किती आणि कसा द्यायचा, हे कसे करायला हवे होते याबद्दल एक अहवाल तुम्ही तयार करा. आपल्या अहवालाची प्रतिक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

असूद्या सर. केंद्राने जीएसटी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 17:31 नवीन
असूद्या सर. केंद्राने जीएसटी का अडवला होता हे सर्व जगाला माहीतीय. का ऊगाच ह्याला विचारा न त्याला विचारा….?? कितीही केंद्राची लाल म्हणा खरं लपून राहत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

हा हा हा

अहिरावण
Wed, 01/10/2024 - 10:55 नवीन
हा हा हा जरा डोकं लावा म्ह्टलं तर तुमचि तंतरली... चालू द्या तुमचे ओका-या काढणे.. लवकर बरे व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

साहेब त्या id ला प्रतिसाद नका

धनावडे
Tue, 01/09/2024 - 18:30 नवीन
साहेब त्या id ला प्रतिसाद नका देत बसू, तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

+१ आणी आपल्या लाडक्या

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 18:41 नवीन
+१ आणी आपल्या लाडक्या केंद्राच्या (नसलेल्या) अब्रूचे धिंडवडे ही निघनार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

भुजबळ बुवा

सुबोध खरे
Tue, 01/09/2024 - 18:48 नवीन
भुजबळ बुवा लांब लांब फेकण्यापेक्षा काही ठोस पुरावा दुवा वगैरे देता येईल का कि केंद्र सरकारने निधी अडवला होता ? उगाच झाझू किंवा तत्सम भंपक माणसांची वक्तव्ये देऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

झाझू?? हे काय आहे??

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 19:02 नवीन
झाझू?? हे काय आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरे साहेब, तुम्हाला तुमच्या

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 19:10 नवीन
खरे साहेब, तुम्हाला तुमच्या सोयीचे पुरावे हवे असतात. म्हणजे पहा झाझू वर तूमचा आजिबात विश्वास नाही पण भंपक फेकूवर १०० टक्के आहे. झाझूने तुम्हाला मीठ दिलं तरी तुम्ही अळणी म्हणाल पण फेकूने साखर म्हणून मीठ खायला दिलं तरी तुम्हाला गोड लागेल. मागे चीनने भारतावर केलेल्या अतिक्रमणाचे पुरावे खुद्द भाजप खासदाराने दिले तरीही तुम्हाला पटले नाहीत. आता २०१९ ला केंद्राने भर कोरोनात जीएसटी अडवला होता ह्याच्या असंख्य बातम्या गुगलला आहेत खुद्द स्वच्छ चारीत्र्याचे सध्याच्या राज्यातील भाजपच्या सरकारातील ऊपमुख्यमंत्री अजीतदादा पवार ह्यांचेही वक्तव्य आहेत अगदी आकडेवारीसहीत म्हणजे फक्त शिवसेनेच्या लोकांचे नाहीत बरका. पण आता तुम्हाला “सोयीचेच“ पुरावे हवे असतील तर ते मी नाही देऊ शकत. गुगलवर सर्व ऊपलब्ध आहे शोधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा हा हा

सुबोध खरे
Tue, 01/09/2024 - 19:35 नवीन
हा हा हा वाटलंच मला. नक्की कोणताही पुरावा न देता लांब लांब फेकणार असो चालू द्या तुमचं वैचारिक बद्धकोष्ठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

२०१९ ला केंद्राने भर कोरोनात

अहिरावण
Wed, 01/10/2024 - 10:59 नवीन
२०१९ ला केंद्राने भर कोरोनात जीएसटी अडवला होता हे असं असतं बघा तुमचं ! शेंडा ना बुडुख... संतापात काहीही लिहिता आणि बरळता... :) २०१९ ला कोरोना नव्हता. विषय संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

२०१९ ला आणी नंतर भर कोरोनातही

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/10/2024 - 11:27 नवीन
२०१९ ला आणी नंतर भर कोरोनातही अडवला होता, गुगललं असतं तर कळालं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अगदी बरोबर. योग्य तर्क आणि

अहिरावण
Wed, 01/10/2024 - 10:57 नवीन
अगदी बरोबर. योग्य तर्क आणि बुद्धीमत्ता यांचा सुयोग्य वापर करुन नेमके शब्द वापरुन मी लिहिलेल्या प्रतिसादाला प्रतिवाद करणे म्हणजे उर्जा आणि वेळ घालवणे. धनावडे तुमचा सल्ला योग्य आहे. पण ते ऐकणार नाहीत... जाऊ द्या ! तुम्ही नका मनावर घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

साहेब तुम्हाला उद्देशून नाही

धनावडे
Wed, 01/10/2024 - 11:28 नवीन
साहेब तुम्हाला उद्देशून नाही तो प्रतिसाद, बाहुबली ना प्रतिसाद नका देत बसू असं म्हणायचं होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

असो. चर्चा राजकिय दिशेने

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 19:14 नवीन
असो. चर्चा राजकिय दिशेने जातेय नी सध्या मिपावर राजकिय चर्चांना बंदी आहे. सांगायचा ऊद्देश एवढाच की संकटकाळी मंदिरे बंदं होती नी अश्यावेळी दिल्ली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अस्मानी नी “सुलतानी” संकंटं झेलून महाराष्ट्र नी दिल्ली वाचवली. त्यामुळे वर “दिल्लीकर” विवेक पटाईत साहेबांनी मंदिरांनी संकटकाळी मदत केली / माणसे वाचवली अश्या प्रकारचं काहीतरी लिहीलंय ते खोटंय एवढंच सांगणंय. मंदिर फक्त काही लोंकांचं पोट भरायचं साधन आहे. एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा!
  • Log in or register to post comments

दिल्ली, महाराष्ट्राच्या

सुबोध खरे
Tue, 01/09/2024 - 19:39 नवीन
दिल्ली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अस्मानी नी “सुलतानी” संकंटं झेलून महाराष्ट्र नी दिल्ली वाचवली. हायला महाराष्ट बुडणार होता कि काय? आमच्या सारख्या कुणाला कधीच कळलं कसं नाही? तरी बरं आम्ही कोमट पाणी पिऊन घरात बसून वर्क फ्रॉम होम मधले नसून प्रत्यक्ष जमिनीवर बसून काम करणार्यातील होतो. बाकी भुजबळ बुवा म्हणजे लांब लांब फेकणारे म्हणून प्रसिद्ध आहेतच त्यातून संक्रांतीचा सण जवळ आलाच आहे. लांब लांब लपेटा मारा. आम्ही हसतो आहोतच.
  • Log in or register to post comments

डाॅक्टर साहेब तुम्ही ऊच्चभ्रू

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/09/2024 - 19:56 नवीन
डाॅक्टर साहेब तुम्ही ऊच्चभ्रू मुंबईत राहनारे. गाव खेड्यात छोट्या शहरांत, स्थलांतरीतात काय परिस्थीती होती हे तुम्हाला कसे कळनार?? मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही मुंबई बाहेर प्रवास केला होता का?? नाहीच. त्यामुळेच तुम्हाला हसु येत असनार. पण ज्यांनी परिस्थीती पाहीली, भोगली त्यांना विचारा. पुण्याच्या फ्लॅटमध्ये पाय पसरून शेतकरी कायदे शेतकर्यांच्या कसे हिताचे आहेत हे मागच्या चार पिढ्यांत शेती न पाहिलेले लोक सोमीवर सांगत होते तसं तुमचं नाही हे मला माहीतीय कारण कोरोना काळात डोक्टर खुप राबलेत हे मला माहीतीय. पण तुमच्या महाराष्ट्र बुडनार होता की काय ह्या प्रश्नाला हेच ऊत्तर आहे की हो. नाशकात ओक्सिजन अभावी रूग्ण मेले, बेडअभावी असंख्य रूग्ण ठिकठिकाणी मेले, लोक दवाखान्यांच्या आवारात ही पडून होते, रूग्णांचे नातेवाईक अक्षरशः दिसेल त्याचे पाय पडत होते. ही महाराष्ट्र बुडनार असल्यासारखीच परिस्थीती होती. केंद्राने जीएसटी अडवला होता/ गुजरातला रेमडीसावीर नाही म्हणून काही नेते अंगावर धावत होते तरीही अश्या परिस्थीतीत राज्य खमकेपणाने ज्यांनी सांभाळले नी महाराष्ट्र वाचवला अश्या लोकांचे ऊपकार महाराष्ट्र विसरनार नाही. तशीही महाराष्ट्राला एकाचवेळी अस्मानी सुलतानी संकंटं झेलायची सवय आहे नी त्या त्या वेळी खमक्या लोकांनी महाराष्ट्र सांभाळल्याचा ईतिहास आहे अगदी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणी ह्यांच्यापासून ते ऊध्दव ठाकरेंपर्यंतचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काय ठरलं मग ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/10/2024 - 07:21 नवीन
:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मधला मार्ग निवडूयात. मदिरालये

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/10/2024 - 08:05 नवीन
मधला मार्ग निवडूयात. मदिरालये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा