थोडा विस्कळीत आहे हा लेख पण समजूत घ्याल अशी अपेक्षा
सध्या राम मंदिर एकदम हॉट टॉपिक आहे त्या मुळे, मंदिर कशाला त्या पेक्षा शाळा , इस्पितळे यावर खर्च केला पाहीजे अशी वाक्य परत ऐकू यायला लागली आहेत. मला खरंच माहीत नाही काय योग्य आणि अयोग्य , एखाद्यावेळेस इतिहासच याचे उत्तर देईल. पण मला मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि माणूस केंद्रित विचार करायला आवडतो.
सगळीच माणसे वेगळी वेगळी असतात. त्यांचे ज्ञान आणि शिकणेही वेगळे असते. अगदी प्रज्ञा पण ९ प्रकारच्या असतात. कोणी गणित , शास्त्र लवकर शिकू शकतो, कोणी भाषा, कोणी शारीरिक कामे जसे खेळ , कोणी चित्रकला, कोणी संगीत तर कोणी शिल्पकला. त्यातही एखाद्याला चित्रकलेत गती असली म्हणजे लगेच तो पिकासो होत नाही. त्यातही प्रत्येकाची पातळी वेगळी असू शकते. काही लोकांना एकाहून अधिक विषयात गती असू शकते.
समजा एखाद्याला एखाद्या विषयात गती नाही पण त्यातच शिक्षण आणि कारकीर्द करायला जबरजस्ती केली तर त्याची प्रगती होणे खूप कठीण आहे. परंतु सध्याच्या व्यवस्थेत हेच होत आहे , फक्त गणित , विज्ञान, हिशेबनीस , संगीत , अभिनय इत्यादी मोजक्याच विषयात यशस्वी कारकीर्द करता येते, पण बाकीच्यांनी काय करायचे?
एका सुदृढ समाजात खरंतर सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या विषयात संधी मिळाली पाहिजे, पण त्यातील काही ठिकाणी राजाश्रय पण जरुरी असतो, म्हणून इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या यशस्वी राजाबद्दल बोलताना त्याच्या राजाबद्दल बोलताना भरभराट आणि त्याने विविध कलावंतांना दिलेला राजाश्रय आणि बांधलेली मंदिरे, विहिरी, महाल या बद्दल लिहिले असायचे.
सांगण्याचा उद्देश म्हणजे जो पर्यंत अति होत नाही तो पर्यंत मंदिरे किंवा तत्सम गोष्टी समाजाच्या किंवा राजाश्रयाने बांधणे काहीच वाईट नाही.
खरं तर जातीनिहाय सर्वेक्षणाऐवजी , प्रज्ञा निहाय सर्वेक्षण केले पाहिजे म्हणजे तसे शिक्षण तयार करता येईल आणि समाजाचीही अधिक गतीने प्रगती होईल
आपला काय विचार ?
प्रतिक्रिया
8 Jan 2024 - 2:26 pm | कर्नलतपस्वी
मापदंड काय...
8 Jan 2024 - 2:43 pm | अमरेंद्र बाहुबली
असे प्रश्न पडताहेत म्हणजे आपला देश बौध्दीक पातळीवर अजून बराच मागे आहे. नी आपण विश्वगूरू बनण्याची स्वप्ने पाहतोय. वाचीव रे देवा वाचीव.
8 Jan 2024 - 3:49 pm | वामन देशमुख
'
शाळा की मंदिर असा प्रश्न पडणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग करावा असा प्रश्न पडतो.
दोन्ही गोष्टी mutually exclusive नाहीत.
पुढील तुलना करून पहा -
शाळा की महाविद्यालय
शाळा की दवाखाना
शाळा की रोजगार हमी
अन्न की वस्त्र की निवारा
कोलगेट की झंडू बाम
अशा इतर असंख्य बदमाश / बाळबोध तुलना
'
15 Jan 2024 - 2:21 pm | वामन देशमुख
चर्चा खूप झाली, पण हा प्रश्न काही अजून सुटला नाही!
15 Jan 2024 - 2:49 pm | अमरेंद्र बाहुबली
कधीच सूटलाय. कर्मठ मनूवाद्यांना मंदीर हवंय तर हिॅदूंना शाळआ.
15 Jan 2024 - 7:41 pm | वामन देशमुख
>>> कर्मठ मनूवाद्यांना मंदीर हवंय तर हिॅदूंना शाळआ.
छान विनोद करत आहात, अजून येऊ द्या!
15 Jan 2024 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली
हिंदू सुधारतोय/सुधारलाय हा तुम्हाला विनोद वाटतोय??
16 Jan 2024 - 3:57 am | वामन देशमुख
हिंदूंना मंदिर नको आहे म्हणताय?
बालदिन साजरा करा.
16 Jan 2024 - 8:50 am | अमरेंद्र बाहुबली
ह शाळा नी मंदिर विचारलं तर आम्ही हिंदू शाळा मागू.
16 Jan 2024 - 8:51 am | अमरेंद्र बाहुबली
मंदिर सनातनींना हवं असतं.
8 Jan 2024 - 5:33 pm | विवेकपटाईत
लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस, हज अनुदान का दिले जातात, असे प्रश्न मनात येत नाही. देशांत धार्मिक मदरस्यांना हजारों कोटी दिले जातात.काही राज्यांत मौलवी आणि इतर कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. तेंव्हा प्रश्न मनात येतच नाही.
हिंदू मंदिरांचा काही हजार कोटी राज्य सरकार वापरतात तेंव्हा मंदिरांचा पैसा सरकार का वापरते, मनात प्रश्न येत नाही.
हिंदू स्व:खर्चाने मंदिर बांधतात. तेंव्हाच मनात प्रश्न येतात.
बाकी हिंदू मंदिरे बिना धार्मिक भेदभाव शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल चालवतात,तेंव्हा मनात प्रश्न येत नाही.
रोज लाखों लोकांची भूक मंदिरे भागवितात, लाखो गरीब मुलींच्या लग्नाचा खर्च ( त्यात इतर धर्मीय ही असतात) मंदिरे उचलतात, तेंव्हा मनात प्रश्न येत नाही.
आज हिंदूंच्या मंदिरांचा धार्मिक पर्यटन आणि व्यापार सात लाख कोटीहून जास्त आहे. आज उत्तम रस्ते रेल्वे विमानतळ बांधले जात आहे.पाच वर्षांत १५ लाख कोटींच्या वर होईल. देशात सर्वात जास्त रोजगार देणारा प्रकल्प म्हणजे हिंदूंची मंदिरांचे दर्शन पर्यटन
इतिहासाचे सांगतो, मंदिर अर्थव्यवस्थेची धुरी होती. मंदिर सोबत धर्मशाळा, विहीर तलाव गुरुकुल, व्यापारिक केंद्र इत्यादी राहत असे. पूर्वी सामाजिक आणि आर्थिक समरसता मंदिरांच्या माध्यमातून साध्य होत होती आणि आज ही होते.
8 Jan 2024 - 7:32 pm | वामन देशमुख
शतशः सहमत.
पण, गाढवाला गुळाची चव काय?
8 Jan 2024 - 9:10 pm | सर टोबी
या आयडी कडून. एक्स्पर्ट मार्केट रिसर्च कडून धार्मिक पर्यटनाच्या बाजारपेठेचा धांडोळा घेतला गेलाय. हि संपूर्ण बाजारपेठ आजघडीला ४.८४ लाख कोटींची आहे आणि यात सर्व धर्मियांचा देश आणि परदेश प्रवास आणि त्या निमित्ताने होणारा खर्च यांचा समावेश आहे. पटाईत साहेबांच्या कथित अनुमानापेक्षा हि रक्कम सहजच दीड लाख कोटींहून कमी आहे. हि रक्कम जवळपास भारतीय लष्कराच्या वार्षिक अंदाजपत्रकाएवढी असावी. धार्मिक पर्यटनची बाजारपेठ सरासरी दहा टक्के वेगाने वाढत आहे. म्हणजे पटाईत काकांचा पंधरा लाख कोटींचा अंदाजही निव्वळ कल्पनाविलास आहे.
बाकी भारत सरकार मंदिरांचा पैसा वापरते यावर पटाईत काका नेमकं भाष्य करतील का? धार्मिक संस्थांवरील करातून कोणत्याही धर्माला सुट नाही असं आंतरजालावरील माहितीतून दिसते.
9 Jan 2024 - 9:50 am | विवेकपटाईत
तुम्ही दिलेल्या आकड्यात फक्त ट्रान्सपोर्टचा आणि हॉटेल खर्च आहे इतर व्यवसाय भागातील शेती भाजीपाला दुग्ध सर्व प्रकारचे लघु उद्योग वस्त्र उद्योग इत्यादीही साडे तीन लाख कोटी होतो.बाकी पुढील पाच वर्षांत वाढत्या जीवनमान आणि उन्नत रस्ते रेल्वे मुळे १५ लाखच्या वर सहज जाईल.
9 Jan 2024 - 10:43 am | सर टोबी
इतकी धुव्वाधार आकडे फेकत आहात तर स्रोत स्पष्ट करा.
9 Jan 2024 - 10:41 am | अहिरावण
बाकी भारत सरकार मंदिरांचा पैसा वापरते यावर पटाईत काका नेमकं भाष्य करतील का? धार्मिक संस्थांवरील करातून कोणत्याही धर्माला सुट नाही असं आंतरजालावरील माहितीतून दिसते.
आंतरजालापेक्षा एखाद्या मोठ्या मंदिराच्या विश्वस्त किंवा लेखा परिक्षकाला समक्ष भेटला असता तर बरे झाले असते असे सुचवतो. तसेच एखाद्या मदरसा, वक्फच्या अधिका-याला भेटलात तर बरीच माहिती मिळेल. चाटजीपीटी पेक्षा प्रत्यक्ष चाट केलेले बरे.. कसे !!
10 Jan 2024 - 1:31 pm | सर टोबी
पटाईत यांच्या मुद्द्यांचा मी मला माहित झालेल्या माहितीच्या आधारावर समाचार घेतला आहे आणि त्या माहितीचा स्रोत देखील सांगितला आहे. तुम्हाला माझ्या मताचा प्रतिवाद करायचा असेल तर तो याच पद्धतीने करावा अशी अपेक्षा आहे. याला भेटा, त्याला माहिती विचारा असा शहाजोगपणाचा सल्ला देऊ नये. कसं?
10 Jan 2024 - 2:05 pm | अमरेंद्र बाहुबली
त्यांचं तसंच आहे. सरकारवर टिका केली की ह्याला जाऊन भेटा त्याला जाऊन भेटा. ह्याची बुध्दी काढ त्याची काढ. पीव्वर प्रातशाखीय विचारसरणी.
13 Jan 2024 - 1:57 pm | अहिरावण
अरे नका भेटू जबरदस्ती नाही. पण उगा काही टिका करु नका. अर्थात तुम्हाला काही फरक पडत नाही. कारण तुम्ही महान पुरोगामी आहात. तुम्हाला वंदन करतो.
खुश?
आता तरी ओका-या बंद करा हिंदूंवरच्या !!!!
13 Jan 2024 - 1:55 pm | अहिरावण
रागावलांत का? राग चांगला नसतो. काळ्या मनुका भिजवून सकाळी खात जा. पित्त कमी होईल राग चिडचिड कमी होईल
15 Jan 2024 - 2:50 pm | अमरेंद्र बाहुबली
गोरा मनूका खाल्ला तर काय होईल?
15 Jan 2024 - 7:50 pm | अहिरावण
गोरी मनुका नसते. काळी असते किंवा तपकिरी. तपकिरी सर्वसाधरण बेदाणा नावाने परिचित आहे.
पांढरी द्राक्षे नसत्तात त्यामुळे गोरी मनुका बनत नसते.
आपली शिकण्याची अभिलाषा छान आहे.
8 Jan 2024 - 7:47 pm | अहिरावण
शाळा की मदिरालये असा प्रश्न नाही पडला तुम्हाला कधी?
8 Jan 2024 - 10:13 pm | कर्नलतपस्वी
देवालय,विद्यालय,मदिरालय सर्वच चांगली. भक्ताने ठरवायचंय कुठे रमायचं.
8 Jan 2024 - 8:14 pm | उनाड
समाजातील ज्या वर्गाला काहीही न करता देवळात बसून दक्षिणा मिळते तो वर्ग मंदीरेच बांधा असे म्हणणार, शाळा वाढल्या व लोक विवेके झाले व दक्षिणा बंद झाल्या तर ? फॉलो द मनी !
8 Jan 2024 - 10:34 pm | नठ्यारा
उनाड,
तुम्ही फॉलो द मनी असं सुचवता आहात. तर मग जो काहीही न करता देवळात बसून दक्षिणा मिळणारा वर्ग आहे, त्यासंबंधी काही आकडेवारी आहे का? मला तरी हिंदू देवळांत असा काही वर्गबिर्ग आढळून आला नाही. मात्र पोपच्या कळपांत असे अनेक नमुने दिसून येतात. त्यांना रोमन क्याथलिक प्रिन्स म्हणतात. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.catholicculture.org/culture/library/dictionary/index.cfm?id=...
-नाठाळ नठ्या
9 Jan 2024 - 9:04 am | अमरेंद्र बाहुबली
+१ ऊनाड
9 Jan 2024 - 9:54 am | विवेकपटाईत
शाळा उघडण्यासाठी मंदिर बांधावे लागतात. बाकी मोठे मंदिरे सरकारी किंवा ट्रस्ट चे असतात. मंदिर हीते म्हणून कारोना काळात कुणी उपाधी राहिले नाही.
9 Jan 2024 - 10:06 am | अमरेंद्र बाहुबली
मंदिर हीते म्हणून कारोना काळात कुणी उपाधी राहिले नाही.
दिल्ली नी महाराष्ट्रात मंदिरे बंदं होती तिथे अनूक्रमे केजरीवाल नी ऊध्दव ठाकरे हेच देवरूपाने लोकांसाठी धीवून येऊन कुणालाही ऊपाशी ठेवले नाही तिथे मंदीरे धावून आली नाहीत. मंदिरे हे फक्त काही लोकांची दक्षीणा घेऊन पोट भरण्याची जागा आहे.9 Jan 2024 - 10:38 am | अहिरावण
करोना काळात केंद्र सरकारने (तिथे कोण होते हे इंटरनेटवर कळेल) गरीबांसाठी राज्यसरकार जे रेशनवर अंत्योदय (३५ किलो) आणि प्राधान्य लाभार्थी (माणशी ३ किलो गहू + २ किलो तांदूळ) धान्य देते त्यात केंद्राची भर म्हणुन अतिरिक्त मोफत धान्य दिले. महाराष्ट्रात तेच मोफत धान्य फक्त महाराष्ट्राचे म्हणून दिले गेले आणि आधी उल्लेखलेले दिलेच नाही. तेव्हा कोण मुख्यमंत्री होते ते इंटरनेटवर क्ळेलच
राहाता राहिली दिल्लीचि बाब-- करोनाकाळातील दारुचा घोटाळाच सध्या चर्चेत आहे..
ज्यांना वाटते की मंदिरे पोट भरण्याची जागा आहे त्यांच्यासाठी विशेष माहिती -
सध्या बांधकाम चालू असलेले राममंदीर, तिथे काम करत असलेले सर्व जण विशिष्टच "काही" लोक आहेत आणि त्यांनी सगळ्या देशाला वेठीस धरले आहे.
चला ते नरकात जावे यासाठी आपण प्रार्थना करु.
9 Jan 2024 - 12:37 pm | अमरेंद्र बाहुबली
केंद्राने राज्याचा जीएसटी अडवून धरला होता. वरून एक रूपयाची मदत नाही. फक्त त्रास देणेच सुरू होते. गुजरातला रेमडेसूवीर का नाही म्हणून इथल्या सरकारशी भांडनारेही पाहीले. कोरोना नी केंद्र अश्या अस्मानी नी सूलतानी संकटातून महाराष्ट्र वाचवनारे मुख्यमंत्री ठाकरे नी केजरीवाल होते. ना मंदिर कामी आले ना कोणी पुजारी कामी आला. कामी आली ती फक्त आपली माणसे….!
9 Jan 2024 - 12:40 pm | अमरेंद्र बाहुबली
असो. राजकिय होईल. पण देवरूपी माणसे ही खरी मंदिरे असे मला वाटते.
9 Jan 2024 - 2:15 pm | अहिरावण
>>>केंद्राने राज्याचा जीएसटी अडवून धरला होता
आपल्या बौद्धिक क्षमतेबद्दल आदर आहेच.
फक्त एक विनंती - आपल्या आजुबाजुला कुणी जीएसटी भरणारा व्यापारी, उद्योजक, सेवापुरवठादार असेल तर करोना काळात त्यांनी जीएस्टी भरणा आणि रिटर्न सादर केले होते की केंद्राने यासाठी खुप मोठी मुदत देऊन करोना काळात व्यापारी, उद्योजक, सेवापुरवठादार यांना सवलत दिली होती ते तपासा.
आणि मग जर रिटर्न सादर झाले नसतील तरी राज्याचा वाटा किती आणि कसा द्यायचा, हे कसे करायला हवे होते याबद्दल एक अहवाल तुम्ही तयार करा. आपल्या अहवालाची प्रतिक्षा आहे.
9 Jan 2024 - 5:31 pm | अमरेंद्र बाहुबली
असूद्या सर. केंद्राने जीएसटी का अडवला होता हे सर्व जगाला माहीतीय. का ऊगाच ह्याला विचारा न त्याला विचारा….?? कितीही केंद्राची लाल म्हणा खरं लपून राहत नाही.
10 Jan 2024 - 10:55 am | अहिरावण
हा हा हा
जरा डोकं लावा म्ह्टलं तर तुमचि तंतरली... चालू द्या तुमचे ओका-या काढणे..
लवकर बरे व्हा
9 Jan 2024 - 6:30 pm | धनावडे
साहेब त्या id ला प्रतिसाद नका देत बसू, तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातील.
9 Jan 2024 - 6:41 pm | अमरेंद्र बाहुबली
+१ आणी आपल्या लाडक्या केंद्राच्या (नसलेल्या) अब्रूचे धिंडवडे ही निघनार नाहीत.
9 Jan 2024 - 6:48 pm | सुबोध खरे
भुजबळ बुवा
लांब लांब फेकण्यापेक्षा काही ठोस पुरावा दुवा वगैरे देता येईल का कि केंद्र सरकारने निधी अडवला होता ?
उगाच झाझू किंवा तत्सम भंपक माणसांची वक्तव्ये देऊ नका.
9 Jan 2024 - 7:02 pm | अमरेंद्र बाहुबली
झाझू?? हे काय आहे??
9 Jan 2024 - 7:10 pm | अमरेंद्र बाहुबली
खरे साहेब, तुम्हाला तुमच्या सोयीचे पुरावे हवे असतात. म्हणजे पहा झाझू वर तूमचा आजिबात विश्वास नाही पण भंपक फेकूवर १०० टक्के आहे. झाझूने तुम्हाला मीठ दिलं तरी तुम्ही अळणी म्हणाल पण फेकूने साखर म्हणून मीठ खायला दिलं तरी तुम्हाला गोड लागेल. मागे चीनने भारतावर केलेल्या अतिक्रमणाचे पुरावे खुद्द भाजप खासदाराने दिले तरीही तुम्हाला पटले नाहीत. आता २०१९ ला केंद्राने भर कोरोनात जीएसटी अडवला होता ह्याच्या असंख्य बातम्या गुगलला आहेत खुद्द स्वच्छ चारीत्र्याचे सध्याच्या राज्यातील भाजपच्या सरकारातील ऊपमुख्यमंत्री अजीतदादा पवार ह्यांचेही वक्तव्य आहेत अगदी आकडेवारीसहीत म्हणजे फक्त शिवसेनेच्या लोकांचे नाहीत बरका. पण आता तुम्हाला “सोयीचेच“ पुरावे हवे असतील तर ते मी नाही देऊ शकत. गुगलवर सर्व ऊपलब्ध आहे शोधा.
9 Jan 2024 - 7:35 pm | सुबोध खरे
हा हा हा
वाटलंच मला.
नक्की कोणताही पुरावा न देता लांब लांब फेकणार
असो
चालू द्या तुमचं वैचारिक बद्धकोष्ठ
10 Jan 2024 - 10:59 am | अहिरावण
२०१९ ला केंद्राने भर कोरोनात जीएसटी अडवला होता
हे असं असतं बघा तुमचं ! शेंडा ना बुडुख... संतापात काहीही लिहिता आणि बरळता... :)
२०१९ ला कोरोना नव्हता. विषय संपला.
10 Jan 2024 - 11:27 am | अमरेंद्र बाहुबली
२०१९ ला आणी नंतर भर कोरोनातही अडवला होता, गुगललं असतं तर कळालं असतं.
10 Jan 2024 - 10:57 am | अहिरावण
अगदी बरोबर. योग्य तर्क आणि बुद्धीमत्ता यांचा सुयोग्य वापर करुन नेमके शब्द वापरुन मी लिहिलेल्या प्रतिसादाला प्रतिवाद करणे म्हणजे उर्जा आणि वेळ घालवणे.
धनावडे तुमचा सल्ला योग्य आहे. पण ते ऐकणार नाहीत... जाऊ द्या ! तुम्ही नका मनावर घेऊ.
10 Jan 2024 - 11:28 am | धनावडे
साहेब तुम्हाला उद्देशून नाही तो प्रतिसाद, बाहुबली ना प्रतिसाद नका देत बसू असं म्हणायचं होत.
9 Jan 2024 - 7:14 pm | अमरेंद्र बाहुबली
असो. चर्चा राजकिय दिशेने जातेय नी सध्या मिपावर राजकिय चर्चांना बंदी आहे. सांगायचा ऊद्देश एवढाच की संकटकाळी मंदिरे बंदं होती नी अश्यावेळी दिल्ली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अस्मानी नी “सुलतानी” संकंटं झेलून महाराष्ट्र नी दिल्ली वाचवली. त्यामुळे वर “दिल्लीकर” विवेक पटाईत साहेबांनी मंदिरांनी संकटकाळी मदत केली / माणसे वाचवली अश्या प्रकारचं काहीतरी लिहीलंय ते खोटंय एवढंच सांगणंय. मंदिर फक्त काही लोंकांचं पोट भरायचं साधन आहे. एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो. जय
हिंद जय महाराष्ट्र जय मिपा!
9 Jan 2024 - 7:39 pm | सुबोध खरे
दिल्ली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अस्मानी नी “सुलतानी” संकंटं झेलून महाराष्ट्र नी दिल्ली वाचवली.
हायला
महाराष्ट बुडणार होता कि काय?
आमच्या सारख्या कुणाला कधीच कळलं कसं नाही?
तरी बरं आम्ही कोमट पाणी पिऊन घरात बसून वर्क फ्रॉम होम मधले नसून
प्रत्यक्ष जमिनीवर बसून काम करणार्यातील होतो.
बाकी भुजबळ बुवा म्हणजे लांब लांब फेकणारे म्हणून प्रसिद्ध आहेतच
त्यातून संक्रांतीचा सण जवळ आलाच आहे.
लांब लांब लपेटा मारा.
आम्ही हसतो आहोतच.
9 Jan 2024 - 7:56 pm | अमरेंद्र बाहुबली
डाॅक्टर साहेब तुम्ही ऊच्चभ्रू मुंबईत राहनारे. गाव खेड्यात छोट्या शहरांत, स्थलांतरीतात काय परिस्थीती होती हे तुम्हाला कसे कळनार?? मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही मुंबई बाहेर प्रवास केला होता का?? नाहीच. त्यामुळेच तुम्हाला हसु येत असनार. पण ज्यांनी परिस्थीती पाहीली, भोगली त्यांना विचारा. पुण्याच्या फ्लॅटमध्ये पाय पसरून शेतकरी कायदे शेतकर्यांच्या कसे हिताचे आहेत हे मागच्या चार पिढ्यांत शेती न पाहिलेले लोक सोमीवर सांगत होते तसं तुमचं नाही हे मला माहीतीय कारण कोरोना काळात डोक्टर खुप राबलेत हे मला माहीतीय. पण तुमच्या महाराष्ट्र बुडनार होता की काय ह्या प्रश्नाला हेच ऊत्तर आहे की हो. नाशकात ओक्सिजन अभावी रूग्ण मेले, बेडअभावी असंख्य रूग्ण ठिकठिकाणी मेले, लोक दवाखान्यांच्या आवारात ही पडून होते, रूग्णांचे नातेवाईक अक्षरशः दिसेल त्याचे पाय पडत होते. ही महाराष्ट्र बुडनार असल्यासारखीच परिस्थीती होती. केंद्राने जीएसटी अडवला होता/ गुजरातला रेमडीसावीर नाही म्हणून काही नेते अंगावर धावत होते तरीही अश्या परिस्थीतीत राज्य खमकेपणाने ज्यांनी सांभाळले नी महाराष्ट्र वाचवला अश्या लोकांचे ऊपकार महाराष्ट्र विसरनार नाही.
तशीही महाराष्ट्राला एकाचवेळी अस्मानी सुलतानी संकंटं झेलायची सवय आहे नी त्या त्या वेळी खमक्या लोकांनी महाराष्ट्र सांभाळल्याचा ईतिहास आहे अगदी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणी ह्यांच्यापासून ते ऊध्दव ठाकरेंपर्यंतचा.
10 Jan 2024 - 7:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
-दिलीप बिरुटे
10 Jan 2024 - 8:05 am | अमरेंद्र बाहुबली
मधला मार्ग निवडूयात. मदिरालये. :)
10 Jan 2024 - 8:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग़ालिब चा प्रसिद्ध शेर अर्ज है-
शराब पीने दे मस्जिद में बैठ कर,
या वो जगह बता जहाँ ख़ुदा नहीं।
-दिलीप बिरुटे
10 Jan 2024 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इकबाल या वर म्हणतो की-
"मस्जिद ख़ुदा का घर है, पीने की जगह नहीं ,
काफिर के दिल में जा, वहाँ ख़ुदा नहीं.
आणि
'ग़ालिब' तू अपना रुख मोड़ क्यों नही देता.
ज़रे-ज़रे में ख़ुदा है तू शराब छोड़ क्यों नही देता.
-दिलीप बिरुटे
( प्रमाणातला ) :)
10 Jan 2024 - 10:09 am | नावातकायआहे
बाडिस! :-)
10 Jan 2024 - 12:23 pm | टीपीके
लेख गंडलाय बहुतेक, मला जे म्हणायचे होते त्या व्यतिरिक्त इतर गोष्टींवरच चर्चा झाली. उगाच मंदिर किंवा जातीनिहाय सर्वेक्षणाबद्दल (आणि माझे यात काही ठाम मत नाही, जे नीट माहित नाही त्याबद्दल आत्ता तरी न बोललेले योग्य ) लिहिले, खरं तर ते नसले तरी हा लेख लिहिता आला असता. त्यामुळे क्षमस्व.
परत एक प्रयत्न करतो.
एक उदाहरण म्हणून शिल्पकला घ्या. तशी निरुपयोगी कला. खरं तर जगण्याची जिथे खाण्या जगण्याची भ्रांत तिथे सगळ्याच कला निरुपयोगी पण निदान संगीत , नाटक ह्या समुदायाने/समुदायाला आनंद देण्याऱ्या कला आहेत आणि त्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू शकतात. जसे प्रेरणा देणे, ज्ञान किंवा इतिहास जपणे जे रिकाम्या पोटीही जरुरी असू शकते. परंतु शिल्पकला , चित्रकला या थोड्या स्वान्तसुखाय विभागात येऊ शकतात. त्याचवेळी हेही खरं आहे की काही लोकांकडे उपजतच ह्या कला असतील. अशा लोकांना जर जबरजस्तीने इतर काम करावे लागले तर ते नीट करू शकणार नाहीत किंवा उपाशी मरू शकतील.
पूर्वीच्या काळी शिल्पकलेचे मुख्य ग्राहक म्हणजे मंदिरे किंवा महाल किंवा जसे युरोपिअन गॉथिक शैलीतील घरे. आता मात्र यातील कोणतेच ग्राहक हि कला वापरत नाहीत त्या मुळे या कलाकारांची कुचम्बणा होत असेल आणि त्यांना अर्थांजन कठीण असेल. अशा वेळी नवीन मंदिरे पारंपरिक पद्धतीने बांधली गेली तर अशा लोकांना पण स्वाभिमानी जगणे शक्य होईल असे म्हणणे होते. आणि मंदिरात वाईट काहीच नाही, ती ही अर्थव्यवस्थेत मदत करतातच. त्यांचा फक्त ब्राह्मणांनाच फायदा होतो असे नाही. अनेक दुकाने असतात जी ब्राह्मणांची नसतात, त्या साठी ज्या वस्तू बनवल्या जातात त्यांचे उत्पादन काही ब्राम्हण करत नाहीत. उलट सर्वच जातींच्या लोकांना (ब्राम्हणांपेक्षाही अधिक) मंदिरामुळे जगण्याची, कमावण्याची संधी मिळते. त्यामुळे ब्राम्हण द्वेष असल्याने मंदिर नको असा विचार फार वेडगळ विचार आहे.
असो, परत मंदिरांची अर्थव्यवस्था हा विषय नसून, वेगवेगळ्या प्रज्ञा आणि त्यांना समाजात उपलब्ध संधी या अनुषंगाने मी हा विषय मांडला होता. अजूनही मुद्दा समजावण्यात मी कमी पडलो असेन किंवा समजूनही सोयीचा नसल्याने पटत नसेल तर इग्नोरास्त्र मारा :)
10 Jan 2024 - 1:06 pm | अमरेंद्र बाहुबली
मंदिर की शाळा ह्यात शाळाच आधी असनार. असा प्रश्न तुन्हाला पडूच कसा शकतो??
10 Jan 2024 - 3:38 pm | सर टोबी
आणि रोजगाराला सहाय्य करतात हा युक्तिवादच मुळी फार तकलादू आहे. हाच युक्तिवाद पुढे कोणत्याही वादग्रस्त उद्योगांना (जसे फटाक्यांचा कारखाना) लावता येऊ शकतो ना? मंदिरांच्या निमित्ताने कलेच्या भरभराटीला चालना मिळाली हा भूतकाळ झाला. सध्याच्या काळात भरमसाठ संपत्तीचा ओघ असणारी शिर्डी आणि तिरुपती संस्थांना कलेला उत्तेजन म्हणून त्यांच्या मंदिरांचे प्रांगण देताच येणार नाही अशी परीस्थिती आहे. तरी पण घटकाभर म्हणू या कि कलेला उत्तेजन देण्यामध्ये मंदिरांचं महत्व होतं. पण आज अशा व्यासपीठांची गरज आहे का? जहांगीर आर्ट गॅलरी, एनसीपीए, भारत भवन, केंद्र आणि राज्य सरकारांची कला आणि सांस्कृतिक खाते, आणि इतर कितीतरी सरकारी आणि खाजगी व्यासपीठे उपलब्ध असतांना पर्यावरण आणि सामाजिक स्वास्थ्य यांना क्षती पोहोचवणारी मंदिरं खरंच अहमिहिकेने उभारावीत का हा प्रश्न आहे.
बाकी ईतर कितीतरी मंदिरांशी निगडित उद्योगांचा ब्राह्मणांशी काही संबंध नसतो असा काही तरी मुद्दा उपस्थित करून मंदिरं नेमकी हवीत कुणाला याचं उत्तर तुम्ही दिलंय असं समजावे का?
10 Jan 2024 - 4:09 pm | टीपीके
मुद्दा शाळा किंवा मंदिर नाहीच आहे. मुद्दा समाजातल्या प्रत्येकाला त्याच्या प्रज्ञेप्रमाणे काम मिळणे आहे. पूर्ण लेखातले शाळा किंवा मंदिर हे डिस्ट्रॅक्टर्स आहेत. तिकडे लक्ष देऊ नका. उदाहरण वाईट म्हणून मुद्दा चुकीचाच असे नसते ना?
10 Jan 2024 - 5:46 pm | गवि
असे करणे अतिशय अवघड असते. मोठ्या आकाराच्या समाजात प्रत्येकाला आपली प्रज्ञा वापरून रोजगार मिळणे, आणि विशेषतः त्याच्या आर्थिक अस्पिरेशन्स पुऱ्या होणे हे फार कठीण आहे. सामाजिक आणि राजकीय रचना अशा सर्वोदयी प्रकारची बनवणे महाकठीण आहे. मागणी पुरवठा हेच विश्वाचे मूळ तत्व. मग तुम्ही कितीही समान वितरण करायचा प्रयत्न करा.
तबला वाजवणे, पोहणे, प्राकृत भाषेचा अभ्यास, पूजापाठ, सेल्युलर बायॉलोजी, ट्रक चालवणे, मजुरी, जाहिरात, क्रिकेट, खो खो, हालगी वादन, नृत्य... प्रज्ञा यातील कशातही सापडू शकते. पण त्यात मिळणाऱ्या "संधी" या त्या प्रज्ञेचे आविष्कार, आऊटपुटस किती लोक पैसे मोजून खरेदी करायला तयार आहेत यावरच ठरते. एका मर्यादेपलीकडे मागणी नसलेल्या संधी कृत्रिम रित्या उत्पन्न करता येत नाहीत. सर्वत्र प्रोत्साहन पॅकेज किंवा परवडत नसतानाही काही कौशल्य जपण्यासाठी कोणाला फार सतत सबसिडी देता येत नाही.
दुर्दैवाने प्रज्ञा आणि संधी (उपजीविका, अर्थार्जन) हे एक न जुळणारे गणित आहे. केवळ मानसिक समाधान याबद्दल बोलत असाल तर वेगळी गोष्ट.
13 Jan 2024 - 4:58 pm | टीपीके
विषयाशी संबंधित बहुतेक एकमेव प्रतिसाद. :)
परत एकदा, हे किंवा ते हा मुद्दाच नाहीये, तर हे हि जरुरी आहे पण तेही जरुरी आहे आणि दोघांतही तोल सांभाळला गेला पाहिजे हा मुद्दा आहे. आता तोल म्हणजे अगदी ५०% हे आणि ५०% ते असेही नाही. प्रत्येक समाजाच्या गरजा आणि त्या वेळेचा तोल वेगळा असेल. तसे म्हंटले तर खेळही (व्यवसाय म्हणून) का पाहिजे? पण समाजात आपण खेळ सामावून घेतलेच ना? उलट आता त्या संबंधी किती नवीन व्यवसाय चालू झाले आहेत? कोचिंग, उपकरणे, अगदी वैद्यकीय व्यवसायात पण विशेष शाखा निर्माण झाल्या आहेत. इतकेच काय पण किती वेगवेगळ्या प्रकारे संशोधनही होत असते, की माणसाच्या शरीराची क्षमता किती? उसेन बोल्ट अजून किती जोरात धावू शकतो? कोणत्या प्रकारचे कपडे घातले की माणूस अधिक जोरात पोहू शकतो? TV वर कोणत्या पद्धतीने खेळ दाखवले की लोकांनां आवडेल, त्या साठी नवीन कॅमेरे, DRS सॉफ्टवेअर? आहारातील संशोधन इत्यादी इत्यादी ...
सांगायचा मुद्दा असा की खेळ या एकाच निरुपयोगी (समाजासाठी) प्रज्ञेचे व्यावसायिकरण झाल्या मुळे किती नवीन संशोधन झाले, व्यवसाय निर्माण झाले आणि अर्थव्यवस्थेत किती भर पडली? सुरवातीला एखाद्या वेळेस समाजाला किंवा सरकारला थोडी गुंतवणूक करावी लागते, पण नंतर फायदेही मिळतातच ना? पण प्रयत्न तर करावे लागतात. स्टेडियम्स, प्रशिक्षण केंद्रे किंवा या धाग्यावर ज्या वरून भांडणे चालू आहेत ती मंदिरे हि फक्त फॅसिलिटेटर्स आहेत, नॉट डेस्टिनेशन ...
गविंचा मुद्दा बरोबर आहे की अगदी मोजून मापून अशा संधी तयार करणे आणि त्यात बॅलन्स आणणे कठीण किंवा अशक्य आहे, पण निदान अशा प्रज्ञा असतात हे मान्य करणे, त्या प्रकारच्या लोकांसाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही एक चांगली सुरवात असू शकते ना? इतकेच :)
माझा खरा राग अशा लोकांवर असतो की ज्यांना राजकीय दृष्ट्या (फक्त मोदी/राहुल असेच नाही तर भांडवलशाही/समाजवाद किंवा तत्सम ) एखादी गोष्ट सोयीची नसली की मग असे हे की ते करून बुद्धिभेद करणे चालू होते. मग चांद्रयान पेक्षा हॉस्पिटल बांधायला पाहिजे होते किंवा तत्सम भांडणे चालू करतात ही लोकं.
एक उदाहरण म्हणून, नेहरूंनीही IIT, IIM, धरणे, ISRO यांना सपोर्ट केलेच ना , मग त्या वेळी कोणी असे बोलले असते की फक्त प्राथमिक शाळा चालू करा आणि जो पर्यंत १००% साक्षरता नाही तो पर्यंत माध्यमिक शाळा किंवा IIT , IIM नको, तर भारताची प्रगती झाली असती का? आणि नुसते शिक्षण देऊन उपयोग होत नाही ना? त्या प्रमाणे जगण्याच्या संधीही तयार कराव्या लागतात. त्या नव्हत्या म्हणूनच त्या काळातील उच्च शिक्षित भारताबाहेर गेले ना? त्या काळात भारताला जितका फायदा व्हायला पाहिजे होता या संस्थांचा तितका झाला नाही. बरे ज्यांना सायंटिफिक टेम्पर आहे त्यांच्यासाठी या संस्था उपयोगी होत्या, पण प्रत्येकाकडे सायंटिफिक टेम्पर असू शकत नाही ना? त्याचे काय? की मग हरणाला उडता येत नाही म्हणून त्याची टर उडवायची की त्याला मारून टाकायचे?
समाजात प्रत्येक जण वेगवेगळ्या लेवल ला असतो, एकीकडे एखादी स्त्री अगदी नरकमय जगत असेल त्याच वेळी दुसरी स्त्री पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असेल. दोघींच्याही गरजा, लागणारा सपोर्ट वेगवेगळा पण जेनुइन असेल. तुम्ही फक्त अधिक वाईट परिस्थितीतील व्यक्तीलाच मदत करावी असे नाही ना करू शकत.
त्यामुळे प्रश्न हे किंवा ते नसून , हे आणि ते आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या प्रज्ञेसाठी जर संधी दिसली तर ती एक्सप्लॉईट केलीच पाहिजे.
13 Jan 2024 - 6:22 pm | सर टोबी
मला वाटतं की तुमच्या कल्पनेतच आजच्या घडीला खुप फोलपणा होता. त्यामुळे शाळा की मंदिर या त्यातल्या त्यात स्पष्ट कल्पनेवर जास्त चर्चा झाली.
आता फोलपणाकडे वळूया: त्या अगोदर प्रज्ञा आणि प्रज्ञावंत या गोष्टी कशा लाडावत जाऊ शकतात त्याचे उदाहरण सांगतो. जवळपास पंधरा वर्षापूर्वी माझ्या टीममध्ये एक टेकनिकल रायटर होता. साधारण कामावर रुजू झाल्यानंतर लगेचच काही दिवसात आम्हाला आपला निर्णय चुकला याची जाणीव झाली. यथावकाश ओरिएंटेशन, प्रॉडक्ट ट्रेनिंग झाल्यावर काही दिवसांनी साहेबांना एक हलकीशी असाइन्मेंट दिली. त्यांनी ती काही केली नाही. होता होता बॅकलॉग चांगलाच साठला आणि साहेबांना दट्ट्या दिला. त्यावर त्यांनी “लिहीणं हे सृजनशील काम आहे आणि अशी कामं कधीपर्यंत पूर्ण होतील हे कसे सांगता येईल” असा लडीवाळ प्रश्न विचारला. हा फिडबॅक दिल्यानंतर थोड्याच दिवसांत त्यांचा आम्ही निरोप समारंभ केला. मुलांच्या प्रज्ञेच्या शोधात त्या व्यक्तींची आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची वाईट गत झाल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या ऐकण्यात आणि पाहण्यात असतात.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील मुलांना भाषा, सोपे विज्ञान, खेळ, सोप्या कला असा सरधोपट कार्यक्रम सर्व मुलांना देतो आणि मग त्यांचा कल लक्षात यायला लागतो. त्यानुसार कुलदीपक किंवा दीपिका काय दिवे लावणार आहेत त्यानुसार आपल्या उत्तर आयुष्याची आपण बेगमी करतो. प्रज्ञेचा शोध यालाच म्हणत असावेत!
11 Jan 2024 - 11:09 am | विवेकपटाईत
मानसिक संतुलन सुधरले की असे प्रतिसाद येतात.
11 Jan 2024 - 12:20 pm | सर टोबी
अशी अर्थहीन वाक्य खरे तर कुणाचं मानसिक संतुलन ढळलंय हे सांगायला पुरेशी आहेत. मानसोपचार आता समाजमान्य आहेत. लवकरात लवकर उपचार सुरु केल्यास आणि रोग अजून भिनला नसल्यास तब्येतीला उतार पडू शकतो.
10 Jan 2024 - 2:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
चलाख शाळामालकानी म्हणूनच 'सरस्वती विद्या मंदीर्/बालमोहन विद्या मंदीर' अशी नावे दिली असावीत काय? शाळा की मंदीर अशी तुलना म्हणजे 'पोळी की भात' असे विचारण्यासारखे आहे.
11 Jan 2024 - 11:06 am | विवेकपटाईत
विद्या भारती ही संस्था सरस्वती शिशु मंदिरांचे संचालन करते आजच्या घटकेला वीस हजारहून जास्त शाळा, अधिकांश मागास व दुर्गम भागात चालवितात. ३५००० एकल विद्यालये ही वनवासी आणि दुर्गम भागात. उद्देश्य सामान्य आणि गरीब जनतेला शिक्षण उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाच्या माध्यमांनी होणारे धर्म परिवर्तन थांबविणे. हजारों शिक्षकांनी आपली आयुष्य वेचले आहे. कित्येक नॅक्सली आणि देशविरोधी हल्यात मुख्यत नॉर्थ इस्ट भागात शहीद ही झाले आहेत.
11 Jan 2024 - 11:10 am | विवेकपटाईत
विद्या भारती ही संस्था सरस्वती शिशु मंदिरांचे संचालन करते आजच्या घटकेला वीस हजारहून जास्त शाळा, अधिकांश मागास व दुर्गम भागात चालवितात. ३५००० एकल विद्यालये ही वनवासी आणि दुर्गम भागात. उद्देश्य सामान्य आणि गरीब जनतेला शिक्षण उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाच्या माध्यमांनी होणारे धर्म परिवर्तन थांबविणे. हजारों शिक्षकांनी आपली आयुष्य वेचले आहे. कित्येक नॅक्सली आणि देशविरोधी हल्यात मुख्यत नॉर्थ इस्ट भागात शहीद ही झाले आहेत.
11 Jan 2024 - 3:17 pm | सुरिया
विद्या भारति जे काही काम करते त्याचा पूर्णपणे आदर ठेऊन, पटाईत साहेब तुम्ही सुशिक्षित आहात, इंग्रजी चांगले जाणता हे ध्यानात घेऊन विचारतो की मोठमोठे आकडे फेकून दणकून लिहायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते?
ह्याचे उत्तर अगदीच सगळ्यांना माहीत असले तरी सल्ला एकच आहे. प्रचार करताच आहात तरी खरा तरी करा.
कारण विद्या भारतीच्याच साईटवरचा हा मजकूर.
विद्या भारती १००० प्लस शाळा चालवते, त्यातील १०० प्लस शाळांना निवासी सुविधा आहे, हि सुविधा वनवासी कल्याण केंद्रा कडून केली जाते.
आपण ठोकलेला वीस हजारहून जास्त शाळा यातील २०००० हा आकडा विद्यार्थ्यांचा आहे. तेही विद्या भारती कडून मोफत शिक्षण घेणारे आदीवासी विद्यार्थी. जे वनवासी कल्याण केंद्राच्या हॉस्टेल वर राहतात.
३५००० एकल विद्यालयाचा स्त्रोत तुम्हीच द्या.
11 Jan 2024 - 4:20 pm | अमरेंद्र बाहुबली
पटाईत साहेब काहीही लिहीत असतात. काहींना तर त्यांनी युगपुरूष घोषीत केलेय.
12 Jan 2024 - 8:07 pm | स्वधर्म
१. माझा मुलगा/ मुलगी गेले कित्येक दिवस शाळेत गेला नाही.
२. माझा मुलगा/ मुलगी गेले कित्येक दिवस मंदीरात/ मशिदीत/ माझ्या धर्माच्या प्रार्थना स्थळाला गेला नाही.
मंदीराचा आग्रह धरणार्यांपैकी किती जणांना १ ची अधिक चिंता वाटेल?
सध्याच्या महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आहेत त्या सरकारी शाळांची अवस्था काही अपवाद सोडले, तर दयनीय आहे. परंतु शिर्डी, पंढरपूर, एकवीरा देवी इ. अनेक देवस्थानांचा विकास करण्यासाठी मात्र शासन अगदी कटीबध्द असल्यासारखे निर्णय घेऊन कामे करत आहे. आपल्या समाजाला आपण कुठे घेऊन जात आहोत, याचा विचार तर कराल?
13 Jan 2024 - 2:25 pm | धनावडे
हिंदुची चूक झाली मंदिर बांधून, आपण इंदू मिल च्या जागेवर शाळा बांधायला हवी काय म्हणता?
13 Jan 2024 - 3:32 pm | कर्नलतपस्वी
त्या भागात चांगल्या शाळाच नाहीत. मोठ्ठ पटांगण मुलांना खेळाचे मैदान होईल.
13 Jan 2024 - 3:45 pm | अमरेंद्र बाहुबली
मंदीर हिंदूंनी बनवलं हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
13 Jan 2024 - 6:16 pm | धनावडे
ते ठीक पण बाकीच्याधर्माच्या धर्मस्थळाबद्दल पण तुम्हाला हेच वाटत असेल ना की तिथं शाळा व्हायला हवी?
13 Jan 2024 - 6:34 pm | अमरेंद्र बाहुबली
सगळ्याच ठिकाणी शाळा बांधून काय करनार?? काही ठिकाणी सार्वजनीक शौचालयेही हवीत.
13 Jan 2024 - 6:40 pm | धनावडे
म्हणजे आक्षेप फक्त मंदिरावर आहे तर, असो चालूदे तुमचे आत्मकुंथन.
13 Jan 2024 - 8:07 pm | अमरेंद्र बाहुबली
आक्षेप केव्हा, कुणी नी कुठे घेतलाय??
14 Jan 2024 - 12:03 am | धनावडे
नाही ना मग एवढी आदळाआपट कशाला लावलेय. मंदिरा किंवा शाळा तर शाळाच हवी अस काहीतरी कोण बोलत होत, बघा बघू कोण होत ते?
14 Jan 2024 - 1:00 am | अमरेंद्र बाहुबली
म्हणजे तूमचा शाळेला विरोध आहे तर
12 Jan 2024 - 11:19 pm | अर्धवटराव
माणसाचं मन डेव्हलप व्हायला हवं कि बुद्धी?
मूळात हे either or आहे का ??
13 Jan 2024 - 8:27 am | सर टोबी
शाळेच्या पातळीवर शिकवलं जाणारं नागरिकशास्त्र हे बहुतांशी मनाने शिकण्याचा विषय असायचा. तेव्हा मन आणि बुद्धी असा काही भेद करता येतो असं वाटत नाही.
यमुनेचं पात्र तुडवून केलेला सत्संग, लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असणारे, वगैरे दिव्य आत्मा बघितले तर मंदिरांमध्ये मनाची मशागत होते असं म्हणणं फार धारिष्ट्याचं होतंय.
15 Jan 2024 - 11:33 am | अर्धवटराव
इथले अनेक प्रतिसाद बघुन त्यांना शाळेचा तरी काय उपयोग झाला याची शंकाच येते.
15 Jan 2024 - 12:35 pm | सर टोबी
सध्या आपण जे अनुभवतो आहे त्याची माझ्यामते कारणमीमांसा अशी आहे:
आपल्या सर्वांच्या आयष्यात ढोबळमानाने चार टप्पे येतात. पहिल्या टप्प्यात आयुष्याची पायाभरणी असते. माझ्या पिढीत (चाळीस वर्षांपूर्वी) नोकरीच्या संधी तशाही फार कमी होत्या. तशात बऱ्याच पांढरपेशा कुटुंबांमध्ये जमीन जुमला वगैरे काही नसल्यामुळे सर्व शक्ती शैक्षणिक पात्रता मिळविण्यासाठीच वापरली जायची.
नंतर येते तो आयष्यात स्थिरस्थावर होण्याचा टप्पा. नोकरी, व्यवसाय, संसार असा हा टप्पा.
पुढच्या टप्प्यात माणूस यथाशक्ती काही तरी सामाजिक कार्यात भाग घेतो. सत्संग, छंद अशा गोष्टींकडे काही जण वळतात. आपण ओळखलो जाओ अशी एक माफक ते तीव्र स्वरूपाची उर्मी यावेळेस तयार होते.
नंतर येतो तो विश्रांतीचा टप्पा. स्वतःला आहोत तसं व्यक्त करणं जसं प्रवास करणं, वाचन अशा गोष्टींमधून आपण व्यक्त व्हायला सुरुवात होते.
आत्ताच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यावर असणाऱ्या मध्यम वर्गीयांनी धार्मिक अस्मिता हे आपली ओळख आणि अभिव्यक्ती करण्यासाठी निवडली आहे हे प्रकर्षाने जाणवते. निव्वळ दिमाखदार सुविधा यांना हा वर्ग विकास समजतो. वाढली महागाई तर वाढू दे, पण मुस्लिम या निमित्ताने एका कोपऱ्यात लोटले जात असतील तर हरकत नाही अशी मानसिकता आहे. येथे चर्चा करणाऱ्यांना कितीही चितपट केले तरी त्यांची धार्मिक निष्ठा त्यांनी कुणाला वाहायच्या हे निश्चित केले आहे.
15 Jan 2024 - 2:15 pm | वामन देशमुख
१. धार्मिक निष्ठा कुणाला वाहायच्या हे निश्चित करणे चूक आहे का?
२. तुम्ही तुमच्या धार्मिक निष्ठा कुणाला वाहिल्या आहेत?
३. तुम्ही तुमच्या धार्मिक निष्ठांची निश्चिती केंव्हा केंव्हा बदलली आहे?
४. या चर्चेत कुणी कुणास चितपट केले आहे?
---
चर्चा म्हणजे माहिती, विचार, मत इत्यादींचे आदानप्रदान असे हिंदू धर्म सांगतो आणि तसे आचरण करतो. चर्चच्या नावाखाली कुणाला चितपट करण्याचे मनसुबे बाळगणे हे हिंदू धर्मास मान्य नाही.
15 Jan 2024 - 2:19 pm | वामन देशमुख
अरे! पुरोगामी लोक असा विचार करतात! बरं झालं तुम्ही इथे उघड केलेत ते. सनातनी हिंदू धर्म मात्र -
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः ।
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
अशी सर्वांच्या हिताची कामना करतो.
16 Jan 2024 - 7:06 pm | सुबोध खरे
राज घाट, महात्मा गांधींची समाधी : 40 एकर.
शांती वन, जवाहरलाल नेहरूंची समाधी : 53 एकर
शक्ती स्थळ,इंदिरा गांधींची समाधी : 45 एकर
राजीव गांधींची समाधी : 15 एकर
राम मंदिर : 2.7 एकर.
गांधी-नेहरूंची समाधी बांधली जात असताना कोणाला शाळा, कॉलेज, हॉस्पिटलचा विचार आला नसेल का?
दिल्लितील अशा सुपर प्राइम प्रोपर्टी विकल्या तर किती शाळा, कॉलेज, हॉस्पिटल बान्धता येतील?
16 Jan 2024 - 7:09 pm | अमरेंद्र बाहुबली
खर्च??
16 Jan 2024 - 7:32 pm | सुबोध खरे
कुणाचा?
16 Jan 2024 - 7:45 pm | अमरेंद्र बाहुबली
दोघांचा. आणी कार्य??
16 Jan 2024 - 7:52 pm | अमरेंद्र बाहुबली
तसंच महात्मा गांधी, इंदिरा गांधी वगैरे लोक महान होते. महात्मा गांधीतर खोटंही बोलायचे नाहीत. आजकाल खोटारज्या
लोकांचा ऊदऊदो करायची परंपरा आलीय. असो. मंदीरांचा ऊपयोग काय?? संत गाडगेबाबा तर सांगून गेलेत मंदिरात फक्त पुजार्याचे पोट असते. प्रश्नकर्त्याने मंदिर की शाळा असा प्रश्न विचारलाय. समजा गावात मंदीर असेल तर पुजार्याची सोय होईल पण शाळा नसेल तर गावातल्या पिढ्या अशीक्षीत राहतील.
विद्या नसेल तर काय होते हे महात्मा फुले आपल्याला सांगूनच गेलेत. मग मंदीर महत्वाचं का शाळा?
17 Jan 2024 - 10:12 am | सुबोध खरे
मंदीरांचा ऊपयोग काय?
मग या समाधी स्थळान्चा तरी काय उपयोग आहे.
दिल्ली मधील अतिमहत्त्वाच्या जागा अड्वून ठेवण्या पेक्शा त्या जागान्चा विधायक कार्यासाठी उपयोग करा की!
नाही तरी साडे चार कोन्ग्रेसी सोड्ले तर कोण जातय तिथे?
मन्दिरात हजारो लाखो भाविक जातात फुल,प्रसाद, खाद्यपदार्थ विक्णारे, रिक्शावाले होटेलवाले इ चे पोट तरि भरते
17 Jan 2024 - 10:17 am | अमरेंद्र बाहुबली
कर्मकांड, अंधश्रध्दा, भिती ह्यांनाही खतपाणी मिळते ते समाधीस्थळी नाही मिळत.
17 Jan 2024 - 10:36 am | सुबोध खरे
काय सान्गताय काय?
कोणत्याही नेत्याच्या समाधी स्थळी गड्बड करुन पहा, दन्गल होते की नाही?
बाकी तुमच्याकडून अधिक काय अपेक्शा करणार?
17 Jan 2024 - 10:53 am | अमरेंद्र बाहुबली
गडबड केली तर होते. ते ही होईलच असे नाही. पण मंदिराचं तसं नाहीये.
17 Jan 2024 - 11:13 am | सुबोध खरे
आपण अधिक विचार करणार नाहीच.
तुमच्याकडून अधिक काय अपेक्शा करणार?
17 Jan 2024 - 11:25 am | अमरेंद्र बाहुबली
जाऊद्या. तुमच्याकडे ऊत्तर नाही. माहीतीय मला.
देशाच्या अधःपतनाला तो प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे ज्याला वाटतं की शिक्षण, रोजगार ह्यापेक्षा धार्मीक मुद्दे जास्त महत्वाचे आहेत. - पेरियार.
17 Jan 2024 - 11:27 am | सुबोध खरे
तुमच्या भम्पक युक्तिवादाला कुणाकडेच ऊत्तर नाही.
तेन्व्हा तुमच चालु द्या
17 Jan 2024 - 11:32 am | अमरेंद्र बाहुबली
कर्मकांडं , अंधश्रध्दा, ह्यावर तुम्ही लिहीलं नाहीत. शाळा का नको मंदिर का हवं? ह्यावरही तुमच्याकडे ऊत्तर नाही. समजू शकतो. देश मागेमागे का चाललाय हे लक्षात आले असेलच तुमच्या.
16 Jan 2024 - 8:21 pm | सर टोबी
कुणा सामान्य माणसाने केला असता तर त्याची सामाजिक परिस्थिती, बौद्धिक कुवत वगैरे कसोट्यांवर ते दुर्लक्षणीय होऊ शकले असते. इथे तर शिक्षण, सामाजिक दर्जा आणि नीतिमत्ता यांचा संबंध नसतो असा साक्षात्कार व्हावा अशी परिस्थिती आहे!
ज्या काळात हि स्मारके उभारली तेव्हाची शैक्षणिक संसाधने असण्याची गरज आणि आजची गरज याचा काही विचार कराल कि नाही? आज प्राथमिक शाळांची फी देखील लाखाच्या घरात आहे. जी स्मारकं तुम्हाला खुपत आहेत त्यांच्या अगोदरच आयआयटी दिल्ली (स्थापना १९६१), हंसराज कॉलेज (स्थापना १९४८) अशा संस्था होत्या. महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था अगदी तालुकाच्या गावापर्यंत पोहोचल्या होत्या.
17 Jan 2024 - 12:03 pm | वामन देशमुख
शतश: सहमत
शिकलेले लोक (मिपावर प्रतिसाद लिहितात म्हणजे शिकलेले असतील असे समजतो) सुद्धा "मंदिर व शाळा ह्या दोन बाबी म्युच्यूअली एक्स्क्लूजिव नसतात" हे समजून न घेता शाळा की मंदिर असा वाद घालतात याचेच ते द्योतक आहे.
अर्थात ही तुम्ही म्हणताय तशी त्यांची बालबुद्धी आहे की त्यांची बदमाशी आहे हेही आहेच.
25 Jan 2024 - 12:35 pm | अमरेंद्र बाहुबली
चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी हाणामारीत ही सूंदर कविता सापडली.
शाळा पडू द्या,त्यात लेकरू मरू द्या....
पण तुम्ही देवळे बांधा बापहो…....
सोन्याचा कळस चढवा त्यावर ,
उद्याच भविष्य दडलंय ना त्यात तुमचं ..……
बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर,
माणसाच्या जीवनात समृद्धी आणत असेल तर....
विकणारा काय खुळा आहे का ?
का मूर्ती घडवणारा खुळा आहे ?
तो स्वतःच भलं करण्याऐवजी ,
बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करेल ?
हे कधी कळणार माझ्या बाप हो तुमाले
राष्ट्रसंत गाडगेबाबा
25 Jan 2024 - 12:49 pm | अहिरावण
थोरांचे थोर विचार...
उद्याला अमरावतीत जाणार आहे. तिकडे बाबांच्या समाधीस्थळी भेट देणार आहे. आरती प्रसाद झाल्यावर ही कविता ऐकवतो सगळ्यांना
25 Jan 2024 - 12:50 pm | अहिरावण
अरे हो तिथली बाबांची मुर्ती छान आहे अगदी
26 Jan 2024 - 7:49 pm | वामन देशमुख
एक नंबर!
25 Jan 2024 - 1:51 pm | कॉमी
शाळा की मंदिर ह्यावर -
https://youtu.be/GFrTezImr_k?si=_cE6FdUSYRdYseYM
26 Jan 2024 - 4:05 am | अर्धवटराव
छान इंटरव्यु दिला आहे भावी कन्हैय्या कुमारांनी :)
26 Jan 2024 - 10:54 am | अहिरावण
कन्हैया कुमार किंवा सोशल मिडीयावरचा नवपुरोगामी....