देव

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
26 Dec 2023 - 8:15 pm

देव होता, देव आहे, असेल पुन्हा
भावनेच्या ओलाव्यातून रुजेल पुन्हा.

कधी माणसाच्या अंतरंगातून डोकावतो आभाळाच्या सावलीतून पाहील पुन्हा.

नेमके फासे तो फेकतो नेहमी इथे
नेटके दान नशिबी तो देईल पुन्हा .

भक्तिभाव जेव्हा उचंबळून येतो
सुगंध बनून मनातून फुलेल पुन्हा.

माणसाने माणसाशी माणसासम वागणे
माणसातूनच देव जन्माला येईल पुन्हा.

शब्द होता कान्ह्याने गीतेतून पेरला
आज नाही तर उद्या जन्म घेईल पुन्हा.

----अभय बापट

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

26 Dec 2023 - 10:06 pm | कर्नलतपस्वी

देव कुणी पाहीला देव कुणा भेटला
माणसाच्या अंतरंगी देव पुन्हा भेटला

सागरसाथी's picture

27 Dec 2023 - 2:31 pm | सागरसाथी

धन्यवाद

कुमार१'s picture

7 Feb 2024 - 7:32 am | कुमार१

आवडली !