हिशोब
एकदा तीन मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले. भरपेट जेवण आणि गप्पा झाल्या. कडक कॉफी झाल्यावर त्यांनी वेटरला बिल आणायला सांगितले. वेटरने बिल आणून दिले. बिल झालं होतं. तीनशे रुपये.
“हे बाकी बेस झालं. प्रत्येकी शंभर रुपये! हे माझे शंभर.” त्याने पाकिटातून शंभराची नोट काढून प्लेटमधे ठेवली.
तर अशाप्रकारे त्या मित्रांनी प्रत्येकी शंभर रुपये शेअर करून बिल चुकते केले. कॉफीचे शेवटचे घुटके घेत असताना वेटर परत आला.
“जेन्टलमेन, माफ करा, आमच्या कॅशिअरने बिल करताना चूक केली. आपले बिल तीनशे नव्हे तर अडीचशे रुपये झाले आहे. कॅशिअरने माझ्याकडे हे पन्नास रुपये तुम्हाला परत देण्यासाठी दिले आहेत. पण पन्नास रुपये तुम्ही तिघात कसे वाटून घेणार? म्हणून मी काय केले आहे कि मी ह्यातून वीस रुपये मला टिप म्हणून ठेवून घेतले आहेत. आणि उरलेले हे घ्या प्रत्येकी दहा रुपये.”
मित्रांनी विचार केला, “अरे, आपण टिप द्यायला विसरलोच होतो. आणि आपल्याला पण बरच झाले. दहा दहा रुपये परत मिळाले.”
अशाप्रकारे मित्र, वेटर आणि कॅशिअर सगळे खुश झाले.
पण अस्सल पुणेरी असल्यामुळे माझ्या मनात किडा वळवला. का?
मी मनात हिशेब करत होतो. प्रत्येक मित्राने नव्वद रुपये खर्च केले. म्हणजे एकूण दोनशे सत्तर अधिक वेटरची टिप वीस रुपये. म्हणजे एकूण दोनशे नव्वद झाले. ऑ? मग दहा रुपये कुठे गेले?
प्रिय मित्रांनो, हिशेबात काय चुकले माझे?
प्रतिक्रिया
6 Nov 2023 - 12:04 pm | शित्रेउमेश
एकुण खर्च २७०/- झाला २५० बिल + २० टिप
आणि एकुन पैसे प्रत्येकी ९० * ३ = २७०/-
बरोबर तर आहे हिशोब.
6 Nov 2023 - 12:17 pm | अमर विश्वास
प्रत्येकी नव्वद रुपये ,,,, त्यातच टीप धरलेली आहे (included).. परत जास्तीची वीस रुपये टीप का मिळवत आहात?
6 Nov 2023 - 12:47 pm | श्वेता व्यास
आपल्या दोन्ही हातांना प्रत्येकी पाच बोटे आहेत, दोन्ही मिळून दहा.
आता एका हाताची बोटे उलटी मोजुयात, १०-९-८-७-६ हे झाले ६ आणि दुसऱ्या हाताची ५ बोटे, एकूण ११ कसे झाले :-/
यामध्ये जी चूक आहे, तीच तुमच्या हिशोबामध्ये आहे :)
6 Nov 2023 - 1:37 pm | भागो
श्वेताजी
हे पण मस्त कोडे आहे. अजून चक्रावलो. येऊ द्या अजून.
6 Nov 2023 - 1:49 pm | भागो
श्वेता व्यास तुमचे हे कोडे मला एव्हढे भावले कि ते मी दुसरीकडे तुमच्या नावा निशी डकवले आहे. तुमची हरकत नसेल असे समजून, जर असेल तर सांगा. डिलीट करेन.
आभार!
6 Nov 2023 - 2:55 pm | श्वेता व्यास
काही हरकत नाही भागो सर :)
6 Nov 2023 - 2:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
एका माणसाला ३ मुले होती आणि त्याने मृत्युपत्रात आपली सर्व ईस्टेट तिघांना समान वाटावी असे लिहिले होते. बाकी सर्व वाटणी झाली, पण त्याचे १७ की कायतरी उंट होते, त्याचे ३ भाग कसे करणार? मग एका शहाण्या माणसाने आपला १ उंट त्यात मिळवला आणि वाटणी केली असे कायतरी गणित होते. कोणी सांगेल का?
6 Nov 2023 - 4:58 pm | भागो
माझ्या वाचनात जे कोडे आहे ते थोडे निराळे आहे. त्यात "समान वाटणी" नाहीये.
https://medium.com/story-that-matters/17-camels-and-3-sons-short-story-2...
त्यात अजून एक मज्जा आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या वाटणी पेक्षा जास्त भाग मिळतो. कसा
https://www.pleacher.com/mp/puzzles/tricks/mobcows.html इथे दिलेल्य्या "Answer:" मध्ये आहे.
6 Nov 2023 - 7:19 pm | नठ्यारा
वर भागो यांनी दिलेली कथा मी ही ऐकली होती. पण त्यात प्रमाणं २/३, १/६ व १/९ होती. या तिन्ही अपूर्णांकांची बेरीज १ न येता १७/१८ येते. त्यामुळे शहाण्या बुजुर्गास १ उंट जास्तीचा टाकून अपेक्षित वाटण्या करता येतात.
6 Nov 2023 - 5:15 pm | भागो
एका विशिष्ट वया नंतर मेंदू मध्ये नवीन मज्जा पेशी निर्माण होत नाहीत. जसे जखम झाली तर ती नव्या पेशी बनून भरून येते. दुर्दैवाने मेंदूचे तसे होत नाही.
असा आजवरचा समाज होता. पण आता असे सिद्ध झाले आहे कि आपण जर आपल्या मेंदूला कवायत करायला लावली तर नव्या मज्जा पेशी निर्माण होऊ शकतात.
कोडी सोडवणे अगदी शब्द कोडी सुद्द्धा ही अशी एक कवायत आहे.
6 Nov 2023 - 7:43 pm | रंगीला रतन
पण आता असे सिद्ध झाले आहे कि आपण जर आपल्या मेंदूला कवायत करायला लावली तर नव्या मज्जा पेशी निर्माण होऊ शकतात.
यातुन अल्झायमर् वर मात करता येइल का?
6 Nov 2023 - 9:08 pm | भागो
यातुन अल्झायमर् वर मात करता येइल का? >>>काही प्रमाणात हे शक्य आहे. आजतरी. निदान अल्झायमर्ला काही वर्षे तरी दूर ठेवता येईल. दोन तीन वर्षे मिळाली तरी काय वाईट आहे.
एनिवे मी इथे दोन संदर्भ देतोय. ज्याना रुची असेल त्यांनी अवश्य वाचावे.
१)https://www.atlassian.com/blog/productivity/neuroplasticity-train-your-b...
२)https://nesscaregroup.co.uk/neuroplasticity-what-is-it-and-how-can-we-us...
6 Nov 2023 - 8:49 pm | नठ्यारा
भागो,
तुम्ही जे उदाहरण दिलंय त्याचं स्पष्टीकरण असंय की तिघांचे प्रत्येकी ९० रुपये मिळून २७० वजा वेटरचे २० म्हणजे २५० अधिक मालकाची सूट ५० म्हणजे बरोबर ३०० होतात.
आता जरा गंमत करूया. मालकाने समजा ३० रुपयांची सूट देऊन बिल २७० केलं. वेटर मित्रांपाशी ५ रुपयांच्या ३ नोटा घेऊन आला व म्हणाला की एव्हढ्याच नोटा गल्ल्यावर आहेत. उरलेले टिप घेऊ का ? मित्रांनी मोठ्या उदारपणे ते मान्य केलं. आता हिशोब असा दाखवला की प्रत्येक मित्राचे ९५ रुपये धरून ९५ * ३ = २८५. यांत वेटरची टिप १५ रुपये मिळवली की बरोबर ३०० रुपये होतात. हे जे तर्कट लावलंय त्यास इंग्रजीत book cooking म्हणतात.
6 Nov 2023 - 9:13 pm | भागो
हे तुमचे वाचून माझ्या डोक्याचा पार भुगा झालाय. आता रात्री विचार करून बघतो काही डोक्यात शिरतंय का.
8 Nov 2023 - 6:05 am | विजुभाऊ
दोनशे सत्तर = २५० + वेटरची टीप २० असे गणीत आहे. वेटरची टीप पुन्हा मिळवू नका. आणि प्रत्येकी परत आलेले दहा रुपये असे एकूण तीस रुपये आहेत. त्यामुळे नव्वद रुपये असा हिशेब होतो.
हीच तुमच्या हिशेबातली चूक आहे
8 Nov 2023 - 7:07 am | भागो
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
8 Nov 2023 - 7:52 am | कॉमी
एक चप्पल बूट विकणारा दुकानदार असतो. सकाळी दुकान उघडल्या उघडल्या एक माणूस येतो. तो एक बुटांची जोडी निवडतो, आणि "काय किंमत आहे ?" विचारतो. दुकानदार सांगतो, पन्नास रुपये. तो माणूस शंभर रुपयांची नोट देतो. दुकानदार बघतो तर त्याच्या गल्ल्यात पण सुट्टे पन्नास नसतात. म्हणून, तो बाजूच्या कपड्याच्या दुकानात जातो, आणि तिथून शंभर रुपयांची नोट देऊन पन्नासच्या दोन नोटा आणतो. गिऱ्हाईक बूट आणि पन्नास रुपये घेऊन निघून जातो.
त्याच दिवशी, नंतर कपड्याचा दुकानदार चपलाच्या दुकानदाराकडे येतो आणि म्हणतो ही शंभर रुपयांची नोट खोटी आहे. मला माझे पैसे परत द्या. चपलाच्या दुकानदाराला निमूटपणे पैसे द्यावे लागतात.
तर, आपल्या दुकानदाराचे एकूण नुकसान किती झाले ?
खोटी नोट १०० + बूट ५० = १५० असे उत्तर बऱ्याचदा येते.
8 Nov 2023 - 12:20 pm | भागो
व्वा! छान आहे. असे हे भ्रम निर्माण करणारे युक्तिवाद!
आता हा किस्सा बघा. हा जॉनी वकाराच्या नावावर खपवला जातो. मी कोलेजात असताना हा प्रसिद्ध होता. एकदा जॉनीभैय्या हलवायाच्या दुकानात गेले. आणि त्याने शंभर रुपयांची जिलेबी घेतली. एव्हढ्यात त्याचे लक्ष लादावाकडे गेले.
"मालक, जिलबी कॅॅन्सल. त्याच्या ऐवजी शंभर रुपयांचे लाडू द्या." दुकानदाराने जीलाबीची पुडी सोडून लाडवाची पुडी बांधायला घेतली.
लास्ट लांबड न लावता इथेच थांबतो. पण तुम्ही कल्पना करू शकता.
लाडू घेऊन जॉनीभैय्या चालू लागले. दुकानदाराने त्याला टोकले.
"भाईसाब लाद्दुके सौ रुपये?"
"लड्डू तो मैने जीलेबिके बदले लिये थे."
"ठीक है. तो जीलेबिके सौ रुपये दो."
"काहेके पैसे? जो चीज मैने ली ही नही उसके पैसे क्यू देना!"