ही तान कधीची..!

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
19 Dec 2008 - 1:50 pm

ही तान कधीची..!
==============================

ध्यानी तरळती क्षण काही
ही याद कशाची..
मनी झंजावती लहरी काही
ही गाज कुणाची..
रानी पसरती भास काही
ही रात कधीची..?

तनी अंकूरती फुटवे काही
ही आस कशाची..
घनी गर्जती कल्लोळ काही
ही काच कुणाची..
पानी ओसरती आवेग काही
ही काट कधीची..?

भानी उमलती किरणे काही
ही हाक कशाची..
बनी झिळमिळती थेंब काही
ही साथ कुणाची..
कानी शहारती गीते काही
ही तान कधीची..?

ही तान कधीची..!

==============================
स्वाती फडणीस .......... २०-११-२००८

कविता

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

19 Dec 2008 - 6:44 pm | श्रावण मोडक

भावनेच्या पातळीवर रचना आवडली, पण कुठं तरी काही तरी वाचताना हुकत गेलं. एक तर काही ओळींमध्ये लय जात असावी किंवा तत्सम काही तरी.
मनी झंजावती लहरी काही
येथे झंजावतीत गडबड वाटली, उमटती किंवा तत्सम काही?
बनी झिळमिळती थेंब काही
येथे झिळमिळतीत...
या दोन्ही ओळींमध्ये थोडे अवांतर काही आल्यासारखे होते.

स्वाती फडणीस's picture

19 Dec 2008 - 7:25 pm | स्वाती फडणीस

मनी झंजावती लहरी काही
या झंजावती मध्ये मला वादळ अपेक्षित आहे.
ही गाज कुणाची..

बनी झिळमिळती थेंब काही
आणि झिळमिळती मध्ये उन पाऊस..
म्हणून.. ही साथ कुणाची?

श्रावण मोडक's picture

19 Dec 2008 - 7:26 pm | श्रावण मोडक

तुम्हाला अपेक्षित बाबींनुसार शब्दयोजना उचितच. मी त्यात लय हुडकत होतो ती अवांतर. पण तुमचा शब्दच अंतिम.

स्वाती फडणीस's picture

19 Dec 2008 - 7:35 pm | स्वाती फडणीस

ह्म्म..
लय वृत्त यात मी कमी पडते..
सध्या शब्दात उतरायचा प्रयत्न करते आहे.. ते जमलं की लय वृत्तां कडे वळेन.. तोपर्यंत असेच चालवून घ्या :P

मीनल's picture

19 Dec 2008 - 6:48 pm | मीनल

मस्त आहे .वेगळी आहे.
क्षणांची याद ,लहरींची गाज ,रानातली रात,अंकूराची आस ,गीताची तान वगैरे छान जमले आहे.

घनी गर्जती कल्लोळ काही
ही काच कुणाची..
हे विषेश आवडले
पहिल्यांदा कळलच नाही.मग समजल की ---
ढग म्हणजे काचे सारखे.ते एकमेकांवरापटले की कडकडाट/कल्लोळ मग---- विज.ती काचेला तडा गेल्या सारखी -----
हाय क्लास वाटले.

मीनल.

श्रावण मोडक's picture

19 Dec 2008 - 6:51 pm | श्रावण मोडक

क्षणांची याद ,लहरींची गाज ,रानातली रात,अंकूराची आस ,गीताची तान वगैरे छान जमले आहे.
शंभर टक्के सहमत.

स्वाती फडणीस's picture

19 Dec 2008 - 7:36 pm | स्वाती फडणीस

मनापासून आभार..! :)

प्राजु's picture

19 Dec 2008 - 7:58 pm | प्राजु

क्षणांची याद ,लहरींची गाज ,रानातली रात,अंकूराची आस ,गीताची तान वगैरे छान जमले आहे.

हेच म्हणते...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती फडणीस's picture

20 Dec 2008 - 11:55 am | स्वाती फडणीस

आभार!