गाभा:
वर्तमानपत्रांमध्ये विविध तऱ्हांच्या बातम्या असतात. सर्व तऱ्हांच्या बातम्या प्रसिध्द करणे हे वर्तमानपत्रांचे कर्तव्य (!) आहे. सध्या कोणत्या तरी एका बेटावर अमुक अभिनेत्रीने वा अभिनेत्याने सुटी घालवली, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात इ-आवृत्तीमध्ये दिसतात. बातमीसोबत बिकिनीतले मोठे फोटोही असतात. अशा बातम्यांना बातमी म्हणून अर्थ असावा पण त्या बरीच जागा व्यापतात. एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी.
प्रतिक्रिया
7 Sep 2023 - 1:21 pm | जेपी
असे सदर मिपावर चालू करायला हरकत नाही.
7 Sep 2023 - 5:57 pm | चौथा कोनाडा
लैच बाळबोध अपेक्षा !
हे इ-आवृतीवाले वाचक नेट वर काय काय "बघत" बसतात ते मार्केटींगच्या लोकांनी कोळून अभ्यास केलेला आहे.
क्लिक पडली त र च पगार होणार हे त्यांना चांगलंच माहित्येय.
आजकाल " मसालेदार " च खपते.
"एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी" ही आद्यपत्रकार जांभेकर शास्त्री कालीन अपेक्षा झाली !
7 Sep 2023 - 6:56 pm | कंजूस
पूर्ण बातमीही नसते.
'या' अभिनेत्रीने 'असा' केला वाढदिवस साजरा.
यापुढे गेल्या आहेत होऊ घातलेल्या होतकरू तारका. त्या स्वतःच इंस्टाग्रामवर फोटो टाकतात. पत्रकारांना काही कामच नाही उरले. नोकऱ्या धोक्यात.
8 Sep 2023 - 4:30 pm | राजेंद्र मेहेंदळे
लोक्स अशा बातम्या "वाचतात"? आम्ही तर या बातम्या फक्त "बघतो".
आणि ऑनलाईनच तर आहे, थोडीच कागद वाया जातोय? टाकु द्या की मोठमोठे फोटो
8 Sep 2023 - 5:27 pm | चौथा कोनाडा
पॉझिटिव्ह अॅप्रोच ... :-)
हा .... हा .... हा .... !