अभिनेते, अभिनेत्रीची बेटावर सुटी
वर्तमानपत्रांमध्ये विविध तऱ्हांच्या बातम्या असतात. सर्व तऱ्हांच्या बातम्या प्रसिध्द करणे हे वर्तमानपत्रांचे कर्तव्य (!) आहे. सध्या कोणत्या तरी एका बेटावर अमुक अभिनेत्रीने वा अभिनेत्याने सुटी घालवली, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात इ-आवृत्तीमध्ये दिसतात. बातमीसोबत बिकिनीतले मोठे फोटोही असतात. अशा बातम्यांना बातमी म्हणून अर्थ असावा पण त्या बरीच जागा व्यापतात. एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी.
वाचन
2247
प्रतिक्रिया
0