एक प्रवास.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
30 Aug 2023 - 11:54 am

प्रेरणा श्री. मेहेंदळेंचा हा धागा
http://misalpav.com/node/51490
काही वेळा आपल्याला प्रवास करायचा असतो पण त्यात काही असे अनुभव येतात की ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. पुढील आयुष्यात आपण या चुका टाळतो. असाच एक प्रवास मी अनुभवला होता. वर्ष नीट लक्षात नाही २०१७ किंवा १८ असावे. त्या काळी मी मध्य प्रदेशात शाजापूर ह्या ठिकाणी नोकरीला होतो. शाजापूर हे इंदोर च्या उत्तरेला १०० किमी वर आहे. मला शाजापूर ते धुळे हा ३५० किमी चा प्रवास करायचा होता. मी ५ वाजेची ड्यूटी संपवून संध्याकाळी बस पकडायला शाजापूर बसस्थानकावर गेलो. नियोजना प्रमाणे आठ ते साडेआठ पर्यंत मी इंदोर पोहोचून मस्त स्लिपर कोच पकडली असती नी झोपून गेलो असतो बस पहाटे पाच ते सहा दरम्यान धुळ्यात असती. झोपेची झोप नी प्रवासाचा प्रवास झाला असता. बस मध्ये बसल्यावर माझ्या लक्षात आले की हेडफोन्स रूमवर राहीलेत, हेडफोन विना प्रवास? अशक्य!
मी बसमधून ऊतरून पून्हा रूम वर आलो हेडफोन्स शोधले नी पुन्हा बस पकडायला बसस्टॅंडला आलो. पण वातावरन पुर्ण बदललेले होते. बस स्टॅंडवर ऐरवी १० तरी गाड्या ऊभ्या असायच्या तिथे एकही गाडी नव्हती. सगळीकडे पोलिस बंदोबस्त दिसत होता. पोलिस नागरीकांना लाठ्याकाठ्या मारून पिटाळत होते. “क्या हूआ?” म्हणून एका पोलीसाला विचारले, त्याच्या कडून कळाले की कांद्याच्या भावावरून आंदोलन पेटलंय नी हायवे ला दोन चार ट्रक, नी एक दन पोलिस गाड्या लोकांनी जाळल्यात, बस हायवेला अडकल्या आहेत नी स्टॅंडला ऊभ्या होत्या त्या पोलिसांनी काढायला लावल्या, लवकरच कर्फ्यू लागेल, तू पण कलटी मार. :(
एका हेडफोन मूळे माझी बस चूकली होती नी पूढील प्रवासाची काहीही शाश्वती नव्हती. खरं तर ह्या प्रसंगी मी पून्हा रूमवर निघून जायला हवे होते, पण तसे होणे नव्हते नाहीतर मी पूढील महान प्रवासाला मूकनार होतो. मी बसस्टॅंड सोडून मेनरोडवर आलो नी काही मिळतंय का पाहू लागलो. माझ्या सारखे अनेक होते नी आम्हा चार पाच जणांना एकाच दिशेस जायचे होते. थोड्या वेळाने एक टेंपो आला तो इंदोर कडे “एमटी” म्हणजे रिकामा जात होता. त्याने ओफर दिली की मक्षी (तिथून २५ किमी) पर्यंत मागे बसून चला पूढे तूम्हाला काहीतरी मिळेलच. टेंपोत मागे बसून? छे! पण काही पर्याय नव्हता इतर चारजण टेंपो वाल्याचीच ताडपत्री अंथरून माझ्यासाठी प्रशस्त जागा ठेवून बसले नी मला “आव” म्हणून आमंत्रण देऊ लागले, मीही त्यांचा आग्रहाला ओ देऊन टेंपोत मागे बसलो. म्हटलं २५ किमी तर जायचंय. टेंपो निघाला, शिस्तीत, हळूहळू, धक्क्यावर धक्के देत त्याने आम्हाला मक्षी पर्यंत सोडले, पण मक्षीलाही काही वेगळी परिस्थीती नव्हती मग टेंपोतच पूढे देवास पर्यंतचा प्रवास करायचे ठरले. देवास येईपर्यंत रात्रीचे ९ः३० झाले होते. खरंतर ह्या वेळेपर्यंत मी इंदोर पोहोचून धूळ्यासाठी स्लिपर कोच पकडायला हवी होती. देवास हून मला इंदोर जायला बस मिळाली, देवासला कांदा प्रश्न नव्हता त्यामूळे रहदारी चालू होती. देवास ते इंदोर अंतर तासाभरात गाठले. इंदोरच्या विजयनगर चौराहावरून सर्व बस धूळ्याकडे पळतात, मी तिथे १०ः३० वाजता पोहोचलो. जवळच एका छोट्या होटेलात मी जेवण केले. पण सर्व बस निघून गेल्या होत्या मला धुळे जायला बस मिळत नव्हती. शेवटी मी सरवटे नावाच्या बस स्टॅंड ला जायचा निर्णय घेतला. बस स्टॅंडलाही बस नाही मिळाली तर मग मला कूठल्यातरी होटेलात रहावं लागनार होतं, त्यासाठी १००० ते १५०० जानार हा विचार करून मी स्वत वरच चरफडलो. तसं बस स्टॅंडवर न्यूज पेपर अंथरून झोपायचीही मला लाज वाटली नसती कारण नागपूरला एकदा एम पी एस सी चा परिक्षा द्यायला मी गेलो होतो तेव्हा असाच रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो. इतर एम पी एस सी कॅंडीडेट झोपले होते मग मी ही झोपलो. ऊद्या अधिकारी झालो असतो तर भाषणात सांगायल बरं पडलं असतं ना की मी रेल्वे स्टेशनवर झोपून परिक्षा दिली नी अधीकारी झालो :)
तिथे नागपूरच्या भर मे महीन्यात रेल्वेने प्रवाशांसाठी स्प्रिंकलर्स लावले होते मस्त थंडगार पाणी कूलर सारखं पडत असल्याने मस्त झोप झाली होती. इंदोरला अशी परिस्थीती नव्हती, प्रचंड घाणेरडे बसस्टॅंड, गोंगाट, नी चोर, लूच्चे, लफंगे ह्यांचा सूळसूळाट होता. ह्यामूळे ते शक्य नव्हते. कूठल्यातरी जूगनू नावाच्या ओला सारख्या ऐप वरून मी रिक्षा बूक केली नी तेवढ्यात देवासारखी एक बस माझ्या समोर प्रकट झाली. पण हाय रे दैवा! ती बडवानी जानारी होती, म्हणजे मला फक्त खलघाट पर्यंतच जायला मिळनार होते, तीथून फाटा फूटून गाडी बडवानी जानार होती. पण इंदोरात होटेलचा तरी पर्याय होता खलघाट ला पूढे गाडी नाही मिळाली तर? तिथे होटेल नाहीत हायवेला.
मी निर्णय कॅंसल केला नी पून्हा रिक्षात जायला लागलो तर बस च्या कंडक्टर ने मला आश्वस्त केलं की तो मला खलघाट टोल नाक्यावर त्यांच्या मागून येनार्या नी धूळ्याकडे जाणार्या गाडीत स्वतः जातीने बसवून देईल. त्याने असे आश्वासन दिल्यावर लाॅजचे हजारेक रूपये वाचल्याचा मला आनंदं झाला. त्या कंडक्टरचं ऐकून मी बसमध्ये चढू लागले पण रिक्षावाला छातीवर ऊभा होता, दिडशे रूपये मागू लागला. शेवटी त्याची २० रूपयात बोळवन करून मी बस मध्ये चढलो, चांगली जागा पाहून बसलो.बस खलघाटकडे निघाली, कंडक्टर ने मला मागून येनार्या बसच्या कंडक्टरचा मोबाईल क्रमांक दिला नी त्याच्याशी बोलू घ्या सांगीतलं. बस थोडी पूढे गेल्यावर अर्ध्याएक तासाने मी कंडक्टरला फोन केला. राॅंग नंबर म्हणून तिकडून कळाले. कदाचीत राॅंग कनेक्शन झाले असावे असे मला वाटले. पुन्हा अर्ध्या तासाने मी त्याला फोन केला, पुन्हा तोच व्यक्ती राॅंग नंबर बोलला. मला शंका आली मी कंडक्टर कडे जाऊन नंबर चेक केला तर त्याच्या मोबाईल मध्ये सेव असलेला नी मी डायल केलेला नंबर सेम होता. पून्हा तिसर्यांदा ट्राय मारला तर समोरच्या व्यक्तिने मला त्याचे नाव गाव सर्व सांगीतले नी रात्रीचे दीड वाजलेत पून्हा फोन लावू नकोस म्हणून धमकावले. कंडक्टरने मला फसवले होते, त्याने एका दगडात दोन पक्षी मारले, खोटं बोलून एक गिर्हाईक वाढवले नी त्याच्या एका शत्रूलाही त्रास दिला. मला प्रचंड संताप आला. जाऊन कंडक्टरला शिव्या द्याव्या गरज पडली तर हानामारी करावी असा विचार केला पण तिथे सर्रास लोक चालत्या गाडीतून फेकतात हे माहीत होते. मी सहा फूटांचा असलो तरी ६५ किलो वजनाचाच होतो. त्यामूळे हातघाईची लढाई न करता दुरून तोफगोळे डागावे असा मी विचार केला. बस थांबली की खाली ऊतरून एक दगड ऊचलायचा नी ह्याची पूढची काच फोडायची नाहीच जमली तर मागची तरी फोडायचीच असा मी निश्चय केला. खलघाट यायची वाट पाहू लागलो. खलघाट आले मी ऊतरलो नी रस्त्याच्या कडेला जाऊन दगड शोधू लागलो. दगड सापडेपर्यंत बस ने वाट पाहीली नाही नी झरदीशी निघून गेली. मनातल्या मनात शिव्या देत मी ऊचललेला दगड खाली ठेवला. रात्रीचे दोन वाजले होते. मी त्या चौकात काही मिळतं का पहात होतो. रात्रीचे दोन वाजलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, नर्मदा किनार नी मोकळा रस्ता गाड्या सूसाट धावत होत्या. स्पीड ब्रेकर दिसत नसल्याने त्यावर गडगडाटा सारख्या आवाज करत ऊधळत होत्या, बडवानी कडे टर्न घेनार्या तेवढ्या स्लो व्हायच्या. चौकात मला एक दूकानापूढे पोलिस खूर्ची बसून नी समोरच्या बाकड्यावर पाय पसरून झोपा ठोकताना दिसला. मी त्याला हलवून ऊठवले नी माझी समस्या सांगीतली, झोपमोड केली म्हणून त्याने माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकला नी “चल, चाय पीते” म्हणून टपरीवर नेले आम्ही एकेक चहा हानला, चहाचे पैसे त्यानेच दिले. मला आश्चर्य वाटले, आम्ही गाड्या थांबवायच्या मोहीमेवर लागलो. आम्ही दोघे सूमारे तासभर गाड्यांना हात देत होतो पण एकही गाडी थांबेना. थोड्या वेळाने मला अक्कल आली, पोलिसाला पाहून कुणीही गाडी थांबवत नाहीये हे माझ्या लक्षात आले. मी त्याला “हॅ हॅ, आप क्यो मेरे लिये परेशान हो रहे हो? आप आराम करो मै रोकता हूॅं.” म्हणून सांगीतले. त्यालाही बरे वाटले नी तो झोप ठोकायला सेटपवर गेला. खूर्ची नी समोराल बाकड्यावर पाय पसरून आडवा झाला. पाचच मिनीटात मला पाहून एक गाडी थांबली, ती टेंपो होती, न्यूज पेपरची गाडी. इंदोरहून “दैनिक भास्कर” घेऊन सेंधव्याला निघाली होती. त्याने मला पूढे केबीन मध्ये बसवले तिथे आधीच ड्रायवर धरून तीन लोक होते. तरी एकाला पूढे एकाला मागे करून त्याने मला जागा करून दिली. भागम भाग सिनेमात जर्मनीला जाताना अक्षयकूमार भरलेल्या गाडीत स्वतला कोंबून दरवाजा बंदं करतो तसा मी स्वतला कोंबून झटकन दरवाजा लावून घेतला. गाडी निघाली, ड्रायवरने गिअर टाकायचा म्हटला तर एकाला आपला पाय दोन्ही हाताने ऊचलावा लागायचा. प्रचंड थंडी वाजत होती, गाडीची काच थोडी ऊघडी होती तारण ड्रायवर ला बाहेर पिचकारी मारावी लागायची. आत गार हवा घूसत होती. कुणी काही बोलत नव्हते म्हणून मीही बोललो नाही ऊगाच द्यायचा ऊतरवून. दोनेक तासाने सेंधवा आलं, सेंधवा टोल नाक्यावर टोल रांगेत एक ट्रॅवल्स स्लिपर कोच ऊभी होती मी पटकन जाऊन त्याच्याशी बोलनी केली, धुळ्याकडेच जात होती. पाच साडेपाच वाजले होते. पेपर गाडीचे पैसे चुकते करून मी तिच्यात शीरलो. स्लिपर फूल होती आत झोपायला जागा नव्हती. मला केबीन मध्ये बसावे लागले, प्रचंड झोप लागत होती. कॅबीन मध्ये फक्त बसन्या पूरती जागा होती. दोन जण आणखी होते. ते जवळच ऊतरले. आता ड्रायवरच्या मागची सीट पूर्ण रिकामी झाली. मी पुर्ण पसरलो. पण ड्रायवरला ते माझे सूख पहावले नाही. तो माझ्याशा भांडू लागला, कॅबीन मध्ये झोपलं कुणी की ड्रायवरला ही झोप येते वगैरे. त्याच्या सीटच्यामागेच वर बदली ड्रायवरला झोपायची जागा होती. नी मी त्याच्या मागे झोपत असल्याने मी त्याला तसाही दिसनार नव्हतो. त्याच्या भांडनात काहीही पोईंट नव्हता. दूसरा त्याचा सोबती आत जाऊन आडवा पडला होता. आता मात्र माझा संयम सूटला मी त्या ड्रायवरला “ भोस*के, वगैरे शिव्या दिल्या, मी धुळ्यात राहतो नी मला झोपू दिलं नाहीस तर धुळ्यात गेल्यावर तूझ्यासह तूझी बस जाळून टाकेन” वगैरे दम भरला. “लगावू फोन? लगावू?” असं त्याला धमकावलं. त्याने एकदा माझ्या कडे खालून वर पाहीलं नी चुपचाप बस चालवू लागला. मी झोपलो. बस शहरातून जानार होती पण त्याने शहराबाहेरून जानार्या बायपास ने का घातली ते कळाले नाही. पून्हा रिक्षाला पन्नास मोजावे लागले हायवेवर ऊतरून घरी यायला. सकाळी ८ वाजता घराजवळ पोहोचलो. सकाळी दूध आणायला जानारे वडील भेटले. “काय रे? केव्हा निघाला? कळवले नाही? जा घरी मी आलो.” बोलले नी निघून गेले. मी घरी येऊन बॅग फेकली नी झोपलो.

प्रवास

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

30 Aug 2023 - 12:31 pm | अनिल हटेला

प्रवास वर्णन आवडले... ;-)
मुळात गंमतीशीर वाटतये ,पण तुमचा किती त्रास दायक अनुभव असेल?

काही म्हणा पण ती वेळ निघुन गेल्यानन्तरच,
त्यातली मजा कळते.

अशा बर्‍याच गमती आस्मादीकानी अनुभवल्या असल्या ने भावना पोचल्या..

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2023 - 12:42 pm | अमरेंद्र बाहुबली

तूमचेही अनूभव सांगा.

अनिल हटेला's picture

30 Aug 2023 - 4:15 pm | अनिल हटेला

नक्कीच....
:-)

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 9:57 am | अमरेंद्र बाहुबली

हो गमतीशीरच आहे खरंतर.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Aug 2023 - 12:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

एका हेडफोनमुळे किती रामायण झाले. तुमच्या धमकीमुळे घाबरुन किवा तुम्हाला धडा शिकवण्यासाठी ड्रायव्हरने गाडी बाहेरुन घेतली असेल. घरी सुखरुप पोचलात ते बरे झाले.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 9:59 am | अमरेंद्र बाहुबली

हो बरोबर. धमकीलाच घाबरला असावा.

खूप दिवसांनी खरं प्रवास वर्णन वाचायला मिळालं.
स्टँडवर अवेळी उभे राहिलो तर चौकशी केल्यावर आपलं नशीब असेल तर कामाचा माणूस भेटतो आणि चांगला सल्ला देतो. पण खिडकीवर चौकशी केली तर बसायला होतं. "हो येईल इतक्यात अमकई बस" अशा आशेवर राहतो आणि फसतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 10:08 am | अमरेंद्र बाहुबली

सहमत. सध्या ब्ला ब्ला कार सारखे पर्याय ऊपलब्ध झाल्याने स्वस्त नी वेगवान पर्याय ऊपलब्घ झालेत.

विअर्ड विक्स's picture

30 Aug 2023 - 12:54 pm | विअर्ड विक्स

असंख्य आठवणी आहेत अशा , गुजर आंदोलन चालू असल्यामुळे माझी दिल्ली मुंबई राजधानी ट्रेन जवळपास ८-१० तास उशिरा पोहोचली मुंबईला , खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. मुंबई बेंगळुरू vrl सारख्या भरवशाच्या ट्रॅव्हल ने येताना बसचा ऍक्सल तुटल्याने बस केबिन मध्ये बसून कोल्हापूर मुंबई प्रवास झाला, मल्टी एक्सएल बसमध्ये ड्रायव्हरच्या बाजूची सीट भारी असते त्यातून प्रवास झाला उशीर झाला ६तास पण अनुभव अविस्मरणीय होता . मुंबई बंगलोर प्रवास एकदा स्वस्तातल्या बसने नाईलाजास्तव करावा लागला त्यावेळेस एकाच ड्रायव्हरने १६ तास बस चालवली तेव्हापासून त्या ट्रॅव्हलवर फुली मारली .

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 10:11 am | अमरेंद्र बाहुबली

बस ड्रायवर काही वेळा आठ आठ तास ऐवजी एकेक दिवस वाटून घेतात. नी असे १६-१८ तास गाडी दामटतात.

प्रचेतस's picture

30 Aug 2023 - 7:21 pm | प्रचेतस

एकदम भारी, लैच प्रवास करावा लागला एका हेडफोनपायी

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 10:12 am | अमरेंद्र बाहुबली

हो ना. हेडफोन विसरलो नसतो तर इतका त्रास/गंमत झालीच नसती.

अहिरावण's picture

30 Aug 2023 - 7:30 pm | अहिरावण

भारीच अनुभव.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 10:12 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

31 Aug 2023 - 3:47 am | चित्रगुप्त

धागा उघडल्यावर लेख जरा मोठा दिसला तर वाचायचा कंटाळा येतो म्हातारपणी. पण दुसर्‍याच ओळीत 'शाजापूर' , तिसर्‍या ओळीत 'इंदोर' आलेले बघून उत्सुकता वाढली. मग पुढे तर मक्षी, देवास, विजयनगर चौराहा, सरवटे बस स्टँडवरचे लुच्चे लफंगे, जुगनू अ‍ॅप, बडवानी, खलघाट, 'दैनिक भास्कर घेऊन 'सेंधव्याला' निघालेला टेंपो वगैरे वाचून पन्नासेक वर्षांपूर्वी (खिशात दोन-पाच रुपयेच असायचे त्याकाळी) याच प्रदेशात असेच केलेले प्रवास आठवून गहिंवरून आले. . कुणीतरी पोत्यात कोंबून लांबवर सोडून आलेल्या कुत्र्याला, हुंगत हुंगत वाट शोधत स्वतःच्या 'एरियात' आल्यावर जो ब्रम्हानंद होत असेल, त्याची प्रचिती आली भौ.
-- त्यातून आणखी कहर म्हणजे 'स्पीड ब्रेकरवर गडगडाट करत उधळणार्‍या गाड्या', खलघाटला उतरल्यावर दगड हुडकून काच फोडण्याचा फसलेला बेत, चाय पाजणारा पोलीस, आणि तो हात दाखवत असलेला बघून कुणीही गाडी न थांबवणे, मग झोप 'ठोकायला' त्याचे 'सेटपवर' जाणे, 'भागम भाग' पिच्च्रातला अक्षयकुमार, स्लीपर कोचच्या ड्रायवरला सूख पहावले न जाणे, मग त्याचेशी शिव्यागाळ आणि त्याच्यासकट त्याची बस जाळून टाकण्याचा दम देऊन, "लगावू फोन? लगावू?" असे धमकावणे...

सफर कर्ना तुम्हारा, तो फिर ठीक था -
उसपर लिखना, तुम्हारा, गजब ढा गया ...
जियो.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 10:18 am | अमरेंद्र बाहुबली

इदोर आलो की नेहमी तूमची भेट घ्यावी असा विचार येतो. आताच मागील महीण्यात आलो होतो तेव्हा कूणाकडून तरी कळाले की तूम्ही परदेशात आहात.
मध्य प्रदेशात बस सेवा खासगी असल्याने मनमानी कारभार चालतो. रेल्वे जाळे चांगले असल्याने तिथे तरी रेल्वेच पकडावी. ह्या मार्गावर रेल्वे नाहीये.
एकदा असाच मा होशंगाबाद सध्याचे नर्मदापूरम वरून भोपाळ कडे निघालो. १०० किमी अंतर होते. आधी रेल्वे स्टेशनवर आलो तेथे कळाले की रेल्वे तासाभराने येईल. मग बस पकडली बस वाल्याने तीन तास सांगीतले पण प्रत्यक्षात चार तास लावले नंतर बपलटी मारली की मी चार तासच सांगीतले होते. मा भोपाळ रेल्वे स्टेशन ला दूसरी गाडी पकडायला आलो. सहज चौकशी तोल्यावर कळाले की नर्मदापूरम( होशंगाबाद) वरून जी रेल्वे एक तास ऊशीरा येनार होती ती एक तास आधीच इथून गेली.

कर्नलतपस्वी's picture

31 Aug 2023 - 8:04 am | कर्नलतपस्वी

केला असल्याने विविध अनुभव आले.त्यातील एक....

काश्मीर मधे पोस्टिंग होते. काही विशेष कारणामुळे लवकरात लवकर घरी पोहचायचे होते. तेव्हां रेल हेड करता मिलिटरी वाहनातून चार ते सहा दिवस लागायचे तर स्टेट किंवा खाजगी बसेस मधून एक दिवस. पण जाण्यास प्रतिबंध होता. पण कारणच असे ,म्हणून हिम्मत केली.

दुपार बारापर्यंत सर्व ठिक ठाक होते. दुपारनंतर तुफान बर्फबारी सुरू झाली. गाडी कशीबशी बटोट पर्यंत पोहोचली. फक्त शंभर कि मी अंतर राहीले होते. आतापर्यंत गाडीच्या टपावर भरपुर बर्फ जमा झाला होता. पुढे ट्रॅफिक बंद झाली. गाडीवान म्हणाला आपापली सोय करा.त्याकाळी बटोट एक छोटे खेडेगाव. बाहेर बर्फ आत कुल्फी जमायला सुरवात झाली. स्थानिक काश्मीर प्रवाशांनी मातृभाषेतून संधान साधून तात्पुरता निवारा शोधला. माझं कुणीच ओळखीचे नाही. TCP मधे एक पोलीस कुडकुडत बसला होता.

काय करावे....

अचानक एका जुन्या साथीदाराचे नाव आठवले तो बटोटचाच होता. बटोटमियां म्हणायचो. पोलिसांकडून माहीती घेतली. नशीबवान होतौ. त्याचे घर खालीच उतारावर होते. कच्चा घसरगुंडी वाला ,बर्फाने भरलेला रस्ता. कसाबसा पोहोचलो. घरातल्यांना सर्व परिस्थिती सांगीतली. तोडक्या मोडक्या हिन्दीत त्यांनी उत्तर दिले. बराच वेळ ओळख पटवून दिल्यावर मात्र त्यांनी रात्रभरा साठी चांगली सोय केली.
घरी आल्यावर बटोटमियांला फोनवर सारी कल्पना दिली. त्यावेळेस तो सिकंदराबाद इ एम ई सेंटर मधे होता.

देव तारी त्याला कोण मारी.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 10:21 am | अमरेंद्र बाहुबली

बापरे, कश्मीरात स्थानीकांचे सैन्याला सहकार्य नसते हे माहीत होते अश्या वातावरनात एखादा सैनिक अडकला तर त्याचे काय हाल होत असावेत? बरं झालं तूमच्या ओळखीचं होतं कुणीतरी.

चौकस२१२'s picture

31 Aug 2023 - 10:44 am | चौकस२१२

असेही अनुभव
१) पन्हाळगड - विशाळगड हि नेहमीची भ्रमंती आणि त्यानंतर विशाळगडावरून खाली कोकणात उतरलो .. ( गावाचे नाव आठवत नाही ) आणि तिथून पुढे रत्नागिरी ला गेलो .. मग रत्नगिरी ते गणपतीपुळे अशी किनारी किनारी भटकंती करून पोचले ,,, पुळ्याला मस्त ३ दिवस अर्रम आधीच आयोजित केला होता ,, इथपर्यंत तर सगळे ठीक,,, परत मुंबई ला येण्यासाठी बस ने येण्याऐवजी आपण बोटीने रत्नगिरी वरून जावे काय म्हणून काह्ही चौकशी ना करीत रत्नागिरी ला ( जयगड) रात्रीच्या वेळेस पोचलो .. "आज बोट नाही" हे तिथे गेल्यावर कळले ,, कामावर परत रुजू व्हायचे होते मग हायवे वरून लक्झरी मिळतील असे कल्यामुळे जयगड बंदरा वरून हायवे ला कसे जायचे याचा शोध घेत होतो .. शेवटी एक रिक्षा चा टेम्पो मिळा;ला आम्ही तिघेच मित्र चांदणं पडलेले . मस्त मागे उघडा टेम्पो चा ट्रे ( मराठीत काय म्हणणार ) बसलो थोड्या वेळात लक्षात आलं कि टेम्पोत कोपऱ्यात रचलेली पोती होती ती सूकटाची ( वाळविलेलं माशे ) होती ...
सगळी चंद्रप्रकाशाची मज्जा नाक दाबून श्वास घेण्याची कसरत करीत गेली .. बर रिक्षाच ती टिकाऊ चा वेग असून किती असणार त्यामुळे असेही करत येईना कि चार बाहेर काढून उलट वारा तोंडावर घयावा
मासे खाणारा असलो तरी हे काही सहन झाले नाही "भपका" या शब्दाचा अर्थ कळला
२) आंबोली सावंतवाडी भ्रमंती करून परत कडे जात असताना आड वाडी पाशी यस टी बंद पडली .... .. कंडक्टर म्हनला सकाळीच आता दुसरी येष्टी येईल
मग काय हावरसॅक मध्ये १ भडंगाचा पुडा फक्त आणि वाईच राहिलेली ओल्ड मंक ... वाडी मध्ये एक टपरी वर एक बरणीभर चिवडा होता त्या टपरी वाल्याचे नशीब उजळले ... आम्ही आखि बरणी विकत घेतली आणि यष्टी च्या टपावर , रात्रीची मैफल जमली ...
३) अश्याच एका भ्रमंतीत रात्री मुक्कामाच्या यष्टीत झोपायला मिळाल होतं ... डास चावले पण एक वेगळा अनुभव होता तो

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 11:17 am | अमरेंद्र बाहुबली

हाहा. मस्त अनूभव होते.

मस्त मागे उघडा टेम्पो चा ट्रे = हौदा

चौकस२१२'s picture

4 Sep 2023 - 6:12 am | चौकस२१२

हायला हौद्यात बसलो असे लिहिले असते तर काय हत्तीच्या पाठीवरील काय ! असे वाटले असते
हत्तीच्या पाठीवरील माहित नाही पण एकदा ताज महाल बघायला जाताना उंटाच्या गाडीत बसलो होतो ( जणू अजस्त्र टांगाचं )थोडा वेळ बरा गेला पण मग उंट जोराने पादला ! तेव्हापासून परत जर उंटाच्या गाडीत बसायची पाळी आली तर , त्या "सैलन्स ऑफ द लॅम्ब " मध्ये कसे मूडदा बघायला जाताना डिटेक्टिव्ह नाका खाली भरपूर विक्स चोळून ठेवतात तसे काही करावे कि काय विचारात आहे !
असो यष्टी पासून उंटापर्यंत विषयांतर झाले क्षमा ..

मस्त मागे उघडा टेम्पो चा ट्रे = हौदा

नचिकेत जवखेडकर's picture

31 Aug 2023 - 1:24 pm | नचिकेत जवखेडकर

एकदा बेंगळुरूहून पुण्याला यायला निघालो होतो. कुठे १४ तास नुसतं बसून जा, म्हणून खासगी स्लीपर बसचं तिकीट काढलं होतं. त्या बाबानी बेंगळुरूमध्येच ३ तास फिरवली गाडी. स्लीपर बस होती म्हणून प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एसी होता आणि तो इतका जबरदस्त मोठा होता की पुण्याला जाईपर्यंत पार घसा कामातून गेला. त्यात भर म्हणून, साताऱ्याच्या अलीकडे त्या चालकाला चक्कर यायला लागली म्हणून वाटेत परत एका ढाब्यावर बस १ तास थांबून राहिली, बदली चालक येईपर्यंत. या सगळ्या प्रकारात १४ तासांचा प्रवास २० तासांचा झाला. नंतर कानाला खडा लागला तो कायमचाच की किमान बेंगळुरू-पुणे खासगी बसनी यायचं नाही. कर्नाटक सरकारच्या ऐरावत बसेस सुंदर आहेत. संध्याकाळी ६:०२ ची वेळ असेल की बरोब्बर त्या वेळेला सुटणार म्हणजे सुटणार आणि सकाळी बरोब्बर ८ वाजता पुण्यात. नंतर तर त्यांनी पण स्लीपर बसेस काढल्या त्यामुळे तर जन्नतच!!

टर्मीनेटर's picture

31 Aug 2023 - 1:38 pm | टर्मीनेटर

ऐनवेळी विमानाची तिकिटे उपलब्ध नसल्याने काही वर्षांपूर्वी दोन वेळा बेंगलोर - मुंबई असा प्रवास शर्मा ट्रॅव्हल्सच्या 2x1 लक्झरी बसने केला होता, फार छान अनुभव आला होता तेव्हा, आता ही सर्व्हिस चालू आहे की नाही ह्याची कल्पना नाही.

टर्मीनेटर's picture

31 Aug 2023 - 1:31 pm | टर्मीनेटर

असे प्रवास करावेत अधून-मधून 😂
मजा आली वाचायला!

Bhakti's picture

2 Sep 2023 - 6:08 pm | Bhakti
Bhakti's picture

2 Sep 2023 - 6:08 pm | Bhakti

असे प्रवास करावेत अधून-मधून..
मजा आली वाचायला!

हेच म्हणते,
आमची जन्म, कर्म, सगळ्यांसाठी एकच भुमी असल्याने असा प्रवास घडला नाही...पण करते एकदा ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2023 - 11:40 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. :)

पूर्वी दोनतीनदा बंगलोर पुणे असा लग्झरीने प्रवास केला आहे. व्होल्वो ने पण आलो आहे.
बसून प्रवास केला तर त्रास होत नाही. पण स्लीपर ने प्रवास म्हणजे शिक्षाच असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 6:16 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत नाही. बसून झोप होत नाही. स्लिपर ला एकदा झोपलो की ताण नसतो.

MipaPremiYogesh's picture

1 Sep 2023 - 8:47 pm | MipaPremiYogesh

काहीही भन्नाट किस्से आणि अनुभव ...कमाल

चौथा कोनाडा's picture

2 Sep 2023 - 5:38 pm | चौथा कोनाडा

ख. त. र. ना. क __ प्रवासानुभ !

लै भारी लिव्हलंय !
थरारक वाचताना लै मज्जा आली !

पण .....

पण जरा पॅराग्राफ मध्ये जागा सोडा की भाऊ ... अन शुद्धलेखन जमलं तर लोण्यात साखरच !

तसं बस स्टॅंडवर न्यूज पेपर अंथरून झोपायचीही मला लाज वाटली नसती कारण नागपूरला एकदा एम पी एस सी चा परिक्षा द्यायला मी गेलो होतो तेव्हा असाच रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो. इतर एम पी एस सी कॅंडीडेट झोपले होते मग मी ही झोपलो. ऊद्या अधिकारी झालो असतो तर भाषणात सांगायल बरं पडलं असतं ना की मी रेल्वे स्टेशनवर झोपून परिक्षा दिली नी अधीकारी झालो :)

चौथा कोनाडा's picture

2 Sep 2023 - 5:39 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !

तसं बस स्टॅंडवर न्यूज पेपर अंथरून झोपायचीही मला लाज वाटली नसती कारण नागपूरला एकदा एम पी एस सी चा परिक्षा द्यायला मी गेलो होतो तेव्हा असाच रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो. इतर एम पी एस सी कॅंडीडेट झोपले होते मग मी ही झोपलो. ऊद्या अधिकारी झालो असतो तर भाषणात सांगायल बरं पडलं असतं ना की मी रेल्वे स्टेशनवर झोपून परिक्षा दिली नी अधीकारी झालो :)

हा .... हा .... हा .... !

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2023 - 11:40 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. :)

रीडर's picture

4 Sep 2023 - 1:19 am | रीडर

अनपेक्षित ट्विस्ट आला तुमच्या प्रवासात

चौकस२१२'s picture

4 Sep 2023 - 6:19 am | चौकस२१२

दिली बंगळुरू रेल्वे ला जाताना दिल्ली च्या एजंटने ठोकून दिले कि तुमचे रिसर्वेशन झाले आहे ... झाले नवहते , बोगीत तर शिरलो ... पण पुढे हाल झाले आणि दुसऱ्या दिवशी बागुलरात कामाच्या मुलाखती साठी जायचे होते,, त्याची हि वाट लागली
"दिल्लि चे ठग" हे ऐकलेले पटले

प्रवासातील नाही पण त्या आधी
मला वाटत पहिलाच परदेशी प्रवास होता अर्थातच भांबावलो होतो
विमानतळावर आत जाताना एक मुलगा आणि मुलगी ने बाहेर ने थांबवले आणि विनंती केली कि आत अमुक कौंटर च्य रांगेत इंदिरा आणि यशवंत उभे आहेत ( कि असह्यच कोणीतरी दोन राजकारण्यांची पहिली नावे घेतली ( आठवत नाही ) त्यांना हा निरोप द्याल का.. मी पण येडाच खरंच आय त्या रांगेत विचारत राहिलो इंदिरा आणि xxxx आहेत का ते !

महिरावण's picture

4 Sep 2023 - 7:06 am | महिरावण

[मी पण येडाच खरंच आय त्या रांगेत विचारत राहिलो इंदिरा आणि xxxx आहेत का ते !]
-तुम्ही अजूनही येडेच आहात.

चौकस२१२'s picture

4 Sep 2023 - 5:39 pm | चौकस२१२

महिरावण , माफ करा ? आपण गमतीने म्हणताय कि मुद्दामून अपमान करताय ?