अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या माझ्या काही आठवणी!

भुजंग पाटील's picture
भुजंग पाटील in जनातलं, मनातलं
18 Aug 2023 - 12:18 pm

ह्या आहेत माझ्या अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या, लाँग ड्राईव्ह्च्या काही आठवणीं - तत्कालीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने बदलत गेलेल्या:

१. नकाश्यांचे पुस्तक (अ‍ॅटलास):
अगदी सुरूवातीला अ‍ॅटलास हा एकच आधार असायचा.
आम्हाला कुठे नवीन ठिकाणी जायचे असल्यास आधी जवळच्या गॅस स्टेशनला जाऊन त्या स्टेट / शहराच्या नकाश्याचे पुस्तक विकत घ्यावे लागायचे.
नाही मिळाले तर तसेच निघून पडायचे, आणि त्या राज्याच्या सिमेवर हायवेच्या वेलकम सेंटर मधून नकाशे विकत घ्यायचे; मग हायलायटरने डेस्टिनेशनचा रस्ता ट्रेस करून पुढची वाटचाल करायची. कधी तर फक्त फॉलकलर्स बघायला रात्री गाडी चालवून सुर्योदयच्या वेळी कुठल्यातरी कॅम्पींग साईट ला पोहोचायचो.
मी ड्रायव्हर असायचो आणि बायको नेव्हिगेटर - ती पुढ्यात नकाशाचे पुस्तक+चिप्स्+कोक/कॉफी+मराठी कॅसेटी/सिडीजचा भला मोठ्ठा आल्बम असे सगळे सांभाळत मला डिरेक्शन देत असायची. लांबलचक हायवे वर तिला कधीतरी झोप लागायची, मग मी हळू आवाजात गाणे ऐकत शक्य तितका पल्ला गाठायचो.

आताही कधी आब्बाचे फर्नँडो/डॅन्सिंग क्वीन किंवा महानोरांचे गडदं जांभळं कानावर पडलेकी मला त्या कॅसेट्स अन आमचे ते विशी पंचविशीतले अपस्टेट न्यु यॉर्क आणि न्यु इंग्लंडचे नोमॅड दिवस आठवतात.

तर अश्या प्राचीन काळात अस्मादीक अमेरिकेत स्थायीक झाले. :))

२. मॅपक्वेस्ट:
२००१ पासून पुढील ३-४ वर्ष मॅपक्वेस्ट मुळे सोपी गेली. आता स्टार्ट टू डेस्टिनेशन नेमका मॅप ऑनलाईन प्रींट (की प्रिंट?) करायची सोय झाली होती.
मी तेव्हा $१२५ ला घेतलेला ब्रदर कंपनीचा लेसर प्रींटर तब्बल १६ वर्ष विना तक्रार चालला.
मग तो टा़कून देतान उगीच जुन्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावर प्रिंट केलेले नकाशे, त्या ट्रिपा, मुलींचे मुझिक क्लासेस चे नोटेशन्स, मॅथ होमवर्क, देशी रेसिपीज, ग्रीन कार्ड, नागरिकत्वाच्या सतराशे साठ डॉक्युमेंट्स, असो.
बाकी गमतीजमती वर सारख्याच. फक्त एकदा रात्री रस्ता न समजल्याने नुवर्कच्या "वेगळ्याच" भागात गोल गोल फिरलो, आणी शेवटी एका पट्रोलींग करणार्या पोलिसाकडे जाऊन "काका मला वाचवा" केले, त्याने मग नीट हायवेला लावून दिले.

३. जिपीएस (गार्मीन / टॉमटॉम):
२००५-२००६ मध्ये पहिले जिपीएस विकत घेतले. आधीपण ते बाजारात होतेच, पण नवीन टेक्नॉलॉजी असल्याने किमती अव्वाच्या सव्वा असायच्या.
आमच्या थोरलीचा जन्म पण तेव्हाचाच, त्यामुळे सौ. अन ती मागच्या सिट वर, अन मी एकटा पुढे. आमच्या कॅसेटी मात्र आता कायमच्या माळ्यावर गेल्या होत्या. त्यांची जागा नर्सरी र्‍हाइम्सच्या सिडीनी घेतली होती.
अजून एक आठवते. युट्यूब चा जन्म (२००६) झाला होता, पण फोनचा इंटरनेट डाटा आवाक्याच्या बाहेर, मग आम्ही घरून डिएसेल वर कूलटोड.कॉम वरून गाणे डाऊनलोड करायचो अन् सिडी बर्न करून बरोबर घ्यायचो.

४. गुगल मॅप्स / अनमिमीटेड इन्टरनेट:
शेवटी २०१० मध्ये पहीला स्मार्ट्फोन घेतला, अँड्रॉइडवर गुगल मॅप्स, युट्यूब, स्वस्तातले इंटरनेट ह्यामूळे आमाच्या लाँग ड्राइव्हज आधीपेक्षा थोड्या इझी झाल्या होत्या.
शेन्डेफळ ३-४ वर्षाचे झाल्यावर थोरली व ती मागे बुस्टर सिट्स वर, कधी मुव्ही बघ्यायच्या, तर कधी वेगवेगळे हायवे गेम्स खेळायच्या, तर बर्याचदा "आर वी देर यट?" चे पालुपद लावायच्या.

अशीच अजून एक आवडती आठवण आहे: आई व घरात एकंदरीत सर्वांचेच जी ए खूप आवडीचे आहेत.
त्यांनी अनुवादीत केलेल्य रान आणि गाव ह्या कॉनरॉड रिचरच्या कादंबर्या ओहायो व्हॅलीच्या पार्श्वभुमीवर घडतात.
एकदा आई भरतातून आली असताना तिला त्या भागात घेऊन गेलो होतो. आणि एका ओव्हरलूक पॉईंट वरून व्हॅलीचे विहंगम द्रुष्य तास दिड तास बघत बसलो .
बायको आणि मुली एकमेकांकडे बघत होत्या, हा काय प्रकार आहे म्हणून.

असो, ह्या आहेत माझ्या आठवणी. ह्यात अमेरिका स्पेसिफीक असे विशेष काही नाही. पण १-२ लेख मिपावर वाचले अमेरिकेतले, आणि वाटले संगवेसे.

कथा

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Aug 2023 - 1:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

रच्याकने १४ वर्षात फक्त दोनच लेख? अजुन बर्‍याच आठ्वणी असतील की. लिहीते रहा.

भुजंग पाटील's picture

18 Aug 2023 - 6:38 pm | भुजंग पाटील

हो, खंडीभर आठवणी आणि अनुभव. जमेल तसे लिहीणार आहे.

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2023 - 2:23 pm | कर्नलतपस्वी

मधे चार चाकी घेतली. बरोबरच टिटीके ची नकाशा पुस्तक घेतले. त्या आधाराचे आर्धा भारत फिरलो.

मुक्तक आवडले.

भुजंग पाटील's picture

18 Aug 2023 - 6:32 pm | भुजंग पाटील

माझा एक बालमित्र बंगळुरू ला स्थायीक झालाय, पन्नाशीच्या आतच त्याने अगडबम्ब पगाराची नोकरी सोडून भारत भ्रमण करायचे ठरवले.
त्याच्याकडून तेव्हा टीटीके मॅप्स बद्दल ऐकले होते.

चौथा कोनाडा's picture

18 Aug 2023 - 6:06 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख ... आवडला !
भारी आठवणी ओघवत्या लिहिलेल्या आहेत... पण थोड्या वरवरच्या वाटल्या !

येऊ द्या आणखी डिटेलमध्ये .... सुंदर मालिका होऊन जाईल !

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !

भुजंग पाटील's picture

18 Aug 2023 - 6:23 pm | भुजंग पाटील

धन्यवाद, नक्कीच प्रयत्न करेल.

अमेरिकेतल्या रस्त्यांच्या निमित्ताने हा थोडक्यात आटोपलेला लेख वाचून तुमच्या अमेरिकेतील प्रदीर्घ वास्तव्यातले नानाविध अनुभव जाणून घेण्याची उत्सुकता बळावली आहे. कृपया मनावर घेऊन शक्यतो अगदी सुरुवातीचे दिवसांपासूनच्या अनुभवांची लेखमाला सुरु करावी ही विनंती. अमेरिकेत तुम्ही केलेले प्रवास, तिथला इतिहास-भूगोल- वातावरण, अमेरिकेत स्थायीक भारतीय आणि खुद्द अमेरिकन, अधून मधून केलेल्या भारतभेटी, दोन्ही संस्कृतीत तुम्हाला जाणवत आलेला फरक, मुलांची भारताबद्दलची आवड-नावड ... सगळे काही विस्ताराने वाचायला खूप आवडेल.

अगदी बरोबर..माझी अमेरिका वारी टेम्परवारी होती, तुमचे अनुभव जास्त खोल आणि मोठ्या आवाक्याचे नक्कीच असणार.. त्याबद्दल वाचायला आवडेल.माझी लेखमाला साधारण 21 भागांची आहे, तुमची प्रदीर्घ व्हावी अशी मनःपूर्वक प्रार्थना..

चित्रगुप्त's picture

18 Aug 2023 - 9:54 pm | चित्रगुप्त

तुमची वारी केंव्हा घडली ? अद्याप तुम्ही अमेरिकेत आहात का ?

आमची वारी साधारण 17 जून ते 25 जुलै 2023 या काळापूर्ती घडली..त्यामुळे आता पुन्हा स्वदेशात आहोत..

छान आठवणी परंतु त्रोटक वाटल्या.
डिटेलवारी लिहायचे मनावर घ्या ही विनंती.

जुने मॅप क्वेस्टचे दिवस आठवले. एका सहकाऱ्याने शहराच्या नकाशाची सीडी दिली होती ती बघून मार्ग समजावून घ्यायचा. मॅप क्वेस्ट वरून छापायचा आणि कागद अर्धबरीच्या हातात द्यायचा. एखादा एक्झिट चुकून चुकला की सगळे ओंफस् मग आधी गाडीत धुमश्चक्री व्हायची आणि नंतर सन्मार्गाला लागायची धडपड.

एकदा एका ठिकाणी तातडीने जावे लागले म्हणून काही न बघता निघालो. परत येताना बराच उशीर झाला तेव्हा चुकलो म्हणजे दिशा बरोबर होती परंतु घराचा रस्ता सापडेना. बराच फिरलो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते किंवा रात्र असल्याने कुत्रं देखील नव्हतं म्हणायला पाहिजे. शेवटी एका चौकात घराच्या रस्त्याची छोटी पाटी दिसली.

लगेच दुसऱ्या दिवशीच पहिला "गपस" आणला (तेव्हा महाग होता). नकाशे ऑफ लाईन (मराठी प्रतिशब्द सुचवा) होते, लेन असिस्ट (मप्रसु) नव्हता परंतु त्यात निलदंत होता. एकदा एका नवीनच आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला राईड दिली तेव्हा एक फोन आला तो मी गपस वर घेतला तेव्हा तो विद्यार्थी भलताच इंप्रेस झाला होता.

पुढे तांत्रिक प्रगतीमुळे सगळेच बदलले. भ्रमणध्वनी चाणाक्ष झाला, कार्स मध्ये नेव्हीगेशन (मप्रसु) प्रणाली आल्या त्यामुळे आता लवकरच गपस नामशेष होईल की काय असे वाटते.

कालाय तस्मै नमः ।

MipaPremiYogesh's picture

23 Aug 2023 - 10:09 pm | MipaPremiYogesh

छान लिहिले आहे. अजून लेख मला लिहा , सगळे अनुभव आणि कशी स्थित्यंतरे झाली वगैरे