https://www.lokmat.com/pune/sharad-pawar-and-ajit-pawar-4-hours-secret-m...
जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली,
झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!...
दूरातल्या चॅनल चे पापाराझी मांडलेले,
भिंगात कॅमेराचे ब्रेकींगन्यूज सांडलेले
कैफात ही युतीची अन् पालखी निघाली
केस मधल्या जरंडेश्वर कारखान्यास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी युती मिळाली
जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली,
झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!...
नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात *शरदचंद्र* होता, स्पर्शात लाख नारे
ओथंबला शाहू-फुल्यांनी अवकाश भोवताली
जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!...
प्रतिक्रिया
13 Aug 2023 - 11:38 am | बाजीगर
भेटले दोघे चोर डिया अतुल
घरी, ना देता मिडिया चाहूल
म्हणे काय टाकू पुढचं पाऊल
आपण वेगळी मांडली ना चूल
भाजपा शी मी बांधला हा पूल
कारण मोदी,शहा पाॅवरफूल
कशी वोटरच्या डोळ्यात धूळ
आपण का करतोय ही भूल
2024 मधे पुन्हा मोदी रुल.
# शीघ्रकवी
18 Aug 2023 - 5:25 am | रंगीला रतन
मस्तच!
18 Aug 2023 - 3:47 pm | बाजीगर
धन्यवाद रतनजी.