मी कार्यकर्ता,
मीsssss कार्यकर्ता.....
वारसा,लाभ.... नेत्यांची मुलं-मुली
पदं मर्जीतल्यांना,आमच्या थंड चूली
सतरंजी उचलायला मात्र मी
टाईमपास खेळतो,जंगली रमी
मी कार्यकर्ता
मी कार्यकर्ता
वर्षानूवर्ष पक्षात मी ठाम
शपथघेती आयारामगयाराम
संकटमोचन मी,मी विघ्नहर्ता
जो विसरला जातो चरताचरता
मी कार्यकर्ता..मी मी मी कार्यकर्ता...
एक बिर्याणी आणि एक बीअर,
एक हिरवी नोट घेऊन मी चीअर
नेत्याने खांद्यावर हात ठेवला
तर हसतो मी मरतामरता
मी कार्यकर्ता..मी मी मी कार्यकर्ता
होर्डींगवर गल्लीतल्या फोटो आला,
माझा जीव हरखून सूपाएवढा झाला,
रेशन आणा वो,घरात नाही दाणा,
काही कामधाम करा हो,हे जाणा
गल्लीत काॅलरटाईट मी शहाणासुरता
सदा दूर्दैवाच्या मी खातो गर्ता
मी कार्यकर्ता..मी मी मी कार्यकर्ता
प्रतिक्रिया
9 Jul 2023 - 12:29 pm | तुषार काळभोर
याचा कोणीतरी व्हिडिओ बनवून व्हायरल करा रे!
अवांतर : लोक कार्यकर्ते का बनतात? शुद्ध समाजसेवा किंवा त्या पक्षाचे/संघटनेचे विचार आपल्याला पटतात म्हणून? सैन्य पोटावर चालते, तसे कार्यकर्त्यालाही पोट असते, कुटुंब असते आणि त्यांनाही पोट असते. ते भरण्याची काय तजवीज करतात साधारण? विशेषतः पूर्णवेळ कार्यकर्ते? की नेते अब्ज आणि कोटीने कमावतात त्यात आपलाही चिमूटभर फायदा होईल या आशेवर? की खरोखरच चिमूटभर फायदा असतो? की आणखी काही? अपवाद सोडून, बहुतेक कार्यकर्त्यांचे कुटुंबीय कसे राहतात?
अति अवांतर : २००६ मध्ये राज ठाकरे यांचे विचार (त्यावेळी) पूर्णपणे पटलेले असल्यामुळे मनसेला ऑनलाईन देणगी दिली होती. नोकरी नसती तर कदाचित सदस्य आणि कार्यकर्तादेखील झालो असतो :)
9 Jul 2023 - 4:52 pm | सर टोबी
पुण्याचे असाल तर कुठेही आढळणाऱ्या खाऊ गल्ल्या, पथारीवाले तसेच क्षेत्रीय कार्यालयाबाहेरील गर्दी तुम्हाला सांगेल कार्यकर्ता काय चीज आहे ते.
9 Jul 2023 - 5:09 pm | चौथा कोनाडा
लै भारी .. एकदम सही जमलंय ...
क्या बात बाजीगर !
तुषार भाऊ म्हणतात त्या प्रमाणे " याचा कोणीतरी व्हिडिओ बनवून व्हायरल करा रे!"
9 Jul 2023 - 5:19 pm | चौथा कोनाडा
उदा :
महाराष्ट्र माझा रॅप गाणे :
https://www.youtube.com/watch?v=TqMni3rNy9M
10 Jul 2023 - 2:02 pm | चांदणे संदीप
आवडला.
सं - दी - प
10 Jul 2023 - 2:41 pm | राजेंद्र मेहेंदळे
आजकाल अशी जमात आहे?
कविता आवडली
16 Jul 2023 - 7:05 pm | कर्नलतपस्वी
एक डोळ्यात अंजन घालणारा चित्रपट.