.....राजधानी Express.....

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
7 Jul 2023 - 8:43 am

राजधानी Express
-------------------------------------------

कशी धावते..राजधानी पाहा ..
हॉर्न वाजवत..वेगात...सुसाट
वार्यालाही मागे टाकणारा.
वेग तिचा तो अफाट..

वेगाशी स्पर्धा करता तिच्या..
थकुनि जाती पळती झाडे..
HiTech तिचे इंजिन अवजड..
धुरांच्या रेषाही न हवेत सोडे..

स्टार-पॅंट्रीचा एक खास डबा..
स्टिम राइस..पिझ्झा बर्गर..नाही गावठी भात-वरण..
सुगरण तिथले शेफ..खरोखर..
सॅलाड मिळे..बास झाले आता शिकरण..!

राजधानीतुन जातो आता
पैसे फेकुन..ऐटित रुबाबात मी ..
साहेबासारखा प्रवास करतो..
एकांतात शिंकताना ही म्हणतो..प्लीज एक्स्क्युज मी..

कोट बिल्ला पाहुन उरात भरे धडकी..
T.C इथले बघा कसे तालेवार वाटती...
ते समोर येताच आपसुक ..
मला सुचते..इंग्रजी..विसरुनि मराठी...

जाते..जाते..राजधानी पाहा..
सुसाट..वेगात...भोंगा वाजवत..
मामाच्या गावालाच मात्र
आता राजधानी नाही थांबत...
.
.
.
.
.
.
.
मामाचा गाव मोठा.. आता झालाय फार छोटा...
मी बाळगतो खिशामध्ये आता पौंड-डॉलरच्या नोटा..
रात्री मामाचा गाव येताना धडधडणारी राजधानी झुकझुक करत जाते..
एरव्ही भोंगा मारणारी ती..आर्त शिटी मारुन..मला बहुदा खुणावते..

मी गाढ झोपेमध्येच मस्त...मामाचा गाव तसाच येऊन जातो निघुन..
पहाटे राजधानीने ढाळलेले अश्रु ही तसेच खिडकीवरुन जातात ओघळुन....राजधानी expresses..

मी उठतो सकाळी...संपतो प्रवास..थांबते राजधानी...
मी उतरतो..धुंदीत..
चिरडली जाते पायाखाली..
मामाच्या गावातुन उडत उडत कशीबशी माझ्यापर्यंत आलेली..कापसाची म्हातारी..
बहुदा तिच..जिच्यामागे धावलो होतो मी मामाच्या गावात...माझ्या बालपणी

----------कानडाऊ योगेशु.

कविता

प्रतिक्रिया

इपित्तर इतिहासकार's picture

7 Jul 2023 - 10:29 am | इपित्तर इतिहासकार

मला पद्य लेखनकलेची तितकीशी समज नाही, पण ही भावना उत्तम पोचली असे म्हणतो.

लहानपणीचे बालसुलभ विश्व, पुढे विस्तारत जाणाऱ्या कक्षा, नंतर व्यावसायिक अन् शर्यतीत पळण्याच्या आयुष्याच्या रीतिभातीमुळे मागे सुटलेले निरागस क्षण ! आवडले आपल्याला.

पहाटे राजधानीने ढाळलेले अश्रु ही तसेच खिडकीवरुन जातात ओघळुन....राजधानी expresses..

हा माझ्यासाठी हाय पॉइंट होता राव !

कर्नलतपस्वी's picture

7 Jul 2023 - 11:06 am | कर्नलतपस्वी

बरेच दिवसांनी.....

मामा मावशी आजी आजोबा, निरापेक्ष नाते. सदैव काळजात घर करून असते. आता काळ बदललाय पण तरीही हे नाते कायम आहे. फक्त जागा बदलल्या आहेत.

आवडली.

कुमार१'s picture

7 Jul 2023 - 11:41 am | कुमार१

आवडलीच ....

चांदणे संदीप's picture

7 Jul 2023 - 12:49 pm | चांदणे संदीप

चांगली कविता. एखादी गजल वगैरे येऊद्या.

सं - दी - प

कवितेतली भावना पोचली.
मलासे वाटते अशा तरल भावना आणि बहु-आयामी अनुभूति व्यक्त करायला असे छंद-मुक्त लिखाणच उत्तम. अनेक आभार.

कानडाऊ योगेशु's picture

13 Jul 2023 - 8:00 am | कानडाऊ योगेशु

प्रतिसाद देणार्या व वाचन करणार्या सर्वांना धन्यवाद!

कंजूस's picture

13 Jul 2023 - 8:38 am | कंजूस

गाडी पोहोचली.