पाऊस

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जे न देखे रवी...
2 Jul 2023 - 12:29 pm

पाऊस
----------------------------------
आई गं
सरसर पाऊस आला गं
जाऊ दे भिजायला गं

क्षणात ऊन कुठे लपलं
जोरदार वारं हे सुटलं
वास भारी मातीला गं
जाऊ दे भिजायला गं

शेजारची पोरं अंगणात
फेर धरुनी रिंगणात
जाऊ दे फेर धरायला गं
जाऊ दे भिजायला गं

पाण्याच्या झाल्या नद्या
सोडू गं त्यात होड्या
दे ना कागद करायला गं
जाऊ दे भिजायला गं

बरं ऐकतो मी तुझं
जातो छत्री घेऊन
पण बाहेर नेऊन
मी बंदच ती करेन
नाहीतर तूच चल भिजायला गं
मस्त मस्त धारा झेलायला गं
--------------------------------------------------

Nisargहे ठिकाण

प्रतिक्रिया

बिपीन सुरेश सांगळे's picture

2 Jul 2023 - 12:30 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचक मंडळी नमस्कार .

मी फारसा सक्रिय राहू शकत नाही . इतर लेखकांच्या कृतींना किंवा माझ्या लेखनावरच्या अभिप्रायांना योग्य वेळी प्रतिसाद देऊ शकत नाही . नंतर फार उशीर झालेला असतो . हा माझा दोष आहे . तरी क्षमा असावी .

धन्यवाद .

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2023 - 1:06 pm | कर्नलतपस्वी

सांगते भौ,मागच्या कट्ट्यानंतर आजच दिसलात.

पाऊस वाजतो दारी
हलकेच निथळती सुर....

पावसाचा दोष आहे.
आठवतात कुणाला कागदाच्या होड्या
तर कुणाला भज्यांच्या गाड्या.