छाट्या

अहिरावण's picture
अहिरावण in जे न देखे रवी...
22 Jun 2023 - 2:24 pm

प्रेरणा : ओळखा पाहू

गावोगाव हिंडून
दारोदार भिक्षा मागतांना
कुणी दान दिलेल्या
कुणी फेकून दिलेल्या
कुठून कुठून मिळवलेल्या
गोळा केलेल्या
सुती, टेरीलीन, टेरीकोट, खादी अन् रेशमी
छाट्या

आज वाटून मोकळे होऊ
उद्या मोकळे होऊ
म्हणता म्हणता
दिवस सरता सरता
अजुन एक भर पडून
नीट घडी करुन,
जपून ट्रंकेत ठेवलेल्या
याने दिलेली
त्याने दिलेली अन
ती छाटी तर...
आठवणींची मोरपिसे
हळुवार उलगडून
हुळहुळत निश्वास
सोडायला लावणा-या
छाट्या

छाटीचा मोह ठेवू नकोस
एक अंगावर
एक दोरीवर
छाटीत अडकलास तर संपलं सगळं
गुरुने दिलेला इशार विसरुन
जमा केलेल्या
छाट्या

ज्यांना
हव्या असतील
त्यांनी येऊन
घेऊन जाव्या सांगून सुद्धा
भर पडत
अजूनच वाढत जातात
छाट्या

गुरुंचे म्हणणे खरे होते
मोह फार वाईट
मग तो छाटीचा का असेना

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

गवि's picture

22 Jun 2023 - 2:39 pm | गवि

हा हा :-))

मिपाचे जुने दिवस आठवले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jun 2023 - 3:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

छाटीवरुन मिठी, मुठी आणि मठीचा विनोद आठवला :)

बाकी विडंबन जमलय

प्रचेतस's picture

22 Jun 2023 - 3:13 pm | प्रचेतस

आता ताट्या, लाट्या, बाट्या येऊ द्यात

राघव's picture

22 Jun 2023 - 11:18 pm | राघव

भारी!

कंजूस's picture

23 Jun 2023 - 5:38 pm | कंजूस

नैतर शूलपाणेश्वरास सर्वच काढून घेणार आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2023 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त येऊ दे अजून

-दिलीप बिरुटे