ताज्या घडामोडी - मे-जून २०२३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
28 May 2023 - 1:47 pm

नमस्कार मंडळी,

खरं तर महिन्याच्या २८ तारखेला ताज्या घडामोडींचा नवा धागा काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही. तसेच आधीच्या धाग्यात आधीच १६०+ प्रतिसाद झाले आहेत तेव्हा त्या धाग्यात अजून प्रतिसाद आल्यास ते वाचणे यापुढे त्रासदायक होऊ शकेल म्हणून मे-जून २०२३ साठी नवा धागा काढत आहे. तसेच इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत त्या जुन्या धाग्यात प्रतिसाद म्हणून जाण्यापेक्षा नव्या धाग्याच्या सुरवातीला असल्या तर ते चांगले होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नव्या संसदभवनाचे उद्घाटन केले. आपल्याला नवे संसदभवन हवे यासाठी पूर्वीपासून विचार चालू होता. सगळ्यात सुरवातीला नरसिंहराव पंतप्रधान असतानाच हा विचार सुरू झाला होता. गुलाम नबी आझाद तेव्हा संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याशी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी या विषयावर चर्चा केली होती असे स्वतः गुलाम नबी आझादांनी म्हटले आहे. https://www.ndtv.com/india-news/new-parliament-narasimha-raos-idea-good-...

नव्या संसदभवनात लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाशेजारी सेंगोलची स्थापना केली गेली आहे. सेंगोल म्हणजे सोन्याचा राजदंड. तामिळ संस्कृतीत चोला राजघराण्यात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून सेंगोल नव्या राज्यकर्त्याच्या (त्यावेळी राजा) हातात सुपूर्द केला जात असे. शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात दर्शवावे असे जवाहरलाल नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारींना याविषयी विचारणा केली. तेव्हा राजाजींनी तामिळनाडूतील चोला राजघराण्यातील परंपरेप्रमाणे असा सेंगोल नेहरूंच्या हातात दिला जावा असे मत व्यक्त केले. ते पंडित नेहरूंनी मान्य केले. त्यानंतर राजाजींनी मद्रासमधील एका सोनाराकडून सोन्याचा सेंगोल (राजदंड) बनवून घेतला. तामिळनाडूतील थिरूवदुतुराई मठाचे प्रतिनिधी कुमारस्वामी थंबिरन आणि इतरांनी तो सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री पावणेबाराला पंडित नेहरूंच्या हातात सुपूर्त केला. याविषयी त्यावेळच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी देत आहे:

sengol

म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते.

राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-try... हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल.

sengol

त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला.

sengol
sengol

हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे?

दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?

प्रतिक्रिया

बावडी बिल्डर's picture

13 Jun 2023 - 1:51 pm | बावडी बिल्डर

वारकर्यांना झालेल्या मारहाणीचेही समर्थन होतेय हे पाहून महाराष्ट्र कूठल्या दिशेने चाललाय याचा अंदाज येतोय. अगदी वारकर्यांना मार्क्सवादी वगैरे ठरवले गेले. ऊद्या हे वारकरी नसून पाकिस्तान पूरस्कृत अतिरेकी होते हे देखील ठरवले जाईल. हा सगळा अट्टहास का? तर शिंदे सरकार आहे म्हणून. मविआ असतं तर ऊलट घडलं असतं. पालघरला साधू मेले तेव्हा गळे काढनारे आता वारकर्यांवरील हल्ल्याला समर्थन देताहेत ते पाहून त्यांच्या कोलांट ऊड्यांची मजा येतेय. हीच शिवसेना राष्ट्रवादीसोबत सत्तेत होती तेव्हा गूंड होती पण भाजपा सोबत आली तर शाव झाली. व्वाह.

हे बघा पोलिसांनाच तुडवत पुढे जाणारे वारकरी, जय हरी विठ्ठल

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 3:28 pm | श्रीगुरुजी

बापरे, पोलिसांनी संयम राखून मोठी दुर्घटना टाळली.

कॉमी's picture

12 Jun 2023 - 3:54 pm | कॉमी

बापरे.

आग्या१९९०'s picture

12 Jun 2023 - 4:34 pm | आग्या१९९०

असे वारकरी असतील तर पोलिसांनी जे काही केले असेल ते योग्यच केले.

कॉमी's picture

12 Jun 2023 - 6:04 pm | कॉमी

मारहाण म्हणून जे व्हिडिओ खाली आहे त्यात पण पोलीस एका बाजूला जाण्यापासून थांबवायचा प्रयत्न करत आहेत पण लोक न जुमानता जाताना दिसत आहेत. उगाच धरले आणि लाठीमार केला असे बिलकुल दिसत नाही.

कपिलमुनी's picture

12 Jun 2023 - 1:44 pm | कपिलमुनी

दुवा

या व्हिडिओ मध्ये वारकऱ्यांना मारहाण होताना दिसत आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 2:12 pm | श्रीगुरुजी

चित्रफितीत कोठे हे दिसलं?

बावडी बिल्डर's picture

12 Jun 2023 - 6:00 pm | बावडी बिल्डर

अनेकांना धक्काबूक्की होताना स्पष्ठ दिसतेय. गरीब वारकर्यांना मारहाण ना कोल्हापूर बंद पाडनार्या आयोजकांवर कोणताही गून्हा नाही. वारे सरकार. साॅरी वारे “हिंदूत्ववादी“ सरकार.

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2023 - 2:48 pm | श्रीगुरुजी

पालखी प्रस्थान होण्यापूर्वी २ दिवस आधी, संकष्टी चतुर्थीला मटण चेपून अभिमानाने समाजमाध्यमांवर चित्र प्रसिद्ध करणाऱ्या एक नेत्या आळंदीत जाऊन बऱ्याच जणांना भेटल्या होत्या. लगेच २ दिवसांनी हा प्रकार घडला. वारकऱ्याचा वेष परिधान करून लाठीमार झाल्याचा खोटा आरोप करणारा एक मार्क्सवादी प्रत्यक्षात ब्रिगेडी विचारांचा आहे.

हे सर्व बिंदू जोडा.

बावडी बिल्डर's picture

13 Jun 2023 - 3:18 pm | बावडी बिल्डर

आणखी बिंदू जोडा पार पाकिस्तान, सिरीया, राक्का, बगदादी, अलकायदा, तालीबान पर्यंत जाऊद्या. आजकाल एआयने फोटो मोर्फ करता येतात. त्या वारकर्याचा इसीस बरोबर फोटो ही येईल.

बावडी बिल्डर's picture

13 Jun 2023 - 4:43 pm | बावडी बिल्डर

आजच्या शिंदेंच्या जाहीरातीतून फडणवीसांना गायब करण्यात आलंय. सरळ मोदी नी शिंदे. ह्यावर बावनकूळेंनी सावध प्रतिक्रीया दिलीय. (तिकीट मिळण्यासाठीचा खटाटोप) कोल्हापूरचा संयूक्त दौरा रद्द झालाय म्हणे फडणवीस शिंदेंचा. एकंदरीत सर्व बेबनाव दिसतोय.

कपिलमुनी's picture

13 Jun 2023 - 7:21 pm | कपिलमुनी

महाराष्ट्राच्या सर्व पेपर मध्ये कुठल्यातरी टुकार सर्वेचा आधार घेऊन जाहिराती छापण्यात आल्या आहेत.
त्यात मामू म्हणून चिंधेना प्रमोट करण्यात आले आहे.

एकंदरीत सुंदोपसंदी (शिंदोपशिंदी ) चालू झालेली आहे.

ताज्या घडामोडी हा विषय काही काळ मिसळपाववर बंद करत आहोत.

विजय_आंग्रे's picture

28 Jun 2023 - 8:01 pm | विजय_आंग्रे

---

'तुअर दाल' व 'ब्रांडेड अरहर दाल' या दोन्ही डाळीत नक्की काय फरक असतो ?

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 7:41 am | इपित्तर इतिहासकार

एकाच डाळीची दोन नावे होत, उत्तरेत अरहर जास्त वापरले जाते, दक्षिणेत तुर.

थोडक्यात त्यांना तूर डाळ आणि ब्रँडेड तूर डाळ हा फरक म्हणायचं असेल पण नावे दोन वापरली एकाच गोष्टीची.

का ? ते मात्र मला माहिती नाही, तेच सांगू शकतील.

नावे दोन वापरली एकाच गोष्टीची.

का ? ते मात्र मला माहिती नाही, तेच सांगू शकतील.

हातच्या काकणाला आरसा कशाला?

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 10:55 am | इपित्तर इतिहासकार

हातच्या काकणाला आरसा कशाला?

स्वतःचा गोळीबार स्वतः करा, आमचा खांदा वापरू नका. आम्ही मिसळपाव धोरण तितके फॉलो करणार.

चणे फोडून डाळ करणे हे value added product धरून vat लागू होतो. बारा ते अठरा टक्के लागतो. छोटे उत्पादक देत नसतील. पण मोठ्या कंपन्यांना tax चुकविता येत नाही. शिवाय चोख वस्तूंची हमी म्हणूनही गिऱ्हाईक येते. अधिक जाहिराती खर्च. उदाहरणार्थ ब्रुकबॉन्ड कंपनी हळद पावडर विकते ती ब्रॅण्डेड.