ताज्या घडामोडी - मे-जून २०२३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
28 May 2023 - 1:47 pm

नमस्कार मंडळी,

खरं तर महिन्याच्या २८ तारखेला ताज्या घडामोडींचा नवा धागा काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही. तसेच आधीच्या धाग्यात आधीच १६०+ प्रतिसाद झाले आहेत तेव्हा त्या धाग्यात अजून प्रतिसाद आल्यास ते वाचणे यापुढे त्रासदायक होऊ शकेल म्हणून मे-जून २०२३ साठी नवा धागा काढत आहे. तसेच इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत त्या जुन्या धाग्यात प्रतिसाद म्हणून जाण्यापेक्षा नव्या धाग्याच्या सुरवातीला असल्या तर ते चांगले होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नव्या संसदभवनाचे उद्घाटन केले. आपल्याला नवे संसदभवन हवे यासाठी पूर्वीपासून विचार चालू होता. सगळ्यात सुरवातीला नरसिंहराव पंतप्रधान असतानाच हा विचार सुरू झाला होता. गुलाम नबी आझाद तेव्हा संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याशी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी या विषयावर चर्चा केली होती असे स्वतः गुलाम नबी आझादांनी म्हटले आहे. https://www.ndtv.com/india-news/new-parliament-narasimha-raos-idea-good-...

नव्या संसदभवनात लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाशेजारी सेंगोलची स्थापना केली गेली आहे. सेंगोल म्हणजे सोन्याचा राजदंड. तामिळ संस्कृतीत चोला राजघराण्यात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून सेंगोल नव्या राज्यकर्त्याच्या (त्यावेळी राजा) हातात सुपूर्द केला जात असे. शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात दर्शवावे असे जवाहरलाल नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारींना याविषयी विचारणा केली. तेव्हा राजाजींनी तामिळनाडूतील चोला राजघराण्यातील परंपरेप्रमाणे असा सेंगोल नेहरूंच्या हातात दिला जावा असे मत व्यक्त केले. ते पंडित नेहरूंनी मान्य केले. त्यानंतर राजाजींनी मद्रासमधील एका सोनाराकडून सोन्याचा सेंगोल (राजदंड) बनवून घेतला. तामिळनाडूतील थिरूवदुतुराई मठाचे प्रतिनिधी कुमारस्वामी थंबिरन आणि इतरांनी तो सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री पावणेबाराला पंडित नेहरूंच्या हातात सुपूर्त केला. याविषयी त्यावेळच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी देत आहे:

sengol

म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते.

राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-try... हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल.

sengol

त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला.

sengol
sengol

हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे?

दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2023 - 3:33 pm | श्रीगुरुजी

मोदींवर बिनबुडाचे आरोप करणे यात नवीन ते काय?

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2023 - 3:28 pm | श्रीगुरुजी

नवीन क्रांतिकारक जावईशोध लावल्याबद्दल मानाचा त्रिवार मुजरा!

सरकारपुरस्कृत म्हणता येईल. रेल्वे खासगीकरणासाठी.

सदर आरोपासाठी काही पुरावे असल्यास द्या. अन्यथा विनाशर्त ते विधान मागे घ्या.

आग्या१९९०'s picture

7 Jun 2023 - 5:43 pm | आग्या१९९०

शेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसले होते असे सरकार म्हणत होते. किती पकडले? कोर्टात affidavit केले का ?

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2023 - 8:06 pm | श्रीगुरुजी

शाहीनबाग किंवा दलालांच्या आंदोलन प्रकरणात सरकारने अति सौम्य भूमिका घेतली. २६ जावेवारीस ट्रॅक्टरवाल्यांना न अडविता लाल किल्ल्यावर जाउन देणे व दलालांनी खलिस्तानी झेंडा फडकविणे ही राष्ट्रीय शरमेची गोष्ट होती. दलालांना चिथवून लाल किल्ल्याच्या दिशेने न्यायचे, पोलिसांनी अडविल्यास प्रतिकार करायचा, पोलिसांवर हल्ला करायचा व लाठीमार किंवा गोळीबार केल्यास जगभर बोंब मारायची ही टूलकिट टोळीची योजना ओळखून सरकारने पोलिसांना अत्यंत संयम बाळगण्यास सांगितले. राजदीप सरदेसाईसारखे टूलकिट टोळी सदस्य आगीत तेल ओतत होते. पोलिसांच्या गोळीबारात एक शेतकरी ठार झाल्याची बातमी राजदीप सरदेसाई रंगवून सांगत होता. काही वेळाने उघड झाले की भरधाव वेगाने पोलिसांवर ट्रॅक्टर नेणारा एक दलाल, ट्रॅक्टर उलटल्यामुळे ठार झाला आणि आज तक तोंडावर पडले. नंतर राजदीप सरदेसाईला २ आठवड्यांसाठी निलंबित केले. वस्तुतः राजदीप सरदेसाईला अटक करणे आवश्यक होते. परंतु सरकारच्या सौम्य भूमिकेमुळे राजदीपवर किंवा खलिस्तानी आंदोलकांवर काहीही कारवाई झाली नाही. गतवर्षी मोदींचा ताफा पुलावर अडविणाऱ्यांवरही काहीही कारवाई झाली नाही. एकंदरीत मोदी सरकार आंदोलकांविरूद्ध अत्यंत बोटचेपी भूमिका घेते हे वारंवार सिद्ध झालंय.

वामन देशमुख's picture

7 Jun 2023 - 8:32 pm | वामन देशमुख

वस्तुतः राजदीप सरदेसाईला अटक करणे आवश्यक होते.

सहमत आहे.

---

संघासारख्या हिंदूंच्या सर्वात मोठ्या संघटनेला, वर्षानुवर्षांपासून हातात सर्वोच्च सत्ता असूनही राजदीप सरदेसाई सारख्यांना आवरता येत नाही ते गझवा-ए-हिंद-२०४७ काय रोखणार?

पृथ्वीवरील सर्वात दुर्दैवी द्विपाद-कळप म्हणजे हिंदू!

आग्या१९९०'s picture

7 Jun 2023 - 8:33 pm | आग्या१९९०

कशाला कारवाई करतील? डमी असतात ते आंदोलनात घुसवलेले. आंदोलन बदनाम करणे हाच हेतू असतो.

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2023 - 8:44 pm | श्रीगुरुजी

अरेच्चा, राजदीप सरदेसाई डमी आंदोलक आहे हे माहितच नव्हते बुवा.

आग्या१९९०'s picture

7 Jun 2023 - 8:59 pm | आग्या१९९०

शेतकरी आंदोलनात घुसवलेले आणि पुलाच्या टोकाला रस्ता अडवणारे डमीबद्दल म्हटले होते . राजदीपचा उल्लेख कुठे आढळला?

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2023 - 4:35 am | श्रीगुरुजी

राजदीप सुद्धा त्यांचाच मुखवटा होता ना.

बाकीचे डमी असल्याचे पुरावे?

वामन देशमुख's picture

7 Jun 2023 - 8:47 pm | वामन देशमुख

आंदोलन बदनाम करणे हाच हेतू असतो.

राजदीप सरदेसाईंनी आंदोलनाची बदनामी केली?

केंव्हा? कुठे?

डँबिस००७'s picture

7 Jun 2023 - 6:51 pm | डँबिस००७

शेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसले होते असे सरकार म्हणत होते

अमेरिकेच्या दौर्यात राहुल गांधीच्या आजुबाजुला हातात झेंडा घेतलेले खलिस्तानी व आय एस आय चे लोक तुम्हाला दिसले नसतीलच !!

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2023 - 8:48 pm | श्रीगुरुजी

छे, आम्ही तिरस्काराच्या सुपर मार्केट मध्ये प्रेमाचे दुकान चालवितो. आम्हाला खलिस्तानी, काश्मिरी फुटिरतावादी, टूलकिट टोळी,पाकिस्तानी, चिनी, रोहिंग्ये, औरंगजेब, टिपू यांच्याविषयी उरापाड प्रेम आहे.

कपिलमुनी's picture

7 Jun 2023 - 7:05 pm | कपिलमुनी

८९,००० कोटी सरकारने बी एस एन एल साठी दिले आहेत.

लौकरच अदानी टेलिकॉम येणार तर !!

बावडी बिल्डर's picture

8 Jun 2023 - 9:23 am | बावडी बिल्डर

अदानीला पून्हा एक नंबर वनर आणायचा प्लान दिसतोय.

प्रदीप's picture

8 Jun 2023 - 10:33 am | प्रदीप

रिलायन्स का नाही? टाटा का नाहीत? बिर्ला का नाहीत ? (अरे हो, टाटा- बिर्ला आता जुन्या रेकॉर्ड्स झाल्या, नाही का?)

डँबिस००७'s picture

8 Jun 2023 - 10:59 am | डँबिस००७

छत्तिस गढ व राजस्थान मध्ये ह्यांना अडाणी पाहिजे. अडाणीला रेड कार्पेट (पायघड्या) अंथरुन राज्यात निवेश करण्यासाठी बोलावतात.
राहुल गांधींच्या पदयात्रे नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अडाणीच्या छत्तिस गढ व राजस्थान मधल्या बिझ नेस बद्दल विचारल तर राहुल
गांघीची "त त प प " झाली होती.

Trump's picture

8 Jun 2023 - 11:24 am | Trump

निवेश = गुंतवणूक
बिझनेस = उद्योग, धंदा

डँबिस००७'s picture

8 Jun 2023 - 6:31 pm | डँबिस००७

ट्रंप दादा,
धन्यवाद,
गुंतवणूक आणि बिझनेस मध्ये माझी गल्लत झालेली असेल.

पण गुंतवणूकीसाठी पैसा उपलब्ध असेल तर कोणीही बिझनेस (अगदी सरकारही) चालवु शकेल. पण ज्यांची पत नाही त्यांना कोण
पैसा देणार , म्हणुन अडाणी चे पाय धरावे लागतात आणि त्याला बोलावतात कारण तो स्वःता पैसा उभा करतो व स्वःताच्या बिझनेस
मध्ये घालतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jun 2023 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छ्ळाचा आरोपानंतर आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असूनसुद्धा अटक झालेली नाही. काल गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कुस्तीपटू आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होऊन पंधरा जूनपर्यंत ब्रीजभूषण यांच्यावर आरोपपत्र दाखल करु, असे आश्वासन दिले. कुस्तीपटूही पंधरा जूनपर्यंत आंदोलन करणार नाही. सरकारने ब्रिजभूषण यांना अटक करण्याबद्दल काहीही आश्वासन दिलेले नाही. केंद्रसरकारच्या प्रस्तावावर आंदोलनकर्ते, अन्य कुस्तीपटू , शेतकरी नेते व खाप पंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करणार आहे. पोक्सो अंतर्गत अटकेचा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे, हे खापपंचायत आणि शेतकरी नेते यात उतरले तर आंदोलनाची धग वाढेल, तो पर्यंत
या प्रकरणाचा फार धूर निघणार नाही, आणि चटके बसणार नाही, याची काळजी सरकार घेईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

प्रदीप's picture

8 Jun 2023 - 10:25 am | प्रदीप

ज्या अल्पवयीन मुलीने हा पोक्सो गुन्हा दाखल केला, तिने तो अर्ज आता मागे घेतला असल्याची बातमी मिंटने दिली आहे.

पोक्सोनुसार केलेल्या तक्रारीनंतर संबंधित कायदा- पालन व्यवास्थेला काही चौकश्या त्या व्यक्तिशी बोलून (अथवा, जरूरीप्रमाणे, इतर तपास करून) कझ्राव्या लागतात. ह्या सर्व चौकशा त्या मुलीच्या संदर्भांत केल्या होत्या काय, ह्याची माहिती कुणाला येथे आहे काय?

https://www.indiacode.nic.in/handle/123456789/2079?sam_handle=123456789/...

प्रदीप's picture

8 Jun 2023 - 10:27 am | प्रदीप

चॅप्टर ५ वाचावा.

प्रदीप's picture

8 Jun 2023 - 10:32 am | प्रदीप

ह्या सर्व प्रकरणांत नक्की काय संबंध आहे, हे येथे कुणी सांगेल काय? म्हणजे कायद्याच्या परिघांत, ह्या प्रकरणाच्या संदर्भांत खाप पंचायत कुठे बसते? तिचे येथे लोकस स्तँडी काय आहे?

डँबिस००७'s picture

8 Jun 2023 - 11:09 am | डँबिस००७

पेहलवानांनी उपोषणाची जागा सोडुन आपल्या घरी निघुन गेलेले आहेत. पेहलवान आपल्या कामाला लागलेले आहेत आणी त्याला दोन दिवस उलटलेले आहेत. पेहलवानांच्या जीवावर आंदोलन करणार्या महेंद्रसीग टिकैत सारख्या अनेक आंदोलन जीवी लोक उघड्यावर
पडलेले आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jun 2023 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अल्पवयीन मुलीने पोलिस उपनिरिक्षकासमोर तक्रार केल्यानंतर, त्या मुलीची बंद खोलीत महिला समीतीसमोर तपशीलवार तक्रार ऐकल्या जाते, तिचं म्हणनं, ते सगळं व्हीडीओ ऑडीयो रेकॉर्ड केल्या जातो आणि तक्रारीची प्रथमदर्शनी तथ्यता लक्षात आल्यानंतर संबंधितांना थेट अटकच होते. पहिल्यांदा थेट अटक आणि मग चौकशी होते. म्हणून तर, साधू -संत या अधिनियमातील थेट अटक करण्याच्या नियमाला विरोध करणार आहेत, अशी बातमी होती.

-दिलीप बिरुटे

प्रदीप's picture

8 Jun 2023 - 12:48 pm | प्रदीप

अशा कुठल्याही तक्रारीमधे प्रथम संबंधित मुलाची/मुलीची विशेष चौकशी केली जाते, व्यवस्थित विचारपूस केली जाते. प्रथम ती व्यक्ति जो आरोप करते आहे, त्यांत तथ्य आहे किंवा नाही, हे पक्के करावे लागते. तसे झाल्यानंतरच, संबम्धित अधिकार्‍यांच्यापर्फे पुढील कारवाई केली जाते. हे मी सर्वसाधारणपणे, मला जसा अगदी थोडाफार का होईना, कायदा समजतो, त्यानुसार इथे लिहीतो आहे. अन्यथा, कुणीही मूल कुणावरही पॉक्सोच्या अंतर्भूत असलेले आरोप करेल व मग संबंधित व्यक्तिला तात्काळ अटक करण्यांत येईल.

निव्वळ कुणीतरी, कुनावर तरी काही आरोप केले, तर त्या आरोपीस तात्काळ अटक होत नाही. प्रथम संबंधित अधिकारी ज्या व्यक्तिने आरोप केले आहेत, तिची, आरोपांसंबंधित, सत्यासत्तत्या पडताळून बघतात. त्यांची खात्री झाली की मग अटक वगैरे पुढची कारवाई होते. अन्यथा, कुणीही मूल, कुणाही व्यक्तिवर असे आरोप करेल व तात्काळ सदर तथाकथित आरोपीस जेरबंद व्हावे लागेल.

ह्या संदर्भांत सेक्शन्स १९, २०, २१, २२ व २३ वाचावेत,

डँबिस००७'s picture

8 Jun 2023 - 11:12 am | डँबिस००७

"अल्पवयीन मुलीने" हाच तर घोळ आहे.

राहुल गांघीच्या "देशद्रोहावर " कायदेशीर कारवाई होणार अशी बातमी आहे.
अमेरीकेत गेलेल्या राहूल गांधी व सॅम पित्रोडाने भारता विषयी बरेच गरळ ओकलेले होते. अमेरिकेतल्या सगळ्या भारत विरोधी एन जि ओ, संस्थाना हाताशी धरुन मोदी विरुद्धच नव्हे तर भारताच्या प्रतिमेलाच डागाळण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यावर अमेरिकन सरकारने राहुल गांधीला व्यवस्थित सुनावले.

"घराघरात गुन्हे घडत आहेत आणि गृहखात्याचं लक्ष नाही "
हे पटलं.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2023 - 7:38 pm | श्रीगुरुजी

फडतूस गृहमंत्री लाभलाय की लादलाय.

बावडी बिल्डर's picture

8 Jun 2023 - 8:57 pm | बावडी बिल्डर

अजून दिड वर्ष झेलायचंय फक्त.

कपिलमुनी's picture

8 Jun 2023 - 8:01 pm | कपिलमुनी

दिल्लीमध्ये खून आणि तुकडे केल्यावर जो अँगल दिला गेला तो अँगल मीरा रोड ला नसणार.. तेव्हा जी पब्लिसिटी किंवा आरोपी मुसलमान आहे म्हणूनच क्रूर आहे वगैरे फिरवले गेले ते आता गुपचूप बसणार आहेत.

आग्या१९९०'s picture

8 Jun 2023 - 8:05 pm | आग्या१९९०

मराठी वर्तमानपात्रात बातमी आली नसेल.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2023 - 8:19 pm | श्रीगुरुजी

ही बातमी आली आहे का₹

डँबिस००७'s picture

9 Jun 2023 - 12:30 am | डँबिस००७

"दिल्लीमध्ये खून आणि तुकडे केल्यावर जो अँगल दिला गेला"

अरेरे , अँगल दिला गेला ?
हातात भगवा कलावा, गळ्यात रुद्राक्ष, नाव सतिश पण मूळ नाव ईब्राहीम, अस्लम किंवा अहमद.. अश्या बहुरुपी मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची चुक नाही पण असे लव्ह जिहादचे प्रकार नाकारणार्या बापाची आहे. समोर ३६ तुकड्यात आपली मुलगी समोर आल्यावर डोळे उघडुन काय उपयोग? कारण वेळ गेलेली असते. त्यावरही शेजारी रहात असलेला हिंदु बाप म्हणतो आता पर्यंत आम्ही सेफ आहोत.
हिंदु समाजाने आपले डोळे उघडण्याची गरज आहे. लव्ह जिहाद ला मानण्याची व त्यावर सामुहीक रीत्या उपाय योजना करायची गरज आहे.

मीरा रोड सारखा अत्यंत नृशंस गुन्हा झालेला असेल पण असे प्रकार अत्यल्प असतात. पण मुसलमान मूलगा हिंद मुलाच्या वेषात येऊन हिंदु मुलींना प्रेमा च्या जाळ्यात ओढुन पळवुन नेतो व पुढे मागे तीची विल्हेवाट लावतो असे प्रकार अलार्मिंगली वाढलेले आहेत.

कालच एका उत्तरेतल्या तिर्थ क्षेत्राच्या जवळ नदीच्या पुलाकडे भगवे वस्र, भस्म, रुद्राक्ष घातलेल्या साधु बाबाला तिथल्या लोकल लोकांनी हटकले व नाव विचारले तर तो ईस्माईल निघाला,
अफझल खान, मोहीमेला निघताना त्याच्या हरम मध्ये असलेल्या ६५ बायकांची त्याने ऐकाच दिवसात कत्ल केली होती. दुर्दैवाने अश्या अफझल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केला. अन्यथा महाराष्ट्रात सुद्धा निजामशाही असती व ९०% लोक मूसलमान असते. हल्ली अफझल खानाला हिरो मानणारेही मुसलमान खुप आहेत. पण असे लोक विसरतात की ते तलवारीच्या धाकानेच मूसलमान झालेत. त्यांच्या घरातली पुर्वजां पैकी ऐखादी स्री ह्याच अफझल खानाच्या हातुन कापली गेलेली असेल.
बातमी मराठी पेपर मध्ये आली आहे का ? अस विचारणार्याचा हेतु लक्षात घ्या. जागरुक आई बापा मुळे ऐखादी मुलगी अश्या जाळ्यात जाण्यापासुन वाचली तरी खुप काही मिळवले !

ज्यांना हिंदु मुलींचे ३६ काय ३६० तुकडे होउन ही फरक पडणार नसेल तर त्यांनी खुषाल लव्ह जिहादचेविरुदध भाषण द्याव.

जाऊद्या हो.. ज्यांना केरळा स्टोरी प्रपोगंडा वाटते त्यांच्याविषयी काय बोलायचे?

शिवकाळात पण खानाच्या पायी जाऊन पडणारे मराठी सरदार होतेच की.. त्यांचीच पिलावळ आज वळवळत आहे असे समजा.

कंजूस's picture

9 Jun 2023 - 12:10 am | कंजूस

गृहखात्याने प्रत्येक घरात एक पोलीस ठेवायचा का?

आग्या१९९०'s picture

9 Jun 2023 - 1:08 am | आग्या१९९०

बाबा लोकांच्या आश्रमात अल्पवयीन, तरुण, वयस्कर हिंदू स्त्रियांचे लैंगिक शोषण होत असते, ते कसे थांबवणार?

कंजूस's picture

9 Jun 2023 - 5:32 pm | कंजूस

बाबा लोक संन्यासी. त्यांच्या आश्रमांत संसारी लोकांनी,त्यातही स्त्रियांनी हजेरी लावायचं कारण काय?
संन्यासी लोक संसारी लोकांचे प्रश्न कसे काय सोडवणार?

आग्या१९९०'s picture

9 Jun 2023 - 8:54 pm | आग्या१९९०

आसाराम तर विवाहीत होता.

डँबिस००७'s picture

9 Jun 2023 - 10:42 am | डँबिस००७

आसाराम बापु बद्दल ऐकल असेलच ! गेली कित्येक वर्षे तो जेल मध्ये आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यावर सुद्धा !

काँग्रेसने देशात मुस्लिम तुस्टीकरणाची पराकाष्ठा केलेली आहे.

पण ज्या अफझल गुरुला काँग्रेसच्या काळातच सु कोर्टाने फाशी सुनावली व नंतर दिली गेली त्याबद्दल काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांनी आपल्या भाष्णात सांगीतल की अफझल गुरुला फाशी देण हे चुकीच होत.

२६/११ चा मुंबई हल्ला हा आर एस एस ने च केलेला होता अश्या अशयाच्या पुस्तकाचे विमोचन करायच्या कार्यक्रमात दिग्विजय सींग स्टेज वर हजर होता. दिग्विजय सींग , चिदंबरम, शिवराज पाटील यांनीच " भगवा आतंकवाद " नावाचा नविन शब्द घडवला, भाजपा आणी आर एस एस ला अतिरेकी घोषीत करायचा प्रयत्न केला. भाजपा सत्तेत आल्यावरही हे सर्व नेते अजुनही बाहेर खुल्ले आम फिरत आहेत.

बावडी बिल्डर's picture

9 Jun 2023 - 11:52 am | बावडी बिल्डर

ते पुस्तक लोंच करनारा कृपाशंकर सिंग भाजपात पायघड्या घालून आणण्यात आलाय.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2023 - 12:41 pm | श्रीगुरुजी

२६/११ चा मुंबई हल्ला हा आर एस एस ने च केलेला होता अश्या अशयाच्या पुस्तकाचे विमोचन करायच्या कार्यक्रमात दिग्विजय सींग स्टेज वर हजर होता.

याच कार्यक्रमात कृपाशंकर सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होतो.

आता त्याला पायघड्या अंथरून भाजपत आणलंय. पवनराजे निंबाळकर व त्यांचा चालक यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी व कारगिल निधी गटटम् कलणारा पद्मसिंह पाटीलही भाजपत आहे. ज्याच्यावरीर आरोपांची यादी दस्तुरखुद्द फडणवीसांनी विधानसभेत वाचली होती तो नारायण राणे व संघ, स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणारा नितेश राणेही भाजपत आहे. विखे, मोहिते पाटील, पिचड, पाचपुते सन्मानाने भाजपत आले आहेत.

महाराष्ट्र भाजपचे पूर्ण वाटोळं करण्याची भीष्मप्रतिज्ञा फडणवीसांनी केली आहे.

बावडी बिल्डर's picture

9 Jun 2023 - 4:14 pm | बावडी बिल्डर

मला वाटतंय जे काम राहूल गांधी देशपातळीवर भाजपसाठी करायचे. तेच काम आता फडणवीस कोंग्रेस नी राष्ट्रवादीसाठी करताहेत. अनेक राष्ट्रवादीचे नेते जे संरत आले होते त्यांना भाजपात घेऊन त्यांचे काजकीय पूनर्वसन केले गेले. हो शरद पवारांच्या सांगन्यावरून केले जात असावे अशी शंकाय. मला तर कधी कधी वाटतं फडणवीस हे पवारांचेच हस्तक असावेत.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2023 - 7:08 pm | श्रीगुरुजी

संजय राऊत व फडणवीस पवारांचे चेले आहेत. भुजबळांचा अपवाद वगळता अजित पवार, तटकरे वगैरेंवर कारवाई केली नाही. भुजबळांवरील कारवाई सुद्धा पवारांच्या सूचनेनुसार झाली असावी. अनेकदा गुंडगिरी, मारझोड करूनही आव्हाड मोकाट आहे. १५-२० दिवसांपूर्वी आव्हाडवर आरोपपत्र दाखल केल्याचे नाटक झाले. पण नंतर सर्व थंड आहे. ना खटला सुरू झाला ना आव्हाडला अटक केली.

गडकरी आणि पवार सख्य आहे म्हणून गडकरींना केंद्रातून महाराष्ट्रात सोडले नाही

अशी थिअरी मिपावर वाचली होती..

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2023 - 7:25 pm | श्रीगुरुजी

गडकरी-पवार सख्य आहे, फडणवीस-पवार सख्य आहे, पण फडणवीस-गडकरी सख्य नाही.

ही पण थिअरी आहे.

बावडी बिल्डर's picture

9 Jun 2023 - 8:57 pm | बावडी बिल्डर

बावनकूळे हा गडकरींचा माणूस आहे. त्यामूळेच मागील निवडणूकीत त्यांचं तिकीट कापलं गेलं. बावनकूळेंनीही आपली ताकद दाखवून भाजपच्या बारा(?) जागा पाडल्या अशी वदंता आहे.

बावडी बिल्डर's picture

9 Jun 2023 - 9:04 pm | बावडी बिल्डर

महाराष्ट्र भाजपचे पूर्ण वाटोळं करण्याची भीष्मप्रतिज्ञा फडणवीसांनी केली आहे.
खरंतर अति कमा वयात नी नागपूरचं महापोरपद सोडलं तर साधा विरोधी पक्षनेतेपदाचाही अनूभव नसलेल्या व्यक्तिस डायरेक्ट नानूपद कोणत्या आधारावर मोशांनी दिलं हे देव जाणे. बहूतेक आपलं एकनारा ना आपल्याला पुढे न नडनारा व्यक्ति त्यांना हवा असेल न्हणून सरळ खूली सूट मोशांनी द्यायला नको होती. ह्यानूळे महाराष्ट्र भाजपचं वाट्टोळं झालंय. मूंडे, गडकरी, तावडे, खडसे असे मोठए भाजप नेते संपल्यात जमा आहेत ज्यांनी महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवला.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2023 - 2:26 am | श्रीगुरुजी

महाराष्ट्र भाजप एकपात्री प्रयोग झालाय (चंपा धरला तर द्विपात्री).