माझा गाव

लवंगी's picture
लवंगी in जे न देखे रवी...
16 Dec 2008 - 9:40 pm

मनकोन्यात दडलय गाव
सागरलाटांवर डुलतेय नाव||

माडांच्या पानात
सुरुच्या रानात
वार्‍याची गाणी
घुमती कानात
देवळाच्या घंटेत श्रद्धाभाव
सागरलाटांवर डुलतेय नाव||

पाउलवाटेवर
धुळीशी कुस्ती
बैलगाडीतील
मित्रांशी मस्ती
पावसाच्या सरीत भिजलाय गाव
सागरलाटांवर डुलतेय नाव||

चमचमत्या वाळूत
ओलीशी पावल
आबांच्या राईत
आभाळ मावल
आजीची हाक घेते काळजाचा ठाव
सागरलाटांवर डुलतेय नाव||

कविता

प्रतिक्रिया

शितल's picture

17 Dec 2008 - 12:37 am | शितल

कविता आवडली. :)

मीनल's picture

17 Dec 2008 - 2:20 am | मीनल

बालिश आहे
पण मस्त.

मीनल.

लवंगी's picture

17 Dec 2008 - 5:08 am | लवंगी

पहिलीच कवीता आहे. इथे दूरदेशी राहून खूपच आठवण येत होती म्हणून ४ ओळी खरडल्या..

राघव's picture

17 Dec 2008 - 10:16 am | राघव

छान कविता!
मुमुक्षु

मनीषा's picture

17 Dec 2008 - 1:08 pm | मनीषा

कविता आवडली !

माडांच्या पानात
सुरुच्या रानात
वार्‍याची गाणी
घुमती कानात
देवळाच्या घन्टेत श्रद्धाभाव
सागरलाटांवर डुलतेय नाव|| .............मस्तच

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 5:13 pm | विसोबा खेचर

अतिशय सुरेख कविता...!

तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

18 Dec 2008 - 7:19 pm | सखाराम_गटणे™

वाह वाह, छानच आहे,
आवडले

पुले शु

----
सखाराम गटणे