गाभा:
राम राम, मिसळपाव डॉट कॉम पूर्ववत सुरु केल्याबद्दल गावतांडा ते देश परदेशातील समस्त मराठी माणसाकच्या वतीने मिसळपाव चालक मालक नीलकांत यांचे आभार. मिपा कधी सुरु होईल असे प्रश्न सहन केल्याबद्दल प्रशांत यांचेही आभार.
मिपा सुरु आहे, बंद आहे, काम चालू आहे, सर्वर ढासळलं, ड्रुपल, मोडलं, याची तपशीलवार माहीती मिळायला पाहिजे. ट्वीटर, टेलीग्राम,वाट्सप अधिकृत ग्रुप असे काय तरी लोकांची प्राइवसी जपत. तसंही, आंतरजालावर प्रायवसी वगैरे काय नसतं. पण, फुकट असले तरी फ्यासिलिटी पाहिजेल. असे आमचे एक मिपाकर म्हणून मागणे आहे.
नोंद घ्याल अशी अपेक्षा. आता मिपा पुढे ( काही दिवस तरी, हे राम ) सुरळीत चालेल (ह. घ्या मालक) अशी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करुन थांबतो. जय महाराष्ट्र.
प्रतिक्रिया
4 May 2023 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ नीलकांतसेठ, दोन हजार चौदापूर्वीही असेच प्रॉब्लेम यायचेत का ? ;)
-दिलीप बिरुटे
4 May 2023 - 9:27 am | प्रचेतस
ते बाकी जाऊ द्यात,पण मिपा बंद होतं तेव्हा तुम्ही काय करत होतात?
4 May 2023 - 9:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स.न.वि.वि.
काम खूप होती पण, मिपा सुरु राहीलं पाहिजे. लिहिणे होऊ की नको होऊ दे. मिपाचं दुकान उघडं राहीलं पाहिजे. आता इतक्या वर्षांची सवय झाली आणि व्यसनही लागलंय त्यामुळे तसं होतं खरं. पण कोणी कोणाचं नसतं हे आपलं ब्रीद वाक्य आहे, जालावरचं.
बाय द वे, आता सुट्या असल्यामुले कामाबरोबर मोडेड विंडोज अकरा टाकले डेस्कटॉपला, फोनला विनाकारण फॉर्मेट मारला. ( मिपा तान) अधुन मधुन मिपा सुरु झालंय का पानावर रिफ्रेश करीत बसलो. ओळखीचे येरर दिसत नव्हते, म्हणून यावेळी काम पांगलंय असे वाटलं. काहींना मुद्दामहून मिपा आता सुरु होत नाही, संपलं सगळं, असं म्हणून जालदोस्तांना छळले.
बाकी, आपल्यासारखे मित्र वाट्सॅपवर असल्यामुळे रेग्युलर दळन सुरु होतं बाकी काही विशेष नाही. एका जवळच्या नात्यात लग्नात गेलो. भर उन्हाळ्यात वरातीत नाचलो. जीव पाणी पाणी करतो. दोन दिवसापूर्वी इकडे गारा पडल्या. लेकरांसोबत त्या वेचल्या. साला उन्हाळा सुरुय की पावसाळा कळायला मार्ग नाही.
-दिलीप बिरुटे
4 May 2023 - 12:20 pm | प्रचेतस
हे बाकी खरंय, मिपा कायम सुरूच राह्यलं पायजे. माझीही तशी नाशिक भटकंती सुरू होती मात्र मिपा रिफ्रेश आणि एरर पकहणे सुरूच होतं.
बाकी भर उन्हाळ्यात वराती बिरातीत नाचू नका भो, बरं नसतं ते.
4 May 2023 - 9:28 am | कर्नलतपस्वी
मिपा पहाता लोचनी
सुख झाले हो...
आमच्या कारभारणीनी सुद्धा सुटकेचा श्वास सोडला.
इतके दिवस छळत होतं बेणं,मिपा सुरू झालयं कळताच काल पासून घरात आहे की नाही याचा तपास नाही.
😀
4 May 2023 - 10:27 am | वामन देशमुख
दर्शन दे रे, दे रे मिसळपावा
किती अंत आता पाहशी तु माझा...
अशी अवस्था झाली होती माझी.
4 May 2023 - 11:34 am | कंजूस
हे शिकवून पाच दहा लोक तयार झाले पाहिजेत.
यांचे धडे इथे कुणी टाकेल का?
4 May 2023 - 11:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वडा-पाव डॉट कॉमवर या शिकायला. आपलं मिपा अडलं की तिकडे शिकू. ती फ्री साइट आहे, कधी बंद पडेल माहीती नाही.
-दिलीप बिरुटे
(व्यवस्थापक वडा-पाव डॉट कॉम ) :)
4 May 2023 - 12:22 pm | प्रचेतस
आम्ही नै येणार तुमच्या वडापाव, भजेपाववर भो, कसेही असले तरी आमचे मिपाच बरे.
4 May 2023 - 1:21 pm | Bhakti
असामान्य ठिकाण दिसतं आहे :)
5 May 2023 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वडा-पाव टेंपररी शिकण्यापुरते सुरु केलेलं. दोस्त हो, रजिस्ट्रेशन करु नका....!
-दिलीप बिरुटे
5 May 2023 - 11:23 am | प्रचेतस
तुमच्या गळाला दोन तीन मासे लागलेले दिसतात :)
5 May 2023 - 12:38 pm | कंजूस
<meta name="Generator" content="Drupal 7 (http://drupal.org)" />
म्हणजे भारीच. चालू ठेवा.
रेजिस्टर केलंय नाव "असून अडचण"
पासवर्डची वाट पाहतोय.
4 May 2023 - 1:20 pm | Bhakti
हे हे मला चिक्कार वेळ असतो(कधीतरी)मला शिकवून टाका द्रुपल का काय ते.
4 May 2023 - 12:19 pm | कंजूस
ते काही आम्हाला जमायचं नाही. वरळी किंवा इगतपुरीला जाणार नाही. पण मिपाने घरीच करवली विपश्यना.
4 May 2023 - 12:41 pm | चांदणे संदीप
गारगार वाटतंय!
सं - दी - प
4 May 2023 - 4:48 pm | श्रीगणेशा
यावेळी (मात्र) मला कळलंच नाही, मिपा बंद होतं ते!
१२ एप्रिलला, कधी नव्हे तो चर्चा सदरात एक धागा सुरु केला.
एक दोन दिवस (एक दोन) प्रतिक्रिया वाचल्या.
त्यानंतर थेट आज सकाळीच फिरकलो इकडे, पाहतो तर मिपा, जैसे थे, जवळ जवळ तिथेच थांबलेलं :-)
4 May 2023 - 6:16 pm | टर्मीनेटर
कोण एवढं वाईटावर टपलं आहे मिपाच्या???
आज सकाळी प्रशांतशेठ आणि तुकाशेठचा मेसेज वाचून मिपा उघडले पण "Gateway Timeout" असा एरर आला. ब्राउझर बदलून उघडले तर एका फटक्यात उघडले तेव्हा फार आनंद झाला.
उण्यापुऱ्या सहा-सात महिन्यांत दोन वेळा DOS attack, Spam attack (10000+ requests at a time) वगैरे गोष्टी होण्याएवढं मिपा लोकप्रिय आहे किंवा एवढं ते कोणाच्यातरी नजरेत खुपतंय हि गोष्ट आचंबित करणारी आहे! दिवाळीच्या आधीही हा प्रकार झाला होता पण ह्यावेळची तीव्रता त्यापेक्षा जास्ती असावी.
असो... सर्व अडचणी-समस्यांवर मात करून आपल्यासारख्या मिपाप्रेमींसाठी ते पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या नीलकांत ह्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!
Long live Mipa...
4 May 2023 - 7:59 pm | कंजूस
सायबर हल्ले होऊ नये असे वाटत असेल तर चालू घडामोडी सदरातील प्रतिसादांत काही विशिष्ट शब्द लिहिण्याचे टाळावे. ते वाचून कृत्रिम शोधक ठरवतो की इकडे काही विशेष आहे. या साईट मध्ये घुसले पाहिजे.
5 May 2023 - 1:08 am | nutanm
मिपा सुरू झाले कालच कळले. छान वाटले खूप. काही नसेल तर वाचायला तर मिपा आहेच वकायमचे तर रोज वाचायला आहेच. काहीतरी नविन व राजकारणातले लेख वाचून माहिती द्यान मनोरंजन होते बंद असल्यावर चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते मी बर्यापैकी नविन असूनही सवय झालीच शेवटी .
5 May 2023 - 1:14 am | nutanm
नीलकांत व प्रशांत सर यांचे खूप खूप आभार , रोजचे स्वताचे सर्व व्याप संभाळून साईट लौकर लौकर दुरूस्त करत बसणे। खूप धन्यवाद दोघांना व सर्व आभार ,धन्यवाद thak u, sorry लागू पडत असेल तर तेही व अनंतापर्यत आभार.
5 May 2023 - 8:07 am | राजेंद्र मेहेंदळे
रिकव्हरी करताना आधी लिहिलेले काही लेख उडालेत. माझ्या मते १५-१६ एप्रिल आधीचा सगळा डेटा वाचवण्यात यश आले आहे. पण असो. पुन्हा चालु झाले हे छान.
बाकी ते दिवसात ५-१० वेळा चक्कर मारुन मिपा चालतंय का बघणे वगैरे झालेच. हापिसात दुसरे कामच काय?
मिपाचालकांचे अभिनंदन आणि आभार्स!!
5 May 2023 - 3:46 pm | विजुभाऊ
आहाहाहा.... सूख म्हणजे काय असते हे आत्ता समजले. मिपा पुन्हा सुरु झालेअगदी घरी आल्यासारखे वाटले.