कोलाहल !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
25 Dec 2022 - 11:10 am

कोलाहल !

सायकलची बेल, दुचाकी चारचाकी चे हॉर्नस
ट्रक चे कर्कशः ब्रेक, वेगाचे आवाज
ट्रामच्या दाराची उघड झाक , हेलिकॉप्टरची झार झार
ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वरची अनाउन्समेंट ,
मधेच ऍम्ब्युलन्स चा सायरन ,
सगळीकडे गडबड, धांदल, गोंगाट,किलबिलाट !

रंगीबेरंगी दिव्यांचे फ्लॅशेस , लांबच्या लांब माळा
लाल हिरव्या रंगानी नटलेल्या उंच उंच इमारती
मोठा मोठाल्या क्रिसमस ट्री , सॅन्टा, त्याच्या हातातली बेल
जिन्गेल बेल चे मुसिक, कुठे हळुवार कुठे कर्कश :
क्रिसमस चे डोळे दिपवणारी लाइटिंग ,
सगळीकडे नुसती रोषणाई आणि झगमगाट !

स्वीट्स, केक्स, वाईन, व्हिस्की चे ग्लासेस ,
टर्की ,फिस्ट ,डेकोरेशन्स
फॅमिलीस फ्रेंड्स गेट टुगेदर्स
सगळीकडे झगमगते रेस्टॉरंट्स आणि घमघमाट !

जग रहाटीचा नुसता कोलाहल !

हे इतके सगळे किलबिलाट झगमगाट ,लखलखाट
तरी मन शांत अंतराळात , एका निर्वात पोकळीत, एकाकी !

अशामध्ये उमगलेले एकटेपण
खूप एकटं करून जातं ......

......... नेहमीसारखंच !

---------- फिझा

कविता

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

25 Dec 2022 - 8:25 pm | तुषार काळभोर

पण भावना चांगल्या मांडल्या आहेत..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Jun 2023 - 10:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अमेरिकन नाही, ऑस्ट्रेलियन :)

कुमार१'s picture

25 May 2023 - 7:01 am | कुमार१

छान आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Jun 2023 - 10:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

जमलिये