ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करण्यात मदत हवी आहे.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in काथ्याकूट
12 Dec 2022 - 8:15 am
गाभा: 

खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे मला कळत नाहीये की कोणता पर्याय निवडायचा. मी वर्ष २०२१-२२ साठी ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करुन पहात आहे.
ITR

मी फ्रीलान्सर म्हणुन आयटीआर बनवत आहे, कृपया माहीतीगारांनी मदत, मार्गदर्शन करावे. जे जास्त उत्सुक असतील त्यांनी मला पुर्ण आयटीआर तयार करुन दीली तर मला काहीही हरकत नाही. खरोखर!

(ह्युश चला वाचले हजार दीड हजार!)

प्रतिक्रिया

माहितगार यांच्या प्रतिक्षेत...

बाकी गूगल असेलच तर शोधा, सहज सापडेल.

शानबा५१२'s picture

12 Dec 2022 - 10:02 am | शानबा५१२

मी फक्त आणि फक्त https://duckduckgo.com/ वापरतो. आपण ही फक्त तेच वापरा. युट्युब वगैरे शोधले खुप.

वामन देशमुख's picture

12 Dec 2022 - 9:39 am | वामन देशमुख

ITR 3 द्वारे फाइल करा.

शानबा५१२'s picture

12 Dec 2022 - 10:05 am | शानबा५१२

मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले आहे. मला आयटीआर ४ लागु होतो. मी एका फर्मचे रजिस्ट्रेशनही करत आहेत त्यात मी पार्टनर आहे.

कंजूस's picture

12 Dec 2022 - 10:17 am | कंजूस

आइटीआर
मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले आहे.

म्हणजे ३१जुलै २०२२ तारखेच्या आत डिपार्टमेंटला पाठवले आहे? त्यांचे तीन मेसेज आले असणार. १) आइटीआर मिळाले, वेरिफिकेशन पाठवा. २)वेरिफिकेशन पाठविल्यावर मिळाले.३) असेसमेंट झाली, रिफंड असला तर बँक अकाऊंटला पाठवला आहे.

तर तुम्हाला आइटीआरचे रेडी टेम्प्लेट /रेकनर/फॉर्म भरणे बनवायचे आहे काय?

शानबा५१२'s picture

12 Dec 2022 - 10:23 am | शानबा५१२

तर तुम्हाला आइटीआरचे रेडी टेम्प्लेट /रेकनर/फॉर्म भरणे बनवायचे आहे काय?

हे एवढे डीटेल मध्ये मला नाही समजत पण मला आयटीआर फाईल बनवायची आहे. मला वाटत २०२२-२३ ची मला मिळाली आहे. पण गेल्या वर्षी मी फाईल नव्हते केले.

rahul ghate's picture

12 Dec 2022 - 9:57 am | rahul ghate

२०२१-२२ साठी असेसमेंट इयर २०२२-२३ असे सिलेक्ट करा , नंतर आलेल्या options पैकी जे लागू असेल ते निवडा

शानबा५१२'s picture

12 Dec 2022 - 10:10 am | शानबा५१२

मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले आहे. मग गेल्या वर्षीचे फाईल करावे लागेल का? मग ते मधले ऑपशन कोन्डोनेशन ओफ डीले सिलेक्ट करायच का? काही कल्पना?

कंजूस's picture

12 Dec 2022 - 10:26 am | कंजूस

प्रथमच आइटीआर करणाऱ्यांसाठी पूर्वीचा नियम - मागील तीन वर्षांचे इन्कम/भरावे लागायचे.

आता तो नियम काढला आहे. नवीन या वर्षीच भरले त्यांनी याच वर्षांचे (assesment year - 2022-23 म्हणजे फिनान्शल year 2021-22 चे इन्कम) भरले तरी चालते. मागील म्हणजे assesment year - 2021-22 किंवा त्या अगोदरचे नसले तरी चालते.

नोकरीचे इन्कम अधिक धंद्याचे इन्कम यासाठी वेगळा नियम/फॉम आहे.

तरीही एक सुचवेन की Taxguru CNBC awaaz यांचे यूट्यूबवरचे कार्यक्रम मार्गदर्शन करतात. तिथे प्रश्नही पाठवू शकता.

फ्रिलांसर म्हणून Itr ४ भरू शकता. ४४ada खाली तुम्हाला मिळालेल्या रकमेच्या कमीत कमी ५०% नफा दाखवून भरू शकता.
वर राहुल ह्यांनी सांगितल्याप्रमाणे २०२१-२२ वर्षाचे उत्पन्न हे २०२२-२३ ह्या असेसमेंट वर्षाच्या विवरणात येणार.

वाढीव उत्पन्न दाखवायचे आहे त्यामुळे अपडेटेड रिटर्न हा पर्याय निवडा.

शानबा५१२'s picture

12 Dec 2022 - 11:41 am | शानबा५१२

जर कुठे लेटेस्ट आयटीआर मागत असतील तर हे २०२२-२३ चे चालेल का? मला ती फाईल ईमेलने मिळाली ति फाईल आता एकीकडे 'लेटेस्ट आयटीआर' म्हणुन अपलोड करु शकतो का की मग २०२१-२२ ची आयटीआर लागेल? मला २०२१-२२ ची आयटीआर फाईल करताना एक जेसॉन फाईल अपलोड करायला सांगत आहे व मि २०२२-२३ ची केली की एरर येतोय.
मला वाटत २०२२-२३ ची फाईल लेटेस्ट आयटीआर म्हणुन चालुन जाईल, राईट?

Assessed for 2022-23? मेसेज आणि ईमेलसुद्धा?
तर २०२२-२३ ची फाईल लेटेस्ट आयटीआर म्हणुन चालुन जाईल?- हो.

रिवाइज अजून केलं नाही,पण करायचं आहे? ते वेगळं.

शानबा५१२'s picture

12 Dec 2022 - 2:52 pm | शानबा५१२

तर २०२२-२३ ची फाईल लेटेस्ट आयटीआर म्हणुन चालुन जाईल?- हो.

खरोखर हे वाचुन हायसं वाटल.

Assessed for 2022-23? मेसेज आणि ईमेलसुद्धा?
- मी आपल्याला एक स्क्रीनशॉट व्यनिमध्ये शेअर करतो. ईमेलचा आहे, प्लीज एकदा बघुन सल्ला द्या.

रिवाइज अजून केलं नाही,पण करायचं आहे? ते वेगळं.
- रीवाईज व्हॉट, ईन्कम टॅक्स? एवढे मला ह्यातले नाही समजत. आणि सध्या मला हे जरुरी आहे अस नाही वाटत. पण हे त्या वेबसाईटवर ऑपशन्समध्ये वाचले होते,बघु पुढे कुठेतरी कामाला येईल, तेव्हा विचारेन.

जोक/विनोदः
एका सीएला फोन केला(जस्टडायलमधुन नंबर घेतला होता), त्याला चार्जेस विचारले तर 'तुम्ही ईतर कुठुन तरी करुन घ्या माझ्याकडुनच घ्या अशी माझी सक्ती नाही'. तंतोतंत हे वाक्य बोलला. साले असे वागतात जस काय कोरोना फक्त ह्यांच्यासाठी होता, मी पण कोरोनातुन जाऊन ओलोय. रानटी झालेत हे लोक.

१)तुमचे आइटीआर कुठे पुरावा म्हणून द्यायचे आहे.
२)आइटीआर २२-२३ म्हणजे चालू असेसमेंटचे भरल्यावरही तुम्हाला त्यात सुधारणा करून फ्रीलान्सींग कामाचे पैसे दाखवले नाहीत ते दाखवून ते रिवाईजड रिटर्न भरायचे आहे.

__________
पैसे येणे आहे, लागू झाले पण मिळाले नाहीत (accrued)/ आणि मिळालेले (received) असे दोन्हीही दाखवून इन्कम दाखवू शकता.

कुणी टॅक्स सल्लागाराकडून फॉम भरल्यास तो व्यवस्थित सर्व कलमांचा विचार करून आइटीआर भरत असतो. पुढे त्यांचा फायदा होतो. शिवाय वर्षभरात वेळोवेळी सल्लाही देतो. बिझनेस/other income वाल्यांनी चांगला सल्लागारच पकडावा.