गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
3 Nov 2022 - 3:16 pm

हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार असून, गुजरात विधानसभा निवडणूक १ व ५ डिसेंबरला होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.

त्या निमित्ताने आज एक मजेदार शीर्षकाची बातमी वाचलीआणि खूप हसलो.

शीर्षक - गुजरात निवडणुकीची तारीख जाहीर झाली अन् ओपिनियन पोलने मोदींना बसला सेटबॅक

बातमीत लिहिलंय की -

टाइम्स नाउ नवभारताच ओपिनियन पोलनुसार भाजपला १२५ ते १३१ जागा मिळतील. त्यानंतर काँग्रेसला २९ ते ३३ तर आपला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्यला २ ते ४ जागा मिळतील.

ABP-CVoterने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला १३५ ते १४३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.

लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या कामगिरीवर जनतेला विचारणा केली होती. तेव्हा दोन तृतियांश जनतेने सरकारच्या कामावर समाधान व्यक्त केले होते. २०१७च्या तुलनेत ११ टक्के अधिक लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले होते.

____________________________________

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला ९९ जागा होत्या आणि आता किमान १२५ चा अंदाज.

पण हा सेटबॅक!

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

8 Dec 2022 - 5:50 pm | वामन देशमुख

गुजरातेत भाजप १९९८ पासून सतत सत्तेवर आहे. बंगालात डावी आघाडी १९७७ ते २०११ या काळात ३४ वर्षे सतत सत्तेत होती.

---

डाव्या आघाडीचा ३४ वर्षांचा विक्रम भाजप मोडू शकेल का?
इतर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचा दीर्घ काळ सत्तेवर असण्याचा विक्रम आहे का?

---

नड्डा-शाह-मोदीं-भाजपचे अभिनंदन

शहांचे एक ट्विट:

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 6:01 pm | श्रीगुरुजी

अंतिम निकाल

गुजरात: भाजप १५६, कॉंग्रेस १७, आआप ५, इतर ४

हिमाचल प्रदेश: भाजप २६, कॉंग्रेस ३९, आआप ०, इतर ३

आआपने गुजरातेत १३% मते मिळवून आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केला आहे. कॉंग्रेसला विरोधी पक्षनेता करता येईल इतक्या सुद्धा जागा मिळाल्या नाहीत. दिल्ली, पंजाब पाठोपाठ गुजरातेत आआप कॉंग्रेसची जागा व्यापत आहे.

दर ५ वर्षांनी सत्तारूढ पक्षाला पराभूत करून सरकार बदलण्याची १९९० पासून सचरू असलेली परंपरा हिमाचल प्रदेशात कायम राहिली. दिल्ली महापालिका आआपकडे, हिमाचल प्रदेश कॉंग्रेसकडे व गुजरात भाजपकडे असे सर्व प्रमुख पक्षांना समाधानकारक निकाल लागले आहेत.

महापालिका किंवा विधानसभा निकालावर लोकसभा निवडणुकीचे निकाल ठरत नाहीत. त्यामुळे या निकालांचा २०२४ मधील संभाव्य लोकसभा निवडणुकीशी संबंध जोडता येणार नाही.

दिल्ली महापालिकेची मुदत एप्रिल २००२ मध्येच संपली होती. भाजपने ८ महिने निवडणूक लांबविली ही पहीली चूक. दिल्लीतील ३ महापालिका एकत्र करून ए् १ मोठी महापालिका निर्माण केली ही दुसरी चूक. आआपच्या सिसोदियांसारख्या नेत्यांवर अनेक आरोप करून घरावर छापे मारणे पण अंतिम आरोपपत्रात नाव नसणे ही सगळ्यात गंभीर चूक. आपल्या नेत्यांवर वारंवार खोटे आरोप करून त्रास दिला जात आहे हा केजरीवालांचे आरोप लोकांना खरे वाटतात. आआपच्या नेत्यांविरूद्ध काही किरकोळ मिळाले तरी तात्काळ कारवाई सुरू करणे व नंतर त्यात काहीही न सापडणे, हे भाजपसाठी बूमरॅंग होत आहे. त्याचवेळी आआपच्या सत्येंद्र जैनसारख्या काही मंत्र्यांविरूद्ध गंभीर आरोप असूनही भाजपला त्याचा फायदा घेता आलेला नाही. स्वतः केजरीवालांचे खलिस्तानवाद्यांशी असलेले संबंध भाजपला जनतेपुढे आणता आलेले नाहीत. यापुढील काळात कॉंग्रेसऐवजी आआप हाच भाजपचा प्रमुख विरोधक असेल. केजरीवाल राहुलप्रमाणे निर्बुद्ध नसून अत्यंत चतुर व धूर्त आहेत व वीज, पाणी वगैरे फुकट देण्याच्या त्यांच्या घोषणांचा जनतेवर चांगलाच प्रभाव पडतो असे आजवर दिसून आले आहे.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 6:46 pm | श्रीगुरुजी

हिमाचल प्रदेशात मतांवर प्रभाव पडलेल्या अजून दो गोष्टी म्हणजे -

१) या राज्यात सरकारी नोकरांची संख्या खूप जास्त आहे. कॉंग्रेस व आआप या दोघांनीही जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते.

२) घरटी दरमहा ३०० एकक वीज फुकट देण्याचे कॉंग्रेसने आश्वासन दिले होते.

या दोन घोषणांचा मतदारांवर निश्चितच प्रभाव पडला असावा.

mayu4u's picture

8 Dec 2022 - 7:45 pm | mayu4u

अजून मतमोजणी सुरू आहे. पण अंतिम निकाल तुम्ही लिहिल्या प्रमाणेच असतील.

BJP{43.00%} (१८,१४,५३०)
INC{43.90%} (१८,५२,५०४)

१% आणि ३८ सहस्र पेक्षा कमी मतांमुळे १५ जागांचा फरक पडला. भाजप च्या दृष्टीने या ६०% अधिकच्या जागा आहेत. १५ पैकी १० जागेत निकाल वेगळे आले असते तरी बहुमत बदललं असतं.

mayu4u's picture

8 Dec 2022 - 8:13 pm | mayu4u

४ मतदार संघांमध्ये भाजपच्या पराभवाचा फरकः
६०
३८२
३९९
५६७

अर्थात, अनेक ठिकाणी भाजप अगदी निसटत्या फरकाने जिंकला आहे. एकंदर ही निवडणूक फार चुरशीची झाली आहे.

भागवत काकांच्या पृथःकरणाच्या प्रतीक्षेत!

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 10:09 pm | श्रीगुरुजी

भाजपने सप्टेंबरमध्येच पेट्रोल व डिझेलचे भाव कमी केले असते तर दिल्ली महापालिका व हिमाचल प्रदेशात फायदा झाला असता. परंतु आडमुठ्या केंद्र सरकारमुळे फटका बसला. आपण कितीही महाग इंधन विकू, पथकर कितीही वाढवू, आयकर कितीही वाढवू . . . जनता आपल्यालाच विजयी करणार या भ्रमात मोदी-शहा आहेत. गुजरातसारख्या राज्यात विरोधी पक्ष जवळपास अस्तित्वात नसल्याने तेथे हा माज चालून जातो. पण जेथे जेथे विरोधी पक्षांचे बऱ्यापैकी अस्तित्व शिल्लक आहे, तेथे तेथे जनता भाजपला तडाखा देते.

आज लोकसभा व विधानसभेच्या इतर राज्यातील ७ पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सर्व ७ मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे.

महाराष्ट्रात तर अनेक विरोधी पक्ष अजून बऱ्यापैकी तग धरून आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला जोरदार तडाखा बसणार आहे. हे ओळखूनच १५ महापालिका, जिल्हा परीषदा इ. ची निवडणूक सातत्याने पुढे ढकलली जात आहे.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 11:07 pm | श्रीगुरुजी

२०१७ मध्ये गुजरातेत भाजपला ४९% तर कॉंग्रेसला ४२% मते होती.

२०२२ मध्ये भाजपला ५२%, कॉंग्रेसला २७% व आआपला जवळपास १३% मते मिळाली आहेत. कॉंग्रेस आआपला जागा रिकामी करून देत आहे.