गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
3 Nov 2022 - 3:16 pm

हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार असून, गुजरात विधानसभा निवडणूक १ व ५ डिसेंबरला होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.

त्या निमित्ताने आज एक मजेदार शीर्षकाची बातमी वाचलीआणि खूप हसलो.

शीर्षक - गुजरात निवडणुकीची तारीख जाहीर झाली अन् ओपिनियन पोलने मोदींना बसला सेटबॅक

बातमीत लिहिलंय की -

टाइम्स नाउ नवभारताच ओपिनियन पोलनुसार भाजपला १२५ ते १३१ जागा मिळतील. त्यानंतर काँग्रेसला २९ ते ३३ तर आपला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्यला २ ते ४ जागा मिळतील.

ABP-CVoterने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला १३५ ते १४३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.

लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या कामगिरीवर जनतेला विचारणा केली होती. तेव्हा दोन तृतियांश जनतेने सरकारच्या कामावर समाधान व्यक्त केले होते. २०१७च्या तुलनेत ११ टक्के अधिक लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले होते.

____________________________________

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला ९९ जागा होत्या आणि आता किमान १२५ चा अंदाज.

पण हा सेटबॅक!

प्रतिक्रिया

गुरुजी हिमाचल प्रदेश बद्दल काय अंदाज.
सध्याचे भाजप सरकारची कामगिरी कशी आहे?
हिमाचल प्रदेश बद्दल बातम्या पण फारशा नसतात.

निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार -

१) भाजप ३८-४६, कॉंग्रेस २०-२८
२) भाजप ३८-४२, कॉंग्रेस २५-२९

भाजप सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2022 - 9:43 am | श्रीगुरुजी

निवडणूकपूर्व अंदाज पूर्णपणे चुकले.

विवेकपटाईत's picture

3 Dec 2022 - 5:07 pm | विवेकपटाईत

हिमाचलच्या मंडी डिस्टिक मध्ये झालेली कामे मी सांगू शकतो कारण माझ्या लेकीचे सासर धरमपूर तहसील मध्ये आहे. गेल्या पाच वर्षांत मंडी डिस्टिक मध्ये रुग्णांच्या सोयीसाठी सात ठिकाणी हेलिपॅड बांधले आहे. एक धरमपूर तहसील मध्ये बांधले गेले. करोना काळात अनेक रुग्णांना तिथून चंदीगड शिमला येथे हलविता आले. धरमपूर होऊन वरती माथ्यावर असलेल्या त्यांच्या गावापर्यंत जाणारा रस्ता आता nh झाला आहे. त्यामुळे त्याची तीन ते चार फूट अधिक रुंद झाली. याशिवाय कमलाह फोर्ट पासून हमीर पूरकडे जाणारा रस्ता जो अनेक वर्षांपासून फॉरेस्ट क्लिअरन्स न मिळाल्याने होऊ शकला नव्हता आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे धरमपूर ते हमीरपुर जाणारा रस्ता 40 ते 50 किलोमीटर छोटा झाला. पहिले दिवसातून दोन ते तीन वेळा बसेस वर यायचा पण आता दर अर्ध्या तासाने येतात. याशिवाय पहिले दिल्लीहून धर्म पुर छोटया बसेस जायच्या आता valvo ही सुरू झाली आहे.

विवेकपटाईत's picture

3 Dec 2022 - 5:07 pm | विवेकपटाईत

हिमाचलच्या मंडी डिस्टिक मध्ये झालेली कामे मी सांगू शकतो कारण माझ्या लेकीचे सासर धरमपूर तहसील मध्ये आहे. गेल्या पाच वर्षांत मंडी डिस्टिक मध्ये रुग्णांच्या सोयीसाठी सात ठिकाणी हेलिपॅड बांधले आहे. एक धरमपूर तहसील मध्ये बांधले गेले. करोना काळात अनेक रुग्णांना तिथून चंदीगड शिमला येथे हलविता आले. धरमपूर होऊन वरती माथ्यावर असलेल्या त्यांच्या गावापर्यंत जाणारा रस्ता आता nh झाला आहे. त्यामुळे त्याची तीन ते चार फूट अधिक रुंद झाली. याशिवाय कमलाह फोर्ट पासून हमीर पूरकडे जाणारा रस्ता जो अनेक वर्षांपासून फॉरेस्ट क्लिअरन्स न मिळाल्याने होऊ शकला नव्हता आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे धरमपूर ते हमीरपुर जाणारा रस्ता 40 ते 50 किलोमीटर छोटा झाला. पहिले दिवसातून दोन ते तीन वेळा बसेस वर यायचा पण आता दर अर्ध्या तासाने येतात. याशिवाय पहिले दिल्लीहून धर्म पुर छोटया बसेस जायच्या आता valvo ही सुरू झाली आहे.

श्रीगुरुजी's picture

4 Nov 2022 - 5:33 pm | श्रीगुरुजी

दिल्ली महापालिका निवडणूक ४ डिसेंबर या दिवशी होणार असून ७ डिसेंबरला मतमोजणी होईल.

गुजरातमध्ये १ डिसेंबर व ५ डिसेंबर या दिवशी निवडणूक होणार आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे की सर्व काही फुकट वाटण्याच्या घोषणा करीत गुजरातमध्ये हिंडत बसावे हा केजरीवालांना पडलेला यक्षप्रश्न असेल.

मोदींची बटीक झालेल्या निवडणूक आयोगाने केजरीवांलांना घाबरलेल्या मोदीच्या सोयीसाठी दिल्ली नी गुजरात निवडणूक एकत्र ठेवलीय. गुजरात निवडणूक हिमाचल सोबत होणे अपेक्षीत होते. पण मोदीनी केंद्रीय यंत्रणा बटीक करून ठेवल्या आहेत. त्यांना हवं तसं मोदींच्या तालावर नाचवलं जातं. मोदी हा माणूस लोकशाहीस घातक आहे.

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2022 - 12:17 am | श्रीगुरुजी

आज जाहीर झालेल्या सी व्होटर - एबीपी न्यूज सर्वेक्षणानुसार गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला १३१-१३९, कॉंग्रेसला ३१-३९ व आआपला २-८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

यात धक्कादायक अंदाज म्हणजे भाजपला अंदाजे ४५ टक्के, कॉंग्रेसला अंदाजे २५ टक्के व आआपला अंदाजे २० टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. आआप आपल्या २०% मतातील १५% मते कॉंग्रेसकडून व ५% मते भाजपकडून खेचण्याची शक्यता आहे.

प्रथमच गुजरात विधानसभा निवडणुकीत २०% मते आआपने मिळविणे ही कॉंग्रेसपेक्षाही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. कॉंग्रेस देशातून पूर्णपणे समाप्त होण्याच्या मार्गावर असून ती जागा आआप व्यापताना दिसत आहे.

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2022 - 7:31 am | श्रीगुरुजी

हे अंदाज खरे ठरले भाजपला इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळेल आणि कॉंग्रेसचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव असेल.

Gujarat Assembly Election 2022: दिल्लीत मुख्यालयातील बैठकीनंतर काँग्रेसने ४३ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

https://www.loksatta.com/elections/congress-releases-list-of-43-candidat...

गांधी घराण्याने निवडलेली यादी....

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2022 - 9:26 am | श्रीगुरुजी

तुमच्या शिल्लक सेनेच्या १८२ उमेदवारांची यादी कधी प्रसिद्ध होणार? शिल्लक सेनेनेच गुजरातमध्ये शून्य असलेल्या भाजपला मोठे केले ना?

मुक्त विहारि's picture

5 Nov 2022 - 9:52 am | मुक्त विहारि

बाळासाहेब ठाकरे यांनी, संजय दत्तला माफी दिली आणि मी शिवसेना सोडून दिली....

धन्यवाद...

वरील प्रतिसाद, हा श्रीगुरूजी यांनाच आहे. इतरांनी, उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये....

विश्लेषण: गुजरातमध्ये भाजपाला शिंगावर घेण्यासाठी ‘आप’नं निवडलेले इसूदनभाई गढवी कोण आहेत?

https://www.loksatta.com/explained/who-is-isudan-gadhvi-aap-gujarat-cm-c...

केजरीवाल हा अत्यंत धूर्त माणूस आहे....गुजरात मध्ये आपचे बस्तान बसवायला, केजरीवालांनी अतिशय योग्य माणसाची निवड केली .....ही निवडणूक तिरंगी असल्याने, भाजप निवडून यायची शक्यता जास्त आहे... पण भविष्यात, गढवींसारखी माणसे आप मध्ये आली तर, पुढच्या निवडणूकी भाजप साठी कठीणच होत जाणार....

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

https://www.esakal.com/desh/big-blow-to-congress-in-himachal-pradesh-26-...

गांधी घराण्याचे, परमपूज्य राहुल गांधी, आता काय टिप्पणी देतात? हे वाचणे रोचक ठरेल .....

तर्कवादी's picture

8 Nov 2022 - 3:56 pm | तर्कवादी

बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा कमी करुन त्यांना मुक्त करणे, त्यांचे सत्कार करणे, त्यांचा "संस्कारी" म्हणत गौरव करणे हा असंवेदनशीलतेचा कळस होता. या गोष्टीचा भाजपला फटका बसणार आहे.

९९ जागांवरुन थेट दीडशे जागा येताना दिसत आहेत.

तर्कवादी's picture

8 Dec 2022 - 6:04 pm | तर्कवादी

ठीक आहे.. आता आणखी बलात्कारी, खूनी , अत्याचारी निर्माण होत राहतील... मोकाट सुटतील.
चालू देत .. कडेलोट होईपर्यंत प्रवास होवू देत एकदाचा...

mayu4u's picture

8 Dec 2022 - 7:43 pm | mayu4u

... चांगलं जमतं तुम्हाला...

२०१४ पूर्वीच्या "मोदी आले तर अल्पसंख्याकांच्या कत्तली होतील, लोकसभा विसर्जित होइल" वगैरे ची आठवण झाली. चालू द्या.

बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा कमी करुन त्यांना मुक्त करणे, त्यांचे सत्कार करणे, त्यांचा "संस्कारी" म्हणत गौरव करणे हे अतिशय चूकीचे कृत्य होते हे माझे होते आणि अजूनही आहेच. बाकी तुमच्या संवेदनशील मनाला ते कृत्य योग्य वाटत असेल तर तुमचं चालू देत.

मला वाद करण्यात रस नाही.

तर्कवादी's picture

8 Dec 2022 - 10:48 pm | तर्कवादी

माझे मत होते आणि अजूनही आहेच
असे वाचावे

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2022 - 10:10 am | श्रीगुरुजी

काल हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक पार पडली. एकूण ६६.५८% मतदारांनी मत दिले. २०१७ मध्ये ७५.५७% मतदारांनी मत दिले होते. म्हणजे यावेळी ९% मतदारांनी मत दिले नाही. जेव्हा मतदार सरकार बदलण्यासाठी मत देतात तेव्हा मागील निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढते. जर आहे तेच सरकार कायम ठेवायचे असेल तर मतदार कमी प्रमाणात मत देतात. यावेळी तसेच होणार असं दिसतंय.

मतमोजणी ८ डिसेंबरला आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2022 - 12:09 am | श्रीगुरुजी

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील ८९ विधानसभा मतदारसंघात मतप्रक्रिया पार पडली. एकूण ६०.२०% मतदारांनी मत दिले. २०१७ मध्ये याच ८९ मतदारसंघात ६८% मतदारांनी मत दिले होते. आआपच्या प्रवेश होऊनही मत टक्केवारी वाढण्याऐवजी बरीच कमी झाली आहे. याचा एक अर्थ असा निघू शकतो की आआपला मतदारांनी फारसे स्थान दिलेले दिसत नाही.

आणि त्यामुळे भाजपचे वजन कमी होऊन विरोधी पक्षांचे वजन वाढेल याची यादी आहे का?

काही फुकट वाटण्याचा निवडणूक जाहिरनामा केजरीवालांनी/आप पक्षाने दिला आहे का? त्या गळाला दिल्ली आणि पंजाब लागले आहेत. इथेही आणि अगदी महाराष्ट्रातही होऊ शकेल.

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2022 - 8:13 am | श्रीगुरुजी

भारतीय राजकारणात बहुतेक वेळा असे दिसले आहे की जेंव्हा जेंव्हा जनतेला विद्यमान सरकार बदलून नवीन सरकार आणायचे असते तेव्हा तेव्हा आधीच्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढते आणि जेव्हा विद्यमान सरकारविषयी जनता निष्क्रिय असते किंवा समाधानी असते किंवा सत्तैवर आणता येईल असा तुल्यबळ विरोधी पक्ष नसतो, तेव्हा मतांची टक्केवारी कमी होते.

गुजरातमध्ये २०१७ निवडणुकीत खूप चुरशीची लढत झाली होते व भाजप अगदी काठावर जिंकला होता. तेव्हा मतांची टक्केवारी ६८% होती. कालच्या टप्प्यात ही टक्केवारी ६०.२% इतकी कमी झाली आहे. याचा प्रथमदर्शनी अर्थ असा आहे की विद्यमान भाजप सरकारविषयी जनता असमाधानी नाही किंवा समाधानी आहे किंवा विरोधी पक्ष अत्यंत दुर्बल आहेत.

सरकार बदलणे हे नोकरी बदलण्यासारखे आहे. आता हातात असलेल्या नोकरीत कर्मचारी असमाधानी असला तरी अधिक चांगली नोकरी मिळत असेल तरच तो नोकरी बदलतो.

एखाद्या पोटनिवडणुकीत जेमतेम ३०-३५% टक्केवारी असते कारण त्या निकालामुळे सरकार बदलण्याची शक्यता शून्य असते. म्हणून जनता मत द्यायला बाहेर येतच नाही.

श्रीगुरुजी's picture

5 Dec 2022 - 10:15 pm | श्रीगुरुजी

निवडणूक संपली. मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज खालीलप्रमाणे -

गुजरात (बहुमतासाठी आवश्यक ९२)

१) इंडिया टुडे - ऍक्सिस: भाजप १३१-१५१, कॉंग्रेस १६-३०, आआप ९-२१
२) टीव्ही ९: भाजप १२५-१३०, कॉंग्रेस ४०-५०, आआप ३-५
३) जन की बात: भाजप ११७-१४०, कॉंग्रेस ३४-५१, आआप ६-१३
४) ETG-TNN: भाजप १३९, कॉंग्रेस ३०, आआप ११
५) चाणक्य: भाजप १५०, कॉंग्रेस १९, आआप ११

एकंदरीत भाजप विक्रमी जागा जिंकून सरकार बनविणार असे दिसते.

हिमाचल प्रदेश (बहुमतासाठी आवश्यक ३५)

१) इंडिया टुडे - ऍक्सिस: भाजप २४-३४, कॉंग्रेस ३०-४०, आआप ०
२) टीव्ही ९: भाजप ३३, कॉंग्रेस ३१, आआप ०
३) जन की बात: भाजप ३२-४०, कॉंग्रेस २७-३४, आआप ०
४) ETG-TNN: भाजप ३८, कॉंग्रेस २८, आआप ०
५) चाणक्य: भाजप ३३, कॉंग्रेस ३३, आआप ०

हिमाचल प्रदेशात जोरदार चुरस दिसते.

strong>दिल्ली महापालिका (बहुमतासाठी आवश्यक १२६)

१) इंडिया टुडे - ऍक्सिस: भाजप ६९-९१, कॉंग्रेस ३-७, आआप १४९-१७१
२) टीव्ही ९: भाजप ९४, कॉंग्रेस ८, आआप १४५
३) जन की बात: भाजप ७०-९२, कॉंग्रेस ४-७, आआप १५९-१७५
४) ETG-TNN: भाजप १४६-१५६, कॉंग्रेस ६-१०, आआप ११

एकंदरीत आआप विक्रमी जागा जिंकताना दिसत आहे. दिल्लीतील ३ महापालिका एकत्र करून एक मोठी महापालिका करण्याची भाजपची योजना फसताना दिसत आहे. दिल्लीत कॉंग्रेस लोकसभा व विधानसभेनंतर महापालिकेतही संपताना दिसत आहे.

भाजप नेतृत्व कितीही निवडणूक कुशल असले तरी दिल्ली, महाराष्ट्र व बिहार या राज्यात भाजपचे केंद्रीय नेतृत्व सातत्याने चुकीचे निर्णय घेऊन तोंडावर आपटत आहे व हे अजूनही त्यांना समजत नाही असं चित्र आहे.

पाणी,वीज यांचे बिल कमी करणार म्हणून.
उद्या जर का कुठेही एखादा पक्ष म्हणेल चाळीस टक्के सवलत, आणि दुसरा पक्ष साठ टक्के सवलत देतो तर सूज्ञ लोक साठवाल्याला मतं देणार. पण या सवलती कुणाच्या तरी आर्थिक कापाकापीतूनच येणार ना?

रात्रीचे चांदणे's picture

6 Dec 2022 - 8:08 am | रात्रीचे चांदणे

हेच दिल्लीकर लोकसभेला भाजपाला मतदान करतात. त्यामुळे केजरीवालांनी फुकट दिले म्हणूनच दिल्लीकरांनी आप ला मतदान दिले हा समज चुकीचा आहे. आणि सगळीच सरकारे काही गोष्टी फुकट देऊन मतदार वळविण्याचा प्रयत्न करत असतात.

श्रीगुरुजी's picture

6 Dec 2022 - 8:08 am | श्रीगुरुजी

विकासाच्या नावाखाली जनता किती दिवस जास्त किंमत देत राहणार?

काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाची जागतिक बाजारपेठेतील किंमत ९,६०० रूपये प्रति गॅलन इतकी वाढली होती. आता हीच किंमत जवळपास दोन तृतीयांश म्हणजे ६,५०० रूपये आहे. परंतु जनतेला त्याच दराने डिझेल व पेट्रोल मिळत आहे. निदान निवडणुकीच्या काळात तरी इंधनाचे भाव कमी करायला हवे होते.

आयकरातील प्रमाणित वजावट मागील ८-९ वर्षात फारशी वाढलेली नाही. उलट अनेक सवलती रद्द केल्या आहेत (उदाहरणार्थ लाभांश पूर्ण करपात्र केला, दीर्घ मुदतीचा भांडवली फायदा करपात्र केला).

सर्वत्र पथकर सातत्याने वाढवित आहेत. मागील आठवड्यात तुळजापूरला जाऊन आलो. पूर्ण ६०० किमी अंतरासाठी जवळपास १२०० रूपये पथकर द्यावा लागला. पुण्यातून साताऱ्यास जाताना ६० किमी अंतरासाठी १८५ रूपये पथकर घेतात, परंतु रस्ता वाईट अवस्थेत आहे. ही एक प्रकारची खंडणी आहे.

विकास असे गोंडस नाव देऊन जनतेचा खिसा मोठ्या प्रमाणात हलका केला जात आहे. अश्या परिस्थितीत फुकट किंवा अल्प दराने वीज, पाणी अश्या प्रलोभनांचे जनतेला आकर्षण वाटणारच.

गुजरातेत जरी आआपला फार कमी जागा मिळताना दिसत असल्या तरी पहिल्याच प्रयत्नात किमान १५% मते मिळणे ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2022 - 9:52 am | श्रीगुरुजी

निवडणूकोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज -

१) गुजरात - ढोबळमानाने सर्वांचे अंदाज बरोबर ठरले. परंतु टीव्ही ९ चा अंदाज बराच भरकटला, तर चाणक्य व इंडिया टुडेचे अंदाज बरेचसे बरोबर आले.

२) हिमाचल प्रदेश - फक्त इंडिया टुडेचा अंदाज अंतिम आकड्यांच्या कक्षैत आहे. बाकी चारही अंदाज चुकले.

३) दिल्ली महापालिका - ETG चा अंदाज पूर्ण चुकला. टीव्ही ९ चा अंदाज बराचसा बरोबर आलाय. इतरांचे अंदाज चुकले.

श्रीगुरुजी's picture

7 Dec 2022 - 11:42 am | श्रीगुरुजी

दिल्ली महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत एकूण २५० जागांमध्ये भाजप १००, आआप १३३ व कॉंग्रेस ११ जागांवर पुढे आहे.

भाजपला ७०- ९४ व आआपला १४५-१७५ जागा मिळतील असा ३ संस्थांचा अंदाज होता. हे अंदाज काहिसे चुकताना दिसत आहेत. ETG चे अंदाज पूर्ण चुकले आहेत.

श्रीगुरुजी's picture

7 Dec 2022 - 1:11 pm | श्रीगुरुजी

भाजप १०४, आआप १३३. सलग १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर भाजपचा दिल्ली महापालिकेत पराभव होतोय. परंतु अंदाजापेक्षा बऱ्यापैकी जास्त जागा भाजप जिंकतोय. दिल्ली विधानसभा व लोकसभा निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होते. त्या तुलनेत महापालिका निवडणूक बऱ्यापैकी चुरशीची झाली आहे.

आआप देशात कॉंग्रेसची जागा घेत आहे व ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. केजरीवाल राहुलसारखे मूर्ख नसून ते अत्यंत धूर्त व चतुर राजकारणी आहेत. त्यामुळे ते ३०२४ किंवा २०२८ मध्ये भाजपसाठी फार मोठे आव्हान ठरतील असं दिसतंय.

श्रीगुरुजी's picture

7 Dec 2022 - 3:15 pm | श्रीगुरुजी

दिल्ली महापालिका निवडणूक अंतिम निकाल -

आआप १३४, भाजप १०४, कॉंग्रेस ९, इतर ३

१५ वर्षांनंतर दिल्ली महापालिकेतील भाजपची सत्ता संपली. तशी एकतर्फी निवडणूक झाली नाही. सलग १५ वर्षांनंतर मतदार नाराज असणे स्वाभाविक आहे. दिल्लीच्या ३ महापालिका एकत्र करण्याचा भाजपचा निर्णय चुकलेला दिसतो. ३ वेगळ्या महापालिका असत्या तर किमान एका महापालिकेत भाजपला बहुमत मिळू शकले असते.

लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ दिल्ली महापालिकेतही कॉंग्रेस पूर्णपणे संपली. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, तामिळनाडू, ओरिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा या मोठ्या राज्यातून कॉंग्रेस पूर्वीच संपली होती. आता दिल्लीतही संपली. या ८ राज्यात लोकसभेच्या निम्म्या म्हणजे २७१ जागा आहेत जेथे कॉंग्रेसचे अस्तित्व जवळपास शून्य झाले आहे. तस्मात् भविष्यात कॉंग्रेस लोकसभेत बहुमताच्या जवळपास सुद्धा येण्याची शक्यता नाही.

आप म्हणजे, आयजीच्या जीवावर बायजी उदार....

श्रीगुरुजी's picture

7 Dec 2022 - 9:50 pm | श्रीगुरुजी

अजून ही लढाई संपलेली नाही. दिल्लीच्या नायब राज्यपालांना दिल्ली महापालिकेत १२ नियुक्त नगरसेवक नेमता येतात. नायब राज्यपाल अर्थातच भाजपशी संबंधित नगरसेवक नियुक्त करणार. त्यामुळे एकूण २६२ नगरसेवकांमध्ये भाजप समर्थक ११६ व आआप १३४ अशी स्थिती होईल. महापालिकेला पक्षांतरबंदी कायदा लागू नसल्याने भाजप नगरसेवकांची फोडाफोडी करून बहुमतासाठी आवश्यक अजून १६ नगरसेवक मिळविण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.

रात्रीचे चांदणे's picture

7 Dec 2022 - 11:22 pm | रात्रीचे चांदणे

महापालिकेला पक्षांतरबंदी कायदा लागू नसेल तर भाजपा साम दाम दंड भेद वापरून सत्ता घायचा प्रयत्न करणार. फक्त ह्यासाठी वेळ कधी निवडणार हाच प्रश्न आहे.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 9:28 am | श्रीगुरुजी

आताचे कल -

गुजरात: भाजप १३७, कॉंग्रेस ३३, आआप ८
हिमाचल प्रदेश: भाजप ३०, कॉंग्रेस ३६, आआप ०

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 9:51 am | श्रीगुरुजी

आताचे कल -

गुजरात: भाजप १४६, कॉंग्रेस २३, आआप ९
हिमाचल प्रदेश: भाजप ३३, कॉंग्रेस ३२, आआप ०

mayu4u's picture

8 Dec 2022 - 11:18 am | mayu4u

हि प्रः
भा ज पः ३०
काँग्रेस: ३५

गुजरातः
भा ज पः १५०
काँग्रेस: १९
आ आ पः ८

mayu4u's picture

8 Dec 2022 - 12:09 pm | mayu4u

हि प्रः
भा ज पः २८
काँग्रेस: ३७

गुजरातः
भा ज पः १५०
काँग्रेस: २२
आ आ पः ६

mayu4u's picture

8 Dec 2022 - 12:11 pm | mayu4u

हि प्र
BJP{43.28%}
INC{43.43%}

०.१५% चा फरक => ९ जागा

त्यांचं हीत पाहतात.

mayu4u's picture

8 Dec 2022 - 12:50 pm | mayu4u

हि प्रः
भा ज पः २७
काँग्रेस: ३८

गुजरातः
भा ज पः १५४
काँग्रेस: १९
आ आ पः ६

BJP{43.12%}
INC{43.63%}

०.५१% => ११ जागा

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2022 - 1:06 pm | श्रीगुरुजी

आताचे कल -

गुजरात: भाजप १५४, कॉंग्रेस १९, आआप ६
हिमाचल प्रदेश: भाजप २७, कॉंग्रेस ३८, आआप ०

गुजरातेत भाजप विक्रमी जागा जिंकून विजयी होतोय. यापूर्वी १९८५ मध्ये कॉंग्रेसला १४४ जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेस आकसत चालली आहे व ती जागा आआप व्यापत आहे.

दुसरीकडे भाजप हिमाचल प्रदेश हरत आहे. या राज्यात प्रत्येक ५ वर्षांनी सरकार बदलते. हा कल २०२२ मध्ये कायम राहताना दिसतोय.

mayu4u's picture

8 Dec 2022 - 3:46 pm | mayu4u

हि प्रः
भा ज पः २६
काँग्रेस: ३९

गुजरातः
भा ज पः १५८
काँग्रेस: १६
आ आ पः ४

BJP{42.99%}
INC{43.87%}

०.८८% => १३ जागा

mayu4u's picture

8 Dec 2022 - 4:42 pm | mayu4u

हि प्रः
भा ज पः २६
काँग्रेस: ३९
३२ जागा जिंकून काँग्रेस बहुमताच्या दिशेने

गुजरातः
भा ज पः १५६
काँग्रेस: १७
आ आ पः ५
१०२ जागा जिंकून भाजप स्पष्ट बहुमताने विजयी

BJP{42.99%}
INC{43.89%}

०.९०% => १३ जागा

सुबोध खरे's picture

8 Dec 2022 - 7:28 pm | सुबोध खरे

अति वाममार्गी फुरोगामी तर्कशास्त्र

INC{43.89%} म्हणजेच ५६. १ टक्के लोकांनी काँग्रेसला मत दिलेले नाही.

म्हणजेच काँग्रेसला सत्ता स्थापनेचा नैतिक अधिकार नाही.

यापेक्षा राष्ट्रपती राजवट लावावी

२०१९ साली भाजप ला लोकसभेत ३७.३६ % मते मिळाली होती म्हणजेच बहुसंख्य जनतेने (६२. ६४ %) भाजपाला नाकारलेले होते. किंवा केवळ २३ कोयती लोकांनी भाजप ला मत दिले आहे तेंव्हा श्री मोदी याना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

याच तर्कशास्त्रावर आधारित

सुबोध खरे's picture

8 Dec 2022 - 7:28 pm | सुबोध खरे

कोटी