पोलिस मिरवणूकीत नाचले !!

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
20 Sep 2022 - 10:44 am

पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cops-wa...

उन्माद भाव मनात साचले
पोलिस मिरवणूकीत नाचले!!

आयुक्त कुलवंत सरंगळ
म्हणे हे सर्व आहे अमंगळ

जास्त 'चूलबूल' करु नका 'पांडे'
नाहितर सस्पेंड चे देवू डंडे.
जास्त बनू नका गोविंदा व कान्हा
कुठून आणायची सोनाक्षी सिन्हा?!

आयुक्तांनी त्यांचे उपटले कान
म्हणाले मी दबंग,
तुम्ही नव्हे सलमान खान

अंगावर असता खाकी वर्दी
म्हणे नाचू नका सांभाळा गर्दी
पण पोलीस ही माणूस व दर्दी
मग आयुक्तांना का झाली सर्दी(?!)

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

20 Sep 2022 - 12:14 pm | कर्नलतपस्वी

वर्दीची निराळी शान
वर्दीचा राखावा मान
ही त्यांची शिकवण
म्हणून तर पाहून वर्दीला
भल्याभल्यांना लागते हागवण....