प्रायोजित मधूचंद्र (?!)
https://www.esakal.com/manoranjan/nayanthara-vignesh-shivan-honeymoon-sp...
No pain
No Spain
मधूचंद्र, विघ्नेश व नयनतारा
नेटफ्लिक्स करणार खर्च सारा
ना काही खर्च
ना काम घरचं
ना घेतलं कर्ज
मधूचंद्री
ही नवी संस्कृती
कि नवी विकृती
टिव्हिवर ते दंपति
दिसणार
प्रायोजक नेटफ्लिक्स
झाले सर्व थेट फिक्स
झाले ऐकोनी पोट धस्स
असा खर्च
अडीच लाख भाडे
हाॅटेल बील काढे
आम्ही म्हणतो पाढे
अबबब
नाही खर्चली कवडी दमडी
नाही वेचला दाम
बाई मी फुकट घेतला आराम!
बाई मी फुकट घेतला आराम !!
प्रतिक्रिया
30 Aug 2022 - 11:18 am | बाजीगर
परंतु ज्यासाठी आतुरतो प्रत्येक जण
हे हळवे रोमांचक खाजगी क्षण
असे उभा समोर कॅमेरामन (?!)
बेडरुमी ।।