तरीही…

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
26 Mar 2022 - 12:27 pm

Gulal

शेंदूर दगडांचा उतरला तरीही,
गुलाल भक्तीचा उधळत राही

धुरळ्यात काही उमजत नाही,
पावलांवर पाऊल पडत राही

झापडे काढली डोळ्यांची तरिही
उजेडाला डोळे हे सरावत नाही

रक्त सांडले कळपात तरिही
मेंढरे लांडग्याला ओळखत नाही

पाणी डोळ्यातले रोखले तरिही
लेखणीतून मग ते झरत राही

~ मनिष

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

26 Mar 2022 - 6:53 pm | कर्नलतपस्वी

थोड्याच शब्दात एक मोठा संदेश हा कवीतेचा गुण मला फार आवडतो.
कवीता आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2022 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रचना. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद बिरुटे सर आणि कर्नल.

एकाच कवितेत 'तरीही' च्या र्‍ह्स्व-दीर्घच्या चुका झाल्यात, त्याबद्द्ल क्षमस्व! _/\_