बालकवी म्या पामरला क्षमा करा
आनंदी आनंद गडे
मेट्रू धावे चोहीकडे
क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड
क्षणात पोहचे कोथुरुडे
आनंदी आनंद गडे
डोलत लतीका गंधवती
मेट्रु स्टाफ लगबगती
नटली संध्या प्रेमाने
कुमद ही हसते आहे
सनई चौघडे , हार तुरे
झगमग लगबग चोहीकडे
आनंदी आनंद गडे
नरमुंड रूंड पाहूनी
मनी चितंले,
प्राणनाथ धावले
भान हरले(पुणेकरांचे),
गान स्फुरले
आनंदी आनंद गडे
नरेंद्र बसला,देवेंद्र ही बसला
खुशीत हसला
उधो धावे खिडकी कडे (तिकीटाच्या)
आनंदी आनंद गडे
वाहति रस्ते संथगती,
विहरती दुचाकी तिव्रगती
द्विपाद,चतुष्पाद भ्रमती मोदभरे
कमल विकसले, कोण आकसले
डोलत वदती (पुणेकर)
इकडे,तिकडे, चोहिकडे
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे
मेट्रू धावे चोहीकडे
क्षणात पिपंरी क्षणात.......
प्रतिक्रिया
12 Mar 2022 - 10:00 am | धर्मराजमुटके
एकंदरीत मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात आल्यामुळे पुणेकरांना फारच आनंद झालेला दिसतोय. अजि म्या ब्रह्म पाहिले चा अनुभव याची देही याच डोळा अनुभवल्याचा आनंद काही वेगळाच असावा.
12 Mar 2022 - 10:19 am | सर टोबी
सध्या तरी जेमतेम पाच किलोमीटर अंतरासाठी असणारी मेट्रो हौसेखातर प्रवास करणाऱ्यांकडून वापरली जात आहे. अणि या एवढ्याश्या प्रवासी संख्येमुळे देखील पार्किंगची कमतरता जाणवयला लागली आहे.
खरा वनाझ पासून प्रवास करणारा मजूर वर्ग येऊन जाऊन ४० रुपयात येरवड्याच्या मजूर धक्क्याला जातो. तो त्याचा प्रवास खर्च दुप्पट करणार नाही मेट्रो साठी. राहता राहिला विमान नगरच्या ऑफिसेस मध्ये जाणारा कर्मचारी वर्ग. तो कितपत पायी जाण्याची तयारी ठेवतो त्यावर मेट्रोचा वापर अवलंबून आहे. त्याने मेट्रोला पसंती दिली नाही तर मेट्रो पांढरा हत्ती होऊ शकतो.
12 Mar 2022 - 10:35 am | कंजूस
पाहा पाहा कसा आनंद भरून राहिला चहुकडे. एरंडवनी जाणार.
गधवंती दुरुस्त करा हो. (गंधवती - सेंट मारलेल्या महिला म्हणायचय का?)
बाकी कविता फारच आवडली. त्याला नाद आहे.
12 Mar 2022 - 11:00 am | कर्नलतपस्वी
कंजूस ...चूक मान्य, आपण घेतलेला अर्थ बरोबर आहे.
2010 मधे पुरानी दिल्ली ते हवाईअडूडा तीन तास लागायचे. मेट्रो मुळे हेच आतंर २६ मी.झाले. सीमेवरून येणाऱ्या सैनिकांची चांगली सोय झाली.
पाढंरा हत्ती सुरवातीलाच पुढे चांगलाच फायदा होईल.
धर्मराज, टोबी सर धन्यवाद
12 Mar 2022 - 9:34 pm | कंजूस
आता राजकारण चर्चा धागेच वाढतात.
12 Mar 2022 - 9:47 pm | कर्नलतपस्वी
चाट,पाणीपुरी स्टॉलवर नेहमीच गर्दी असते.राजकारण हा विषय पण असाच आहे.
12 Mar 2022 - 9:56 pm | कर्नलतपस्वी
सेवानिवृत्त आहे, जुने धागे काढून वाचतोय. फार सुंदर लेख, कवीता,भटकंती इ. .आता जागतीक घडामोडींवर सर्व नजर ठेवून आसतात. इथे मतभिन्नता आसल्या मुळे धागा हालता राहातो.तसे बाकी ठिकाणी नाही.. असो.
13 Mar 2022 - 12:57 pm | मुक्त विहारि
हीच तर मिपाची खासीयत आहे ....
वैचारिक मतभेद हवेतच... सुदृढ लोकशाही, मतभिन्नतेवरच आधारित असते...
वैचारिक मतभेद असलेले कितीतरी मिपाकर, ऐनवेळी व्यक्तीगत पातळीवर, एकमेकांना मदत करतातच करतात... निदान मला तरी, व्यक्तीगत पातळीवर, मिपाकरांचा हाच अनुभव आला....
अडलेल्या मिपाकराला, मिपाकर हमखास मदत करतात..
13 Mar 2022 - 8:49 am | शेखरमोघे
कविता आवडली. निवडणुका होऊन गेल्या आहेत नाहीतर "उधो धावे खिडकी कडे (तिकीटाच्या)" यातून अनेक अर्थ निघु शकले असते.
13 Mar 2022 - 8:56 am | कर्नलतपस्वी
ज्या की रही भावना जैसी
प्रभू मुरत तिन देखी तैसी
13 Mar 2022 - 9:31 am | विजुभाऊ
मस्त कविता आहे.
13 Mar 2022 - 12:17 pm | चौथा कोनाडा
व्वा, मस्तच !
मेट्रु विडंबन छान जमले आहे !
हा हा हा .... भारी !
"क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड" असे आमच्या वाडीचे उल्लेख वाचून गहिईवरून आले !
13 Mar 2022 - 12:57 pm | मुक्त विहारि
कविता आवडली...
13 Mar 2022 - 1:53 pm | धर्मराजमुटके
पुणे मेट्रो मधून प्रवास करण्यार्या पुणेकरांचे व्हिडीओ. मेट्रोतील प्रवास प्रवाशांना गारेगार अनुभव देतो तर ह्या चित्रफिती आपल्या मनास आनंद देतील.
दुवा १
दुवा २
दुवा ३
दुवा क्र. ४
दुवा क्र. ५
13 Mar 2022 - 4:58 pm | भीमराव
मेट्रुच्या फेसबुक पेजवर पाम्पलेट करुन लावायला हवी ही कविता.
18 Mar 2022 - 8:58 pm | पाषाणभेद
मस्त आहे