ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग २

निनाद's picture
निनाद in राजकारण
7 Feb 2022 - 4:03 am

मद्रास उच्च न्यायालयाने हिंदू याचिकाकर्त्याला चर्च बाबत सहिष्णुता दाखवण्याचे निर्देश दिले आहेत.
तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील नेदुविलाई येथे नव्याने बांधलेल्या चर्चमध्ये लाऊडस्पीकरच्या वापराबाबत याचिकाकर्त्याने रात्रंदिवस लाऊडस्पीकरच्या वापरामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली होती. हे मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले आहे!

सी किशोर म्हणून ओळखल्या जाणार्‍या याचिकाकर्त्याने मद्रास उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली. त्यांनी कन्याकुमारीच्या जिल्हाधिकार्‍यांनी वाई थंगराज याला चर्च बांधण्यासाठी दिलेल्या परवानगीला आव्हान दिले. थंगराज हा दिवसा आणि रात्री ध्वनिक्षेपकाद्वारे प्रार्थना करून उपद्रव निर्माण करत असल्याची तक्रार त्यांनी केली. चर्चने आपल्या घराच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता आणि लाऊडस्पीकर आणि संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली होती.
--
अवांतरः
सध्या मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. स्टॅलिन यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आहे.
द्रमुक पक्षाची स्वतःची मते आहेत जी मुळात पेरियार विचारसरणीने बनलेली आहेत. आणि ही विचारसरणीने प्रत्येक हिंदू श्रद्धा जसे की देव, मंदिरे, हिंदू संस्कृती आणि परंपरा इत्यादींना विरोध करते. या विरोधासाठीच करण्यासाठी द्रमुक पक्षाची स्थापन केली गेली होती. २०१४ पासून मात्र द्रविडी पक्षाचे समर्थक हिंदूना विरोध करण्यासाठी पक्षाची स्थापना करण्यात आली होती हे लपवण्याचा प्रयत्न करतात असे दिसून येते.
पक्षाचे अध्यक्ष एमके स्टॅलिन हे घोषित नास्तिक आहेत, द्रमुक पक्ष हिंदूविरोधी आहे असे अनेकदा दिसून आले आहे. त्यांचे दिवंगत वडील आणि द्रमुकचे माजी प्रमुख एम. करुणानिधी हेही नास्तिक होते.

प्रतिक्रिया

अश्या गोष्टी विस्कळीतच लिहायच्या असतात. अडचणीत आले की म्हणजे दुसरा अर्थ काढता येतो.

पण तुम्ही दिलेल्या ट्विट मध्ये ती पुष्कळच व्हेग आहे. न पटण्यासारखं काही लिहिलेलं नाहीये त्यात. तुम्ही ३७० चा काँटेक्स्ट सांगितला नसता तर चांगलंच लिहिलंय म्हणलो असतो मी.

चौकस२१२'s picture

9 Feb 2022 - 12:55 pm | चौकस२१२

असल्या व्यक्तीकडून कसली अपेक्षा ठेवायची?
दुटप्पि आणि ढोंगी पणा आणि मागे लपलेला कडवे पणा बाहेर आला

दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या पाकिस्तानी कंपनीने तथाकथित 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे' ला पाठिंबा दिल्याने वाद निर्माण झाला होता, त्यावर खेद व्यक्त केला आहे. तरीही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तडकाफडकी दक्षिण कोरियाच्या राजदूताला भेटीस बोलावले. कोरिया प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांच्याशी भेट घेतली आणि इतर द्विपक्षीय बाबींवर चर्चा करण्याबरोबरच या मुद्द्यावर भारताची नाराजी व्यक्त केली. श्री योंग यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Feb 2022 - 10:28 am | चंद्रसूर्यकुमार

हा प्रकार नुसत्या ह्युंडाईनेच नाही तर पिझ्झा हट, डॉमिनोज वगैरेंनी पण केला आहे. एकाच वेळेस अनेक कंपन्यांकडून हा प्रकार होणे यामागे काहीतरी प्लॅन असावा असे दिसते. या कंपन्या बहुराष्ट्रीय आहेत आणि त्यांचा पाकिस्तानातही व्यवसाय चालतो. अशावेळी पाकिस्तानातून काहीतरी खोडसाळपणा झालेला दिसतो. आपला भारतातील बिझनेस पाकिस्तानातील बिझनेसपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे तेव्हा भारतीयांना दुखावून चालणार नाही हे न समजण्याइतक्या त्या कंपन्या खुळ्या नसाव्यात. तरीही या प्रकाराची भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटली हे चांगले झाले. तुमचा व्यवसाय वगैरे तुमच्या घरी. आमच्या देशाशी पंगा घ्यायचा नाही हे सामान्य लोकांनी उघडपणे सांगितले त्यामुळे या कंपन्यांना नाक घासत शरण यावे लागले.

असा अ‍ॅटिट्यूड आपण दाखवायलाच हवा.कोणीही येऊन आपल्याला टपलीत मारून जातो आणि आपण ते ऐकून घेतो हा प्रकार यापुढे चालणार नाही हे जगाला समजलेच पाहिजे. आणि तसे केल्यास त्याची किंमतही मोजावी लागेल हे पण जगाला समजले पाहिजे. भारतातून ह्युंडाई गाड्यांच्या काही ऑर्डर रद्द झाल्या असेही वाचले. ते कितपत खरे आहे हे माहित नाही. पण असल्यास ते खूप चांगले. हा मनमोहनसिंगांचा भारत नाही तर मोदींचा भारत आहे हे जगाला समजले तरी खूप झाले.

दुसरे म्हणजे सामान्य भारतीयांना आपल्या 'राष्ट्राविषयी' प्रेम आहे हे परत एकदा उघड झाले हे पण चांगले झाले. कारण गेल्या काही वर्षांपासून राष्ट्र म्हणजे ग्लोरिफाईड म्युनिसिपालटी वगैरे डावे विचारवंत लोक बोलत होते त्याला परत एकदा चपराक बसली हे चांगले झाले. परवा रागा पण लोकसभेत भारत हे राष्ट्र नाही वगैरे काहीतरी बरळला आणि पुरोगामी विचारजंतांनी त्याला डोक्यावरही घेतले. असल्या घाणेरड्या बांडगुळांना सामान्य भारतीय किंमत देत नाहीत हे पण जगापुढे आले हे पण चांगले झाले.

उत्तम. पण regret म्हणजे माफी नाही.

sunil kachure's picture

9 Feb 2022 - 12:38 pm | sunil kachure

भारत हे संघ राज्य च आहे .आणि भारत हे संघराज्य आहे म्हणून च त्यानी प्रगती केली आहे.
भारत संघ राज्य आहे म्हणूनच देश एकत्र आहे.
राहुल गांधी योग्य तेच बोलले आहे.
विविध ,संस्कृती,भाषा असणाऱ्या ह्या देशात केंद्रीय सरकार नी त्यांची मत लादू नयेत.
त्यांच्या वर केंद्रीय सरकार कोणतीच एक भाषा लादू नये.
एक देश एक भाषा असली धोरण देशात अशांतता निर्माण करतील.
राज्यांना जे हवं आहे तेच केंद्राने द्यावे त्यांच्यात लुडबुड करू नये.
Bjp पक्ष म्हणून वेगळेच बोलत असतो.
पंतप्रधान वेगळेच बोलत असतात.
आणि आयटी सेल वाले भलतेच काही तरी बोलत असतात
राजीव गांधी ना प्रतिउत्तर देताना आयटी सेल चे प्रमुख असेच बरळले.
त्यांना हे पण माहीत नाही.
भारतीय राज्य घटनेनं च भारत हे संघ राज्य.आहे अशी भारताची व्याख्या केली आहे.
भारताच्या पारपत्र वर ते छापलेले असतेच.

चौकस२१२'s picture

9 Feb 2022 - 1:14 pm | चौकस२१२

एक देश एक भाषा असली धोरण देशात अशांतता निर्माण करतील.
राज्यांना जे हवं आहे तेच केंद्राने द्यावे त्यांच्यात लुडबुड करू नये.

झाली परत १८८ प्रभूंची आठवण

निनाद's picture

9 Feb 2022 - 9:22 am | निनाद

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. समाजवादी पक्षाने आझम खान यांना रामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी निवडणूक प्रचारासाठी अंतरिम दिलासा मिळावा यासाठी २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भूमाफिया समाजवादी नेते आझम खान यांच्यावर ८४हून अधिक खटले दाखल आहेत आणि दोन वर्षांपासून सीतापूर तुरुंगात आहेत!

आग्या१९९०'s picture

9 Feb 2022 - 11:17 am | आग्या१९९०

बहुजनांची डोकी फिरवण्यासाठी भंपक राजकारणी राष्ट्रप्रेमाची गोळी खायला घालतात. ते बिचारे मग परदेशी पणत्या, इलेक्ट्रिक लायटिंग इत्यादी मालावर बहिष्कार घालतात. पिझ्झा खाणारे , परदेशी गाड्या वापरणारे खाऊनु पिऊन आपले राष्ट्रप्रेम चोख बजावतात. आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत केली तेव्हा किती राष्ट्रप्रेमी भारतीय अमेरिकेतील नोकऱ्या सोडून भारतात परत आले?

रात्रीचे चांदणे's picture

9 Feb 2022 - 11:42 am | रात्रीचे चांदणे

अमेरिकेत भारतातील बहुजन नौकाऱ्या करत नाहीत का?

बहुजनांची डोकी फिरवण्यासाठी भंपक राजकारणी राष्ट्रप्रेमाची गोळी खायला घालतात
या पेक्षा आपण जर " सर्व नागरिकांना .." असे म्हणले असते तर पटले असते एकेवळ
अर्थात राष्ट्रप्रेमाची , इंडिया इस इंदिरा " असल्या गोळ्या बरेच वर्षे वाटाळ्या गेलया आहेत ,, त्यामुळे सवय असावी
आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत केली तेव्हा किती राष्ट्रप्रेमी भारतीय अमेरिकेतील नोकऱ्या सोडून भारतात परत आले?

चांगला प्रश्न आहे त्याची उत्तरे देतो पटतील असे नाही पण बघा
- अमेरिका हा एक स्वतंत्र देश आहे त्यामुळे तिथे राहणाऱ्या भारतीय वंशांचं लोकांना जर अमेरिकन सरकारचे पाकीस्तान संबंधी धोरण आवडले नाही तर त्यानं तेथील लोकशाही मार्गाने फक्त आपले मत मांडता येते... आणि त्यापुढे जाऊन जे काही तेथील लोकशाही सरकार ठरवेल हे एक नागरिक म्हणून मान्य करावे लागते ,, पाकिस्तान वर बहिष्कार फक्त वयक्तिक पातळीवर ते घालू शकतात . किंवा राजकीय डम असले तर लॉबी

- अधिकृत निषेध वैगरे भारताचे सरकार करू शकते

आग्या१९९०'s picture

9 Feb 2022 - 6:51 pm | आग्या१९९०

भारतातील लोकही लोकशाही पद्धतीने निषेध व्यक्त करू शकतात, झुंडशाही करायची काय गरज आहे? आपल्या देशात गोवा सोडल्यास खाण्याचे स्वातंत्र्य नाही, संशयावरून लोकं कायदा हातात घेतात आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाते.
अधिकृत निषेध वैगरे भारताचे सरकार करू शकते
चीनचे नांव घ्यायची आपल्या पंतप्रधानांची हिंमत होत नाही.

sunil kachure's picture

9 Feb 2022 - 1:29 pm | sunil kachure

ह्यांनी उघड भारता विरुद्ध भूमिका घेतली तरी .अमेरिका ,ब्रिटन मधील उत्तम राज्य व्यवस्था आणि सू संपन्न जीवन शैली चा उपभोग घेणारे देश प्रेमी भारतीय भारताची बाजू घेणार नाहीत
ना ते तेथील ऐश आरमी जीवन सोडून .
विरोध म्हणून ते अमेरिका ,ब्रिटन सोडून भारतात येतील.
शून्य शक्यता.
उपदेश फक्त बाकी लोकांसाठी असतो.

चौकस२१२'s picture

9 Feb 2022 - 2:40 pm | चौकस२१२

विरोध म्हणून ते अमेरिका ,ब्रिटन सोडून भारतात येतील.

काय हो तुमच्य्या आयुष्यात तुम्ही राहत असलेलया देशात / राज्यात / गाव , जे सरकार आहे त्यांची एखादी भुमिका तुम्हाला आवडली नाही तर लगेच तो देश / राज्य / गाव लगेच सोडता का?
किती "पटत नाहीये" याच्यावर हा निर्णय आहे
आणि तांत्रिक दृष्ट्या जे थेतील नागरिक झालेत ( म्हणजे एन आर नाही तर पूर्ण परदेशी नागरिक ) त्यांना ( तांत्रिक दृष्ट्या) भारत काय किंवा इतर देश काय सारखेच असायला पाहिजेत , खाजगीत तुम्ही काय करायायचे ते करा

अर्थात " हे परदेशात गेलेले भरतोय ना फक्त अप्पलपोटी स्वार्थी पैशायचंय च फक्त मागविले गुलाम अशी भावना " असेल तर तुमचे चालुद्या

आग्या१९९०'s picture

9 Feb 2022 - 12:00 pm | आग्या१९९०

अमेरिकेत भारतातील बहुजन नौकाऱ्या करत नाहीत का?
अक्कल आली की सगळेच राष्ट्रप्रेम मायदेशात सोडून परदेशात जातात.

रात्रीचे चांदणे's picture

9 Feb 2022 - 12:20 pm | रात्रीचे चांदणे

म्हणजे जे परदेशात जातात ते राष्ट्रप्रेमी नसतात तर?

प्रसाद_१९८२'s picture

9 Feb 2022 - 12:09 pm | प्रसाद_१९८२

'आपला धर्म घरातच ठेऊन बाहेर पडावे' असा सल्ला, हिंदुच्या सणावारांना व प्रथांबाबत देणारे तथाकथित फुरोगामी, कर्नाटकातील हुबळी हिजाब प्रकरणात मात्र मुग गिळून गप्प आहेत. वर या शांतीदूतांना हिजाब घालुनच शाळा-कॉलेजात यायची खाज असेल तर त्या सरळ मदरशात का जात नाहीत.

'पहले हिजाब बादमे किताब' असे म्हणणार्‍या या शांतीदूताना शिक्षणात किती रस आहे ते या घटनेवरुन दिसतच आहे.

हिजाब वादा मुळे देशाचा काही फायदा होईल काही ठाम निर्णय होतील ह्याची शून्य खात्री.
हीजाब मुळे मुस्लिम स्त्रियांना मुस्लिम धर्म इज्जत देईल शून्य शक्यता.
हिजब बंदी केली तर हिंदू ना काही फायदा होईल शून्य शक्यता.
एक मात्र सत्य आहे .
हिंदुत्व वादी,मुस्लिम वादी,पुरोगामी , डावे ह्या सर्व राजकीय पक्षांची मात्र ह्या प्रकरणात चंगळ आहे..
सर्वांची व्होट बँक मजबूत होईल
भारत बुडाला तरी चालेल पण आमचा राजकीय फायदा झाला पाहिजे.
हीच सर्व राजकीय पक्षांची धोरणे आहेत.
मध्यम मार्ग स्वीकारून
मीडिया ल बाहेर ठेवून.
सर्व जण मिळून योग्य मार्ग काढू
अशी भाषा एका पण राजकीय पक्षांची नाही.
सामान्य लोकांनी ह्या राजकीय खेळत कोणाची डोकी फोडू नयेत.
फक्त मजा बघावी.

sunil kachure's picture

9 Feb 2022 - 1:22 pm | sunil kachure

हिजाब वरून जे त्या मुस्लिम मुली वर अन्याय होत आहे असे रडगाणे गात आहेत
ह्या मधी देशातील आणि विदेशातील सर्व ढोंगी आहेत.
मुस्लिम महिला बुरखा किंवा हिजाव स्व मर्जी नी वापरतात .
हेच मुळात साफ खोटे आहे.
त्यांच्या वर अनेक धार्मिक बंदन लादली आहेत.
स्त्रिया ना मुस्लिम धर्मात किंमत नाही ना त्यांच्या मताला कोण विचारात.
अन्याय होत आहे त्यांच्या धर्मात स्त्रियांवर.
कोणताच ढोंगी,
पुरोगामी,मुस्लिम वादी, ह्यावर एक शब्द बोलत नाहीत.
स्त्री मुक्ती वाले हिंदू धर्माच्या स्त्रियांना त्यांचे मुक्ती चे दिव्य ज्ञान देत अस्तात.
आणि आपल्या हिंदू स्त्रिया त्यांच्या पाठी आंधळ्या सारख्या धावत असतात
मुस्लिम स्त्री ला स्त्री मुक्ती वाले त्यांचे मुक्ति चे दिव्य ज्ञान का देत नाहीत.

प्रसाद_१९८२'s picture

9 Feb 2022 - 4:43 pm | प्रसाद_१९८२

1

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Feb 2022 - 6:30 pm | चंद्रसूर्यकुमार

देशाची वाटचाल यादवी युध्दाकडे चालू आहे असे परखड मत लालू यादवने म्हटले आहे. https://maharashtratimes.com/india-news/karnataka-hijab-row-rjd-chief-la...

या हलकटाने वर्षानुवर्षे बिहारची जितकी वाट लावायची तितकी लावली, पैसे खा खा खाल्ले, सत्तेचा दर्प आणि अहंकार जितका लालूत होता तितका क्वचितच इतर कोणा राज्यकर्त्यामध्ये बघायला मिळाला असेल. आणि असला माणूस अक्कल पाजळत आहे. थर्डक्लास गुड फॉर नथिंग मनुष्य.

रात्रीचे चांदणे's picture

9 Feb 2022 - 6:45 pm | रात्रीचे चांदणे

मुळात काही लोकांची ईच्छाच आहे की देश यादवी युध्दाकडे जावा म्हणजे मोदींना दोष देऊन परत सत्तेत बसता येईल, ग्रेटा ला टूलकिट ह्यासाठीच तयार करून दिले असेल.

sunil kachure's picture

9 Feb 2022 - 7:40 pm | sunil kachure

बिहार ची काळजी फक्त लालु नी करावी.देश याढवी युद्धात गेला तर .
बिहारी नोकरी,शिक्षण, मजुरी करायला कुठे जातील.
बिहार तर ना शिक्षण देवू शकतं, ना नोकऱ्या देवू शकत . ना रोजगार देवू शकत.

सुक्या's picture

9 Feb 2022 - 10:58 pm | सुक्या

https://fortune.com/2022/02/04/india-elon-musk-modi-no-special-tax-break...

ही अजुन एक मस्त बातमी. एलोन मस्क भारतात कार विकायला तयार आहे पण बनवणार मात्र चीन मधे; वरुन मला टॅक्स मधे सवलत द्या वगेरे वगेरे मागणी. हे सरकार अगदी मस्त काम करते आहे हा याचा पुरावा ... भारतात कार विकायची असेल तर इथेच बनवावी लागेल हे त्याला कळले आहे पण उगाच प्रेशर टॅक्टीस चालु आहे.

बाकी ... मागे त्याने चिवचिवाट केला तेव्हा "आमच्या कडे या आमच्या कडे या" असे आपले बरेच राज्ये बोलत होती तेव्हा त्यांना हे माहीत नव्हते काय? मस्क फक्त दुकान चालु करायचे म्हणतो आहे कारखाना नाही हे त्यांना आमंत्रण देताना माहीत नव्हते काय?

भारताचे केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी इलॉन मस्कच्या अतार्किक मागण्या पूर्ण करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. कार बनवणाऱ्या कंपनीला भारतात कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत कोणतीही सवलत मिळणार नाही , असे त्यांनी स्पष्ट केले .
इलॉन मस्क यांना त्यांच्या चीनमध्ये बनवलेल्या कार विकण्यासाठी भारतीय बाजारपेठेचा वापर करायचा आहे. यात ही रोचक हे आहे की यासाठी प्रयत्न काँग्रेस चे सदस्य करत आहेत. लोकसभेत काँग्रेस सदस्य मोदी सरकारला विचारत आहेत की ते टेस्लाला त्यांच्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत विकण्यासाठी मदत का करत नाहीत. भारतीय बाजारपेठेत टेस्ला स्वस्त करण्यासाठी काँग्रेसने भारत सरकारला खास टेस्लासाठी आयात शुल्क कमी करण्यास सांगितले आहे.
यावर भारताचे केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी काँग्रेस आणि इलॉन मस्कच्या अतार्किक मागण्या पूर्ण करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. मोदी सरकारच्या काळात चीनमध्ये उत्पादन आणि भारतात विक्री करणे शक्य नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.

मस्क ला चीनमध्ये फार जास्त रस आहे. एलोन मस्क यांनी चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनला ५० लाख युआन दिले आहेत.

काँग्रेसला चीन मध्ये बनवलेल्या गाड्या भारतात विकण्यात इतका रस का असावा बरे?
यात भारताचा काय फायदा त्यांना अपेक्षित असावा?

sunil kachure's picture

10 Feb 2022 - 1:48 pm | sunil kachure

भारतात उत्पादन करा.
पण कच्चा माल भारतातील च वापरा
ही पण अट हवी.
कच्चा माल पुरवण्याची जबाबदारी अडाणी अंबानी ह्यांना नसावी.
लघु उद्योगांना ती जबाबदारी द्यावी
चीन मध्ये उत्पादन करून भारत सरकार चे टॅक्स भरून टेस्ला भारतात विक्री करू शकते.
भारत त्यांना रोखू शकत नाही..
जागतिक व्यापार करार तसा अधिकार देत नाही
तरी रोखले तर युरोपियन राष्ट्र चढून बसतील.
.मोदी सरकार ते करूच शकणार नाही.
उत्पादन इथे नाही तर इथे विक्री नाही हा निर्णय भारत सरकार घेवूच शकत नाही.
उगाच फेकाफेक करू नका

सुबोध खरे's picture

10 Feb 2022 - 8:19 pm | सुबोध खरे

भारतात कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत कोणतीही सवलत मिळणार नाही

उत्पादन इथे नाही तर इथे विक्री नाही हा निर्णय भारत सरकार घेवूच शकत नाही.

असे त्यांनी कुठे म्हटलेले आहे?

उगाच फेकाफेक करू नका

दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी जरा नीट वाचत चला

निनाद's picture

11 Feb 2022 - 4:56 am | निनाद

खरे सर, धन्यवाद!
भारतात कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत कोणतीही सवलत मिळणार नाही , असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतात उत्पादनही करायचे नाही पण सवलत मात्र मिळवायची असे होऊ शकत नाही असा मुद्दा आहे. मी तो वर ठळक पण केला आहे. यात काही फेकाफेकी दिसत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. तुम्ही मंत्र्यांना याचा जाब विचारू शकता - किंवा तुमच्या वतीने तो जाब काँग्रेस ने आधीच विचारला आहे. आणि त्यालाच हे उत्तर दिले आहे. हे उत्तर त्यांनी फेकले असेल तर असेल ती फकाफकी!

खरे सर, ही एगदी टिपिकल मुद्दा भरकटवण्याची पद्धती आहे. या आधी whataboutism वापरून झाले आहे. त्यात युक्तिवादाचे थेट खंडन किंवा खंडन न करता ढोंगीपणाचा आरोप करून प्रतिस्पर्ध्याची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो किंवा भलताच मुद्दा काढला जातो.

आता दुसरी पद्धत चालली आहे - पण याला काय म्हणतात ते माहित नाही. ते एक पुस्तक /हँडबुक होते ना डाव्यांचे की आंदोलने कशी करावीत आणि समोरच्याला नामोहरम कसे करावे यावरचे (त्याचे नाव आठवत नाहीये आत्ता मला) हे सगळे प्रकार त्यातलेच आहेत.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Feb 2022 - 9:30 am | रावसाहेब चिंगभूतकर

तुम्हाला नाही लिहिलं हो त्यांनी. तो मध्ये 188 प्रभूंचा प्रतिसाद दिसतोय का तुम्हाला? त्यांना लिहिलं आहे.

कॉमी's picture

10 Feb 2022 - 8:29 pm | कॉमी

कच्चा माल पुरवण्याची जबाबदारी अडाणी अंबानी ह्यांना नसावी.
लघु उद्योगांना ती जबाबदारी द्यावी

कोण ठरवत असत हो, कोण कुणाला काय माल द्यायचा ते ? सरकार ठरवते का हो ?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Feb 2022 - 9:32 am | रावसाहेब चिंगभूतकर

त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत बसाल तर मूळ मुद्दा राहील बाजूला. पूर्वी "टेंडर काढलेले आहे, आताच अप्लाय करा, नंतर अंबानी अदानी ला मिळाले म्हणू नका" प्रकारचा एक विनोद होता. तोही आता जुना झाला.

सुखीमाणूस's picture

10 Feb 2022 - 11:30 am | सुखीमाणूस
रात्रीचे चांदणे's picture

10 Feb 2022 - 11:44 am | रात्रीचे चांदणे

हिजाब प्रकरणाला JNU, सोलापूर, बीड, कोलकता आणि पाकिस्तान मधूनही पाठिंबा मिळत आहे. कपडे न घातलेला जैन विद्यार्थी शाळेत चालेल का?

कपडे न घातलेला जैन विद्यार्थी शाळेत चालेल का?.....
.
काहीही. अगदी काईच्याकाई लॉजिक.
एकतर जैना मध्ये फक्त दिगंबर संप्रदायाचे आणि ते ही दीक्षा घेतलेले साधू दिगंबर राहतात. तेही शिक्षणानंतर किंवा शिक्षणा ऐवजी साधुत्व स्विकारतात. ते काही दिगंबर राहण्याचा समस्त जैन धर्मीय सोडा दिगंबर जैन लोकांना पण उपदेश करत नाहीत. त्यामुळे कुणी जैन विद्यार्थ्याने सामाजिक जीवनात नग्नतेचा आग्रह धरण्यात मुद्दाच नाही. तसे होत ही नाही. धार्मिक प्रथेनुसार नग्नता तर हिंदू नागा साधू पण पाळतात. त्यांचा आधार घेऊन कुणी हिंदू वागेल का..
हिजाब, कृपान किंवा गंध वगैरे सर्वसामान्याच्या प्रथा किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी धार्मिक रीवाज आहेत. तो विषय वेगळा आहे.

रात्रीचे चांदणे's picture

10 Feb 2022 - 5:04 pm | रात्रीचे चांदणे

लॉजिक काईच्याकाई आहे हे मान्य आहे म्हणजे सध्यातरी नक्कीच आहे. पण मूळ मुद्दा आहे की शाळेमध्ये धार्मिक करणं देऊन एकाला सवलत दिली की दुसरापण सवलतिची मागणी करू शकतो. एखाद्याला शिक्षण घेत असतानाच साधुत्व घायची हुक्की आली तर काय करणार? आज हिजबला परवानगी दिली की उद्या हिंदू भगवी उपरणी घालून येतील तर जय भीमवाले निळी उपरणी घालतील.

सुबोध खरे's picture

11 Feb 2022 - 9:32 am | सुबोध खरे

मूळ मुद्दा दिगंबर पंथाच्या जैन मुलाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्यासाठी शालेत किंवा कॉलेजात विवस्त्र येण्याचा अधिकार असावा असे म्हटले तर काय हा आहे.
त्याने रोज कपडे घातलेले असले तरी चालेल.

बाहेर हिजाब घालायचा नाही पण केवळ धार्मिक स्वातंत्र्यासाठी हिजाब घालायचा हक्क पाहिजे.

हा मुद्दा येथे थांबणार नाही.

उद्या कॉलेजात नमाज पढण्यासाठी सुटी हवी किंवा नमाज पढण्यासाठी वेगळी खोली उपलब्ध करून द्यावी याची पण मागणी येऊ लागेल.

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.

घटनात्मक हक्क आणि मूलभूत हक्क यातील फरक समजून घ्या.

मूलभूत हक्क हा कधीही डावलला जाऊ शकत नाही.

पण घटनात्मक हक्काला मुरड घालता येऊ शकते. याला reasonable restriction म्हणतात.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Feb 2022 - 9:35 am | रावसाहेब चिंगभूतकर

मुख्य म्हणजे माझ्या पाल्याला शाळेत 3 वेळा भजन करायचा अधिकार पण मिळायला हवा. 180 डेसिबल च्या आवाजाने. आम्ही करतो.

कर्नाटक हिजाब विवाद हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचे समोर येते आहे. आंतरराष्ट्रीय टूलकिट बनवले गेले असल्याची शक्यता आहे. कारण फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बाने भारतीय महाविद्यालयांमध्ये हिजाबला समर्थन देणारी पोस्ट शेअर केली आहे.

मुस्लिम मुलींच्या मागणीला विरोध करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. यात काही मुले मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यासाठी त्रास देत असल्याचा दावा केला होता. पोग्बाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेला एक मिनिटाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर “इस्लाम इज माय दीन” या अतिरेकी इस्लामी पेजने पोस्ट केला होता.

भारतीय लोकांच्या अस्तित्त्वात नसलेल्या समस्या वाढवण्यासाठी परदेशी घटकांचा वापर केला जातो आहे.

निनाद's picture

11 Feb 2022 - 5:25 am | निनाद

हे ठरवून केलेले काम आहे असे विजय पटेल यांनी दाखवून दिले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील होशंगाबाद जिल्ह्याचे नर्मदापुरम असे नामकरण करण्यास मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील बबई शहराचे नाव माखन नगर असे नामवंत हिंदी कवी आणि पत्रकार माखनलाल चतुर्वेदी यांच्या नावावर करण्यास मान्यता दिली आहे.
"मध्य प्रदेश सरकारने होशंगाबादचे नाव बदलून नर्मदापुरम आणि बाबईचे नाव बदलून माखन नगर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता, जो मंजूर झाला आहे," श्री चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

शहराला पूर्वी नर्मदा नदीच्या नावावरून नर्मदापूर असे म्हणत असत. नंतर माळवा सल्तनतचा क्रूर आक्रमक शासक होशंग शाह घोरी याच्या नावावरून हे नाव बदलून होशंगाबाद करण्यात आले. त्याला अल्प खान म्हणून ओळखले जात असे. खरे तर याचे अफ्गाणी वडील दिलावर खान घोरी दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्या दरबारात कामाला होते. पुढे याला तात्कलिक जमिनदारी मिळाली. पण त्याने याचा फायदा घेऊन आपलीच एक लहान मुस्लिम सल्तनत काढली. याने येथली र्मदा नदीच्या तीरावरची अनेक प्राचीन मंदिरे पाडली होती. भोजशालाही याच मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केली होती.

इतिहासाच्या एका क्रूर आणि काळ्या कालखंडातली ही चूक सुधारून आता इतिहास पूर्ववत करण्यात आला आहे.

हिजाबचा हिसाब 2024ला करणार, कर्नाटकातील हिजाब वादाचे सोलापुरात पडसाद; चक्काजाम

https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/hijab-controversy-...

कालच एका साम्यवादी मुली बरोबर गप्पा मारल्या. कधीकधी, साम्यवादी लोकांबरोबर टाईमपास करायला मजा येते...

तिच्या मते, धर्म घरांत आणि एक समान नागरी कायदा बाहेर ....

कधी नव्हे ते, ह्या बाबतीत तरी, तिचे आणि माझे एकमत झाले ...

मनी लाँड्रिंग प्रकरणात पत्रकार राणा अयुब यांच्यावर ईडीची कारवाई; १.७७ कोटींची संपत्ती जप्त

https://www.loksatta.com/mumbai/ed-takes-action-against-journalist-rana-...

चौथा स्तंभ, सडत चाललेला वाटतो.

दिगू कधीच वेडा झाला....

https://www.sarkarnama.in/desh/allegation-on-sps-ex-ministers-son-murder...

माझा भाजपवर विश्र्वास दृढ होत चालला आहे...

https://zeenews.india.com/marathi/maharashtra/bhangarwala-cheted-rs-200-...

हे केंद्र सरकार, योग्य वेळी चांगले निर्णय घेत आहे...

सोनिया गांधींनी २०२० पासून भरलं नाही बंगल्याचं भाडं; १० रुपये पाठवत भाजपा नेत्याने सुरु केली वर्गणी मोहीम

https://www.loksatta.com/desh-videsh/rent-of-congress-headquarters-sonia...

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत.... हे माझे वैयक्तिक मत आहे ...

मुक्त विहारि's picture

11 Feb 2022 - 3:30 pm | मुक्त विहारि

करमुसे मारहाण प्रकरणात देखील, पोलीसांवर कारवाई झाली

साधू हत्याकांड झाले आणि कारवाई पोलीसांवर झाली

आणि नुकतीच किरीट सोमैय्या यांना मारहाण झाली आणि पोलीसांवर कारवाईची टांगती तलवार ..... (https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/centre-team-to-visit-...)

ह्या राजवटीत, रक्षकांवरच कारवाई करण्याची वेळ का येत आहे?

दोष नक्की कुणाचा?

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार; ईडीला पाठवलं पत्र

https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/mumbai/sachin-vaze...

ह्या राजवटीत नक्की काय सुरू आहे?