ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग २

निनाद's picture
निनाद in राजकारण
7 Feb 2022 - 4:03 am

मद्रास उच्च न्यायालयाने हिंदू याचिकाकर्त्याला चर्च बाबत सहिष्णुता दाखवण्याचे निर्देश दिले आहेत.
तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील नेदुविलाई येथे नव्याने बांधलेल्या चर्चमध्ये लाऊडस्पीकरच्या वापराबाबत याचिकाकर्त्याने रात्रंदिवस लाऊडस्पीकरच्या वापरामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली होती. हे मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले आहे!

सी किशोर म्हणून ओळखल्या जाणार्‍या याचिकाकर्त्याने मद्रास उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली. त्यांनी कन्याकुमारीच्या जिल्हाधिकार्‍यांनी वाई थंगराज याला चर्च बांधण्यासाठी दिलेल्या परवानगीला आव्हान दिले. थंगराज हा दिवसा आणि रात्री ध्वनिक्षेपकाद्वारे प्रार्थना करून उपद्रव निर्माण करत असल्याची तक्रार त्यांनी केली. चर्चने आपल्या घराच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता आणि लाऊडस्पीकर आणि संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली होती.
--
अवांतरः
सध्या मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. स्टॅलिन यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आहे.
द्रमुक पक्षाची स्वतःची मते आहेत जी मुळात पेरियार विचारसरणीने बनलेली आहेत. आणि ही विचारसरणीने प्रत्येक हिंदू श्रद्धा जसे की देव, मंदिरे, हिंदू संस्कृती आणि परंपरा इत्यादींना विरोध करते. या विरोधासाठीच करण्यासाठी द्रमुक पक्षाची स्थापन केली गेली होती. २०१४ पासून मात्र द्रविडी पक्षाचे समर्थक हिंदूना विरोध करण्यासाठी पक्षाची स्थापना करण्यात आली होती हे लपवण्याचा प्रयत्न करतात असे दिसून येते.
पक्षाचे अध्यक्ष एमके स्टॅलिन हे घोषित नास्तिक आहेत, द्रमुक पक्ष हिंदूविरोधी आहे असे अनेकदा दिसून आले आहे. त्यांचे दिवंगत वडील आणि द्रमुकचे माजी प्रमुख एम. करुणानिधी हेही नास्तिक होते.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Feb 2022 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली

अश्या “खुळखुळ्यांमुळेच बंगालात हातात खुळखुळा मिळाला. आता पंजाब, गोवा नी युपीत मिळेल.

प्रदीप's picture

8 Feb 2022 - 10:31 pm | प्रदीप

अशी तुमची गत आहे.

sunil kachure's picture

8 Feb 2022 - 7:22 pm | sunil kachure

देशाला पोसानारा,,, ,सर्व देशाचा बोजा वाहणारा,जिथे देशाचे राज्य करते निवडून येवून फेकाफेकी करत असतात त्या राज्यातील लोकांना आसरा आणि रोजगार देणारा महाराष्ट्र आहे
त्याच्या वर टीका करायच्या अगोदर .
गंगा नदीत वाहणाऱ्या प्रेता ची दाखल पंतप्रधान ह्यांनी घेतली पाहिजे होती
गंगा नदीच्या किनारी प्रेताचा ठीक लागला होता तो. मोदी ना का दिसत नाही..

प्रदीप's picture

8 Feb 2022 - 10:29 pm | प्रदीप

पाश्चिमात्य, विकसित देशांना (यू. एस., यू. के, ई. यू.) इतर देशांच्या, विशेषतः आशियाई देशांच्या कारभारांत नाक खुपसायला, व स्वतःचा अ‍ॅजेंडा पुढे करावयाला, काही बुजगावणी लागतात. सध्या तशी दोन अगदी जोमाने कार्यरत आहेत- एक मलाला, दुसरी ग्रेटा.

ह्यांतले पहिले बुजगावणे आज कर्नाटकच्या सध्याच्या, मुद्दाम ढवळून काढलेल्या हिजाबच्या मुद्द्यावर आज बोलते झाले.

Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying. Objectification of women persists — for wearing less or more. Indian leaders must stop the marginalisation of Muslim women.

ऑब्जेक्टिफिकेशन म्हणजे काय म्हणायचे आहे समजले नाही, पण इतर बाबतीत (मलालाशी) सहमत आहे.

हे प्रकरण मुद्दाम ढवळून काढले आहे याबाबत सुद्धा सहमत.

प्रदीप's picture

8 Feb 2022 - 11:04 pm | प्रदीप

१. मुलींना शाळेत हिजाब वापरण्यास परवानगी दिली नाही, हे भीतीदायक (horrifying) आहे,
२. भारतीय पुढार्‍यांनी (पक्षी: भाजपच्या, सरकारांत असलेल्या पुढार्‍यांनी) मुस्लिम स्त्रीयांचे अलगीकरण चालवले आहे.

ह्या विधानांशी तुम्ही सहमत आहांत?

Objectification म्हणजे, मला समजते त्यानुसार, स्त्रीयांना (पुरुषांच्या हातांतले) बाहुले म्हणून वागवणे, असे आहे.

१. अगदी तसेच्या तसे नाही, युनिफॉर्म सक्ती पेक्षा घटना मालिका आणि त्यानंतरचे पडसाद भीतीदायक वाटले. एका मुलीच्या आजूबाजूला अनेक भगवे स्कार्फ घातलेले तरुण जाऊन जय श्री राम म्हणत होते, त्यावर ती मुलगी अल्ला हु अकबर म्हणून प्रत्युत्तर देत होती, तो व्हिडीओ चांगलाच भीतीदायक वाटला. एका ग्रुपने भगवा झेंडा फडकवला. (त्यानंतर मुस्लिम जमाव शाळेवर का कोलेजवर दगडफेक करत होते, काही लोकांना हत्यारांसह अटक केली हे भीतीदायकच वाटले. आणि कोणत्याही व्हिडिओची सत्यासत्यता काय माहित नाहीये, पण सध्या तरी खरे असावेत असे वाटते.)

२. Marhinalisation- treatment of a person, group, or concept as insignificant or peripheral.
या विद्यार्थिनींबाबत तसे झाले आहे असे वाटते. इन जनरल तसे म्हणणे खूप लोडेड होईल. स्पेसिफिक राहिलेले बरे. इतर ठिकाणी जिथे टोकाचा धार्मिक आग्रह असतो तिथे कन्सेशन नेहमी मिळते- उदा. पगडी. आता कर्नाटकात पगडी घालणारे कमी आहेत हे सोडा, भारतभरात शिखांना हे कन्सेशन मिळत आले आहे, हा मुद्दा आहे. या मुलींचा आग्रह सुद्धा बहुदा डोके झाकण्यासाठीच आहे.

भारतभरात शिखांना हे कन्सेशन मिळत आले आहे, हा मुद्दा आहे. या मुलींचा आग्रह सुद्धा बहुदा डोके झाकण्यासाठीच आहे.
दोन्ही मध्ये सूक्ष्म फरक आहे
पण तो समजून घ्यायचा नसेल तर बोलन खुंटल
हिजाब कशाला चला बुरखा पण असुदे तो सुद्धा अफगाणी स्टाईल

काय फरक आहे ? धार्मिक फरक नाही, प्रॅक्टिकली काय फरक आहे ?

१. तसाच विडिओ दुसर्‍या बाजुचाही आहे. एका मुलावर बुरखाधारी मुली धावुन जात होत्या. माझ्या माहीतीने रिकाम्या पोलवर भगवा फडकवला, तिरंगा काढुन नव्हे. दोन्हीमध्ये खुप फरक आहे.
२. Marhinalisation- treatment of a person, group, or concept as insignificant or peripheral. जर समानतेने थोडा बदल करायला लागत असेल तर तो त्यांनी घ्यायलाच हवा. नाहीतर फायदा असेल तर समानता आणि इतर वेळी खास वागणुक. जर मुलींना ते आवडत नसेल तर मुस्लीम शाळेत जायला कोणती हरकत आहे.

धावून जात होत्या ? मी पाहिले आहे त्या नुसार त्या नुसत्या उभ्या आहेत. तिरंगा काढून फडकावला असे मी म्हणलेच नाहीये. पण या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांनी पडायचंच काय कारण होतं ? त्यांचा संबंध येतोच कुठे ? अर्थात मुक्त समाज आहे, पडायचे त्यात पडा. पण एकंदरीत सगळं प्रकरण मुस्लिम मुलींना त्रास द्यायसाठी आहे.

मुस्लिम शाळेत का जावे? शाळांमध्ये प्रार्थना, ओंकार, गायत्री मंत्र इत्यादी म्हणवून घेतातच (किमानपक्षी आमच्या तरी घ्यायचे.) गणपती बसवायचे. ईद साजरी करत नाही म्हणून कोणी दंगा केल्याचं समरणात नाही.

तसेही तुम्हाला वाटते, आम्हाला नाही. त्याअर्थांने ती मुलेही त्या बुरखाधारी मुलीला काही त्रास देत नव्हती.

धावून जात होत्या ? मी पाहिले आहे त्या नुसार त्या नुसत्या उभ्या आहेत.

धन्यवाद. भगवा म्हणजे हिंदुत्व हे मान्य केलेच तुम्ही. त्या अर्थाने शिवाजी महाराज, पेशवे, आणि इतर हिंदु राजे हे हे पण हिंदुत्ववालेच होते.

तिरंगा काढून फडकावला असे मी म्हणलेच नाहीये. पण या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांनी पडायचंच काय कारण होतं ? त्यांचा संबंध येतोच कुठे ?

हिंदुत्ववाले पण समाजाचा भाग आहेत.

अर्थात मुक्त समाज आहे, पडायचे त्यात पडा. पण एकंदरीत सगळं प्रकरण मुस्लिम मुलींना त्रास द्यायसाठी आहे.

ज्या गतीचे तथाकथीत पुरोगामी चालले आहेत, त्या गतीने तुमची इच्छा लवकरच पुर्ण होईल.

ईद साजरी करत नाही म्हणून कोणी दंगा केल्याचं समरणात नाही.

मी पाहिले आहे त्या नुसार त्या नुसत्या उभ्या आहेत. तिरंगा काढून फडकावला असे मी म्हणलेच नाहीये. पण या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांनी पडायचंच काय कारण होतं ?
मुस्लिम शाळेत का जावे? शाळांमध्ये प्रार्थना, ओंकार, गायत्री मंत्र इत्यादी म्हणवून घेतातच (किमानपक्षी आमच्या तरी घ्यायचे.) गणपती बसवायचे. ईद साजरी करत नाही म्हणून कोणी दंगा केल्याचं समरणात नाही.

प्रदीप's picture

9 Feb 2022 - 3:29 pm | प्रदीप

१. बाई म्हणाली "Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying". घटनाक्रम वगैरे तुम्ही आता त्यांत आणताय. बाईचे म्हणणे, शाळेने असे काही करावयास रोखणे, ह्याबद्दल आहे.

२. बाई म्हणते "Objectification of women persists — for wearing less or more". तर त्यांत पुन्हा तुम्ही दर्शवताय त्या घटनेचा काहीही संबंध तिच्या म्हणण्यांत नाही.

घटनाक्रमाची सुरूवात कुठून झाली? मग पुढे हिंदू मुलामुलींनी जे काही उत्स्फूर्तपणे केले, ती रिअ‍ॅक्शन होती, हे उघड आहे. तुम्ही निर्देशीलेल्या घटनेत, त्या मुलीला अगदी खात्री असणार, की आपल्यावर शारीरीक हल्ला होणार नाही तेव्हा ती तिथे ठाम उभी होती. पण तुम्ही अशी एक घटना दाखवलीत, त्याच्या बिलकूल विरूद्ध बाजूच्या अनेक घटना दर्शवता येतील - भारत, पाकिस्तान व बांगलादेशांतल्या. त्यांतील बहुतांश घटनांत हिंदूंना मारहाण झाली, त्यांच्या घरांवर/ मंदिरांवर हल्ले झाले, अनेक प्रसंगी हिंदूंचे मुडदेही पडले. ते सर्व भयावह होते व आहे. पण इथे आपण मलालाच्या त्या स्पेसिफिक वक्तव्याविषयी बोलत आहोत.

घटनाक्रम सोडून मी त्या वक्तव्याचा विचार करूच शकत नाही. मलाला युसुफझाई निर्वात पोकळीतून कुठे बोलतिये ?
शारीरिक हल्ला झाल्यावरच गोष्टी वाईट असतात असे कुठे असते खरं ? हिंदू मुलामुलींनी दिलेली 'उत्स्फूर्त' रिऍक्शन अत्यंत द्वेषाच्या भूमिकेतून आलीये असे मलातरी वाटले.
बाकी, हिंदू तरुण तरुणींची प्रतिक्रिया सोडून, हिजाब असल्याने मुलींना शाळेत न घेणे आणि त्यांना वेगळे बसवणे या गोष्टी मला आवडल्या नाहीचेत. आता त्या "horrifying" आहेत का नाहीत हे बोलणे माझ्यासाठी फक्त semantics होईल.

प्रदीप's picture

9 Feb 2022 - 7:27 pm | प्रदीप

मलालाला व्यवस्थित विचार करून काही म्हणता येते, ह्यावर माझा विश्वास नाही. तिचे ट्वीट पुन्हा एकदा तपासा:

“College is forcing us to choose between studies and the hijab”.

Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying. Objectification of women persists — for wearing less or more. Indian leaders must stop the marginalisation of Muslim women.

इथे कुठलाही, तुम्ही वर्णन करताहात, तो तपशिलवार घटनाक्रम तिच्या मनांत आहे, असे दिसून येत नाही.

"Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying" एव्हढेच.

आणि मग पुढे, मूळ विषयाशी असंबंद्ध टिपण्णी (जे बोलणे, तिच्या सध्याच्या स्टेटससाठी जरूरीचे आहे)--- स्त्रीयांकडे केवळ एक (उपभोग्य) वस्तू म्हणून वापर, वगैरे वगैरे. तेव्हा vacuous Malala thinks in vacuum, talks in vacuum.

मलाला ही बोलकी बाहुली आहे. तिला पिन मिळाली की बोलते. बाकी तिच्या स्वतःच्या देशात काय चालु आहे यावर ती गच्च डोळे बंद करुन बसते. थोड्या दिवसात रिहाना बाई व ग्रेट मिया बाई पन पैसे मिळाले की बोलतील. "नो हिजाब नो स्कुल". शिक्षण गेलं चुलीत तर जौ दे. त्याने काय पोट भरणार आहे का?

sunil kachure's picture

8 Feb 2022 - 11:15 pm | sunil kachure

शाळेचा जी ड्रेस कोड आहे तो सर्वांनी पाळावा.
शाळेत धर्म कशाला हवा
इंग्रजी शाळेत हिंदू मुलींना बांगड्या आणि टिकली लावायला ड्रेस कोड च्या नावा खाली.
रोखले जाते.
तेव्हा हिंदू च्या भावना दुखावल्या गेल्या अशी बोंब जागतिक स्तरावर मारली जात नाही.

चौकस२१२'s picture

9 Feb 2022 - 6:38 am | चौकस२१२

marginalisation of Muslim women.
हो हो हो ( म्हणजे सांता क्लाउस जसा पोट धरून हासतो तसे )

या मलाला ला तिच्याच धर्मबंधूंनी marginali केलं होते हे ती विसरलेली दिसती आहे !

चला आता आदरणीय मिया खलिफा आणि आदरणीय थुबर्ग काय बोलतील त्याची आतुरतेने वाट पाहुयात

कॉमी's picture

9 Feb 2022 - 7:05 am | कॉमी

या मलाला ला तिच्याच धर्मबंधूंनी marginali केलं होते हे ती विसरलेली दिसती आहे !

हा निष्कर्ष कुठून काढलात ?

मलाला जेवहा मुस्लिम मूलिनच्या शिक्षणाबद्दल बोलली थोटी तेव्हा तिला पाकिस्तानी तालिबान्यांनी गप्प करायाचा प्रयतन केला होता, गोळी घालून हे विसरलात का
आता तीच पुरोगामी मलाला मुस्लिम महिलांना एक प्रकारच्या बंधनात ठेवणाऱ्या "हिजाब " ( बुरख्या पेक्षा सौम असला तरी ) चा पुरस्कार करीत आहे हा मोठा विरोधाभास नाही का ? या अर्थाने
दुतोंडी

विरोधाभास कसलाच नाहीये. स्वतःच्या मर्जीने हिजाब घालायचा असेल तर जबरदस्तीने रोखण्याचा विरोध आहे. मुस्लिम मुलींना शिक्षण मिळावं म्हणून गोळी खाणारी मुलगी "हिजाब घालून शाळेत प्रवेश मिळणार नाही" यावर मौन राखून बसली असती तर खरा विरोधाभास झाला असता.

पण जर व्यक्तिगत निर्णय, या संकल्पनेवर विश्वास नसेल तर विरोधाभास वाटू शकतो. हिजाब घालू नये असे मत असले तरी हिजाब वापरण्यावर बंदी नको असे वाटू शकते हे समजत नसेल तर समजून घ्या.

आधी सुद्धा मलालाची मागणी मुलींच्या शिक्षण घेण्याच्या निर्णयाचा आदर व्हावा हीच होती आणि आता सुद्धा मुलींच्या हिजाब वापरण्याच्या निर्णयाचा आदर व्हावा हीच आहे. शून्य विरोधाभास.

आग्या१९९०'s picture

9 Feb 2022 - 11:26 am | आग्या१९९०

मुलींनी कॉलेजमध्ये तोकडे कपडे घातले तरी त्याला विरोध करायचा आणि संपूर्ण शरीर झाकले तरी विरोध करायचा. त्यापेक्षा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन का बदलत नाहीत? ते अधिक सोपे असावे.

कॉमी's picture

9 Feb 2022 - 12:02 pm | कॉमी

सहमत.

प्रदीप's picture

9 Feb 2022 - 3:49 pm | प्रदीप

आग्यांच्या विषयांतराच्या करणार्‍या प्रतिसादावर तुमची सहमती थोडी खटकली.

तर मूळ मुद्दा, मुस्लिम स्त्रीयांना, घरांत व सार्वजनिक स्थानांत,हिजाब वापरण्यापासून भारतांत तरी कुणी सरसकट रोखलेले नाही (अवांतरः मलाला जो नोबेल पुरस्कार घेऊन जगभर मिरवते, त्या नोबेलच्या मूळ भूमींत, नॉर्वेतच तसे कायद्याने रोखलेले आहे, पण सध्या ते असोच). मात्र काही सार्वजनिक ठिकाणी तेथील गणवेश घातलाच पाहिजे, ह्याविषयी वाद आता का होतो आहे? भारतांतील बहुतेक सर्वच शाळांतून गणवेश सक्तिचा असतो, हे अगदी मला आठवते तेव्हापासून म्हणजे पन्नाशीच्या दशकापासूनच सुरू आहे. ह्याचप्रमाणे अनेक सेवांतही गणवेश जरूरी असतो व तो तसा असावाही. उदा. बँकांत, दुकानांत, सिनेमागृहांत, सिक्युरीटीची कामे करणारे, तेथील कर्मचारी सहज ओळ्खता यावेत, हा एक मुख्य उद्देश ह्यामागे आहे. ह्याबद्दल मूलभूत चर्चा का व्हावी?

राहिला प्रश्न त्या गणवेशांपेक्षा स्वतःचे, कुठल्याही कारणाने वेगळे काही करण्याचा. तर, असे केल्याने, गणवेशाच्या संकल्पनेलाच अर्थ राहत नाही. इथपतच हिजाब/ धोतरे/साढ्या (गणवेश, पँटचा असल्यास) विरोध/ बंदी आहे. शिखांच्या बाबतीत मात्र फार कालापासूनच अपवाद केला गेलेला आहे, पण त्यांना फक्त फेटे घालण्यापुरतेच ते मर्यादित आहे.

आता, ह्यांत कुणीही धार्मिक बाबींवरून किंवा, मॉरॅलिटीच्या प्रश्नावरून विरोध केलेला नाही, तेव्हा असे म्हणणे गैरलागू आहे,

हिजाबाची मोरॅलीटी नक्की चर्चेत आहे. कॉलेजचे कारण युनिफॉरमिटी हेच असले तरी वेगवेगळ्या चर्चांमध्यें मोरालिटी नक्की आहे. शेखर गुप्तांचे ५० वर्ड एडिट ट्विट आलेले, त्यात हिजाबाचे समर्थन म्हणजे पुरोगामीत्वाला सोडून आहे असे म्हणणे मांडलेले, हिजाब ही रिग्रेसिव्ह प्रथा आहे आणि तीवर बंदी आणली तर ते पुरोगामीच होईल, असा आडून नजरीया गुप्तांनी मांडलेला.

प्रदीप's picture

9 Feb 2022 - 7:58 pm | प्रदीप

कॉलेजने, हिजाब परिधान करून शाळेत आलेल्या मुलींना, आत येण्यास नकार देतांना, कसलीही धार्मिक टिपण्णी केली नव्हती. हा केवळ गणवेशाचाच प्रश्न आहे. उदा. प्रियंका गांधीनी आजच एका प्रेस कॉन्फरन्समधे स्त्रीया कसलाही वेश परिधान करू शकतात- अगदी बिकीनीही, वगैरे निरर्थक मलाली टिपण्णी केली आहे. तेव्हा जर कुणी खरोखरच बिकीनीच घालून गेल्या असत्या, तरीही त्या कॉलेजाने हीच भूमिका घेतली असती, पण मग अर्थात, त्यावरून असा धार्मिक स्चरूपाचा गदारोळ करता आला नसता. कॉन्ग्रेससारख्या खुळचट पक्षाचे सोडा, पण तथाकथित विचारवंतांची आता होते आहे, तशी कसरत झाली नसती (म्हणजे, पुरोगामीपणाची झूल वावरता वावरता, हिजाब वापरण्याचे समर्थन करायचे-- कारण म्हणे व्यक्तिस्वातंत्र्य!). गणवेश घालण्यामगे एक निश्चीत शिस्तीची भूमिका आहे. तिथे व्यक्तिस्वातंत्र बाजूस ठेवायचे, हा साधा कॉमन सेन्स आहे. उदा. माझ्या लहानपनापासूनच, कॉन्वेण्ट शाळेत मुलींना कुंकू लावून येण्यास मनाई आहे. त्यांच्या पुरती ती बरोबरच आहे. ज्या मुलींना तेथे जायचे आहे, त्यांनी त्या गणवेश- नियमाचे पालन केलेच पाहिजे. नपेक्षा त्यांनी त्या शाळेत जाऊच नये. हे माझ्या माहितीतले साधे आचरण आहे.

पण, इथे हिजाब घातलेल्यांना प्रवेश नाकारला गेला, ह्यावरून रीतसर वैचारीक व शारीरीक दंगल पेटवण्यांत आली, कारण तोच मूळ अ‍ॅजेंडा होता व आहे. म्हणजे, काळजीपूर्वक ह्या आंदोलनामागील व्यक्तिसमूहाने, असा वेश निवडला की चर्चा सहज भरकटेल. मूळ कारण-- गणवेशाचे उल्लंघन. चर्चा -- धार्मिक वेष, व्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी.

अवांतरः

ह्यावरून मला, ऐशीच्या दशकांत घडलेला एक प्रसंग आठवला. सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा/ परळ येथील वर्क्शॉपमधे काम करणारा एक पुरुष कामगार, स्कर्ट घालून येऊ लागला. आता , इथे गणवेशाचे उल्लांङ्हन वगैरे नव्हते. पण सर्वमान्य शिष्टाचार (ड्रेस कोड) ला त्यामुळे धक्का बसत होता. ह्यामागे त्याचे म्हणणे एव्हढेच होते की स्कर्ट वापरल्याने कापडाची व म्हणून त्याच्या पैशाची बचत होते आहे. मग व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे कौतुके तेव्हा नव्हती. त्यामुळे कासलाही गाजावाजा न होता ती केस रेल्वे प्रशासनाने हाताळली, सदर व्यक्तिस समज देण्यात आली व पुरुषी पोशाख घालून येण्यास त्याला भाग पडले.

मान्य. पण लहानपणापासुन ब्रेनवॉश (मराठी शब्द?) करायचे आणि नंतर स्वत:हुन निवड केली म्हणुन सांगायचे.

विरोधाभास कसलाच नाहीये. स्वतःच्या मर्जीने हिजाब घालायचा असेल तर जबरदस्तीने रोखण्याचा विरोध आहे. मुस्लिम मुलींना शिक्षण मिळावं म्हणून गोळी खाणारी मुलगी "हिजाब घालून शाळेत प्रवेश मिळणार नाही" यावर मौन राखून बसली असती तर खरा विरोधाभास झाला असता.

या बाबत सहमत आहे. पण ब्रेनवॉश आहे की नाही कसे ठरवणार ?

आणि, हिजाब घालू नये किंवा स्त्री पुरुष स्मानतेसाठी शाळेत शिकवले असते तर खंदे समर्थन दिले असते.

Trump's picture

9 Feb 2022 - 12:08 pm | Trump

तो प्रश्न आहे.
मग द्या लहान मुलांना सर्व धर्मांचे आणि रिलिजनचे शिक्षण, आणि मोठे झाल्यानंतर निवडु स्वत:चा मार्ग. बघा किती मुस्लिम आणि क्रिश्चन तयार होतात ते. माझ्या माहीतीतले बरेचरे हिंदु तयार होतील.

या बाबत सहमत आहे. पण ब्रेनवॉश आहे की नाही कसे ठरवणार ?

रात्रीचे चांदणे's picture

9 Feb 2022 - 11:46 am | रात्रीचे चांदणे

शाळा किंवा कॉलेज चा गणवेश असताना हिजाब चा हट्टहास कशासाठी? वटलस तर शाळेच्या पहिल्या पायरी पर्यंत हिजाब घालुन यावा आणि शाळा संपली की बाहेर पडल्या पडल्या परत हिजाब घालावा, पण शाळा कॉलेज मध्ये असे पर्यंत फक्त गावणेशच पाहिजे.

गणवेशात हिजाब चालणारच नाही हा हट्ट तरी का ?

रात्रीचे चांदणे's picture

9 Feb 2022 - 12:14 pm | रात्रीचे चांदणे

गणवेशात हिजाब पाहिजे हा हट्टहासच केला तर तो गणवेशच राहील का? उद्या आर्मी, पोलिसवाले पण म्हणतील आम्ही गणवेश घालू पण वरून आमचा पठाणी किंवा आमच्या धर्मात जे लिहिलंय ते वरून घालू ते चालेल का? त्या कॉलेज मधील मुलींनी डोक्यापासून पायापर्यंत स्वत ला झाकुन घेतलंय अत्ता आतमध्ये कॉलेज चा गणवेश आहे का नाही ते कसा बघणार?

सुबोध खरे's picture

9 Feb 2022 - 12:28 pm | सुबोध खरे

उद्या आर्मी, पोलिसवाले पण म्हणतील आम्ही गणवेश घालू पण वरून आमचा पठाणी किंवा आमच्या धर्मात जे लिहिलंय ते वरून घालू ते चालेल का?

यावर पुरोगाम्यांची दातखिळी बसेल.

मुळात शाळेत गणवेश कशासाठी असतो तर विद्यार्थी श्रीमंत गरीब कोणत्याही जातीधर्माच्या असला तरी सर्वाना एकाच पातळीवर आणून समानतेचे तत्व शिकवणे हे आहे.

बऱ्याच शाळांमध्ये सर्वाना एकच भोजनही दिले जाते किंवा काही शाळांत केवळ भाजी पोळीच आणायची असा नियम याच साठी असतो

बाकी चालू द्या

प्रदीप's picture

9 Feb 2022 - 3:52 pm | प्रदीप

उद्या आर्मी, पोलिसवाले पण म्हणतील आम्ही गणवेश घालू पण वरून आमचा पठाणी किंवा आमच्या धर्मात जे लिहिलंय ते वरून घालू ते चालेल का?

यावर पुरोगाम्यांची दातखिळी बसेल.

येतोय, येतोय. शाळेतील हिजाबच्या "लढ्यानंतर" पुढील प्रवेश तोही असेल.

कॉमी's picture

9 Feb 2022 - 12:37 pm | कॉमी

गणवेशात हिजाब वापरला तर तो कसा असावा असे सांगता येऊ शकते, रन्ग वैगेरे.

शिखांना पगडीसाठी सूट आहे, कृपाण ठेवण्यासाठी आहे. आर्मी आणि पोलिसांना सुद्धा आहे.

उद्या आर्मी, पोलिसवाले पण म्हणतील आम्ही गणवेश घालू पण वरून आमचा पठाणी किंवा आमच्या धर्मात जे लिहिलंय ते वरून घालू ते चालेल का?

तसा आग्रह कोणी केल्याचं ऐकिवात नाही, किंवा धर्मात सुद्धा पुरुषांसाठी पोषाख बंधनकारक केल्याचं ऐकिवात नाही. चुभुद्याघ्या.

रात्रीचे चांदणे's picture

9 Feb 2022 - 1:00 pm | रात्रीचे चांदणे

धार्मिक कारण देऊन दाढी ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा परवानगी मागितली होती पण नाकारण्यात आली आणि कोर्टानेही परवानगी दिली नाही.
शिखांची पगडी आणि हिजाब याची तुलना करता येणार नाही कारण मुस्लिममध्ये हिजाब compulsory नाही.
मुळात गणवेश असताना हिजाब पाहिजे हा हट्टहास कशासाठी? आज एक धर्म हिजाब घालून येईल उद्या हिंदू मुली आमच्या धर्मात अमुक कपडे पाहिजे म्हणून भांडत बसतील परवा ख्रिश्चन मुली वेगळ्या कपड्याचा आग्रह करतील म्हणजेच एका शाळेत ३-४ गणवेश होतील.

माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांच्या मताप्रमाणे हिजाब मुस्लिम धर्मानुसार बंधनकारक आहे, तर काहींच्या नाही.

आज एक धर्म हिजाब घालून येईल उद्या हिंदू मुली आमच्या धर्मात अमुक कपडे पाहिजे म्हणून भांडत बसतील परवा ख्रिश्चन मुली वेगळ्या कपड्याचा आग्रह करतील म्हणजेच एका शाळेत ३-४ गणवेश होतील.

असे आतापर्यंत होते आहे का खरं? मग कल्पित अडचणी का सोडवत बसायच्या ? आतापर्यंत त्या मुली हिजाब वाप्रतच होत्या की.

रात्रीचे चांदणे's picture

9 Feb 2022 - 1:55 pm | रात्रीचे चांदणे

. माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांच्या मताप्रमाणे हिजाब मुस्लिम धर्मानुसार बंधनकारक आहे, तर काहींच्या नाही.
आस कस चालेल, लोकं स्वतः च्या सोयीनुसार कायद्याचा अर्थ काढतील. बऱ्याच इंग्रजी शाळेत मेहंदी, टीका किंवा गंध, कुंकू याला परवानगी नाही.

प्रदीप's picture

9 Feb 2022 - 3:57 pm | प्रदीप

कॉमी, आता मात्र तुम्ही विनाकारण काहीतरी विवाद करताहात, असे वाटू लागले आहे. म्हणजे, एखाद्या जागेतील, नियम एका गटाला तोडण्यासाठी परवानगी देतांना, इतर गटही उद्या तसली मागणी करतील, ह्या साध्या मुद्द्याकडे डोळेझाक करायची. मग जेव्हा ती नदी पार करण्याची वेळ येईल, तेव्हा त्याचा विचार करायचा!!

कमॉन कॉमी, तुमच्याकडून इतक्या भुसभशीत भूमिकेची अपेक्षा नाही.

कॉमी's picture

9 Feb 2022 - 4:54 pm | कॉमी

असा प्रॉब्लेम आत्तापर्यंत आलेला दिसत नाहीये. शिखांना पगडी आणि कृपाण ठेवताना सुद्धा असा विचार झाला नव्हता.

तरी स्पष्टीकरण- अर्थात पुढे अशे मागणी कोणी केल्यास त्यांना सुद्धा परवानगी मिळावी.

प्रदीप's picture

9 Feb 2022 - 7:35 pm | प्रदीप

असा प्रॉब्लेम आत्तापर्यंत आलेला दिसत नाहीये.

नाही, ना! भारतांतील मुस्लिमही अशी मागणी करीत होते काय? हिंदू भगव्या शाली घालून शाळेत जात होते काय? पण आता हवा बदलली आहे. कारण ह्यामागे सरळसरळ षडयंत्र कार्यरत आहे. विनाकारण सामाजिक चिथावणी देण्याचे, आव्हाने देण्याचे काम अगदी प्लॅनिंग करून सुरू आहे. अलिकडेच गुरूग्राम येथे रस्त्यावर मुस्लिमांनी नमाज पढणे सुरू केले होते, तोही ह्याचाच एक भाग होता.

तरी स्पष्टीकरण- अर्थात पुढे अशे मागणी कोणी केल्यास त्यांना सुद्धा परवानगी मिळावी.

म्हणजे, तुम्हाला कसलाही गणवेश, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी मान्य नाही, तर!!

जाता जाता, कॉमी देशांत असली कौतुके अजिबात चालत नाहीत, हे तुम्हाला ठाऊक असेलच!

धार्मिक परिधान सुद्धा एकसारखी असावीत- असे असू शकते. हा हा प्रकार वापरायचा असल्यास तो असा असा असावा.

चिथावणी देणे नक्की सुरु आहे. शाहरुख खान थुंकला म्हणे.

कॉमी देशांमध्ये काय आहे ह्याच्याने मला काही फरक पडत नाही.

प्रदीप's picture

9 Feb 2022 - 10:17 pm | प्रदीप

शाहरुख खान थुंकला म्हणे.

ते मानणे हे अतिशय मूर्खपणाचे आहे, त्याने त्याच्या धर्मरीतिनुसार, फुंकर घातली. पण हे, काही टोकाच्या हिंदूत्ववाद्यांच्या प्रतिक्रियांना स्पष्ट शब्दांत सुनवणारे, मी अनेक हिंदूत्ववादीही पाहिले आहेत. त्यांच्या, कानौघडणी करणार्‍या पोस्ट्स वाचल्या आहेत.

आणि हाच मोठा फरक त्यांच्यात, व तथाकथित पुरोगाम्यांत आहे.

मुलींच्या शिक्षण घेण्याच्या निर्णयाचा आदर व्हावा हीच होती आणि आता सुद्धा मुलींच्या हिजाब वापरण्याच्या निर्णयाचा आदर व्हावा हीच

हिजाब सक्ती म्हणजे पुररुषांचे वर्चस्व असे बरेच जण बोलतात हे "सत्य" ताटाखाली ठेव्याचे असेल तर ठेवा मग चालुद्या "स्वखुशीने हिजाब" वैगरे
मलाला जर अश्या धार्मिक पुरुषी वर्चस्वाच्या आणि अन्यायाचं विरुद्ध आहे ( आणि त्यात शंका घ्यायला जागा नाही तिने त्यासाठी गोळी खाल्ली आहे ) तर मग तिला हे हिजाब आणि पुढे बुरख्याच्या संकल्पेन मागे दडलेले पुरुषी ( इस्लाम चा आधार घेत राबवलेले ) वर्चस्व दिसत नाही का?
म्हणू विरोधाभास असे मी म्हणालो एवढेच

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Feb 2022 - 11:20 am | चंद्रसूर्यकुमार

तिला गोळी घालून ठार मारायचा प्रयत्न कोणी केला? तर पाकिस्तानातील धर्मांध आणि मूलतत्ववादी तत्वांनी. काश्मीरवर कबजा कोण मिळवू बघत आहे? तर तीच मूलतत्ववादी तत्वे. तरीही त्या तत्वांविरोधात काहीही न बोलता बरोबर ३७० कलम रद्द झाल्यानंतर तिला काश्मीरी स्त्रिया आणि लहान मुलांविषयी कळवळा वाटायला लागला होता हा योगायोग म्हणायचा का?

असल्या व्यक्तीकडून कसली अपेक्षा ठेवायची?

ती सरतशेवटी पाकिस्तानी आहे. ती काशमीरबाबत भारताच्या बाजूने का बोलेल ? ती ऑर्डिनरी पाकड्यांसारखेच बोलणार ना.

पण तुम्ही दिलेल्या ट्विट मध्ये ती पुष्कळच व्हेग आहे. न पटण्यासारखं काही लिहिलेलं नाहीये त्यात. तुम्ही ३७० चा काँटेक्स्ट सांगितला नसता तर चांगलंच लिहिलंय म्हणलो असतो मी.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Feb 2022 - 12:15 pm | चंद्रसूर्यकुमार

ती सरतशेवटी पाकिस्तानी आहे. ती काशमीरबाबत भारताच्या बाजूने का बोलेल ? ती ऑर्डिनरी पाकड्यांसारखेच बोलणार ना.

तोच तर प्रॉब्लेम असतो. पाकडे भारताविरोधात अगदी एकसुराने आणि एकदिलाने बोलतात आणि वागतात. पण भारतात मात्र अफजलगुरूसारख्याची 'पुण्यतिथी' साजरी करणार्‍या तुकडेतुकडे गँगला डोक्यावर घेणारे लोक असतात. असल्या लोकांना भारतात विचारवंत वगैरे म्हणतात. इतर देशात असल्या लोकांना ठार मारायला कमी केले जाणार नाही. एकेकाळी म्हणजे मनमोहनसिंगांच्या काळात अशा लोकांना सरकारी मानमरातबही मिळायचा. त्यांच्याविरोधात काही बोलले तर मग राष्ट्रवादाची झिंग चढली आहे वगैरे अजूनही बोलले जात असते.

तुम्ही ३७० चा काँटेक्स्ट सांगितला नसता तर चांगलंच लिहिलंय म्हणलो असतो मी.

८ ऑगस्ट २०१९ या तारखेला ते लिहिले आहे म्हणजे त्यातच आले की सगळे.

चालू विषयाशी या सगळ्याचा काय संबंध समजलं नाही.
का ऍड हॉमीनेम (मराठी प्रतिशब्द ?) करायचा होता ?

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Feb 2022 - 1:01 pm | चंद्रसूर्यकुमार

नाही कसा?

प्रत्येक गोष्टीत आम्ही आमचा देश आणि त्याचे हितसंबंध बघत असतो आणि तुमच्यासारख्यांना देश वगैरे असे काही असते हेच मान्य नसते. हा फरक आहे. कर्नाटकातल्या घटनेवर मलाला ही कठपुतली बोलली. त्यानंतर तिचा पूर्वेतिहास काय आहे आणि ती काश्मीरविषयी नक्की काय आणि कोणत्या संदर्भात बोलली आहे हे तपासून बघणे तुमच्यासारख्यांना गरजेचे वाटत नसेल पण मला वाटते. शेवटी आमच्यासाठी आमचा देश (माझ्यासारखेच वाटणार्‍यांसाठी- आपला देश) हा आमच्या अस्तित्वाशीच निगडीत आहे त्यामुळे त्याचा संबंध प्रत्येक ठिकाणी येणारच.

जाऊ दे. तुमच्यासारख्यांना नाही कळणार.

ठीक, म्हणजे ऍड होमिनेमच आहे.

Typically this term refers to a rhetorical strategy where the speaker attacks the character, motive, or some other attribute of the person making an argument rather than attacking the substance of the argument itself.

मराठी-
मांडलेल्या मुद्द्याऐवजी व्यक्ती, गुण, उद्देश इत्यादींवर हल्ला करणे.