ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२

निनाद's picture
निनाद in राजकारण
1 Feb 2022 - 7:38 am

किशन भारवाडचा खून - आरोपी सब्बीर आणि जमालपूर येथील मौलाना.
अहमदाबाद जिल्हा रहिवासी असलेल्या किशन भारवाड यांची २५ जानेवारी रोजी धंधुका तालुक्यात दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. किशनजी घरी जात असताना दोन दुचाकीस्वारांनी येऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सब्बीर, इम्तियाज आणि जमालपूर येथील मौलाना अयुब जावरवाला यांनी यापूर्वी मे २०२१ मध्ये पोरबंदर येथील रहिवासी साजन ओडेदरा याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोरबंदरमध्ये तो सापडला नाही.
एटीएसचे एसपी आयजी शेख यांनी सांगितले की, किशन भारवाडच्या हत्येप्रकरणी मौलाना कमरगानी उस्मानी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.
धार्मिक भावना दुखावणाऱ्या एका फेसबुक पोस्टमुळे किशन भारवाडची हत्या करण्यात आली आहे. एका बैठकीत कमर गनी यांनी आरोपींना सांगितले होते की, जर कोणी त्यांच्या धर्माविरुद्ध बोलत असेल तर त्या व्यक्तीला संपवले पाहिजे. त्यामुळेच कमर गनीच्या सांगण्यावरून या दोन्ही आरोपींनी किशन भारवाड यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रतिक्रिया

क्यानडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल सरकारने लादलेल्या लस सक्तीची करण्याच्या आदेशावर ट्रकचालक आंदोलक निदर्शने करत आहेत. लसीकरण न केलेल्या ट्रकचालकांसाठी सरकारने १४ दिवसांच्या होम क्वारंटाईनचे निर्देश दिले आहेत.
या निदर्शंनांमुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि त्यांचे कुटुंब सुरक्षिततेच्या कारणास्तव ओटावा येथील गुप्त अज्ञात ठिकाणी गेले असावेत असा कयास आहे. जस्टिन ट्रूडो यांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी २७०० ट्रकचा ताफा शनिवारी ओटावामध्ये दाखल झाला होता. असे म्हंटले जाते आहे की कॅनडातील शेतकरीही या आदेशाच्या विरोधात ट्रकवाल्यांमध्ये सामील झाले आहेत.

सौंदाळा's picture

1 Feb 2022 - 10:15 am | सौंदाळा

उत्तम, कालच बातमी पाहिली.
ट्रुडो इकडे शेतकरी आंदोलकांना समर्थन देत होता ना.
आता या कॅनडातल्या ट्रकवाल्यांना भारताने फूस देऊन अजुन भडकवले पाहिजे.
करावे तसे भरावे.

Trump's picture

1 Feb 2022 - 10:48 am | Trump

ट्रुडो इकडे शेतकरी आंदोलकांना समर्थन देत होता ना.

युरोपियन लोक तशीही दुसर्‍याला ज्ञान शिकवायला पुढे असतात.

आता या कॅनडातल्या ट्रकवाल्यांना भारताने फूस देऊन अजुन भडकवले पाहिजे.

नको. चीन आणि रशियासारखे यांना कोंडीत पकडायचे.

साहना's picture

1 Feb 2022 - 1:56 pm | साहना

कॅनडा युरोप मध्ये नाही.

कनेडियन आणि युरोपियन लोकांमध्ये किती फरक आहे?
कनेडियन लोकांनी युरोपियन लोकांविरुद्ध जाउन अयुरोपियन लोकांना किती वेळा मदत केली आहे?

कॅनडा युरोप मध्ये नाही.

कॅनडा उत्तर अमेरिकेत आहे तर युरोप, युरोप मध्ये (duh). जे लोक युरोप मध्ये आज वास्तव्य करतात ती मंडळी युरोपिअन, जी मंडळी कॅनडात आहे ती कॅनेडिअन किंवा उत्तर अमेरिकन. कोणी कुणाला कधी आणि किती मदत केली हे इथे रेलेवंट अजिबात नाही. शेजाऱ्याच्या पोराला तुम्ही कितीही मदत केली तरी तुम्ही त्याचे बाप होत नाही, उद्या पंजाबातील लोकांना कितीही मदत कॅनडा वाल्यानी केली तरी कॅनेडिअन लोक पंजाबी होणार नाहीत.

उगाच आपल्याला फरक कळत नाही म्हणून कुणालाही काहीही नवे चिकटवायची नाहीत.

राजकारणा- आणि अर्थकारणामध्ये कोण कोणाला मदत करते ह्याला खुप महत्त्व असते.

कोणी कुणाला कधी आणि किती मदत केली हे इथे रेलेवंट अजिबात नाही.

दत्तक घेता येते की. आणि शेजारी पोरांना बापाविरुध्द फितवु शकतो की. जर मदत करत नसेल तर माणसे घरातील माणसाला जवळ उभे करत नाहीत. असो.

शेजाऱ्याच्या पोराला तुम्ही कितीही मदत केली तरी तुम्ही त्याचे बाप होत नाही.

ह्याचा काय प्रतिवाद अपेक्षित आहेत?

उगाच आपल्याला फरक कळत नाही म्हणून कुणालाही काहीही नवे चिकटवायची नाहीत.

माझीच चूक झाली ! क्षमस्व !

Trump's picture

2 Feb 2022 - 5:38 pm | Trump

धन्यवाद. :)

माझीच चूक झाली ! क्षमस्व !

गुप्त सुत्रां कडून बातमी आली आहे कि तृदेव पंजाब मधील लुधियाना येथे लपून बसले आहेत.

ह्या आंदोलनात एकूण १०,००० ट्रक सहभागी झाले होते. तृदेव ह्यांनी आपले शेपूट अगदीच खाली घातले आहे. विनोद अलाहिदा, तृदेव हे पळून अमेरिकेत आले आहेत.

शेतकरी,किंवा कष्टकरी वर्ग हा देशाप्रती भावनिक असतो.
संकट येते तेव्हा हाच वर्ग युद्धात सैनिक रुपात असतो.
भारतात शिकून स्वा सार्थ साधण्यासाठी जग भर फिरत नाही.
काही दशकं पूर्वी भारतात संगणक ज्ञान फुकट सरकारी पैश्याचे घेवून .
युरोपियन राष्ट्रात सेवा करणारे .
देशाच्या संकट काळी काही कामाचे नाहीत.
कॅनडा असू किंवा भारत उघड पने कष्टकरी वर्गाला कधीच दुःखवत नाही.
ट्रक वाल्या समोर कॅनडा सरकार माघार घेईल.

आपला आयडी बदलला म्हणून आपले निर्बुद्ध व्यक्तिमत्व बदलत नाही. उगाच कबुतरा प्रमाणे प्रत्येक प्रतिसादावर घाण करू नये.

कमर गनी यांनी आरोपींना सांगितले होते की, जर कोणी त्यांच्या धर्माविरुद्ध बोलत असेल तर त्या व्यक्तीला संपवले पाहिजे.

त्या आरोपींनी भारतीय घटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराचा उपयोग केलेला आहे.

ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलल्लाह इस्लामनुसार केवळ अल्लाह हाच ईश्वर आहे आणि काफिरांना ठार मारण्याचा अधिकार मुसलमानांना आहे. आणि ही बाब इस्लामने कधीही लपवून ठेवलेली नाही.

---

प्रश्न हा आहे की हिंदूंनी घटना लिहून मुसलमानांना असा अधिकार का द्यावा?

घटनेचे रचनाका श्री बाबासाहेब होते. त्यांच्या अनुयायांना विचारा. ते सध्या भीम आणि मिम करत स्वतःच इंटरनेट वाले मिम बनून राहिले आहेत.

कॉमी's picture

1 Feb 2022 - 8:30 pm | कॉमी

प्रश्न हा आहे की हिंदूंनी घटना लिहून मुसलमानांना असा अधिकार का द्यावा?

इतका बावळटपणा येतो कुठून हो ?
हिंदूनी घटनेमध्ये काफ़िरांना ठार मारण्याचा अधिकार कुठे दिलाय म्हणे ?

इस्लाम हा भारताचा विशेष धर्म (घटने प्रमाणे) असून हिंदू पेक्षा जास्त अधिकार त्याला आहेत. इस्लामचा अपमान कायद्याने गुन्हा आहे. आता गुन्हाची शिक्षा देहदंड आहे कि जेल (किंवा भारतीय जेल ह्या देहदंडा पेक्षा जास्त हानिकारक असू शकतात) इत्यादी गोष्टी नगण्य आहेत.

किशन भारवाड या धंधुका येथील युवकाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंदिरात जमलेल्या हिंदूंच्या गटावर खास समुदायाच्या जमावाने हल्ला केल्याने छोटा उदेपूरमध्ये जातीय तणाव निर्माण झाला आहे. रविवारी रात्री उशिरा रामजी मंदिरात झालेल्या हाणामारीप्रकरणी छोटा उदेपूर जिल्हा पोलिसांनी सोमवारी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये सहा जणांना अटक केली. किशन भारवाड यांना २ जानेवारीला मुलगी झाली आहे.

कॉमी's picture

2 Feb 2022 - 7:00 am | कॉमी

हे " घट्नादत्त काफ़िरांना मारण्याची परवानगी"च्या मैलोन मेल जवळ येत नाही.

मणिपूरला ७५ वर्षांत प्रथमच मालवाहतूक रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. आधी आसाममधील सिलचर येथून निघालेली मणिपूरमधील प्रवासी रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर २७ जानेवारी रोजी मालवाहतूक करणारी रेल्वे ईशान्य राज्यातील तामेंगलाँग येथील राणी गाईदिन्ल्यु स्थानकावर आली आहे. मणिपूर आणि संपूर्ण ईशान्येसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. मोदी सरकारने ईशान्येकडील चालू असलेल्या रेल्वे प्रकल्पांसाठी यावर्षी ७००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुक्त विहारि's picture

1 Feb 2022 - 2:10 pm | मुक्त विहारि

हे सरकार, स्वसंरक्षण आणि आर्थिक दृष्टीने स्वायत्त होण्याच्या दृष्टीने, योग्य काम करत आहे...

स्वसंरक्षणासाठी, दळणवळण वेगवानच हवे

२०२५ पर्यंत देशभरात पसरणार ऑप्टिकल फायबरचे जाळे, प्रत्येक गावात मिळणार स्वस्त इंटरनेटची सुविधा

https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/nirmala-sith...

अर्थात, काही झारीतील शुक्राचार्यांना, ही गोष्ट स्वीकारायला जडच जाणार....

sunil kachure's picture

1 Feb 2022 - 2:18 pm | sunil kachure

दरोडे,fraud,ऑनलाईन फसवणूक,प्रत्येक पावलाला कोणी तरी फसवेल अशी अवस्था.
गल्लोगल्ली गुंड लोक,गुंडगिरी,समाज माध्यमावर जात,धर्म ह्याच्या नावावर गुंडगिरी.
रस्त्यात पडणारे खून,पोलिस लोकांच्या हत्या.दबंग नेते ,गुंड राजकारणी
सरकार कोणाचे संरक्षण करत आहे.
कोणताच देश कधीच अण्वस्त्र वापरणार नाही.
कोणताच देश कधीच दुसरा देश लष्करी तकत वापरून ताब्यात घेणार नाही .
तेथील गरीब जनता कोण सांभाळत बसेल.
अंतर्गत भय मुक्त वातावरण असणे हे जास्त महत्वाचे आहे
बाहेरून देशाला काही धोका नाही

रावसाहेब चिंगभूतकर's picture

1 Feb 2022 - 2:30 pm | रावसाहेब चिंगभूतकर

'हाकललं तरी दुसरं नाव घेऊन येणारे डुप्लिकेट आयडी' हे टाकायचं राहिलंच बघा.

अनन्त अवधुत's picture

1 Feb 2022 - 2:31 pm | अनन्त अवधुत

बाहेरून देशाला काही धोका नाही

चीन, पाकिस्तान, अजून ते नक्षलवाद वगैरे आहेतच.
जाता जाता: प्रभू, तुम्ही जी यादी वर दिली त्यात, देशांतर्गत होणारे बॉम्बस्फोट, हे नाही. देशाच्या अंतर्भागात होणारे अतिरेकी हल्ले, हे पण नाही. हे सरकारचे यश.

असे ज्ञान मिळवायला, आपण कुठला पेपर वाचता?

किंवा काही पुस्तके वाचली असतील तर, जरूर सांगा...

बाय द वे,

एका प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकाल का?

शाकाहारी कोंबडी जर उपवासाला फराळ म्हणून खायला चालत असेल तर शेळी, बोकड, हत्ती, ससा, किंवा अगदीच गेला बाजार कोळंबी पण उपवासाला फराळ म्हणून खायला चालेल का?

बाहेरून देशाला काही धोका नाही!
लाख मोलाचा बोललात भाऊ .. कारण हळू हळू का होईना देशाला पाठीचा कणा आहे हे दाखवताय सद्य केंद्र सरकार
हो ना धोका आहे तो अंतर्गतच ... गुलाबी चष्मे घालून बसलेल्या अति उदरमतवादि डावखुऱ्या गुलामांकडून ! आणि संधीसाधू जाणत्या राजांकडून

सर टोबी's picture

2 Feb 2022 - 11:07 am | सर टोबी

अणि तो चीन समोर झुकला आहे का?

नसेल तर लवकर द्या ! खास तुम्हाला निमंत्रण आहे तात्यांकडून.

आमंत्रिताना खास रिटर्न गिफ्ट म्हणून MAGA ची टोपी आणि टॅक्टिकल टॉर्च (जी नेव्ही सील्स वापरतात तसली) आणि महान देशभक्त स्टिकर देण्यात येणार आहेत.

Trump's picture

2 Feb 2022 - 11:28 am | Trump

परदेशी लोकांकडुन निवड्णुकनिधीला परवानगी नाही.
https://www.fec.gov/help-candidates-and-committees/candidate-taking-rece...

कॉमी's picture

2 Feb 2022 - 4:37 pm | कॉमी

भारतातल्या फॅन्सचं डिनर हुकलं कि :(

बेंगळुरू क्रांतिवीर सांगोली रायण्णा रेल्वे स्थानकाच्या आत हमालांच्या विश्रांतीगृहाचे मशिदीत बेकायदेशीर रूपांतर केले गेले आहे. इतर समुदायातील सदस्यांना या विशिष्ट खोलीत जाण्यास बंदी आहे. `
आश्चर्याची गोष्ट ही की दक्षिण पश्चिम रेल्वे च्या अधिकार्‍यांनी यावर काहीही कारवाई केलेली नाही.

तामिळनाडू पोलिसांनी पुदुकोट्टई जिल्ह्यातील गणेश बाबू नावाच्या एका व्यक्तीला धर्मांतराची तक्रार दिली होती त्यालाच अटक केली आहे!
दोन मिशनरी त्याच्या घरी आल्या. या महिलांनी त्याला सांगितले होते की जर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर त्यांच्या कुटुंबाची 'येशू काळजी घेतील'. याला गणेश बाबू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला. त्यांनी स्त्रियांना सांगितले की ते हिंदू आहेत आणि त्यांची कुलदेवता (कुलदेवम) मलायादिकरुप्पर आहे. त्याने त्या मिशनरी स्त्रियांना त्वरित जाण्यास करण्यास सांगितले. पण त्या दोन धर्मप्रचारक महिलांनी हिंदू देवतांची 'दगड', 'सैतान' आणि 'भूत' अशी विटंबना केली. त्यामुळे त्यांचे भांडण झाले.

जेव्हा गणेश बाबूने त्यांना सांगितले की मी पोलिसांना कळवेन, तेव्हा मिशनरी महिलांनी त्यांना सांगितले की 'तो केसही वाकडा करू शकत नाही' कारण ते खूप काळापासून हे ख्रिस्ती धर्म कार्य करत आहेत. : जवळच्या इरुंधीरापट्टी, मेट्टुपट्टी, कट्टाकुट्टी गावात तसेच इरप्पूसल, इलुपूर, मेलाप्पट्टी, नवमपट्टी गावांतील कोणीही त्यांना काहीही करू शकले नाही. मग त्या महिलांनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तक्रार इन्स्पेक्टर उषानधिनी आणि उपनिरीक्षक रेक्स स्टॅलिन यांच्याकडे दिली होती.

भारताने फ्रान्सला EU च्या पाकिस्तानला शस्त्रे विक्रीवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. फ्रान्सने नुकतेच EU चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. यापूर्वी फ्रान्सनेही भारताला संवेदनशील शस्त्रे आणि संरक्षण यंत्रणा पाकिस्तानला न देण्याचे आश्वासन दिले आहे. याआधीही दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली होती. युरोपियन युनियनच्या राज्यांमध्ये, इटली हा पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे, त्यानंतर स्वीडनचा क्रमांक लागतो. चीन हा आतापर्यंत पाकिस्तानला लढाऊ विमाने, फ्रिगेट्स आणि पाणबुड्यांसह संरक्षण यंत्रणांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. यानंतर रशियाचा क्रमांक लागतो, परंतु अलिकडच्या वर्षांत मॉस्कोकडून कोणतीही अत्याधुनिक शस्त्र प्रणाली पुरवण्यात आलेली नाही.

निनाद's picture

2 Feb 2022 - 4:12 am | निनाद

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा वाढदिवस १ फेब्रुवारी रोजी आसाम मध्ये जनतेकडून जोरदार साजरा केला गेला. आसामचे लोक त्यांना प्रेमाने 'मामा' म्हणतात. कायद्याची अंमलबजावणी आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याच्या बाबतीत, सरमा यांनी आसामसाठी योगी आदित्यनाथ यांचे यूपी पोलिस मॉडेल स्वीकारले आहे. बांगलादेशात होणारी तस्करी रोखली जाते आहे. त्यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या बेकायदेशीर अतिक्रमणातून मोठ्या प्रमाणात जमीन मुक्त केली आहे. मुख्यमंत्री आसाममध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून उल्फाने यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर बहिष्कार न घालण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. ख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे आसामने गेल्या २१ वर्षांतील गेंड्याच्या चोरट्या शिकारीचा सर्वात कमी दर नोंदवला आहे. मेघालय आणि आसाममधील सीमावादाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा दोघेही जमिनीच्या अदलाबदलीच्या कराराद्वारे विवाद मिटवण्यासाठी बैठका घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे १९९१ ते २०१५ पर्यंत हिमंता बिस्वा सरमा हे काँग्रेसचे नेते होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Feb 2022 - 4:30 pm | चंद्रसूर्यकुमार

हिमंत बिस्व सर्मा कधीकाळी काँग्रेसमध्ये होते हे खरे वाटणार नाही अशाप्रकारे भाजपात रूळले आहेत. आसाम भाजपमधील पूर्वी मोठे असलेले नेते- कविंद्र पुरकायस्थ, द्वारकानाथ दास, विजया चक्रवर्ती वगैरे नेते एक तर वृध्द झाले होते किंवा पक्षाला सत्तेवर आणू शकतील इतके लोकप्रिय/एंटरप्रायझिंग नव्हते. अशावेळी सुरवातीला सरबानंद सोनोवाल आणि नंतर हिमंत बिस्व सर्मा हे नेते दुसर्‍या पक्षातून भाजपात आले. त्यापैकी सोनोवालांची वैचारीक भूमिका भाजपाप्रमाणेच होती. बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्यांनी दीर्घकाळ सर्वोच्च न्यायालयात लढा दिला होता. त्यामुळे ते दुसर्‍या पक्षातून भाजपात आले तरी वेगळे कधी वाटलेच नाहीत. पण हिमंत बिस्व सर्मांची गोष्ट तशी नव्हती. ते जवळपास १५ वर्षे तरूण गोगोईंचे उजवे हात म्हणून काँग्रेसमध्ये होते. तरूण गोगोईंचे उत्तराधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जायला लागले होते पण गोगोई आपल्या मुलाला पुढे आणणार आणि आपला पत्ता कट होणार हे त्यांच्या लक्षात आल्यावर (आणि अर्थात रागांचा पिडी एपिसोड) ते भाजपात आले. वैयक्तिक महत्वाकांक्षेतून भाजपात आलेले हिमंत बिस्व सर्मा कधी आपले त्यामुळे वाटले नव्हते. पण हिमंत बिस्व सर्मा सरबानंद सोनोवालांपेक्षाही बांगलादेशी घुसखोरांवर कठोर दिसत आहेत. आणि ते चांगलेच आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Feb 2022 - 8:07 pm | अमरेंद्र बाहुबली

आता नारायण राणेंना भाजपने मुख्यमंत्री पदाचा ऊमेदवार म्हणून निवजावे तेही भाजपात छान रूळतील. खडसेंसारखे लोक भाजपात सतरंजी ऊचलायचं सौभाग्य सोडून राष्ट्रवादीत गेले.

कॉमी's picture

2 Feb 2022 - 2:59 pm | कॉमी

https://indianexpress.com/article/india/digital-trail-points-to-pegasus-...

The phones show “ample deployment of malware” that is consistent with digital fingerprints of Pegasus available in the public domain, the experts said.
There is a presence of “strong indicators” pointing to the involvement of “the state, its intelligence and law enforcement agencies” in using the Pegasus spyware for unauthorised surveillance against individuals

सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीसमोर दोन सायबरसिक्युरिटी तज्ञांची साक्ष.
हे तज्ञ याचिकाकर्त्यांनीच नेमले आहेत.

सर टोबी's picture

2 Feb 2022 - 6:08 pm | सर टोबी

सरकारचा सहभाग सिद्ध झाला तर भक्त आहेतच महामृत्युंजयाचा जप करायला: ||राष्ट्र प्रथम नमो सर्वोत्तम||

अर्थातच. सहभाग सिद्ध झाल्यावर केलं ते योग्यच आहे असेच म्हणणे समोर येणार आहे.

अर्थातच. सहभाग सिद्ध झाल्यावर केलं ते योग्यच आहे असेच म्हणणे समोर येणार आहे.

आंतरजाल तज्ञ कायदेशीर किंवा बेकायदेशीर कसे ठरवु शकतात?

There is a presence of “strong indicators” pointing to the involvement of “the state, its intelligence and law enforcement agencies” in using the Pegasus spyware for unauthorised surveillance against individuals

कॉमी's picture

2 Feb 2022 - 6:13 pm | कॉमी

का नाही ठरवू शकत ?

आंतरजाल तज्ञ तांत्रिक बाबी संभाळतात, कायदेशीर किंवा बेकायदेशीर ठरवत नाहीत. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

कायदेशीर किंवा बेकायदेशीर नव्याने ठरवायचे नाहीये. कायद्याने अनाधिकृत म्हणून (आधीच) ठरवलेला वापर झाला आहे की नाही हे ठरवायचे आहे. आणि अर्थातच हे त्यांच्या स्कोप बाहेरचे असेल तर केवळ त्यांनी स्थापित केलेली तथ्ये विचारात घेतली जातील.

जरुरी नाही. सायबर सुरक्षेत कायदा हा खूप महत्वाचा भाग असून तांत्रिक तज्ज्ञांना सुद्धा संबंधित कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे unauthorized ह्याचा अर्थ बेकायदेशीर होत नाही. unauthorized ह्याचा अर्थ तिथे ग्राहकाने परवानगी दिलेली नव्हती असा घ्यावा असे मला वाटते.

दुसरी गोष्ट म्हणजे surveillance मध्ये ग्राहकाला सरकारने त्याच्यावर पळत ठेवली आहे हे सांगायची गरज नसली तरी surveillance कसे करावे ह्याचे मापदंड हे सार्वजनिक असावेत असे अपेक्षित आहे अन सायबर सुरक्षा तज्ज्ञांना त्यांची इत्यंभूत माहिती असली पाहिजे. उदाहरण म्हणजे AIRTEL च्या हाफीसांत जाऊन कॉल सरकार टेप करू शकते (माझ्या माहिती प्रमाणे इथे गृहमंत्रालयाला परमिशन द्यावी लागते) पण आपल्या बाथरूम मध्ये जाऊन कॅमेरा लावू शकत नाही किंवा सरकारी हॉस्पिटलांत आपण कोविद टेस्टिंग साठी गेले असताना गुपचूप एखादि चिप आपल्या शरीरांत बसवू शकत नाही.

सायबर फॉरेन्सिक मध्ये तज्ञ् मंडळी एखादे तंत्रज्ञान हे कायदेशीर असू शकते किंवा नाही ह्यावर म्हणूनच मत प्रदर्शन करू शकतात.

ज्ञान असणे आणि अधिकारवाणी असणे ह्यात फरक आहे, जसा मेडीकल दुकानवाला आणि वैद्य ह्यामध्ये आहे तो. मेडीकल दुकानवाला अनुभवावर आधारीत औषधे देऊ शकतो, पण औषधांची लेखी शिफारस करु शकत नाही.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांना मुख्य उद्देश नियमकानुसार माहिती सुरक्षित ठेवणे असे असते आणि फक्त तांत्रिक सबंध असतो. कायदेशीर, बेकायदेशीर ह्यात त्यांना कोणताही रस नसतो.
तुमची बहुतेक सुरक्षा ह्या शब्द्दाबरोबर गल्लत झाली आहे.

सुक्या's picture

2 Feb 2022 - 10:37 pm | सुक्या

गंम्मत अशी आहे, ज्या न्युयॉर्क टाईम्स च्या रीपोर्ट वरुन हा सगळा गोंधळ सुरु झाला त्यात असे लिहिले आहे.
This version of Pegasus was “zero click” — unlike more common hacking software, it did not require users to click on a malicious attachment or link —They couldn’t see the Pegasus computers connecting to a network of servers around the world, hacking the phone,

आता जर हे खरे मानले तर मग ही सारी माल्वेयर त्या फोन मधे आली कशी?

अजुन एक बाब मला समजली नाही ..
As part of their training, F.B.I. employees bought new smartphones at local stores and set them up with dummy accounts, using SIM cards from other countries — Pegasus was designed to be unable to hack into American numbers. Then the Pegasus engineers, as they had in previous demonstrations around the world, opened their interface, entered the number of the phone and began an attack.

दुसर्‍या देशातील सीम कार्ड अमेरिकेत कशे काय चालले ? नेट्वर्क कसे काम हॅक केले ?

प्रदीप's picture

2 Feb 2022 - 3:45 pm | प्रदीप

हे तज्ञ याचिकाकर्त्यांनीच नेमले आहेत.

.

प्रदीप's picture

2 Feb 2022 - 3:51 pm | प्रदीप

ह्यांतील एक तज्ञ, एका थिंक-टँकचे 'स्ट्रॅटेजिक अ‍ॅडव्ह्यायसर' आहेत!!

इतरस्त्र कुठेही, सायबर सिक्युरीटीच्या क्षेत्रांत कार्यरत असलेली तज्ञ, त्या विषयांतील तज्ञ असतात. इथे वेगळेच चालू आहे, असे दिसते.

चालूंदेत.