'मास्क' आता नेहमीच हवा
विसरून नाहीच चालणार,
बाहेर पडताना ठेवा ध्यानात
नाक तोंड झाकून ठेवा जनांत !
तसे तर आपण सवयीने
वापरतो अनेकदा मुखवटे,
वर वर हसू, ओठाआड राग
व्देषाची मनात असते आग !!
गोड शब्दाने भुलवतो त्याला
ज्याचा मत्सर पेटवतो ज्वाला,
वरवर हसत शुभेच्छा देताना,
मनात मात्र असूयेची भावना !!
'अरे वा!'असं कौतुक वरवरचं
'लायकी नसताना मिळालय',
असं मनातल्या मनात बोलणं.
अवघड व्हायचं ना अशावेळी हसणं?
मुखपट्टीच्या वापरामुळे
आता हे मात्र बरं झालय
अंतरातले भाव दिसण्याचं
कारणच नाही उरलय !!
मनातले खरे भाव आता
आरशातल्या स्वतः पुरतेच
बाकी कोणाला कसे दिसतील
मुखपट्टी मागे दडून राहतील !!
-©️सौ.वृंदा मोघे
-24जाने.22
प्रतिक्रिया
24 Jan 2022 - 11:50 pm | प्रसाद गोडबोले
लोकं कविता का करतात ?