पॅनिक डिसऑर्डर.....

नाम्या झंगाट's picture
नाम्या झंगाट in काथ्याकूट
4 Dec 2008 - 1:50 pm
गाभा: 

मिपाकर.....

पॅनिक डिसऑर्डर काय असते???
त्याचि कारणे, लक्षणे, उपचार, टेस्ट, काळजी कशी घ्यावी??????

प्रतिक्रिया

झकासराव's picture

4 Dec 2008 - 1:53 pm | झकासराव

http://en.wikipedia.org/wiki/Panic_disorder

आधी गुगल वर शोधत चला.
त्यात जर नाही कळाल किंवा अजुन स्पेसिफिक अशी माहिती एकदम डिटेल हवी असेल तरच इथे विचारा.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

नाम्या झंगाट's picture

4 Dec 2008 - 1:59 pm | नाम्या झंगाट

मला मेडिकल मधील जड शब्द कळ्त नाही म्हणून मिपावर जाणकार मंडंळींना विचारावे म्हट्ले....... त्रासाबद्दल क्षमस्व..
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Dec 2008 - 2:11 pm | घाशीराम कोतवाल १.२

आता हे काय नविन साला हि मिसळ पाव आहे का .
सर जे जे ईस्पितळाची साईट आहे कोनाला काय पाहिजे तर खानावळ
कोनाला काय तर पुस्तकाचे दुकान तर कोनाला आजाराची माहिति चल राजा सर जे जे ईस्पितळात आपलि
लय वट हाय तुला दाखवतो तिथे

गलगले गलगले काय हे कशाला उगाच चिडताय राग राग करताय लोकांची करमणुक होते कशाला त्याच्या मजेचा भंग करताय

विनायक प्रभू's picture

4 Dec 2008 - 2:22 pm | विनायक प्रभू

सारखे येणार्-या काल्पनिक संकटाची भिती बाळगुन आपल्या वर्तमानाचे वाट्टोळे करणे ह्याला पॅनिक डिसॉर्डर म्हणतात. अगदी तुम्हाला समजेल अशी व्याख्या.

चपखल व्याख्या!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

टारझन's picture

4 Dec 2008 - 2:27 pm | टारझन

असे धागे काढणे म्हणजे पैनिक डिसार्डर

- टारझन

अप्पासाहेब's picture

5 Dec 2008 - 1:37 pm | अप्पासाहेब

सकाळी उठल्या पासुन रात्री झोपे पर्यंत भरपुर तर्री मारुन मिसळी वर मिसळी चापा, सोबत ताजा हिरवा गर्द मिरच्यांचा बक्क्ळ ठेचा हाणा.

रात्री झोपा आणि मग सकाळी जे होईल त्याला 'पॅनिक डिसॉर्डर' म्हणत्याय..........

(एक सुचना: शुध्द देशी लोणी वा कैलास जिवन मलाम हाताशी असावे)

लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

विसोबा खेचर's picture

6 Dec 2008 - 5:42 pm | विसोबा खेचर

सकाळी उठल्या पासुन रात्री झोपे पर्यंत भरपुर तर्री मारुन मिसळी वर मिसळी चापा, सोबत ताजा हिरवा गर्द मिरच्यांचा बक्क्ळ ठेचा हाणा.
रात्री झोपा आणि मग सकाळी जे होईल त्याला 'पॅनिक डिसॉर्डर' म्हणत्याय..........

हा सल्ला आहे अंमळ गंमतीशीर परंतु प्रकृतीस्वास्थ्याच्या बाबतीत अशी कधी टिंगल करू नये.. काय सांगावं, कुणाला खरंच काही त्रास असेल..!

असो,

आपला,
डॉ तात्या अभ्यंकर.