हिची चाल

भिडू's picture
भिडू in जे न देखे रवी...
4 Dec 2008 - 10:49 am

(माझे पहिलेच लिखाण आहे.. चू.भु.द्या.घ्या.)

चाल - हिची चाल तुरुतुरु

घेउन पाणी अनि दारु,चला ग्लास पुर्ण भरु,
खोलुन आता मग हि बाटली
जशी मावळत्या उन्हात,काचेच्या ग्लासात
दारु हि फस फस ली ....

इथे कोणी आस पास ना
दारु ची बाटली खोल ना
तू जरा ग्लास ही भर ना
ओठाना जरा सा हा लाव ना

तू लग बग पिता,करुन ग्लास हा रिता
जिभ गालात हि अडखळली
जशी मावळत्या उन्हात,काचेच्या ग्लासात
दारु हि फस फस ली ....

थोडासा चकणा खाउन
फुकाचि मिळते म्हणून पिउन
बाटली चाचपीत हाथा न
ग्लास हा भरिशि पेगा न

हा पेग मोठा मोठा
मिसळून त्यात अनि सोडा
माझी मलाच किक बसली
जशी मावळत्या उन्हात,काचेच्या ग्लासात
दारु हि फस फस ली ....

विडंबन

प्रतिक्रिया

निखिलराव's picture

4 Dec 2008 - 2:47 pm | निखिलराव

मावळत्या उन्हाची वाट पहाणारा,
निखिल

निखिलराव's picture

4 Dec 2008 - 2:50 pm | निखिलराव

भिड भिडु

मावळत्या उन्हाची वाट पहाणारा,
निखिल

श्रीकान्त पाटिल's picture

5 Dec 2008 - 12:24 pm | श्रीकान्त पाटिल

जशी मावळत्या उन्हात,काचेच्या ग्लासात
दारु हि फस फस ली ....

मस्त झाली कविता ... चाल पण चपखल बसली हो .....!!

अनिल हटेला's picture

13 Dec 2008 - 2:33 pm | अनिल हटेला

हा पेग मोठा मोठा
मिसळून त्यात अनि सोडा
माझी मलाच किक बसली
जशी मावळत्या उन्हात

आहाहा .....
(रमता जोगी)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

परिकथेतील राजकुमार's picture

13 Dec 2008 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार

भले शाब्बास रे ! आज ह्याबद्दल आपण एक पेग जास्ती मारणार ;)
पिउन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एव्हडी ढोसुन चढ्णार नसेल
तर अख्खा खंबा व्यर्थ आहे..

टांगा पलटी घोडे फरार झालेला दारुकथेतील दारुकुमार
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

वेताळ's picture

13 Dec 2008 - 5:15 pm | वेताळ

चालीत पण म्हणता येते राव
चालु द्या.
वेताळ

विसोबा खेचर's picture

13 Dec 2008 - 5:32 pm | विसोबा खेचर

जशी मावळत्या उन्हात,काचेच्या ग्लासात
दारु हि फस फस ली ....

वा! सुंदर कविता...

आपला,
(व्हॅट ६९ प्रेमी) तात्या.