- डॉ. सुधीर रा. देवरे
बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं? मराठीला टिकवायचं- जगवायचं तर तिच्यात बोलीभाषांचं प्रभावी उपयोजन होणं गरजेचं आहे.
संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/10/blog-post_73.html?spref=tw
संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/
प्रतिक्रिया
3 Oct 2021 - 1:15 pm | चौथा कोनाडा
+१
3 Oct 2021 - 2:44 pm | संगणकनंद
मराठी बोलीभाषा आणि प्रमाण मराठी दोन्ही टिकतील. जिवंत राहतील.
तुम्ही तुमच्या मृत ब्लॉगचे काय ते पहा. मिसळपावचा वापर करुन त्यात धुगधुगी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात तुम्ही.
3 Oct 2021 - 9:16 pm | कपिलमुनी
स्टेडियमबाहेर षटकार
4 Oct 2021 - 5:52 pm | उपयोजक
:))))
4 Oct 2021 - 9:17 pm | गॉडजिला
.
13 Oct 2021 - 5:32 am | पुष्कर
संगणकनंद :)
3 Oct 2021 - 9:17 pm | कपिलमुनी
पूर्ण लेख इथे टाकायला काय हरकत आहे??
अशा झैराती मिपा धोरणात बसतात का ??
4 Oct 2021 - 9:29 pm | धर्मराजमुटके
खरे तर आपण प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधले पाहिजे.
मिसळपाव वर येणार्या प्रचंड वाचका संख्येमुळे सर्वर वर ताण येतो. त्यामुळेच येथे येणारी ट्राफीक थोडा वेळ दुसरीकडे वळवून मिसळपाव चे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी तर दुसर्या संकेतस्थळाची लिंक देत नसावेत ना ? असा विचार करुन पाहायला काय हरकत आहे ?
17 Oct 2021 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पूर्ण लेख इथे टाकायला पाहिजे, इथून बाहेर पडलं की अजून तिकडेच कुठे जालभटकंती सुरु होते.
आपण मिपावर होतो हे विसरुन जातो, त्यामुळे एकदा इकडे आलो की पुन्हा इकडे तिकडे जायचा कंटाळा येतो.
-दिलीप बिरुटे
5 Oct 2021 - 4:03 am | चौकस२१२
बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल.
हि काय भानगड... दोन्ही चालू राहतील कि .. युती कसली? नसलेला वाद काढू नका
हिंदी आणि इंग्रजीची नको असलेली घुसड हि दोन्ही कडे चालू आहे .. त्यावर काम करा हवे तर
5 Oct 2021 - 11:49 am | चौथा कोनाडा
लेखात त्यांनी एक महत्वाचं वाक्य लिहिलेलं आहे " संस्कृत भाषेचा मारा करून प्रवाही मराठी वाक्यरचनेपासून सर्वसामान्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न होतो "
म्हं जे असं दिसतंय त्यांना असं म्हणायचं की शाळते इंग्रजी/हिंदी/संस्कृत ऐवजी बोलीभाषा शिकवायला सुरुवात करायला हवी !
13 Oct 2021 - 6:31 am | चौकस२१२
संस्कृत भाषेचा मारा ! याला काही पुरावा आहे कि नाही कोण जाणे . शेवटी कोणत्या वर्षी मराठी चा अभ्यास क्रम बदलला होता? कोणाला माहिती आहे > कि ज्यात लेख म्हणतो तसे संस्कृतीकरण झाले असावे !
शाळते इंग्रजी/हिंदी/संस्कृत ऐवजी बोलीभाषा शिकवायला सुरुवात करायला हवी !
कि तेम्हणता आहेत कि मराठीच हे अजून वाढवा ! तसे असेल तर . पण मग विचार करा कि असे धोरण राबवयायला किती काम पडेल! म्हणजे कोकणात, विदर्भात आणि खान्देशात प्रमाण मराठी च्या बरोबर अजून एक त्या त्या भागातील बोलीभाषा वेगळं विषय किंवा उपविषय शिकवा... अरे बापरे म्हणजे राज्याचे अजून तुकडे
आधीच या सी बीएस सी/ आय सीएस सी , १० पद्धतीमुळे प्रमाण मराठी सुद्धा १०० गुणांची मुख्य भाषा ना राहता दुय्यम दर्जाची शिकवली जाते ..
हा असे करता येईल कदाचित कि मुख मराठी विषयात (जर नसेल तर) ३-४ मुख्य बोली भाषांसह नयना दयावे ,,, पण मग परत त्यावर गदारोळ मुख्य बोली भाषा कोणत्या?
"शिक्षणाच्या मातोश्रींचा घो " झालाय सगळा !