गावाचा पिंपळ आणि इतर क्षणिका

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
10 Aug 2021 - 9:31 am

पिंपळाने सोडले
गावाच्या पाऱ्याला.
फ्लैट मध्ये आला
मनी प्लांट झाला.

(२)
वाळूचे मनोरे
वार्यात उडाले.
भग्न स्वप्नाची
अधुरी कहाणी.

(३)
कल्पनेला मिळेना
साथ शब्दांची.
कोरीच राहिली
वही कवितेची.

(४)
पुरोगामी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर

काटा रुते कुणाला
हा दैव योग आहे.
भाला रुते कितींना
हा मोदी योग आहे.

कैच्याकैकविताचारोळ्या

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

10 Aug 2021 - 3:07 pm | प्रसाद गोडबोले

लोकं कविता का "करतात" ?

मदनबाण's picture

10 Aug 2021 - 6:58 pm | मदनबाण

काटा रुते कुणाला
हा दैव योग आहे.
भाला रुते कितींना
हा मोदी योग आहे.

हॉकी हिट मारला आहे तो ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre

राघव's picture

11 Aug 2021 - 5:56 pm | राघव

क्षणिका हा शब्द आवडला!