मागे इथे चित्पावनांबद्दल एक लेख आला होता. त्यासंदर्भाने थोडा अजून प्रकाश टाकणारा एक लेख कालनिर्णय २००४ च्या दिवाळी अंकात पत्रकार 'दिलीप चावरे' यांनी लिहिला होता. तो लेख आणि त्यांनी मांडलेली मते. मिपाकरांनीही प्रतिसाद द्यावेत. याच लेखातले शेवटी ठळकमधे दिलेले चित्पावनांबद्दचे काही उल्लेख हे काही चित्पावन मिपाकरांना न पटणारे असू शकतात. पण लेखकाने त्यांचे संदर्भ दिले आहेत. ते तटस्थपणे वाचले जावेत ही अपेक्षा
-------------------------------------------------
चित्पावन ब्राह्मण ही पोेटजात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचा उपलब्ध इतिहास जेमतेम चारशे वर्षांचा आहे . आम्ही अस्सल भारतीय आहोत असे एकीकडे सांगणारे चित्पावन त्याच वेळी आपले मूळ शोधण्याची खटपट करताना आढळतात. ते कशासाठी ? चित्पावन आणि इतर यांच्यात ठळक फरक आढळतात. ते कसे ? अल्पसंख्य असूनही चित्पावनांचे योगदान प्रचंड आहे . बौद्धिक पराक्रमाबरोबरच अभिजात कलाविष्कार , क्रीडा , लष्कर , राष्ट्रभक्ती आणि परदेशातील यशप्राप्ती आदी विविध क्षेत्रांवर त्यांचा ठसा आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा चित्पावनच होता. तर त्यांचे गुरु आणि शिष्यही अनुक्रमे रानडे , भावे हे चित्पावनच होते . एकंदरीत असे म्हणता येईल की , चार लोकांत चित्पावन उठून दिसतो. मराठी जरीपटका पार अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत फडकावणाऱ्या पेशवाईच्या अमलाखाली आजचा बहुतांश भारत आलेला होता. युनियन जॅक १८१८ साली शनिवारवाड्यावर फडकावणारा एक चित्पावन ब्राह्मणच होता. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक , आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवत फडके , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , एका मागोमाग एक फासावर चढणारे तिघे चापेकर बंधू , ' सुधारक ' गोपाळ गणेश आगरकर , स्त्री - शिक्षणाचे प्रणेते धोंडो केशव कर्वे , पहिले भारतीय रँग्लर रघुनाथराव परांजपे अथवा भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे अशी शेकडो नररत्ने या पोटजातीत निपजली. परंतु चित्पावनांच्या योगदानाला महाराष्ट्राने पुरेसा न्याय दिलेला नाही. पेशव्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांच्या जेवणावळी अधिक लोकांना माहीत आहेत . गेल्या काही वर्षात या पोटजातीवर बरेच शास्त्रीय संशोधन होत आहे . एवढी देैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या या पोटजातीबद्दल अधिक चर्चा आणि संशोधन व्हावे असा या लेखाचा उद्देश आहे . लेखातील शास्त्रीय संशोधनाचा तपशील इंटरनेटवरून घेतलेला आहे . ' कोकणस्थ ' , ' चित्पावन ' किंवा ' दीक्षित ' असे शब्द दिल्यास ही माहिती इंटरनेटवर सापडेल .
चिपळूण आणि त्याचा परिसर म्हणजे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांचे मूळ वसतिस्थान असल्याची समजूत आहे. तेथेच परशुरामाचे मंदिर असल्याने कोकणस्थ आणि परशुराम यांचा संबंध सहजपणे जोडला जातो . एके काळी चित्पावनांना चिपळोणे म्हटले जाई . मात्र वारली , आगरी , कुणबी , मराठे किंवा देशस्थ ब्राह्मण यांच्याबद्दल इतिहासात जसे वारंवार उल्लेख आढळतात तसे चित्पावनांचे दिसत नाहीत . ही पोटजात चारशे वर्षांपेक्षा फार जुनी असल्याचा निर्णायक पुरावा अद्याप तरी उपलब्ध झालेला नाही. चित्पावनांचे वर्णवैशिष्ट्य आणि स्वभाववैशिष्ट्य लक्षात घेता भारतात तरी त्यांचे कोणत्याच लोकसमूहाबरोबर साधर्म्य आढळत नाही . पोर्तुगीज राष्ट्रातील प्रजा किंवा ज्यू धर्माचे लोक यांच्याबरोबर मात्र ते साम्य कमालीचे आहे. एकांडेपण , सातासमुद्रापलीकडे जाण्याची मानसिकता आणि पराक्रम ही गुणवैशिष्ट्ये पोर्तुगीज आणि चित्पावन यांच्यात समान आहेत. वंशशुद्धी राखण्याचा प्रयत्न , कृपणपणा , व्यवहारचातुर्य किंवा कर्ज देणे हे ज्यू लोकांचे गुण चित्पावनांत सर्वसाधारणपणे आढळतात. युरोपच्या मुख्य प्रवाहापासून पोर्तुगीज नेहमीच फटकून राहिले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा अपवाद वगळता कोकणस्थ ही पोटजात महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून काहीशी अलिप्त राहिली. एखादी संस्था स्थापन करून ती नमुनेदार पद्धतीने चालवण्यावर चित्पावनांचा भर राहिला. मात्र समाजाबरोबर चालणे त्यांना रुचले नाही.
एकेकाळी अटकेपार मराठी जरीपटका नेणारे कोकणस्थ असे विरक्त होण्याचे कारण तरी काय असेल , हा प्रश्न मला नेहमीच सतावत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन मराठेशाहीची पायाभरणी केली . ज्या परिस्थितीत आपली कामगिरी त्यांनी पार पाडली तिला जगाच्या इतिहासात तोड सापडणार नाही , देव , देश आणि धर्म या त्रयीचे अमृत पाजून त्यांनी मराठी तेज जागे केले . उत्तरेतील शहेनशाही आणि दक्षिणेतील आदिलशाही छत्रपतींच्या साध्या नामोल्लेखाने चळाचळा कापू लागल्या. मराठेशाही नेस्तनाबूत करण्यासाठी आलेला औरंगजेब अखेर मराठी मातीतच इतिहासजमा झाला. मात्र मराठेशाहीचा उत्कर्ष होतच गेला. छत्रपतींचे स्वप्न साकार होऊ लागले. दिल्लीचे तख्त फोडून वीर मराठा अटकेपार गेला. महाराष्ट्र आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात मराठी अंमल स्थापन झाला. जाट , शीख , रजपूत आणि इतर जमातींनी मुगलांसमोर पत्करलेल्या शरणागतीच्या पार्श्वभूमीवर मराठेशाहीने ही अचाट कामगिरी जेमतेम शंभर वर्षांच्या काळात करून दाखविली. ' मराठा गडी यशाचा धनी ' असे कवन सर्वतोमुखी झाले. परंतु या कामगिरीचे नेतृत्व करणारे पेशवे जनमानसावर अधिराज्य करू शकले नाहीत. त्यांचा पराक्रम विस्मृतीत गेला आणि तथाकथित लढवय्या घराणी ब्रिटिशांच्या चरणी लीन होण्यात धन्यता मानू लागली. यास महाराष्ट्राचा इतिहास साक्षीदार आहे.
प्रस्तुत लेखाचा विषय कोकणस्थांची गेल्या चारशे वर्षांमधील कामगिरी आणि त्यांना सतत सहन करावा लागलेला दुस्वास. इतिहास कोणाला न्याय नाकारत नाही आणि कोणाला क्षमाही करत नाही. शिवाजीराजांना दरोडेखोर म्हणणारे पंडित जवाहरलाल नेहरू अखेर सत्यासमोर नतमस्तक झाले आणि प्रतापगडावर त्यांनी महाराजांना मानाचा मुजरा केला. ' मुंबई महाराष्ट्राला कदापि मिळणार नाही ' , अशी दर्पोक्ती करणारे स . का . पाटील अपमानित अवस्थेत राजकारणाबाहेर फेकले गेले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. कोकणस्थांबाबत निर्माण होणारा प्रश्न म्हणजे प्रवेदी दैदीप्यमान कामगिरी करूनही समाज आणि ही पोटजात यांच्यात एक सुप्त दुरावा कायम राहिला. महात्मा जोतिराव फुले यांची ब्राह्मणविरोधी चळवळ ही चित्पावनविरोधी होती असे मानणारेही अनेक आहेत. पेशवाईतील जेवणावळीवर टीका करणारे असंख्य तथाकथित विद्वान आढळतात. पण पेशव्यांनी परप्रांतात गाजवलेल्या पराक्रमाबद्दल चकार शब्द ते काढत नाहीत. मुगलांबद्दल प्रेमाचा उमाळा येणारे पेशव्यांबाबत एवढे कठोर का होतात किंवा एकूणच समाजात पेशवाईबद्दल अढी का आढळते , आदी प्रश्नांचा खोलवर विचार करता असे जाणवते की , कोकणस्थ ही पोटजात महाराष्ट्रात अचानक उदयास आली. याबाबतचे संक्षिप्त वैज्ञानिक विवेचन या लेखाच्या पुढील भागात आहे.
या विषयाच्या मर्यादेत तपशीलवार विश्लेषण करणे शक्य नसले तरी समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी आणि इतिहास संशोधकांनी अधिक प्रकाश टाकण्यासारखा हा विषय आहे. एवढा असामान्य पराक्रम गाजवणारी पेशवाई उपहासाचा विषय का बनली , हा विस्तृत संशोधनाचा विषय आहे. काही गुण आणि काही अवगुण प्रत्येक व्यक्तीत तसेच प्रत्येक राजवटीत आढळतात. याला अपवाद म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा कारभार. देव , देश आणि धर्म अशा त्रयीला नमन करून त्यांनी राज्य केले. त्यामुळे अत्याचार , अन्याय आणि अधर्म यांना त्यांच्या काळात स्थान नव्हते. चैन , विलास , संपत्ती यांना राजांनी महत्त्व दिले नाही. पेशवाईच्या काळात विशेषतः अखेरच्या ५० वर्षात या गोष्टींचा अतिरेक झाला . अटकेपार झेंडे नेणारा राघो भरारी सिंहासनाच्या मोहाला बळी पडला आणि सारी पेशवाई बदनाम झाली. आधीचे पराक्रम पुसले गेले. बाकीचा भारत पादाक्रांत करून ब्रिटिशांनी पेशवाईचा घास घेतला आणि संपूर्ण भारतावर गोरा अंमल प्रस्थापित झाला. उत्तरेतील शहेनशाही किंवा दक्षिणेतील आदिलशाही संपुष्टात आल्याबद्दल व्यक्तिगतरित्या कोणालाही जबाबदार ठरवण्यात आले नाही. पेशवाई गेल्यानंतर मात्र ' पळपुटा ' बाजीराव अपयशाचा धनी ठरला. नाना फडणवीस खलनायक ठरला. भाऊबंदकीने साक्षात छत्रपतींच्या पुत्रांना सोडले नाही. मुगलांचा तर प्रत्येक सत्तापालट रक्तलांच्छित होता . महत्त्वाकांक्षी माणूस सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो हा मानवी इतिहास विसरून पेशवाईवर टीकेची झोड उठवण्यात आली. जेवणावळी वादग्रस्त ठरल्या. जणू जेवणांमुळेच राज्य गेले असा समज निर्माण करण्यात आला. पेशवे म्हणजे पर्यायाने चित्पावन ब्राह्मण गुन्हेगार ठरले. पेशवे एखादे देशस्थ ब्राह्मण घराणे असते तर टीका एवढी टोकदार राहिली असती काय , हा प्रश्न नेहमीच पडतो. महाराष्ट्रातील पारंपरिक गावगाडा पाहिल्यास ब्राह्मणांपैकी देशस्थ स्थानिक लोकांबरोबर मिळून - मिसळून राहिल्याचे आढळते. पाटील आणि कुलकर्णी म्हणजे महाराष्ट्रातील महसूल आणि कायदा सुव्यवस्था यंत्रणेचे प्रमुख. याखेरीज उपाध्ये आणि भिक्षुकी वृत्ती करणारे देशस्थ जन्मापासून मृत्यूपर्यंत बहुजन समाजाच्या सतत संपर्कात होते . कोकणस्थ जमात उदयाला आली पेशव्यांबरोबर. तोपर्यंत तिचे अस्तित्व नगण्य होते . पेशवाईत कोकणस्थांचे स्थान शासक म्हणून प्रस्थापित झाले. छोटे संस्थानिक ठिकठिकाणी नेमण्यात आले . म्हणजे पुन्हा प्रजेपासून अंतर दुसरे कारण असे की , आपल्या भूमीत फारसे हे करणे त्यांना शक्य नसल्याने अन्यत्र जाऊन कर्तबगारी साकारण्याची संधी शोधणे त्यांना क्रमप्राप्त झाले. पुण्यात वाव नव्हता म्हणून परमुलखात जाऊन त्यांनी पराक्रम केले . राघोबादादा अगदी अटकेपार गेले. स्वदेशाबाहेर जाऊन आक्रमण करण्याचे हे ऐतिहासिक पाऊल म्हणावे लागेल . आपल्या तलवारीचे पाणी शत्रूच्या मुलखात जाऊन त्याला पाजण्याचे सर्वप्रथम धाडस शिवाजी महाराजांनी दाखवले . तत्कालीन स्थितीमुळे त्यांना अधिकांश काळ महाराष्ट्रात खर्च करावा लागला . अन्यथा त्यांची दूरदृष्टी आणि मुत्सद्दी वृत्ती पाहता मराठी अंमल उत्तरेत स्थापन करण्याची सुवर्णसंधी ते सोडणे शक्यच नव्हते . महाराजांचे ईप्सित पेशवाईत साध्य झाले आणि ग्वाल्हेर किंवा इंदूरसारखी महत्त्वाची शहरे मराठा राज्याची केंद्रे बनली . शिवशाही ते पेशवाई या दरम्यानच्या काळात अंतर्गत कलहामुळे जर्जर बनलेल्या मराठेशाहीचा डंका पुन्हा भारतभर दुमदुमला. तथापि या उज्ज्वल भूतकाळाकडे दुर्लक्ष करून पेशवाईला फक्त दूषणे देणारे अनेक आढळतात . महाराष्ट्रात चित्पावनांबद्दल एक प्रकारची अढी दिसून येते . ती प्रथमपासून होती की ब्रिटिशांनी रुजवली , याचेही संशोधन झाले पाहिजे . आपल्याला त्रास होणार तो चित्पावनांकडूनच याचा इशारा धोरणी ब्रिटिशांना सहज समजण्यासारखा असणार . नानासाहेब पेशव्यांच्या रूपाने तो खरा ठरला . उत्तर भारत १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धात होरपळत असताना महाराष्ट्र मात्र शांत होता , कारण ही लढाई आणि सत्तास्पर्धा पेशवे अन् ब्रिटिश यांच्यापुरतीच मर्यादित असल्याची भावना निर्माण झालेली होती . वासुदेव बळवंत फडक्यांनी सशस्त्र क्रांती उभी करण्याचा प्रयत्न केला . प्रस्थापित हिंदू बहुजनसमाज त्यापासून दूर राहिला . जनमानसाची ही नाडी समजणारे लोकमान्य टिळक स्वत:स तेल्यातांबोळ्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागले , याचे इंगित सर्वसामान्यांच्या लक्षात फार उशिरा आले . तोपर्यंत ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब करून ब्राह्मण आणि मराठा या दोन प्रमुख जातींमध्ये कमालीची तेढ निर्माण करून ठेवली होती. चापेकर बंधू किंवा वीर सावरकर यांचा त्याग केवळ अतुलनीय होता . परंतु नथुराम गोडसे याच्या आततायी कृतीमुळे स्वतंत्र भारतात त्यांना मानसन्मान प्राप्त झाला नाही . एवढेच नव्हे तर ग्रामीण भागांतला चित्पावन ( कोकण वगळता ) शहरांकडे वळला . राजकारणातही स्थान नसल्याने त्याने परदेशी जाण्याचा पर्याय स्वीकारला . आज अमेरिकेतील मराठी माणसांपैकी बहुसंख्य कोकणस्थ यशस्वी आहेत ते विनाकारण नव्हे . चित्पावन , कोकणस्थ ब्राह्मण किंवा एकूणच ब्राह्मण जातीचे प्रमाण महाराष्ट्राच्या लोकसंख्येत जेमतेम पाच टक्के आहे . ' साडेतीन टक्के ' असा उल्लेख प्रामुख्याने ब्राह्मणांना हिणवण्यासाठी करण्यात येतो . चित्पावन वगळता अन्य मराठी लोकांनी आपले मूळ शोधण्याचा खटाटोप केलेला नाही . आपणच इथले मालक अशी भावना त्यांच्यात उपजत आढळते . पण चित्पावन मात्र आपले अस्तित्व शोधण्यासाठी धडपडत असतात . कुलवृत्तांत ग्रथित करणारी महाराष्ट्रातील एकमेव जमात म्हणजे चित्पावन , अर्थातच त्यांची व्याप्ती चारशे वर्षांपेक्षा कमी कालखंडाची . महाराष्ट्रातील मराठे , कुणबी , आगरी , कोळी , बारा बलुतेदार आदींच्या डीएनए चाचण्या होतील तेव्हा आणखी बराच तपशील उपलब्ध होईल आणि महाराष्ट्राचा मानववंशशास्त्र इतिहास स्पष्ट होत जाईल. सोबत एक चौकट आहे . विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या लेखसंग्रहातून ती घेतलेली आहे . महाराष्ट्राचा अंदाजे १००० वर्षांचा लोक - इतिहास शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
परशुरामाने चित्पावन जमात निर्माण केली असे म्हणणारे अनेक आहेत. असे गृहीत धरल्यास मधली हजारो वर्षे ही जमात कोठे लुप्त झाली होती , याचे स्पष्टीकरण कोणालाच देता येत नाही . चित्पावनांची स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेता त्यांच्यावर ब्रिटिशांची वक्रदृष्टी कायम का राहिली याचे रहस्य उलगडता येते. विशेषतः पुणेरी चित्पावनांवर त्यांचा दात होता. त्याची चर्चा थोडक्यात पुढे आहे . या मुद्याची दुसरी बाजू म्हणजे चित्पावनांची गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षामधील कामगिरी . याबाबतचा इतिहास उपलब्ध आहे . त्यामुळे प्रश्न आहे याबाबत महाराष्ट्राने योग्य दखल घेतली की नाही एवढाच . एखादी व्यक्ती किंवा एखादी जमात यांच्यावर सतत अन्यायच होताना दिसतो . दैववादी असणारे लोक याला दुर्दैव किंवा परमेश्वरी अवकृपा म्हणून मोकळे होतात. इतरेजन त्याबाबतची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण जगाचा विचार करताना ज्यू धर्माचे उदाहरण सम्मेर येते . सुमारे २००० वर्षांच्या संघर्षानंतर इस्त्रायलच्या रूपाने या धर्माच्या लोकांना स्वत : ची भूमी प्राप्त झाली . त्यानंतरही त्यांच्याविरुद्धची मोहीम आणि कारस्थाने चालूच राहिली . कोकणस्थांबाबत १ ९ ४८ चा अपवाद वगळता असे घडले नसले तरी त्यांचे महत्त्व कमी लेखण्याच्या प्रवृत्तीला सतत उत्तेजन देण्यात आले . शक्य त्या सर्व आयुधांचा वापर करण्यात आला . जातीयवादाचा आश्रय प्रच्छन्नपणे घेण्यात आला . चित्पावनांनी केलेला त्याग बिनमहत्त्वाचा ठरला . वास्तविक स्वातंत्र्यसंग्रामातील या जमातीचे योगदान असामान्य आहे . महाराष्ट्राचे राजकारण , अर्थकारण आणि समाजकारण यांच्यात चित्पावन नेहमीच आघाडीवर होते. मात्र राजकारण हा प्रांत त्यांच्यासाठी निषिद्ध ठरू लागला . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आरंभीचा काळ सोडता चित्पावनही काँग्रेसच्या राजकारणापासून दूर गेले . इतर पक्षांचा पर्याय त्यांनी स्वीकारला . परंतु प्रथमपासून काँग्रेसच्या प्रभावाखाली असलेल्या महाराष्ट्रात त्यांचे राजकीय अस्तित्व नगण्य राहिले . कोकणस्थ हा शब्दप्रयोग आधी म्हटल्याप्रमाणे सर्वसमावेशक आहे . चित्पावन म्हणजे त्यापैकी एक अल्पसंख्य गट , मात्र या गटाचे बौद्धिक वर्चस्व महाराष्ट्रावर राहिले हे निर्विवाद . शिक्षण आणि वर्तमानपत्रे ही मोक्याची क्षेत्रे चित्पावनांच्या ताब्यात आरंभापासून राहिली . पेशवे पुण्यास आल्यानंतर चित्पावनांचा उल्लेख तत्कालीन लेखनात होऊ लागला . त्यामुळे या लेखाच्या कालखंडाची व्याप्ती स्थूलपणे १७००
ते २००० अशी तीनशे वर्षांची मानता येईल . त्या मर्यादेतच प्रत्येक विधानाचा अर्थ ठरणार आहे . तेव्हाच्या परिस्थितीनुसार एकंदरीतच शिक्षण क्षेत्र ब्राह्मणांसाठी राखीव होते असे म्हणणे गैर ठरणार नाही . पेशवाईच्या उदयानंतर त्यावर चित्पावनांनी आपली मक्तेदारी स्थापन केली . त्या काळातील विद्वान देशस्थ म्हणजे घनपाठी ब्राह्मण , वेदविद्या आणि संस्कृत भाषेचा अभ्यास चालू ठेवण्यात त्यांनी समाधान मानले . आधुनिक शिक्षण त्यांच्यापासून दूर राहिले . तेथे चित्पावन स्थिरावले . त्यांनी येणारी संधी अचूक हेरून तयारी सुरू केली . एकीकडे बहुजनसमाज पारंपरिक बंधनात जखडला आहे तर दुसरीकडे एक अल्पसंख्य गट वेगाने प्रगती करत आहे , असे चित्र निर्माण होऊ लागले . वर्ण आणि शिक्षण यांच्यामुळे आत्मप्रौढीची भावना अगदी आजही सहजपणे निर्माण होताना दिसते . त्या काळात तर यांच्या जोडीस राजकीय सचाही होती . त्यापुढे चित्पावन अत्यंत थोडक्या काळात इतरांच्या पुढे गेले सत्ता आणि दुर्गुण यांची जोडी अभिन्न आहे . जसजशी सत्ता वाढत गेली तसतसे तिच्या गैरवापराचे प्रमाणही वाढत गेले . या गैरवापसचे चटके बहुजनसमाजाला बसले आणि सत्ताधीशांबद्दल अधिकाधिक नाराजी वाढली . कारभार करताना त्रास होऊ नये म्हणून नेता नेहमीच समाजातील प्रमुख वर्ग वश करण्याचा प्रयत्न करतो . महाराष्ट्रात इंग्रजांनी हेच केले . अगदी ब्राह्मणांच्या दक्षिणाही कायम ठेवल्या . त्यांना इंग्रजी भाषा शिकण्यास प्रवृत्त केले . सरकारी नोकऱ्या दिल्या. आधीच गरीब असलेले बहुसंख्य चित्पावन असल्या प्रलोभनांना बळी पडले आणि पुन्हा एकदा शिक्षण किंवा प्रशासन अशा ठिकाणी प्रस्थापित झाले . पांढरपेशा नावाची नवी जमात महाराष्ट्रात वाढू लागली. पोस्ट , रेल्वे , मामलेदार कचेरी अशा जनसंपर्काच्या जागांवर त्या काळी प्रामुख्याने चित्पावन होते याची प्रचीती तेव्हाच्या कोणत्याही संदर्भावरून सहजपणे येते . शिक्षकही प्रामुख्याने याच वर्गातील होते. फटकळपणा , बेदरकार स्वभाव , हिशेबी वृत्ती आणि आढ्यता ही वैशिष्ट्ये चित्पावनांत आजही काही प्रमाणात सापडतात . त्या काळात तर त्यांचा कहर झालेला असणार . त्याचा अपेक्षित परिणाम झाला. बहुसंख्य समाज आणि चित्पावन यांच्यातील दरी वाढत गेली . याचे दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजे गणेशपूजा . पेशवाई आली , गणेशपूजनाची परंपरा सुरू झाली . तोपर्यंत महाराष्ट्राची दैवते होती विठोबा आणि खंडोबा . प्रथम वंदनाचा मान असलेला गणपती हे ग्रामदैवत होते . लोकमान्यांच्या दूरदृष्टीचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी गणेशोत्सवास सामाजिक रूप दिले . पेशव्यांच्या आणि चित्पावनांच्या देव्हाऱ्यातील गणेशाला त्यांनी राष्ट्रीय अस्मितेची देवता म्हणून समाजप्रिय केले. देव म्हणजे गणपती आणि आदर्श पुरुष म्हणजे शिवाजी महाराज अशी दोन दैवते समोर ठेवून त्यांनी राजकारण केल्याने बहुजनसमाज त्यांच्यामागे गेला . म्हणूनच त्यांना लोकमान्य हे असामान्य बिरुद जनतेने अर्पण केले. मराठी वर्तमानपत्रसृष्टीची शक्ती वापरून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तर टिळकांनी या दोहोंचा अवलंब करून ' राष्ट्रीय असंतोषाचे जनक ' म्हणून समाजमनावर अधिराज्य केले . वासुदेव बळवत फडके यांनी सशस्त्र क्रांतीचा पहिला उठाव केला . देशातील पहिली प्रमुख राजकीय हत्या चापेकर बंधूंनी केली , तर सावरकरांनी ब्रिटिश सत्तेलाच आव्हान दिले . या प्रत्येकाचे कार्य आणि त्याग अतुलनीय होते. तरीही एक टिळक वगळता इतर कोणीही समाजनेते होऊ शकले नाहीत . त्यांच्या बाबतीत हे का घडू शकले नाही ( स्वतंत्र भारतात तर निवडणुकीच्या राजकारणातून चित्पावन हहपोरच झाले . काकासाहेब गाडगीळ किंवा बाबासाहेब परांजपे , एस . एम . जोशी किंवा ना . ग . गोरे , विठ्ठलराव गाडगीळ अथवा हरिभाऊ गोखले अशा नावांवरून सर्वसामान्य निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल . त्याची कारणे स्पष्ट आहेत . नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केली . चित्पावन अधिकच बदनाम झाले . याचीही पार्थभूमी निवडणुकीच्या राजकारणास लाभली . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंप आणि भारतीय जनता पक्ष यांचा प्रत्येक कार्यकर्ता अथवा समर्थक म्हणजे नथुरामचा चाहता असा गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला. आजही अधूनमधून त्याचा प्रत्यय येत असतो . महात्माजींची अवज्ञा करून काँग्रेस पक्षाने फाळणी स्वीकारली या कटु सत्याकडे डोळेझाक करण्यात येते . डीएनए चाचणी म्हणजे सध्या निर्णायक पुरावा मानण्यात येतो. या मार्गाने कोकणस्थ ब्राह्मणांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही चित्पावनांच्या तोंडातील कातडीचे सूक्ष्म नमुने गोळा करून ऑक्सफर्ड येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यानुसार निघालेला प्राथमिक निष्कर्ष असा आहे की , सर्व चित्पावनांचा जन्म एकाच आईपासून झाल्याचे दिसत नाही . ऑक्सफर्ड येथील तज्ञांच्या मते बहुसंख्य नमुन्यांची जातकुळी ' झेनिया ' नामक मानवगटाच्या डीएनएबरोबर मिळतीजुळती आहे . डीएनएची ही रचना ब्लॅक सी परिसरात आढळते. झेनिया मानवगटाची संतती संपूर्ण युरोपात आढळते. पूर्वज शोधण्याच्या कामात गढून गेलेल्या संशोधकांच्या मते ही संतती आणि चित्पावन यांचे मूळ काही अंशी समान आहे . मात्र काही चित्पावन ब्राह्मणांची जातकुळी ' उना ' या मानवगटाबरोबर साम्य दाखवते. अशा नमुन्यांचे प्रमाण अगदी अल्प असले तरी त्यांना जन्म देणाऱ्या पूर्वज स्त्रियांचे वास्तव्य आर्मेनिया , तुर्कस्तान , सीरिया आणि इराक या पट्ट्यात असल्याचा पुरावा उपलब्ध आहे . ऑक्सफर्ड प्रयोगशाळेच्या अभ्यासानुसार ' उना ' ही डीएनए रचना अत्यंत दुर्मिळ आहे. नवीन संशोधनानुसार भारतातील २० ते ३० टक्के उच्चवर्णीय हिंदूंचे मूळ पश्चिम युरेशिया भागात होते . त्यामुळे चित्पावनांचे पूर्वजही ब्लॅक सी परिसर आणि आर्मेनिया - तुर्कस्तान - सीरिया - इराक अशा दुहेरी पट्ट्यातून भारतात आले असल्याच्या तर्काला सध्यातरी पुष्टी मिळत आहे. अशा संशोधनावरील भरपूर तपशील अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे . नवा तपशील मिळत जाणार आहे. ह्युस्टन येथील डीएनए प्रयोगशाळेने पुरविलेल्या तपशिलाबरोबर ' य ' पेशी ( वाय क्रोमोझोम ) नमुने ताडून पाहण्यात आहे. ब्लॅक सी परिसरातील ' अश्केनाझी ' नामक ज्यू जमातीच्या डीएनए गुणधर्माबरोबर या नमुन्यांचे कमालीचे साम्य आढळून आले. यावरून होणारा एक तर्क म्हणजे ज्यू आणि चित्पावन १५०० ते ३००० वर्षापूर्वी एकाच पूर्वजगटापासून निर्माण झाले . संपूर्ण जगात चित्पावनांचे वंशशास्त्रीय साम्य या ज्यू जमातीबरोबर सर्वाधिक आढळून येते. अश्केनाझी जमात बहुतांश पूर्व युरोपची रहिवासी असून इस्रायलच्या स्थापनेत तिचा पुढाकार आहे . याच जमातीची प्रजा अमेरिकेत प्रबळ आहे . ज्यू धर्माचे आणखी दोन प्रमुख वंश आहेत . त्यापैकी सेफार्डिक वंशाचे लोक स्पेनमध्ये तर मिझराची वंशाचे लोक इराण - इराकचे रहिवासी होते . त्यांच्या तुलनेत अश्केनाझी जमातीच्या लोकसंख्यावाढीचा वेग फार जास्त आहे. ज्यू आणि चित्पावन यांची अनेक समान वैशिष्ट्ये आहेत . धूर्तपणा , बुद्धिमत्ता , कृपणता , कष्टाळू वृत्ती , खस्ता खाण्याची तयारी , मुलांच्या शिक्षणाची कळकळ आणि आपला भूतकाळ तसेच संस्कृतीबाबत कमालीची जागरूकता अशा काही गुणांचा उल्लेख या संदर्भात करता येतो. त्यामुळे विस्थापित झालेला ज्यूधर्मीय एखादा समूह भारतात आला असण्याची शक्यताही नजरेआड करता येत नाही . अगदी आजही अलिबाग परिसरातील ज्यू स्वच्छ मराठी बोलतात , चित्पावनांसारखेच गोरेगोमटे दिसतात. रायगड आणि रत्नागिरी अशी स्थाननामे नंतर प्रचारात आली. त्या काळात हे अंतर ( म्हणजे अलिबाग - गुहागर ) फारसे नव्हते . या संदर्भात उल्लेखनीय मुद्दा म्हणजे सर्व मानवप्राण्यांची जन्मदात्री एकच होती असा डीएनए शास्त्रज्ञांचा सिद्धांत. काळा , पिवळा , तांबडा किंवा गोरा असा कातडीचा रंग कोणताही असला तरी मानवाचा वंश एकच आहे असे त्यांचे म्हणणे आहे . मानवास सर्वात जवळचा प्राणी म्हणजे चिंपांझी . त्याचे तीन वंश आहेत . तथापि मानवाच्या बाबतीत जगभर एकच वंश आहे . मानवी डीएनए सर्वप्रथम आफ्रिकेत उपजला आणि त्यानंतर जगभर पसरला , असे आता स्पष्ट झाले आहे. स्थलानुसार आणि हवामानानुसार विविध वर्ण विकसित झाले आणि त्यानुसार मानवगट स्थिरावले . मात्र त्यांची डीएनए रचना समान राहिलेली आहे . त्याबाबतच्या संशोधनामधून नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे.
चित्पावनांच्या संदर्भात असे दिसून आले की , अपवादात्मक का होईना पण त्यांच्यात ' लताशा ' ही आफ्रिकेतील जमात धारण करत असलेली डीएनए वैशिष्टो सापडली. हे साम्य कसे दिसले याचा समाधानकारक खुलासा अद्याप शास्त्रज्ञांना सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे . विशेष म्हणजे ' लताशा ' डीएनए आफ्रिकेबाहेर अद्याप सापडलेला नाही . चित्पावन हा आजवरचा याबाबतचा जागतिक अपवाद.
सूर्य , अग्नी , ज्ञानदेवता , गोमाता यांच्या प्रतिमांचे पूजन प्राचीन काळात ज्यूधर्मीयांचा एक समूह करीत असे . मात्र त्याचे प्रमाण अल्प होते . अखेर मूर्तिपूजक एकीकडे आणि बाकीचे त्यांच्याविरुद्ध अशी विभागणी होऊन इ. स. पूर्व ८१६-८०० या काळातील जीहोवा राजाच्या अमदानीत मूर्तिपूजकांना हाकलून लावण्यात आले. मूर्तिपूजक आर्य आणि ज्यू मूर्तिपूजक एकत्र येणे अशक्य कोटीतील बिलकूल नव्हते. कारण त्यापूर्वीच सिकंदराने भारतापर्यंतचा रस्ता खुला करून ठेवलेला होता. चित्पावन आणि ज्यू यांच्या इतिहासातील आणखी एक साम्य म्हणजे १४ मृतांना पुन्हा प्राणदान करून परशुरामाने संजीवनी दिली अशी चित्पावनांची समजूत आहे , तर ज्यू पुराणानुसार सात पुरुष आणि सात स्त्रिया असे फक्त चौदा लोक भारतात जिवंत अवस्थेत पोहोचले . असा आणखी बराच तपशील आहे . विज्ञान जसजशी प्रगती करत जाईल तसतशी त्याची संगती लागत जाईल एवढीच अपेक्षा करणे आज तरी हाती आहे . मात्र एकीकडे पोर्तुगीजांची लढाऊ वृत्ती तर दुसरीकडे ज्यूधर्माची उपासना करणाऱ्यांबरोबर साम्य असे मिश्रण स्पष्टपणे जाणवून देणारे चित्पावन यशस्वी भारतीयांच्या यादीत अत्यंत ठळकपणे आढळून येतात. देशात आणि परदेशात कर्तबगारी गाजवणारे चित्पावन अनेक आहेत . त्यांचा तपशील सहजपणे उपलब्ध आहे. प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे या अंगाने अधिक संशोधन व्हावे अशी प्रेरणा निर्माण करण्याचा. हा लेख लिहीत असतानाच चित्पावनांवर प्रसिद्ध झालेले एक पुस्तक पाहण्यात आले . त्यात या लेखाच्या विषयाला स्पर्शही झालेला नाही . राजवाडे , भारताचार्य चिंतामणराव वैद्य आदींचे निबंध असले तरी वैज्ञानिक अंगाने या विषयावर झालेल्या प्रगतीची दखल कोठेही घेतल्याचे दिसत नाही. इ.स. १६०० पूर्वी कोकणस्थ नावाची संघटित पोटजात न सापडणे हे एक रहस्य ठरत असून त्याचा उलगडा झाल्यास अनेक मुद्यांवर प्रकाश पडेल. डीएनए चाचण्यांमुळे आपले पूर्वज शोधणे शक्य झाले आहे . त्यांचा वापर करून महाराष्ट्राच्या इतिहासाचे पुनर्लेखन करता येण्यासारखे आहे . कदाचित तसे घडल्यास कोकणस्थ पोटजातीस अधिक न्याय मिळू शकेल.
-------------------------------------------------------
कोकणस्थ लबाड आहेत !
" कोकणस्थ हे लबाड आहेत. ते वाटेल तेव्हा राष्ट्रीय ( जहाल ) बनतात व वाटेल तेव्हा मॉडरेट ( मवाळ ) बनतात . "
" पण आपल्या पक्षात कोकणस्थ आहेत ना ? तुम्ही कोकणस्थांवर विश्वास ठेवू नये , असे कसे बोलता ? "
'आपल्या पक्षात कोकणस्थ आहेत , त्यांना मी म्हणतो ते सांगायचे नाही. कारण त्यांना आपण आपले खरे विचार कधीच कळू देऊ नयेत. त्यांना आपण झुलवतच ठेवले पाहिजे . ते आपल्या पक्षाला मिळाले तरी त्यांना पुढे येऊ देता कामा नये . नाहीतर हे लेकाचे आहेत हुशार . आपण कोणताही पक्ष काढला तरी त्याला हे कोकणस्थ येऊन मिळतील आणि त्या पक्षाचे पुढारी होतील . म्हणजे आयता तयार झालेला पक्ष ते वापरतात . ते दुसऱ्या पक्षांतील कोकणस्थांविरुद्ध व्याख्याने देतील व त्यामुळे दोन्ही पक्षांतील कोकणस्थांचाच डंका होतो . हे लेकाचे देशस्थाला शिव्यादेखील देणार नाहीत . कारण ज्या देशस्थाला शिव्या मिळतील , त्या देशस्थाला महत्त्व येईल.( श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या आशावादी ' या कादंबरीमधून )
राजकीय ध्येयबुद्धी कोकणस्थ ब्राह्मणांस स्वाभाविक आहे . त्यांना राजकारण कोणी शिकवावयास नको . देशाच्या बरेवाईटपणाची जबाबदारी कोकणस्थ ब्राह्मणांवर असून देशातील इतर लोक आहारनिद्राभयमैथुन या पाशवी पातळीवर जगणारे आहेत . ( ' गोंडवनातील प्रियंवदा ' या श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या कादंबरीमधून )
कोकणातील ब्राह्मण समाजात पूर्वी चित्पावन हे हीन मानले जात होते. त्यांना हेर किंवा हरकारे समजत . देशस्थ ब्राह्मण त्यांना आपल्या पंक्तीला घेत नसत . म्हणून आपण देशस्थ असून अंबेजोगाईहून कोकणात आलो असे काही चित्पावन सांगू लागले. पण ही समजूत भ्रामक आहे. ( ' भारतीय संस्कृती कोश ' )
आमची कोठेही शाखा नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूर येथे झाली . आज ही देशातील सर्वात मोठी अराजकीय संघटना आहे . ही स्थापना झाली तेव्हा पुणे हे राजकीय चळवळींचे केंद्र असल्याने संघस्थापनेची घोषणा पुण्यात व्हावी म्हणून प्रयत्न झाले. ते का सफल झाले नाहीत याचा तपशील उपलब्ध नाही. परंतु संघाची स्थापना नागपुरात झाल्यानंतर त्याचा सतत विस्तार झाला . संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार म्हणजे तेलंगी ( म्हणजे देशस्थ ब्राह्मण) संघ पुण्यात स्थापन झाला असता तर काय घडले असते ? पुण्यातील तत्कालीन काँग्रेसविरोधी ब्राह्मणी नेतृत्व चित्पावनांच्या प्रभावाखाली होते . त्यामुळे एखादा चित्पावन संघाचा संस्थापक झाला असता आणि कोणत्यातरी बोळात त्याने संघ कार्यालयावर ' आमची कोठेही शाखा नाही ' असा फलक लावून अखिल भारतीय म्हणून मिरवणाऱ्या हजारो संस्थांच्या यादीत एकाची भर घालून विषय संपवला असता , अशी उपहासपूर्ण चर्चा आजही ऐकू येते. असल्या चर्चेतून कोकणस्थ ब्राह्मण आणि पुणे यांच्याबद्दलची हेटाळणीची भावनाच स्पष्ट होते.
' सोबत'चे संपादक ग. वा. बेहेरे म्हणजे अगदी चित्पावनांचा अर्क. गोरेपान , निळे डोळे , पिंगट केस असे बेहेरे पहिल्या भेटीतच इतरांवर छाप टाकत असत . पुण्याचा त्यांना विलक्षण अभिमान असे . एकदा मुंबई - पुणे प्रवासात त्यांना गुप्ता नावाचे अस्खलित मराठी बोलणारे गृहस्थ भेटले . दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि रंगत गेल्या . गुप्तांचा पुण्यात कसलासा व्यापार होता. गप्पांच्या ओघात बेहेऱ्यांनी विचारले ,
" गुप्ता , तुम्ही मूळचे कुठले ? "
" आम्ही पुणेकरच " असे उत्तर गुप्तांनी दिले.
ते बेहेऱ्यांना पचले नाही .
" तुम्ही मूळचे पुण्याचे असणे शक्यच नाही. व्यापारानिमित्त उत्तरेतून फिरत आलेले तुमचे पूर्वज पुण्यात स्थायिक झाले असणार , " असे बेहेऱ्यांनी त्यांना सुनावले.
आता गुप्तांमधील पुणेकर जागा झाला.
“ आमचे राहू द्या. बेहेरे साहेब , तुम्ही मूळचे भारतीय आहात याला तरी काय पुरावा आहे ? " असा प्रतिप्रश्न गुप्तांनी केला.
या संभाषणाची अखेर काय झाली हे महत्त्वाचे नाही . मात्र चित्पावनांबद्दलची इतरांची भावना त्यातून स्पष्ट होते .
( जयराज साळगावकर यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमधून )
प्रतिक्रिया
3 Aug 2021 - 4:43 pm | टवाळ कार्टा
मी पयला
4 Aug 2021 - 4:24 am | चौकस२१२
एकूणच समाजात पेशवाईबद्दल अढी का आढळते ,
हा अगदी चांगला प्रश्न आहे .. कौतुकाचे गुन सोडून द्या त्यापेक्षा यावर जास्त विचारमंथन केले तर फायदा होईल
काही कारणे सुचतात पण त्या कारणांबरोबर हा प्रश्न पडतो कि हि कारणे तर सर्व सवर्णनां हि लागू होतायत मग याच एका जमाती वर का रोष?
- छोटी लोकसंख्येने मोठया लोकसंख्यवार राज्य करणे ( मराठा जातीने पण केले पण मराठा निदान २०% तरी असावेत )
- काही प्रमाणात तरी "नेपोटिसम " आले असणारच खास करून पेशवाई स्थापित झाल्यावर
- पेशवे आपल्या जातीचे आहेत हे कारण वापरून त्या जातीतील नाकर्त्यांनी केलेलं चुकीचे वयवहार
-त्याकाळात आज पेक्षा जास्त रूढी परंपरा आणि त्यातून होणार अन्याय जास्त होता ( कि जे सर्व सवर्ण करीत होते फक्त ब्राह्माण नव्हे) अश्या परिस्थिती हातातील सत्ता यामुळे कदाचित झालेले दुरुपयोग !
- एकलकोंडे पण (एकीकडे कितीही चांगले कार्य केलं तरी)
- अतिस्पष्टपणा आणि त्याच बरोबर असलेल्या धूर्ततेचा केला गेलेला वाईट उपयोग ?
- सध्या च्या परिस्थितीत नेमके सेनेने आणि भाजपने जोशी आणि फडणवीस मुख्यमंत्री नेमले त्यामुळे जणू काही "जखमे वर मीठ " अशी भावना निर्माण कार्याला काही नेत्याना सोप्पे गेले आणि त्यातून भाजप म्हणजे भटांचाच पक्ष हे समीकरण सिद्ध कार्याला अजून सोप्पे गेले
3 Aug 2021 - 5:20 pm | श्रीगुरुजी
दिवे-आगर येथील शक ९८२ चा (म्हणजे इ.स. १०६०) ताम्रपट उल्लेखनीय आहे. या ताम्रपटात जी व्यक्तिनामे आली आहेत त्यांत घैसास, देवलु (देवल) मावल भट्ट (महाबळ भट) ही नावे येतात. घैसास, देवल व महाबळ ही कुलनावे (किंवा आडनावे) फक्त चित्पावनात आहेत. तेव्हा या आडनावांचे चित्पावन अकराव्या शतकातही होते हे उघड आहे. म्हणजे चित्पावन ब्राह्मण याआधीही असणार.
4 Aug 2021 - 10:41 am | उपयोजक
इतक्या किरकोळ पुराव्यावरुन ठाम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. बरं जरी ९ व्या शतकात ते असले तरी त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने दिसायला १७ वे शतक का उजडावे लागले? ९ ते १६ या शतकांदरम्यान काही दखलपात्र घडले का त्यांच्याबद्दल?
BTW लेखकाचा(आणि माझाही)हेतु ''बघा बघा चित्पावन परदेशातून आलेत. पाठवा त्यांना त्यांच्या मूळच्या देशात!" वगैरे 'मूळनिवाशीछाप' नाहीये बरं का! ; )
4 Aug 2021 - 11:13 am | श्रीगुरुजी
मुळात ९ वे शतक ते १७ वे शतक या दरम्यान काही थोड्या संतांचे अपवाद वगळता इतर कोणत्याही ब्राह्मणांबद्दल काही दखलपात्र आढळून येत नाही.
चित्पावन ब्राह्मणांचे उल्लेख काही पुराणे, प्राचीन संस्कृत वाङमयात सुद्धा आढळतात. सापडले की सांगतो.
कोकण भागात वस्ती असणारे ब्राह्मण ते कोकणस्थ ब्राह्मण अशी साधी व्याख्या आहे. ते कोठूनतरी बाहेरून आले हा समजच मुळात चुकीचा आहे. आर्य बाहेरून भारतात आले हा सिद्धांतच मुळात चुकीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच कोकणस्थ ब्राह्मणांचे सुद्धा आहे.
4 Aug 2021 - 5:00 pm | उपयोजक
भास्कराचार्य
शिवाय गाथासप्तशतीमधेही ब्राह्मणांचे उल्लेख आहेत. ग्रंथ तर २२०० वर्षांपूर्वीचा असावा. हे दोन पुरावे केवळ महाराष्ट्राबद्दलचे
4 Aug 2021 - 7:14 pm | अनिरुद्ध.वैद्य
बाकि काही जातिंसंबंधी किती उल्लेख आढ्ळतात का ते ही बघायला हवे. म्हणजे, नेमकं कळेल, कोकणातले सगळ्याच जातींचे लोक कोकणाच्या बाहेर कितपत माहिती होते.
4 Aug 2021 - 8:04 pm | प्रचेतस
किरकोळ?
ताम्रपट, शिलालेख, नाणी ही अत्यंत विश्वसनीय साधने म्हणून समजली जातात तर पुराणे वगैरे दुय्यम साधने.
4 Aug 2021 - 9:36 pm | आनन्दा
तो बहुधा उपरोधिक होते.
6 Aug 2021 - 9:28 am | प्रचेतस
शके ११२४ च्या जैत्र सामंताच्या जालगाव ताम्रपटात नारायण घैसास आणि त्याचा मुलगा गोविंद घैसासाचा उल्लेख आहे. पंढरपूरच्या रामदेवरायाच्या काळातील चौर्याऐंशीच्या शिलालेखात काही कोकणस्थांचे उल्लेख आलेले आहेत
3 Aug 2021 - 5:31 pm | कंजूस
मूळ आहेत. ते थेट आफ्रिकेतून इकडे आले. बाकीचे होमो सपिअन युरोप - काराकोरम मार्गे भारतात उत्तरेकडून दक्षिणेला गेले. भारतातील बऱ्याच जणांची डिएएनए आफ्रिकनांचीच आहेत.
3 Aug 2021 - 6:11 pm | टवाळ कार्टा
स्थलांतर करण्याच्या चक्करमध्ये त्या अफ्रिकेतल्या पूर्वजांचे काही गुण नेमके हरवले =))
3 Aug 2021 - 9:13 pm | कंजूस
- प्रणयलाल पाहा.
4 Aug 2021 - 10:42 am | उपयोजक
मंगळूरहून आले असतील तर लेखक म्हणतात त्याप्रमाणे गुजराती आणि जुनी चित्पावनी भाषा यांच्यात साम्य कसे? कन्नडशी साम्य का असू नये? शिवाय मुळात दक्षिण भारतात जिथे काळा/सावळ्या वर्णाची लोकसंख्या खूपच जास्त आहे तिथे बहुसंख्य लोक गोरेपान, घारे डोळे असणारी जात कशी येईल? दक्षिण भारतात अजून कोणत्या जाती अशा गोर्या,बुद्धिमान आणि घार्या डोळ्यांच्या आहेत का?
4 Aug 2021 - 8:11 pm | कंजूस
तपासतात.
3 Aug 2021 - 5:51 pm | टर्मीनेटर
विचार प्रवर्तक लेख!
आमचे मूळ गाव खुद्द सातारा (शनिवार पेठ). माझ्या माहिती प्रमाणे माझ्या पणजोबांचे बालपणही साताऱ्यातच गेले होते. कोकणापासून सातारा फार काही लांब नसल्याने पूर्वज कोकणातून साताऱ्याला स्थलांतरित झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हयात असलेल्या आणि आजही सातारला राहणाऱ्या आजोबांकडून (वडिलांच्या काकांकडून) त्यापूर्वीच्या पिढ्यांच्या मुळस्थाना विषयी काही माहिती मिळते का बघावे लागेल.
सद्यस्थितीत तरी माझ्या वडिलांकडून नात्यात लागणारा कोकणात आमचा एकही नातेवाईक नाही.
आईच्या आईचे माहेर मात्र कोकणातले होते.
3 Aug 2021 - 6:19 pm | गॉडजिला
माहितीचे संकलनही छानच... आणि या प्रवासात अनुषंगाने अनेक रोचक बाबी आपल्यामुळे समजल्या. राजकीय, संस्कृतिक, सामाजिक, धार्मिक परामर्श आवडला.
3 Aug 2021 - 8:04 pm | रमेश आठवले
मुख्यतः कोकणात उगम असलेल्या चित्पावनांपैकी बऱ्याच कुळांचे कुलदैवत हि मराठवाड्यातील अंबाबाई आहे. हे का व कसे ?
3 Aug 2021 - 8:14 pm | कपिलमुनी
आफ्रिकेतून येताना एक मोठा फेयर अँड लव्हली चा डबा सापडला, ज्यांनी तो फासला ते सगळे काळी माणस गोरी झाले आणि नंतर तो संपत आला तसे बाकीचे गव्हाळ झाले.
3 Aug 2021 - 8:35 pm | चौथा कोनाडा
लांबलचक लेख ! परिच्छेद नसल्याने सु"वाच्य" नाही, हे नम्रपणे नोंदवू इच्छितो ! (आकृत्या असत्या तर आणखी सु"वाच्य" झाला असता हे वैयक्तिक मत)
बाकी हा लेख आधी वाचला होता ! आंजावर चित्पावनांविषयी एका तज्ण्य डॉ चित्पावनाने केलेला थिसीस उपलब्ध होता तेंव्हा वाचला होता.
जितके खोदत जाऊ तेवढे काय काय सापडत राहिल, ते हाताळून, त्याच्याशी खेळून काय फायदा होणार हे प्रश्नच आहे. युवा पिढी तर असल्या माहितीला कितपत थारा देईल हे माहित नाही !
4 Aug 2021 - 10:50 am | उपयोजक
हो लेख थोडा थांबत थांबत लिहिल्याने काही त्रुटी असू शकतात. त्याबद्दल क्षमस्व _/\_
4 Aug 2021 - 11:22 am | चौथा कोनाडा
ओके.
👍
4 Aug 2021 - 11:43 am | कॉमी
नव्याईश पिढीचा प्रतिनिधी म्हणून सांगतो, तुमचा कयास अचूक आहे.
3 Aug 2021 - 9:03 pm | प्रसाद गोडबोले
मी स्वतः आमचा कुल वृत्तांत पाहिला आहे. जवळपास ४०० वर्ष १४ पिढ्यांची नावे व्यवस्थित नोंदवून ठेवलेली आहेत हे पाहुन खुप कौतुक वाटले.
बाकी काही खास नाही.
मला आता कोणत्याही ग्रूप आयडेंटीटीचा तिटकारा वाटायला लागलाय ! काय फरक पडतो तुम्ही कोणत्याजातीत जन्माला आला म्हणुन ? त्यात तुमचे काय कर्तृत्व ? जनरली , कोणत्याही व्यक्तीवर त्याची व्यक्तिभिन्नता पुसुन ग्रूप आयडेंटी लादणारी व्यक्ती / सिस्टीम केवळ त्याचा दुरुपयोग करुन घेत असते असे माझे ठाम मत बनले आहे त्यामुळे उद्या कोणी " एक चिपावन करोड चित्पावन " असला काही नारा दिला तर मी त्याच्यापासुन शक्य तितके लांब जाईन आणि त्याच्या स्वार्थी हेतुंविषयी अभ्यास करुन माझ्या जवळच्या लोकांना इशारा देईन.!
मुळातच उडीदामाजी काळे गोरे. कोणत्याही जातीचे धर्माचे लोकं एक सारखे नसतात. प्रत्येकाचे व्यक्तीविशेष भिन्न भिन्नच ! कोणी आत्महत्या करणारे साने असतील तर कोणी वध करणारे कान्हेरे असतील, कोणी भोंगळ चळवळी करणारे भावे असतील तर कोणी कठोर व्यावहारिक दृष्टीकोन ठेवणारे सावरकर असतील , कोणी स्वमतांध गोडसे असतील तर कोणी प्रचंड विचारी टिळक असतील . सगळ्यांना एका माळेत कसे ओवणार ? रादर कोणी ओवत असेल तर त्याचा हेतु विषयी शंका घ्यायला पुष्कळ वाव आहे.
मोठ्ठी मोठ्ठी उदाहरणे राहु द्या, मी स्वतः चित्पावन ब्राह्मणांमध्ये पराकोटीचे निर्बुध्द , व्यवहारशुन्य , आपमतलबी अन स्वार्थी लोकं जवळुन पहात आहे. एक महाभाग तर सरळ सरळ ब्राह्मण असल्याचा फायदा घेऊन देवभोळ्या लोकांची फसवणुक करणारे माहीतीत आहेत.
कसलं आलंय चित्पावन चिपावन ! सगळ्यांचेच पाय मातीचे !
असो.
धन्यवाद !
3 Aug 2021 - 9:53 pm | गुल्लू दादा
मानवता हाच खरा धर्म. कोण उच्च कोण निच्च? तुमची पैदाईश ठरवणार असेल तुमची लायकी तर मग चांगला बाप शोधणे आले. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्या जोरावर उड्या मारायच्या छ्या! मी तर काही काही लोक असे पाहिलेत जे मित्र सुद्धा जात बघून करतात. काय म्हणावं अश्यांना. सगळीकडे सापडतात असे नग. मोठा विषय आहे.
4 Aug 2021 - 10:45 am | उपयोजक
चित्पावन जगातल्या इतर कुठल्याही देशातून आणि कधीही भारतात आलेले असोत. त्यांनी संतपरंपरा वगळता बाकी जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे आणि हे नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. पण म्हणून इतिहास शोधायचाच नाही किंवा एखाद्या संशोधनामुळे एखाद्या जातीसमुहाच्या लोकांना अवघडल्यासारखे वाटेल म्हणून त्यावर संशोधन करायचेच नाही हे कसे चालेल? आणि असली एखादी जात जात्याच किंवा जनुकीय कारणांमुळे सरासरी बुद्धिमान इतर काही जातींच्या तुलनेत 'तर बिघडलं कुठं?' उलट बुद्धिमान लोकांमुळे समाजाची प्रगती वेगाने होते हा फायदाच आहे की!
4 Aug 2021 - 4:30 pm | गॉडजिला
समाजाची प्रगती प्रगती करायच्या प्रवृत्तीने होते.
5 Aug 2021 - 10:37 am | कॉमी
फक्त जाती हा. धर्मावरून केले तर चंगा सी.
5 Aug 2021 - 11:03 am | रावसाहेब चिंगभूतकर
ज्यू हा धर्मच होता. बहुधा.
5 Aug 2021 - 11:06 am | कॉमी
माझा रोख वेगळा होता, असो.
हो, ज्यू द्वेषाचे मूळ धार्मिक असले तरी हिटलरचा द्वेष वांशिक होता. ज्यू खेरीज पोलिश स्लाव्हिक वंशांचा सुद्धा त्याला तिटकारा होता.
5 Aug 2021 - 1:35 pm | आंद्रे वडापाव
चित्पावनब्राम्हणां ना, किंवा ब्राम्हणांना, किंवा सर्वण ओबीसी दलीत, मुस्लिम ख्रिचन अल्प संख्यांक ,
कोणत्याही भारतीयाला
पूर्वदुशित मता वर आधारित अन्याय अपमानाला
सामोरे नको जाऊ दे रे महाराजा!
6 Aug 2021 - 7:29 am | कॉमी
व्हय महाराजा !
6 Aug 2021 - 8:48 am | प्रसाद गोडबोले
फार पुर्वी एका साधुंची भेट झाली होती , त्यांना मी विचारलं होत - "हे" लोकं साधुसंतांची जातीपातीत विभागणी करताहेत , म्हणजे ज्ञानेश्वर एकनाथ रामदास तुमचे , तुकाराम नामदेव आमचे वगैरे वगैरे. त्यावर तुम्ही काही बोलत का नाही ?
ते म्हणाले होते- नदीचे मुळ अन साधुचे कुळ विचारु नये. सगळेच संत आपले आहेत , हे जे जातीद्वेषातुन विभागणी करणारे लोकं आहेत ना ह्यांना कधी समाधान नाही लाभणार , तुम्ही त्यांच्या नादी लागु नका !
________/\_________
https://www.swamiswaroopanandpawas.org/mr/charitra.php
4 Aug 2021 - 12:37 am | गॉडजिला
स्वतःला कोणताही ग्रुप आयडेंटिटी मध्ये विभागुन घ्यायच नाही, पण इतरांना मात्र (आधी गटात विभाजायचे व मग नंतर) ( विशेषतः गट क्र. २ मधील लोकांना ) त्यांचा ग्रुप किती भारी आहे , त्यांची ग्रुप आयडेंटिटी किती हुच्च आहे , त्यांची ग्रुप आयडेंटीटी ही त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे हे दाखवुन द्यायचे !
सर्वानी असेच करायला शिकले पाहिजे का नाही यावर अजुन त्यांनी मत प्रदर्शीत केलेले नाही.
4 Aug 2021 - 4:05 am | चौकस२१२
१) लेख लिहणाऱयांसाठी = यावर चिकित्सा खूप झाली आहे तेच तेच मुद्दे आहेत कशाला उगाच खाजवून खरूज काढताय ! आधीच महाराष्ट्रात कोक्कनष्ठातला "को" उचररला कि "बोंम्बबाबोम्ब " चालू होते ..
२) लेखाची कुचेष्टा कार्नार्त्यांसाठी : "आपण या जमातीशी असहमत असू शकता, त्यांचा तिरस्कार करू शकता पण त्या जमातीला विसरू शकता नाही You can hate them buy can't ignore them "
थोडक्यात काय यावर कोकणस्थ नसलेले सुद्धा लिहितात धून मधून हे असले लिहिले जातंय .. सहन करा
5 Aug 2021 - 1:20 am | साहना
> काय फरक पडतो तुम्ही कोणत्याजातीत जन्माला आला म्हणुन ?
विविध नोकऱ्यांत आणि प्रवेश प्रक्रियेत आरक्षण मिळते. तुम्ही डॉक्टर होणार कि कारकून इतका मोठा फरक पडू शकतो. SCST atrocity ऍक्ट पहा, तुम्ही योग्य जातीत जन्माला आला तर तुमच्या सध्या अगदी धांदात खोट्या सुद्धा तक्रारींवर भले भले सरळ जेल मध्ये जाऊ शकतात. भारतीय घटना हि जात आणि धर्म ह्या दोन्ही गोष्टींना प्रचंड महत्व आणि त्या अनुषंगाने वेगळे अधिकार देत असल्याने तुम्हाला आवडो ना आवडो तुमची जात आणि धर्म अत्यंत महत्वाची आयडेंटिटी ठरतात.
आता तुम्ही लोन रेंजर प्रमाणे आयडेंटिटी झुगारून स्वहित पाहून जे काही साध्य करायचे आहे ते स्वबळावर कराल कि आपल्या जातीच्या इतर लोकांबरोबर राहून कराल हा तुमचा प्रश्न आहे. माझ्या पाहण्याप्रमाणे तरी बहुतेक ब्राम्हण लोक राजकीय संघटन वगैरे ह्यांच्या नादी न लागता स्वतंत्रपणे आपला मार्ग निवडतात आणि इतकी वर्षे विविध प्रकारचे कायदेशीर भेदभाव सुद्धा सहन करून विविध क्षेत्रांत ह्यांचा अजून सुद्धा दबदबा असल्याने हा मार्ग बरोबर आहे असे वाटते.
मी स्वतः गौड सारस्वत आहे. राजकीय दृष्ट्या महत्व जवळ जवळ शून्य असले तरी मठ ह्या संकल्पनेच्या भोवताली सारस्वत मंडळींनी बऱ्यापैकी संघटन उभारले आहे. पेजवर स्वामी किंवा हल्लीच वृन्दावनस्थ झालेले विद्याधिराज तीर्थ स्वामीजी असो ह्यांनी तोंड बंद ठेवून समाजासाठी बरेच काम केले आहे. विद्याधिराज तीर्थ स्वामीजींनी शेकडो मंदिरे कर्नाटक सरकारच्या हातांत जाण्यापासून वाचवली. गोव्यांत सुद्धा पर्रीकर इत्यादी मंडळींचे देवस्थान टेकओव्हर त्यांनी बंद पाडले. पैशाअभावी एकही सारस्वत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ह्यासाठी अनेक सारस्वत संघटना कार्यरत आहेत. आणि फक्त गोव्यातून काही कोटी रुपयांच्या शिष्यवृत्त्या दर वर्षी दिल्या जातात हे पहिले आहे. त्यामुळे राजकीय संघटन नसले तरी सांस्कृतिक संघटनाने जातीचा खूप फायदा झाला आहे हे नक्की.
4 Aug 2021 - 12:50 am | कपिलमुनी
एकदा युरेशिया चर्चेला आला की पावन होईल
4 Aug 2021 - 7:24 am | Bhakti
म्हणून आपण देशस्थ असून अंबेजोगाईहून कोकणात आलो असे काही चित्पावन सांगू लागले. पण ही समजूत भ्रामक आहे. ( ' भारतीय संस्कृती कोश ' )
अरे देवा मी तर कोकणस्थ आणि अंबाजोगाईचा संबंध कसा विचार करतेय,हे तर माझ्या सर के ऊपर गया,यांचा संबंध पार साता समुद्रापार आहे.
बाकी माझ्या एका मैत्रिणीचे डोळे खुपचं सुंदर होते ती सारखी कोकण कोकण करायची तेव्हा मला कळले की चित्पावन असे काही असते,मग मला चित्पावन चांगलेच कळले... सुंदर डोळ्यांचे! अर्थात आपले शारीरिक गुण ह्यात DNA हातभार आहे.पण हे मी अमका ,धमाका बास करून छोट्याशा आयुष्यात सगळ्यांनाच बौद्धिक पातळी वाढवायला कमालीचा स्कोप आहे.
एकंदरीत हा लेख म्हणजे अभ्यासपूर्ण वर्तुळ आहे.
4 Aug 2021 - 9:39 am | चंद्रसूर्यकुमार
काही प्रश्न--
१. कोब्रा चारशे-पाचशे वर्षांपूर्वी भारताबाहेरून कुठूनतरी आले असतील तर ते भारतात आल्यावर त्यांना जातीच्या उतरंडीमध्ये डायरेक्ट उच्चपदावर कसे जायला मिळाले? एक तर हिंदूंमध्ये जाती या जन्मापासून मिळतात आणि त्या मरेपर्यंत टिकतात. जातींमध्ये 'लॅटरल एन्ट्री' हिंदू समाजात शक्य नाही. अनेक हिंदूंचे मोंगल, टिपू सुलतान वगैरेंनी सक्तीने धर्मांतर केले. त्यांना आणि त्यांच्या वंशजांना परत हिंदू समाजात परत घेताना 'त्यांना कोणत्या जातीत टाकायचे' या प्रश्नाचे उत्तर न सापडल्याने त्यांची घरवापसी अनेक शतके होऊ शकली नव्हती असे मिपावरच कोणत्यातरी चर्चेत काही वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. असे असताना कोब्रांची नुसती जातीच्या उतरंडीत लॅटरल एन्ट्रीच झाली असे नाही तर त्यांना थेट उच्चपदावर जायला मिळाले यात विसंगती वाटत नाही?
२. कोब्रा जर चारशे-पाचशे वर्षांपूर्वी भारताबाहेरून कुठूनतरी आले असतील तर मग दोन-अडीच हजार वर्षांपासून समाजातील तळागाळाच्या लोकांवर अन्याय करणारे म्हणून सगळे बुबुडाविपुमाऊधवि ज्यांना दोषी धरतात ते नक्की कोण होते? एकूणच बुबुडाविपुमाऊधवि या गटात प्रवेश मिळण्यासाठी ब्राह्मणांचा, विशेषतः कोब्रांचा पराकोटीचा द्वेष करणे ही एक पूर्वअट असते हे त्या गटातील काही आघाडीच्या लोकांच्या फेसबुक भिंतीवरून आणि ऐसीसारख्या ठिकाणी एखादा फेरफटका मारला तरी समजून येईल.
३. बुबुडाविपुमाऊधविंचे एक सरताज आहेत. पूर्वी ते दूरदर्शनमध्ये नोकरीला होते आणि अंतर्नादसारख्या नियतकालिकात आणि ऐसीच्या दिवाळी अंकात लेख लिहून जगाला अक्कल शिकवत असतात. कोब्रांचा मूळ पुरूष परशुराम याने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली असे म्हणतात. अशा 'खुनशी' आणि 'रक्तपिपासू' परशुरामाला आपला आद्य पुरूष मानणार्या कोब्रांची त्यांना कीव येते. हेच सरताज कम्युनिस्ट विचारांचे आहेत असे त्यांच्या इतर लिखाणावरून वाटते (उदाहरणार्थ कार्ल मार्क्सला महापुरूष म्हणणे वगैरे). अन्यथा पुराणात आणि हिंदू ग्रंथांमध्ये दिलेल्या गोष्टी भाकडकथा आहेत यावर त्यांचा गाढा विश्वास असतो पण परशुरामाने मात्र २१ वेळा क्षत्रियांच्या कत्तली केल्या ही भाकडकथा नसून तो इतिहास होता यावरही त्यांचा गाढा विश्वास असतो. विष्णूचा सातवा अवतार राम होता की नाही याचा काहीही पुरावा नाही असे ते म्हणणार पण त्याचवेळी विष्णूचा पाचवा अवतार परशुराम मात्र नुसता झालाच असा नाही तर त्याने २१ वेळा क्षत्रियांच्या कत्तलीही केल्या यावरही त्यांचा गाढा विश्वास असतो. म्हणून त्या परशुरामाला आपला मूळ पुरूष मानणार्या कोब्रांची त्यांना कीव वाटते. पण त्याचवेळेस चे गव्हेरा वगैरे त्यांना प्रातःस्मरणीय असलेल्या लोकांनी खरोखरच्या कत्तली केल्या त्यावर हे काहीही बोलताना दिसत नाहीत.
हे घाणेरडे लोक जाम डोक्यात जातात ते असले काहीतरी गुडघ्यातले लिहितात म्हणून.
एक साधा प्रश्न- जर परशुरामाने २१ वेळा कत्तली केल्या असे मानले आणि त्याचवेळी कोब्रा ४००-५०० वर्षांपूर्वीच भारतात आले असे म्हणायचे असेल तर त्या कत्तलींचे पुरावे कुठेतरी मिळतीलच. गेलाबाजार ज्याला folklore म्हणतात त्या लोककथांमध्येही त्याचे उल्लेख सापडतीलच. कोब्रा भारतात येण्यापूर्वी ५०० वर्षे गझनीच्या महंमदाने सोमनाथच्या मंदिराचा विध्वंस केला, कोब्रा भारतात आले साधारण त्याच सुमारास बाबराने अयोध्येत राममंदिराचा विध्वंस केला वगैरे गोष्टी अशाच आपल्याला माहित असतात आणि त्याचे पुरावेही सापडतात. त्याप्रकारे परशुरामाने केलेल्या कत्तलींचे पुरावे सापडू शकतील का?
(चार-पाचशे वर्षांपूर्वी भारतात आलेल्यांचा वंशज) चंद्रसूर्यकुमार
4 Aug 2021 - 1:13 pm | श्रीगुरुजी
योग्य मुद्दे
5 Aug 2021 - 1:28 am | कोहंसोहं१०
२१ वेळा नि:क्षत्रिय याचा अर्थच मुळी चुकीचा लावला गेला आहे. त्या काळी वर्णव्यवस्था अस्तित्वात होती आणि क्षत्रिय वर्ण हा राजे लढाऊ सैनिक किंवा समाजाचे रक्षण करणारा गट यांचा होता. परंतु ज्या राजांनी राज्यकारभार अन्यायाने केला त्या शक्य तितक्या राजांना परशुरामांनी एकतर लढाईत जिंकले नि सचोटीने कारभार करण्यास भाग पडले किंवा न ऐकणाऱ्या दंभ राजांना सरळ यमसदनी धाडले. थोडक्यात २१ वेळा नि:क्षत्रिय याचा अर्थ २१ वेळा बहुतांशी अन्यायी राज्यकर्त्यांना धडा शिकवला असा आहे. ते कामच मुळी प्रचंड असणार त्यामुळे पुराणात नि:क्षत्रिय हा शब्दच मुळी अतिशयोक्ती अलंकार पद्धतीने वापरला आहे.
परशुराम हे स्वतः ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही होते. त्यामुळे नि:क्षत्रिय याचा शब्दशः अर्थ घेणेच चुकीचे आहे हे सहज लक्शात येते. परशुरामांच्या काळीही अनेक राजे होते ज्यांनी त्यांच्या हयातीत राज्यकारभार केला आणि वंशपरंपरा किंवा कुळ पुढे चालवले (उदा जनक राजा). रामाच्या कुळातला राजा बृहद्बल महाभारतामध्ये लढाईत मारला गेला.थोडा शोध घेतल्यास अशी अनेक उदाहरणे सापडतील ज्यान्चे कुळ परशुरामांच्या आधी किंवा हयातीत अस्तित्वात होते आणि पुढेही राहिले.
थोडेसे तारतम्य वापरून विचार केला की पुराणातील गोष्टीचाही योग्य अर्थ लागू शकतो. पण लोक स्वार्थासाठी (खास करून राजकीय) तसे करत नाहीत त्याला कोण काय करणार?
5 Aug 2021 - 10:12 am | चंद्रसूर्यकुमार
हे सगळे ते फुरोगामी विचारजंत समजायच्या मनस्थितीत असतील असे वाटते का?
जातीयवादाने भारतीय समाजाचे खूप नुकसान झाले आहे याविषयी दुमत नसावे. १०-१२ वर्षांपूर्वी एक वेळ आली होती की जातीयवादाविरोधात बोलणार्या लोकांविषयी मला थोडा आपलेपणा वाटायला लागला होता. त्यातून संबंधित मनुष्याला मी जाऊन भेटलो होतो. तो मनुष्य माझ्या नात्यातील एका व्यक्तीचा परिचित आहे. त्याचे खरे रंग लगेच दिसले नाहीत पण नंतरच्या काळात ई-मेल वरील संपर्कातून ते कळायला लागले. परशुरामाविषयी हे गुडघ्यातले विधान केलेच पण त्याबरोबरच संबंधित मनुष्याने '७०% कोब्रा हे बुरसटलेले असतात' हे विधानही केले होते. या प्रकाराचे मला आश्चर्य वाटले कारण हेच लोक 'कोणाकडेही जातीपातीचे लेबल लाऊन बघू नका' असे तत्वज्ञान जगाला शिकवत असतात. तसे असेल तर समोरचा माणूस कोब्रा आहे हा विचारच त्यांच्या मनात यायला नको कारण जातीपातीच्या लेबलाच्या वर जाऊन व्यक्तीकडे बघा ही लेक्चरबाजी हेच लोक इतरांना करत असतात. आणि इतकेच नाही तर दुसर्या कोणत्या जातीचे/धर्माचे ७०% (किंवा अन्य काही आकडा) लोक वाईट आहेत असे कोणी म्हटले तर हेच लोक त्यावर चवताळून उठतात. अशा प्रसंगांमधून या लोकांचा खरा चेहरा कळला. आणि तो चेहरा हा की 'कोणाकडेही जातीपातीचे लेबल लाऊन बघू नका' हे तत्वज्ञान ते पाजळतात ते पूर्ण ढोंग आहे.
तेव्हापासून एक गोष्ट समजली की ७०% कोब्रा बुरसटलेले असतात की नाही हे माहित नाही पण १००% पुरोगामी विचारजंत (खरं तर फुरोगामी विचारजंत) हे एक नंबरचे बदमाष, ढोंगी आणि थर्डक्लास नव्हे फोर्थ क्लास असतात.
6 Aug 2021 - 11:49 am | उपयोजक
याला लॅटरल एन्ट्री म्हणता येईल का नाही ाहित नाही.तरी दोन उदाहरणे आहेत.
१) 'मग' नावाची उत्तर भारतातली एक ब्राह्मण जातीचे लोक हे मूळ पारशी(झोराष्ट्रियन) धर्मीय पुजार्यांचे वंशज आहेत.
https://en.m.wikipedia.org/wiki/Magi
२) केरळमधे ज्यावेळी नंबुद्री ब्राह्मण आले त्यावेळी त्यांचे वेदाध्ययन , धर्माधिकार ,गौर वर्ण यामुळे प्रभावित होऊन त्यावेळी (आणि आजही) केरळातल्या अनार्य जातींमधली सर्वोच्च अशा नायर जातीतल्या बर्याचशा लोकांनी आपल्या मुलींची लग्ने या नंबुद्री ब्राह्मणांशी लावून दिली. नायर समाजात मातृसत्ताक पद्धत असल्याने तो नंबुद्री अपत्य जन्मानंतर निघून गेला तरी फरक पडत नसे. अशा नंबुद्री ब्राह्मण बाप आणि नायर जातीची आई संकरातून जन्मलेल्या लोकसमुहाला नायर ब्राह्मण म्हणून अोळखले जाते. प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मेट्रोमॅन ई. श्रीधरन हे नायर ब्राह्मण आहेत.
6 Aug 2021 - 1:17 pm | चंद्रसूर्यकुमार
अच्छा. म्हणजे चित्पावनांप्रमाणे नंबुद्री ब्राह्मणही असेच ४००-५०० वर्षांपूर्वी बाहेरून कुठून तरी आले आहेत तर :)
6 Aug 2021 - 3:09 pm | उपयोजक
ते मुळचे सध्याच्या कर्नाटकातील तुळूभाषिक प्रदेशातलेच ब्राह्मण आहेत. तिथून पौरोहित्य,वेदाध्ययन,धर्मचर्चा यासाठी केरळमधे स्थलांतरीत झाले. तिथे त्यांना नंबुद्री म्हटले गेले
4 Aug 2021 - 10:51 am | सुबोध खरे
"राजकीय सोय" हि एक मोठी वैचारिक दांभिकता आहे.
आपली रेषा लांब करण्यापेक्षा दुसऱ्याची रेष लहान दाखवणे जास्त सोपे असते.
एकच महान व्यक्ती सर्वज्ञानी आणि सर्वात जास्त बुद्धिमान आहे असा अत्यंत चुकीचा विचार बाळगणाऱ्या समाजगटाबद्दल काय म्हणावे?
जगातील सर्व प्रश्नच उत्तर एकाच ग्रंथात मिळते आणि त्याच्या पुढे काहीच नाही हे समजणाऱ्या गटांनी जगाचे जेवढे नुकसान केले आहे तितके सर्व युद्धे आणि महामाऱ्यांनी सुद्धा केलेले नाही.
यात अनेक व्यक्ती आणि अनेक ग्रंथ येतात. पण मी सध्या कार्ल मार्क्स, दास कॅपिटल आणि वाममार्गी लोकांबद्दल बोलतो आहे.
4 Aug 2021 - 1:24 pm | कंजूस
लोक प्रत्येक वंशाचं, प्राण्याचं गुणसुत्रं शोधून नोंदवून ठेवत आहेत. कोण पृथ्वीतलावर अगोदरचा नंतरचा , संशयीत स्थलांतरित वगैरे. त्यात हेसुद्धा आले.
कुणाला बाह्य गुणांत आवड असेल त्यांच्यासाठी एक दोन फोटो देऊन टाका ना. काही तरी उपयोगी करा.
सुंदर घारे डोळे आणि पुढे आलेले दातही आवडत असतील.
4 Aug 2021 - 2:15 pm | साहना
> कुलवृत्तांत ग्रथित करणारी महाराष्ट्रातील एकमेव जमात म्हणजे चित्पावन
सपशेल खोटे.
> मात्र काही चित्पावन ब्राह्मणांची जातकुळी ' उना ' या मानवगटाबरोबर साम्य दाखवते. अशा नमुन्यांचे प्रमाण अगदी अल्प असले तरी त्यांना जन्म देणाऱ्या पूर्वज स्त्रियांचे वास्तव्य आर्मेनिया , तुर्कस्तान , सीरिया आणि इराक या पट्ट्यात असल्याचा पुरावा उपलब्ध आहे . ऑक्सफर्ड प्रयोगशाळेच्या अभ्यासानुसार ' उना ' ही डीएनए रचना अत्यंत दुर्मिळ आहे. नवीन संशोधनानुसार भारतातील २० ते ३० टक्के उच्चवर्णीय हिंदूंचे मूळ पश्चिम युरेशिया भागात होते .
हे सुद्धा धांदात खोटे आहे आणि हि तर्कदुष्टता मनू जोसेफ सारख्या मंडळींनी आपल्या अर्धवट ज्ञानाने पसरवली आहे. मी हि आधी ह्या समजाला बळी पडले होते.
पण ज्या वेगाने देशांत आरक्षणाचा भस्मासुर मोठा होत आहे ते पाहून बहुतेक उच्चवर्णीयांची भविष्य मात्र पाश्चात्य देशांतच असेल असे वाटते. :)
4 Aug 2021 - 7:49 pm | चौथा कोनाडा
पण ज्या वेगाने देशांत आरक्षणाचा भस्मासुर मोठा होत आहे ते पाहून बहुतेक उच्चवर्णीयांची भविष्य मात्र पाश्चात्य देशांतच असेल असे वाटते.
... चिंता निर्माण करणारे विधान.
ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना ज्या विविध यंत्रणा निर्माण केल्या (पोस्ट, रेल्वे, प्रशासकीय सेवा ई) त्या जर नसत्या तर परिस्थिती बिकट झाली असती असे बरेच विचारवंत सांगतात.
आणखी ब्रेन ड्रेन झाले तर .... ?
4 Aug 2021 - 8:35 pm | प्रसाद गोडबोले
अनाठायी भीती !
काहीही फरक पडणार नाही . बौध्दिक हुशारी ही कोणत्याही जातीची किंव्वा पोटजातीची मक्तेदारी नाही . सर्वच्या सर्व चित्पावन / ब्राह्मण / तथाकथित हुच्चवर्णीय लोकं देशाबाहेर गेले तरी भारताला काहीही फरक पडणार नाही , ह्या देशात टॅलेंट ची काहीही कमी नाही !
4 Aug 2021 - 11:45 pm | उपयोजक
यांचा दुराभिमान म्हणून नव्हे तर वास्तव म्हणून
आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांच्याच ताब्यात असणार्या देशांनी विज्ञान/तंत्रज्ञान किंवा आधुनिक राहणीमान यांमधे ते देश स्वतंत्र झाल्यापासून कितीशी प्रगती केली आहे? दक्षिण आफ्रिका त्यातल्या त्यात सुधारली पण त्यावर गोर्यांचा अंमल बर्यापैकी होता,अजूनही आहे.
5 Aug 2021 - 1:53 am | साहना
योग्य प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर तुम्हाला थॉमस सोवेल्ल ह्यांच्या रेस ह्या पुस्तकांत सापडेल.
4 Aug 2021 - 8:45 pm | गॉडजिला
हा फार रोचक मुद्दा आहे...
पण भारताला ब्रेंड्रेन ची समस्या नाहीच मुळी, ही एक बिनडोक उपपत्ति आहे. कधी काळी मर्यादित लोक शिक्षण घेत असतील तेंव्हां ब्रेन ड्रेन ची किंचीत भीती व्यवहारीक ठरली असती, इथे समस्या टॅलेंट कुजवणे ही आहे तेव्हढे टाळले तरी पुरे आहे मग सर्व आयआयटी स्टूडंट सलग २५ वर्षे जरी देश सोडत राहिले तरी काहिच फरक पडणार नाही.
तसेही तिकडे यशस्वी झालेले भारतात त्यासारख्या इतर developing countries मधे प्रगत देशा इतकेच यश मिळवलेले दिसत नाहित. ब्रेन ड्रेन तेंव्हां मान्य करु जेंव्हा एखादा समूह भारतातून निघून पाकिस्तान श्रीलंकेत स्थायिक अमेरिकेत कमावले तसे यश कमावेल...
किती तरी उच्च शिक्षित शीख लोकं परदेशात गडगंज यश मिळवतात त्यावेळी कोणी ब्रेन ड्रेन ची चिंता व्यक्त करत नाही...
4 Aug 2021 - 10:27 pm | नावातकायआहे
"शष्प" फरक पडणार नाही ! ! !
4 Aug 2021 - 11:14 pm | साहना
> ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना ज्या विविध यंत्रणा निर्माण केल्या (पोस्ट, रेल्वे, प्रशासकीय सेवा ई) त्या जर नसत्या तर परिस्थिती बिकट झाली असती असे बरेच विचारवंत सांगतात.
ह्या विधानाचा आणि माझ्या विधानाचा संबंध लागला नाही.
> ब्रेन ड्रेन
इतर लोकांप्रमाणेच हि भीती अनाठायी आहे असे वाटते. लोकसंख्या भरपूर असल्याने ब्रेन्स भरपूर आहेत आणि असतील. जे ब्रेन बाहेर जात आहेत त्यांनी देशांत राहिले म्हणून देशाला फायदा होईल अशी स्थिती देशांत नसल्याने बाहेर जाऊन स्वहित साधने हेच त्याच्यासाठी फायद्याचे आहे.
4 Aug 2021 - 11:43 pm | कॉमी
ड्रेन होण्यासाठी ब्रेन ही निसर्गदत्त किंवा वंशपरंपरागत देणगी कमी असते आणि आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचे उत्पन्न जास्त असते. गरिबीतून मध्यमवर्गात येणाऱयांचा ओघ चालू असतो, नवनवीन ब्रेन्स तयार होत राहतात.
5 Aug 2021 - 9:44 am | सुबोध खरे
ब्रेन ही निसर्गदत्त किंवा वंशपरंपरागत देणगी कमी असते आणि आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचे उत्पन्न जास्त असते.
हि दळभद्री साम्यवादी किंवा समाजवादी विचारसरणी वैद्यक शास्त्राने कधीच मोडीत काढली आहे
पण पोथीनिष्ठ लोक अजूनही तीच हृदयाशी कवटाळून बसलेले आहेत.
एक साधे उदाहरण --असं जर असतं तर जुळ्या भावा (किंवा बहिणीत) इतकी तफावत दिसलीच नसती.
किंवा
दत्तक घेतलेल्या मुलांत आणि त्यांच्या आईबापांच्या बुद्धिमत्तेत एवढा फरक दिसला नसता
5 Aug 2021 - 2:18 pm | साहना
मानवी क्षमता हि जनुकीय असते कि अणजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते (nature / nurture) हा पाश्चात्य संस्कृतीतील खूप मोठा वादाचा विषय आहे.
पिंकर ह्यांचे the blank slate हे पुस्तक ह्या विषयाच्या खोलांत जाते आणि उपलब्ध सर्व अभ्यासाचे दाखले देते. जुळ्या मुलांचा ४० वर्षांचा अभ्यास हा एक खूप मोठा महत्वाचा प्रयोग होता.
तात्पर्य :
जनुकीय देणग्या मानवी क्षमतेवर प्रचंड प्रभाव करतात. साधारण ५०% वेळा निव्वळ जनुकीय संबंधावर व्यक्तीचे भवितव्य ठरते. पण त्याच वेळी इतर ५०% वेळा हेच भवितव्य सभोवतालच्या परिस्थितीवरून ठरते. फक्त फरक इतका आहे कि हि परिस्थिती नक्की काय आहे हे कुणीच कंट्रोल करू शकत नाही.
खुप मनोरंजक पुस्तक आहे. पुस्तक वाचण्याऐवजी निव्वळ हे पाहू शकता : https://www.youtube.com/watch?v=6A_6yR00pHA
5 Aug 2021 - 6:33 pm | गॉडजिला
हा प्रतिसाद माझ्या नजरेत टोटली रॉक्स...
वरून तुम्हीं किती भांडखोर भासत असाल कोणाला तरी आतून एकदम गायीप्रमाणे हळुवार आहात हे नक्की
_/\_
5 Aug 2021 - 4:21 pm | कॉमी
बरं बुवा, तुम्ही तुमची सुरेख रेशियल सुपीरिओरिटी ची आरती करत राहा.
5 Aug 2021 - 4:38 pm | कॉमी
माणसाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा त्याच्या बौद्धिक जडणघडणीवर मोठठा परिणाम असतो ह्या साध्य वाक्यात डॉक्टर खरेंना मिरच्या झोम्बतात आणि साम्यवादी समाजवादी वैगेरे नेहमीचे रडगाणे गावे लागते यातच बरेच काही आले. गुड फेथ मार्गाने न जाता दळभद्री वैगेरे शब्द वापरल्याने हा प्रतिसाद आहे याची नोंद व्हावी.
आपली जन्मजात गुणवत्ता आहे असा कॉम्प्लेक्स टिकवण्यासाठी इंटरनेटवर धसमुसलेपणा करावाच लागतो असे दिसते.
5 Aug 2021 - 6:38 pm | गॉडजिला
जेनेटिकल सुपिरीओरीटी ही सायंटीफिक फॅक्ट आहे आणि ती विशिष्ट जमातीपूर्ती कटाक्षाने मर्यादित राखणे रेशियल सुपिरियरीटी लादणे ठरते मला वाटते खरे साहेब रेशीयल न्हवे जेनेटिक सुपीरिओरिटी बद्दल बोलत आहेत.
5 Aug 2021 - 6:48 pm | टवाळ कार्टा
असे असेल तर सगळ्या स्त्रीयांनी जो कोणी आजच्या काळातला सर्वोत्तम पुरुष असेल त्याच्याकडूनच गर्भधारणा करून घ्यावी....आणि बाकी सगळ्या पुरुषांना मुले जन्माला घालू नये असे बंधनात ठेवावे...काय म्हणता?
5 Aug 2021 - 7:07 pm | गॉडजिला
सपोर्ट करत नाही... त्यामूळे आपल्या मताशी सहमत नाही
5 Aug 2021 - 7:29 pm | टवाळ कार्टा
ते तुम्हीच लिहिलेत....मी फक्त जेनेटिकल सुपिरीओरीटी ठेवायचा "नैसर्गीक" मार्ग सांगितला
5 Aug 2021 - 7:31 pm | गॉडजिला
.
5 Aug 2021 - 7:36 pm | टवाळ कार्टा
निसर्गात पुरुषप्रधान वगैरे काहीही नसते....सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वांत श्रेष्ठ नरच जवळपास सगळ्या माद्यांना गर्भधारणा करवतो आणि वंशश्रेष्ठत्व राखतो
5 Aug 2021 - 7:46 pm | गॉडजिला
मानवाच्या मुला मधे आणि मुली मधे जेनेटिक सुपिरीओरीटी आलेली असताना फक्त पुरुषाचा वापर संपूर्ण अवैज्ञानिक ठरतो...
तूर्त चर्चा मानवाची चालू आहे जर त्यात प्राण्यांची चर्चा घुसळायची असती तर सगळे सिंह नागवे फिरतात माणसांनीच का कपडे घालावेत असेही विषयांतर करतां येईल...
5 Aug 2021 - 7:50 pm | गॉडजिला
अपत्या मधे आई आणि वडील दोघांचेही गुण उतरत असतात म्हणुन फक्त पुरुषाचा वापर जो आपण सुचवत आहात तो वैज्ञानिक नाही
5 Aug 2021 - 8:46 pm | टवाळ कार्टा
नराच्या बाजूने सर्वश्रेष्ठ जनुके आली की पुढल्या सगळ्या"च" पिढीला किमान ५०% सर्वश्रेष्ठ जनुके मिळतात....कोणत्याही नरामुळे गर्भधारणा झाली तर हे प्रमाण कमीच होणार
6 Aug 2021 - 9:59 am | गॉडजिला
निव्वळ नराचा विचार केलात म्हणूनच पुरुषप्रधान हलकटपणा अशी संभावना केली होती.
6 Aug 2021 - 10:20 am | गॉडजिला
नर सर्वोतकृष्ट कोणता यात जरी स्पर्धा होत असली तरी मादी सर्वोत्कृष्ट कोणती यात स्पर्धा होत नाही.
होणाऱ्या अपत्यामधे नर व मादी या दोघांतील गुण संक्रमित होत असतात म्हणुन सगळ्या स्त्रीयांनी जो कोणी आजच्या काळातला सर्वोत्तम पुरुष असेल त्याच्याकडूनच गर्भधारणा करून घ्यावी.... हे आपले पुरुषी मानसिकतेचे विधान ५०%सर्वोत्कृष्ट जनुके पुढील पिढीला देईल याची शाश्वती देत नाही.
तसेच सगळ्या पुरुषांनी जो कोणी आजच्या काळातली सर्वोत्तम जनुक असणारी स्त्री असेल असेल तिलाच गर्भधारणा केली तरीही ही बाब ५०%सर्वोत्कृष्ट जनुके पुढील पिढीला देईल याची शाश्वती देत नाही.
तेंव्हा हा विचार त्याग करा
6 Aug 2021 - 2:28 pm | टवाळ कार्टा
मी तुमच्या मानसिकतेबद्दल वैयक्तिक प्रतिसाद लिहिलेला नाहिये त्यामुळे माझी मानसिकता काय आहे त्याबद्दल तुमचे मत तुमच्याकडेच ठेवा....तुम्हाला नाही झेपणार ते :)
याचा काही वैज्ञानिक रेफरन्स आहे का?
8 Aug 2021 - 3:15 pm | गॉडजिला
:) याचाही रेफ्रंस हवा.. विषय मिटला... =)) xD xD xD
तुमची मानसीकता मला न झेपणारी नक्कीचं असु शकते, पण तो प्रतिसाद पुरुषप्रधान मानसिकतेचा होता आहे...
5 Aug 2021 - 7:13 pm | कॉमी
शक्य आहे. I may be reaching.
उच्चवर्णीयांचे आरक्षणामुळे ब्रेन ड्रेन होत आहे यावर माझे मत होते की नवीन मध्यमवर्गातून नवीन ब्रेन्स तयार होत असतात. त्यावर डॉक्टरांचा वरील प्रतिसाद आला, जेनेटिक सुपीरिओरिटी बद्दल. त्यामुळे मला जे वाटलं ते वाटलं. असा माझ्या प्रतिसादाचा कंटेक्सट.
5 Aug 2021 - 7:25 pm | गॉडजिला
अगदी शेतीसाठी देखील ती वापरली जाते...
पण जेंव्हा ती देव, देश अन धर्माची अंकित बनवली जाते रेसिजमचा उदय होतो. अब्सोल्युट प्रभुत्व कोणाचेच नाही आफ्रिकन शरीराने दणकट असेल तर ज्यू, जपानी बुद्धिमत्तेने
पण कालच वाचले इत्रायलसाठी सुवर्ण पदक जिकणारा खेळाडू त्याच्या इस्त्रायली ज्यू गर्लफ्रेंड सोबत कायद्याने लग्न करु शकत नाही... वस्तूत: विज्ञानाच्या बाजूने विचार केला तर त्याच्या लग्नात कसलाच अडथळा नसावा
5 Aug 2021 - 7:49 pm | गॉडजिला
अपत्या मधे आई आणि वडील दोघांचेही गुण उतरत असतात म्हणुन फक्त पुरुषाचा वापर जो आपण सुचवत आहात तो वैज्ञानिक नाही
5 Aug 2021 - 8:21 pm | कॉमी
जेनेटिक गुण असतातच, पण सामाजिक आर्थिक बाबींचा सुद्धा मोठा प्रभाव असतो. Unless begining is equal, जेनेटिक गुण काय आणि वर्षानुवर्षांचे सामाजिक आर्थिक फायदे काय हे वेगळे करणे अवघड आहे.
5 Aug 2021 - 8:21 pm | सुबोध खरे
@ कॉमी
संपूर्णपणे बकवास असे प्रतिसाद लिहून आपली भडभड बाहेर काढलीत हे बरं झालं.
निदान थॊडा काळ तरी शांतता मिळेल
बुद्धिमत्ता हि काही जाती वंश किंवा धर्मावर आधारित नाही तर अनुवांशिक आहे पण त्याला रेशिअल सुपिरियॉरिटी सारखे शब्द परत वापरून आपले वैचारिक दारिद्र्य सिद्ध करत आहात.
पण ती (बुद्धिमत्ता) अनुवांशिक आहे हे सत्य आहे. प्रत्येक जातीत धर्मात उच्च बुद्धिमत्ता असलेले लोक आहेतच आणि ते लोक गरिबीत राहिले तरी त्यांची बुद्धिमत्ता पुढच्या पिढीत उतरेलच. यात त्यांना फक्त संधी मिळण्याचा अवकाश आहे.
कोणत्याही जातीचे वंशाचे किंवा धर्माचे लोक सरसकट निर्बुद्ध आहेत याला कोणताही पुरावा नाही किंवा शास्त्राधारही नाही.
स्त्रिया अजिबात शिकल्या नाही आणि अत्यंत वाईट परिस्थितीत किंवा युद्ध जन्य परिस्थितीत (उदा अफगाणिस्तान इस्लामिक देशात) राहिल्या तरी त्यांचे वंशज काही निर्बुद्ध झाले नाहीत.
५० % लोकसंख्येची बुद्धिमत्ता चार भिंतीत कोंडून ठेवल्यामुळे यातील बहुसंख्य देशांची बौद्धिक आणि म्हणून आर्थिक स्थिती अत्यंत खुजी राहिली आहे.( इतका साधा विचार तेथील राज्यकर्त्यांना येत नाही हा त्या धर्माचा पगडा असल्यामुळे आहे)
इतक्या शतकांचा इतिहास समोर असूनही केवळ लाल चष्मा घातला कि असा होतंय पहा
सहाना ताई यांच्यासाठी
बुद्धिमत्ता हि जेनेटिक( अनुवांशिक/ गुणसूत्रांवर) तसेच एपिजेनेटिक बाबींवर( अधि गुणसुत्रे)-- ज्याला सभोवतालचे वातावरण जबाबदार असते) अवलंबून असते हे मान्य केले तरीही मुळात केक भिकार असेल तर त्यावरील आईसिंग उत्तम असून शेवटी उत्पादन निम्न पातळीचेच होईल हि वस्तुस्थिती आहे
5 Aug 2021 - 8:28 pm | कॉमी
तुमचाही भडभड, लाल चष्मां वैगेरेचा आवेशपूर्ण बडबडीचा कोटा माझ्यामुळे पूर्ण झाला हे बरे झाले. मी दिलेला प्रतिसाद काय कोटेक्सट चा विचार करून दिलाय ते गॉजीरा ला दिलेल्या प्रतिसादात वाचा.
उच्चवर्णीय आरक्षणामुळे देशाबाहेर गेले तर ब्रेन ड्रेन होईल ह्यावर मी म्हणालो कि देशाचा बराच मोठा भाग गरिबीत दिवस कंठत आला आहे. त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारली कि नवे उत्तम हुशार जन उदयास येतील. असे मी म्हणल्यावर तुम्ही जेनेटिक जेनेटिक म्हणत आला.
6 Aug 2021 - 10:07 am | सुबोध खरे
@कॉमी
कशाला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय?
ब्रेन ड्रेन म्हणायला मुळात भारतातील सर्वच ब्रेन हा वरच्या ( आर्थिक) वर्गातून आला आहे हा मूलभूत सिद्धांतच चुकीचा आहे.
( आर्थिक) -- नाही तर परत तुमची लाडकी पोथी जात वंश किंवा धर्म म्हणायला लागेल
एकाच संस्थेकडे बुद्धीचा मक्ता असतो असे समजणाऱ्या आय आय टी सारख्या अनेक संस्था भारतात आहेत. तेथील लोक बाहेर गेले म्हणून भारताची प्रगती थांबली असे होणारच नाही.
मागे दोन तीन वेळेस दिलेला प्रतिसाद येथे परत देतो आहे.
उदयनपट्टी येथे शाळेत शिकणारा प्राथमिक शिक्षकाचा हुशार मुलगा मुरुगन "आकाश किंवा बैजूसारखा" कोणताही क्लास न लावता १२ च्या गुणांवर तिरुनेलवेलीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतो आणि घरची गरिबी म्हणून अभियंता झाल्या झाल्या इसरो किंवा भाभा अणुसंशोधन केंद्र किंवा डी आर डी ओ सारख्या संस्थेत "सुरक्षित" म्हणून सरकारी नोकरी धरतो, तो काही जे इ इ मध्ये पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा हुशारीने कमी नसतो.
असे अनेक अत्यंत हुशार परंतु प्रकाशात न आलेले शास्त्रज्ञ भारतीय प्रयोगशाळांत काम करताना मी पाहिले आहेत.
आणि अशा हुशार विद्यार्थ्यांची दुसरी किंवा तिसरी पिढी संधी मिळाल्यावर काय करू शकते ते आप्ल्याला दिसतेच आहे.
बाकी देशाच्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे उपाध्यक्ष आणि भावी पंतप्रधान म्हणून जे आपल्यावर लादले जाण्याची शक्यता असलेले महाशय ज्यांच्या तीन पिढ्या देशावर सत्ता गाजवत्या होत्या त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल न बोलणेच चांगले
तेंव्हा आजूबाजूच्या परिथितीमुळे माणसांची बुद्धिमत्ता कमी किंवा जास्त होते हा भिकारडा साम्यवादी सिद्धांत अनेक वेळेस फोल ठरलेला प्रत्यक्षात दिसून येतो.
6 Aug 2021 - 10:26 am | Bhakti
चांगले उदाहरण आहे.मी सुद्धा ए पी जे अब्दुल कलाम यांच्या उदाहरण देणार होते.
आणि अशा हुशार विद्यार्थ्यांची दुसरी किंवा तिसरी पिढी संधी मिळाल्यावर काय करू शकते ते आप्ल्याला दिसतेच आहे. हे योग्य आहे पण भारतासाठी त्यांनी तो जास्तच फायदा करून द्यावा. मेडिकल क्षेत्रात अशी उदाहरणे आहेत.
6 Aug 2021 - 10:36 am | गॉडजिला
हे एकमेव विधान सोडुन बाकी सर्व प्रतिसाद अत्यंत समर्पक आहे. आजूबाजूची परिस्थिती मॅटर करते. अनेक होतकरू गुणवंत निव्वळ आजूबाजूची परिस्थिती भिकार्डी होती म्हणुन अक्षशः कुजले व वाया गेलेले पाहिले आहेत
6 Aug 2021 - 12:15 pm | सुबोध खरे
परत शब्दांची हातचलाखी?
अनेक होतकरू गुणवंत निव्वळ आजूबाजूची परिस्थिती भिकार्डी होती म्हणुन अक्षशः कुजले व वाया गेलेले पाहिले आहेत.
पण परिस्थिती अशी असल्यामुळे ते ढ किंवा मतिमंद तर झाले नाहीत? किंवा त्यांची अपत्ये ढ निपजली असे तर झाले नाही?
त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर न होणे आणि बुद्धिमत्ताच नसणे यातील फरक आपण समजून घेत नाही कि आपल्याला समजून घ्यायचाच नाही?
न वापरल्याने तलवार गंजली म्हणून काही ती लाटणं होत नाही.
6 Aug 2021 - 10:58 am | कॉमी
आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या मुलाने यश मिळवल्यावर खास कौतुक होते ते याच कारणासाठी कि त्याचे कष्ट इतरांपेक्षा जास्त असतात. गरीब विद्यार्थी मूर्खच असतात आणि हुशार असूच शकत नाहीत असा तिरपांगडा अर्थ माझ्या बोलण्यातून काढणार असेल तर बोलणे खुंटले. उच्च आर्थिक स्तरातील व्यक्ती जिनियसच असेल असेही माझे म्हणणे नाही. एका पातळीच्यावर तुमच्या आर्थिक पातळीचा परिणाम पडणार पण नाही. पण एका पातळीच्या खाली असलेल्या व्यक्तीवर वाईट परिणाम नक्की होतो. बघा बुवा हे पण अमान्य असेल तर.
5 Aug 2021 - 8:46 pm | गॉडजिला
आपला प्रतिसाद चांगल्या केकवरील भिकार आयसिंग चे उत्कृश्ट उदाहरण असेल...
जाता जाता...
Son-Rise: A Miracle of Love ही ऑटिजम वरील सत्यकथा दाखवणारी डॉक्युमेंट्री अवश्य बघा, Raun Kaufman हे पोरग जनमजात ऑटिस्टिक होते, सगळ्या डॉक्टर, सायन्स नी हात टेकले होते व हे पोरग इतरांशी संवाद सोडा स्वतःच्या मूलभूत गोष्टी देखिल करायला कधी शिकणार नाही असा ठाम निष्कर्ष सर्वांनी काढला फक्त त्याचे आई वडील मात्र सहमत झाले नाहीत आज ते पोरग संपूर्ण नॉर्मल आयुष्य कंठत आहे.... केक भिकार होता म्हणुन त्याच्या पालकांनी हार मानली नाही. आज सन राईज प्रोग्राम ऑटीजम वरील क्रांती गणला जातो...
डॉक्टर आपल्या कडून ही अपेक्षा न्हवती.
6 Aug 2021 - 10:17 am | सुबोध खरे
आपले वैद्यकशास्त्राचे ज्ञान फार उच्च दर्जाचे आहे असे वाटत नाही.
ऑटीझम म्हणजे स्वमग्नता - जे मूळ बाहेरच्या जगाशी ज्ञात असलेल्या मार्गानी संपर्क करू शकत नाही त्याला ऑटीझम म्हणजे स्वमग्नता म्हणतात.
याचा बुद्धीमत्ता किंवा हुशारीशी संबंध नाही. अत्यंत हुशार असूनही आपले विचार लोकांकडे मांडू शकत नाही म्हणून त्याला निर्बुद्ध समजणे हे चूक आहे
आपल्याला संगणकाच्या लिनक्स या प्रणालीने संगणकाशी संपर्क करता येत नाही म्हणजे तो संगणक पूर्णपणे निरुपयोगी किंवा ढ आहे असे म्हणण्यासारखे आहे.
एकंदर विषयाला फाटे फोडण्यासाठी असला भंपक प्रतिसाद दिल्याबद्दल आपले धन्यवाद.
बाकी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवूच नका. उगाच अपेक्षाभंगाचे दुःख कशाला पदरात घेताय?
6 Aug 2021 - 11:23 am | गॉडजिला
भिकर्ड्या, भंपक वगेरे टिपण्या आपण जितक्या मनपूर्वक लिहतात तसे कश्ट मुद्दा समजुन घ्यायला आपण घ्यावेत ही विनंती आहे.
बरोबर थोडक्यात पदार्थ सर्वात उत्तम वापरले तरीही अंतिम प्रोडक्ट केक व्यवस्थित नाही...
पण त्याच्या पालकांनी हार मानली नाही वैद्यक शास्त्रातील तज्ञांनी तो काय करू शकणार नाही हे निक्षून सांगूनही त्यांनी ते करून दाखवले यात तुमच्या वैद्यकीय दुखावला गेला तर नाईलाज आहे... तिथल्या डॉक्टरांचा इगो सुध्धा दुखावला गेला होता.
6 Aug 2021 - 12:35 pm | सुबोध खरे
परत शब्दांची हातचलाखी?
अत्यंत हुशार असूनही आपले विचार लोकांकडे मांडू शकत नाही म्हणून त्याला निर्बुद्ध समजणे हे चूक आहे. हे आपण वाचलंच नाही असं दिसतंय.
कुठल्या तरी देशातील कोण्यातरी डॉक्टर ने काही तरी सांगितलं म्हणून माझा इगो दुखावला गेलाय?
हे म्हणजे व्हेनेझुएलाच्या कोणत्यातरी कोपऱ्यातील एका कम्युनिस्टने चे गव्हेरा मूर्ख आहे म्हटल्यामुळे आपला अहं दुखावला गेला असे मी म्हणण्यासारखे आहे.
बरोबर थोडक्यात पदार्थ सर्वात उत्तम वापरले तरीही अंतिम प्रोडक्ट केक व्यवस्थित नाही.
अर्थात मतिमंद मुलाला राजवाड्यात वाढवला तरी त्याची बुद्धिमत्ता किती दर्जाची होऊ शकेल याचा विचार आपणच करायचा आहे.
एकंदर विषयाला फाटे फोडण्यासाठी असला भंपक प्रतिसाद दिल्याबद्दल आपले धन्यवाद.
बाकी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवूच नका. उगाच अपेक्षाभंगाचे दुःख कशाला पदरात घेताय?
6 Aug 2021 - 12:44 pm | गॉडजिला
दुःख नव्हे सुख मिळते, ते तुम्ही द्याल हे वाटले न्हवते :) मजा येतेय की.
असं तुम्हीचका कोणीही म्हंटले तर आनंदच आहे मला. क्युबात क्रांती झाल्यावर मी क्रांतिकारक आहे शासक नाही म्हणुन दुसरीकडे क्रांती करायला निघुन गेला अन मारला गेला याला माझ्या नजरेत काहिच शहानपण दिसत नाही...
धन्यवाद कशाला तुमच्याकडूनच शिकायचा प्रयत्न करतोय
6 Aug 2021 - 12:47 pm | गॉडजिला
पण प्रतिसाद वैयक्तिक अथवा बिलो द बेल्ट मानणार नसाल तर हे इतरांचे प्रतिसाद जे आपणाला भंपक भिकारडे म्हणायची सवय आहे ती जनुकीय आहे, वैद्यकीय आहे की ही भाषा आजूबाूजूच्या परिसरातून शिकलात ?
7 Aug 2021 - 9:43 am | सुबोध खरे
"भिकारडा साम्यवादी सिद्धांत" हे माझं मत अजूनही कायमच आहे
एकंदर विषयाला फाटे फोडण्यासाठी असला भंपक प्रतिसाद दिल्याबद्दल आपले धन्यवाद.
मी प्रतिसादाला भंपक म्हटलंय भिकारडा नव्हे. दोन्हीतील फरक समजून घ्या
आणि भिकार्डी आपल्याच प्रतिसादात आहे
"आपला प्रतिसाद चांगल्या केकवरील भिकार आयसिंग चे उत्कृश्ट उदाहरण असेल
पहा अनेक होतकरू गुणवंत निव्वळ आजूबाजूची परिस्थिती भिकार्डी होती म्हणुन अक्षशः कुजले व वाया गेलेले पाहिले आहेत."
सवय आहे ती जनुकीय आहे, वैद्यकीय आहे की ही भाषा आजूबाूजूच्या परिसरातून शिकलात ?
यातील जनुकीय हा शब्द माझ्या आईवडिलांबद्दल असल्याने स्पष्टपणे वैयक्तिक आणि अश्लाघ्य आहे
असा माझ्या आईवडिलांबद्दल प्रतिसाद देऊन आपण आपली पातळी दाखवून दिलीत याबद्दल धन्यवाद
8 Aug 2021 - 2:36 pm | गॉडजिला
कशा प्रकारच्या विचारधारासाठी शब्द वापरता हा मुद्दा न्हवता त्यामूळे मूळ मुद्द्याला फाटे फोडायचा भंपकपणा आपण कराल ही माझी अपेक्षा आपण अपेक्षितपणे पूर्ण केलीत
पुन्हा एकदा आपल्या वैद्यकीय अज्ञानाचे महान प्रदर्शन आपण इथे केलेत. जनुकीय हा शब्द वैद्यकीय आहे.
आईवडिलांबद्दल काही बोलायचे असते तर हा गुण तुम्ही आई कडून घेतलात की बाबांकडून शिकलात असे विचारले असते पण मी ते केलेले नाहीं कारण कदाचीत जर आपण ही बाब जनुकीय आहे असेही मान्य केले असते तरीही हे वैद्यकीय सत्य आहे जनुकीय क्षमता या फक्त पालकांच्याच आलेल्या असतात असे नाही तर पालकांच्या पालकांच्या पालकांच्याही येऊ शकतात म्हणजेच माझ्या विधानाचा तुमच्या थेट पालकांशी (तुमच्या भाषेत आई वडिलांशी) डायरेक्ट संबंध नाही.
तसेही मी आधी तुम्हीं प्रश्न वैयक्तिक घेणार नसाल तरच लागू होतो हे ही स्पष्ट केलं होते, तरीही आपण अनावश्यक वैद्यकीय, आणि तर्किक भंपकपणा दर्शवणारा प्रतिसाद लीहलात आणि या धाग्यावर ते पुन्हा पुन्हा लिहीत आहात हे अशोभनीय आहे....
बाकी समाजवाद गेला खड्यात मी समाजात डोळ्यासमोर घडलेले जे पाहिले ते लिहले
9 Aug 2021 - 10:06 am | सुबोध खरे
बरं !
आपल्याच शब्दात विचारतो कि आपला साम्यवादी/ समाजवादी दळभद्रीपणा जनुकीय आहे, उत्परिवर्तित आहे कि स्वयंभू आहे?
हो आणि वैयक्तिक घेऊ नका अगोदरच सांगून ठेवतोय (आपल्याच शब्दात)
9 Aug 2021 - 3:52 pm | गॉडजिला
जनुकिय नाही, उत्परिवर्तित नाही, स्वयंभू नाही...
मी पक्का व्यावसायिक व भांडवलवादाच्या बाजूने झुकणारा व्यक्ती आहे... इतर काही समजायचा दळभद्रीपणा कोणी करत असेल तर त्याला तो व्यक्ती जबाबदार असेल.
6 Aug 2021 - 3:46 pm | उपयोजक
ड्रेन होण्यासाठी ब्रेन ही निसर्गदत्त किंवा वंशपरंपरागत देणगी कमी असते आणि आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचे उत्पन्न जास्त असते. गरिबीतून मध्यमवर्गात येणाऱयांचा ओघ चालू असतो, नवनवीन ब्रेन्स तयार होत राहतात.
निसर्गदत्त किंवा वंशपरंपरागत बुद्धिमत्ताच महत्वाची ठरते. कोणी कितीही नाकारले तरीही! तसे नसते तर झोपडपट्टीत राहणारी प्रत्येक व्यक्ती ही तिथल्या संघर्षाला आणि बकाल परिस्थितीला वैतागून जिद्दीने , कष्टाने श्रीमंत झालेली किंवा स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवणारी दिसली असती.
पण मी म्हणतो प्रगती म्हणजे दरवेळी फक्त विज्ञान/तंत्रज्ञानातली प्रगतीच का मोजावी? जशी युरोपियन लोकांनी विज्ञानात प्रगती केली तशीच आफ्रिकन लोकांमधे लोकसंगीत,नृत्यकला , मैदानी खेळातले कौशल्य चांगले असते. ही सुद्धा वंशपरंपरेने मिळालेली देणगीच की! डान्सर मायकल जॅक्सन आणि त्याची भावंडे , उसेन बोल्ट धावपटू किंवा इलय्याराजा, ए. आर रहमान,हॅरिस जयराज सारखे दक्षिणभारतीय प्रतिभावान संगीतकार किंवा प्रभुदेवा,राघवेंद्र लॉरेन्ससारखे प्रतिभावान नृत्यकुशल लोक किंवा कोकणातले अनेक मैल धावू शकणारे कातकरी हे सगळे आफ्रिकनांचे थेट वंशजच नाही का? उत्तरेतल्या लोकांइतकी त्यांच्यात वंशमिसळ झालेली नसावी.
6 Aug 2021 - 5:03 pm | कॉमी
तुमचीही मते (या प्रतिसादातली) काहीही आहेत इतके म्हणतो. धन्यवाद.
6 Aug 2021 - 5:05 pm | कॉमी
हे महालोल आहे
6 Aug 2021 - 6:12 pm | आग्या१९९०
Eugenics आणि Euthenics शास्त्र समजून घेण्याची गरज आहे.
7 Aug 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा
या चर्चेवरुन सुंदर व अधुनिक सिंगापूरचे शिल्पकार ली क्वान यू यांचा एक क्वोट आठवतो:
" रेसमध्ये जिंकण्यासाठी जातिवंत घोडेच लागतात"
ली क्वान यू यांच्या शासनकाळात त्यांनी अधिकारी आणि मंत्रीपदावर त्यांच्याच नातेवाईकांची वर्णी लावली आणि प्रशासन यशस्वी करून दाखवले !
या त्यांच्या नातेवाईकगिरी बद्दल त्यांना पत्रकारांनी एकदा उलटेसुलटे प्रश्न विचारले त्यावर वरील विधान करुन त्यांनी पत्रकारांना निरूत्तर केले !
8 Aug 2021 - 4:07 pm | आंद्रे वडापाव
याचरोबरीने/ अश्याच तर्काने राहुल गांधीचा पदावरील क्लेम
काही लोकांना मान्य वाटतो की काय ?
अशी शंका मनात येत आहे.
(चौ को तुम्ही वैयकतिकरित्या नाही, इन जनरल)
8 Aug 2021 - 5:31 pm | चौथा कोनाडा
पॉईन्टात मुद्दा आहे .....
😂
आणि ली क्वान यू यांच्या या क्वोटवरून लै दंगा झालेला. बर्याच लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती, पण हा हुकुमशहा बधला नाही
4 Aug 2021 - 7:30 pm | अनिरुद्ध.वैद्य
वाईमधुन कोकणात गेले, तिकडेच वसती करुन राहिले असा घराण्यातला किस्सा सांगण्यात येतो.
बाकी जोगेश्वरीबद्दलचा किस्सा म्हणजे, ती देवी मुळची कोकणातलीच. पण काही कामानिमीत्त (कि कोण्या एका लग्नाच्या निमित्ताने) आंबेजोगाईकडे गेली, अन तिकडेच स्थान करुन राहिली अस तिथल्या पुजारी लोकांनी सांगीतले. हव्या तितक्या कथा.
ह्या धाग्यात रुपकुंडाचा उल्लेख कसा नाही? इसवी सन ८५० मधे काही कोकणस्थ यात्रेच्या निमित्ताने तिकडे गेले असतांना बिचारे कुंडात बुडाले. जवळ्पास दोनेकशे सापळे आहेत तिकडे.
5 Aug 2021 - 12:00 am | उपयोजक
इथे जी संशोधन झाली त्यांचे अधिकृत अहवाल सर्वांसाठी उपलब्ध आहेत का? रुपकुंडाच्या संशोधनात ते सापळे चित्पावन समाजाच्या लोकांचेच होते असे स्पष्टपणे लिहिलेय का? की ती शक्यता वर्तवलीय?
5 Aug 2021 - 1:15 pm | मनो
चित्पावन आणि रुपकुंड येथील हाडांचा काहीही संबंध नाही. हा मूळ लेख वाचा.
https://www.nature.com/articles/s41467-019-11357-9
6 Aug 2021 - 11:20 am | अनिरुद्ध.वैद्य
मेडिटेरियन म्हणताय, इंडिया टुडेवाले चित्पावन म्हनताय
म्हन्जे चित्पावन मेडिटेरियन होते, युरेशियन नै असा निश्कर्श काडायला आपण मोकळे
(क्रुप्या हलके घेने)
5 Aug 2021 - 10:35 am | मदनबाण
बाकी जोगेश्वरीबद्दलचा किस्सा म्हणजे, ती देवी मुळची कोकणातलीच. पण काही कामानिमीत्त (कि कोण्या एका लग्नाच्या निमित्ताने) आंबेजोगाईकडे गेली, अन तिकडेच स्थान करुन राहिली अस तिथल्या पुजारी लोकांनी सांगीतले. हव्या तितक्या कथा.
आम्हा कोकणातल्या बापट लोकांची कुलदेवता घाटावरची जोगेश्वरी (म्हणजे अंबेजोगाई) कशी काय याबद्दल कोणी सांगू शकेल का?
योगेश्वरीचे मूळ स्थान म्हणजे गुहागर निवासीनी दुर्गा ! काही लोकांच्या मते योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरी (अप्रभ्रंशीत झालेले).
कोकणातल्या कोणाचेही "कुलदैवत" कोकण सोडुन आढळत नाही,त्यावरुन हे अनुमान काढले गेले असेल.
(डॉ.आनंद खरे)
संदर्भ :---|| दुर्गाश्री||
लेखन व संकलन :--- कविता मेहेंदळे
या एका धाग्यावरुन अनेक धागे आठवले !
लग्नाच्या "बाजार'गप्पा!
आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!
गोत्रांची संपूर्ण यादी
जाता जाता :- जाहिरात... :- चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी
[ कब्रा ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - “Astrology is one of the oldest and most accurate tools known to mankind.” :- Chris Flisher
5 Aug 2021 - 11:41 am | राजेंद्र मेहेंदळे
लेख बर्यापैकी माहितीपूर्ण वाटला. पण पुन्हा पुन्हा पेशवाईतील जेवणावळी आणि नथुराम गोडसेंचा उल्लेख करुन लेखकाला काय साधायचे आहे ते समजले नाही. बाकी कोकणस्थांनी दिलेल्या सामाजिक/आर्थिक योगदानाकडे दुर्लक्ष करणे, आरक्षण नसणे, मनोहर जोशी किंवा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर "बहुजन समाजाचा नेता हवा होता" असे गळे काढणे या बद्दल न बोललेलेच बरे. एखाद्या जातीबद्दल एव्हढा द्वेष फारच विरळा पहायला मिळतो. कदाचित तो पद्धतशीर राजकारणाचा भाग असावा. जसे की पाकिस्तानात कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत द्वेषाचा अजेंडा त्याला राबवावाच लागतो तसेच.
"दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम" असा श्लोक आहे, म्हणजे कुठल्या कुळात जन्म मिळेल हे नशीबावर अवलंबुन आहे, परंतु यश खेचुन आणणे तुमच्यात किती धमक आहे त्यावर असते. याच न्यायाने ब्राम्हण्,मराठा,जैन्,गुजराथी,मुसलमान्,मारवाडी कोणीही नोकरी करु शकतो, धंदा करु शकतो किवा ईतर कोणत्याही मार्गाने यशस्वी होऊ शकतोच की. तरीही पिढ्यान पिढ्यांची सवय म्हणा, परंपरा म्हणा किवा गुणसुत्रे म्हणा बहुसंख्य ब्राम्हण शिक्षण किवा नोकरी करणार, गुजराती/मारवाडी कोणतातरी धंदा करणार असे कल दिसुन येतात.
योगेश्वरी आंबेजोगाई बद्दल--कोकणातील काही मुलांना (त्या परशुरामाच्या १४ जणांना/ वाहुन आलेल्या आणि जिवंत केलेल्या प्रेतांना) मराठवाड्यातील मुली केल्या आणि तिथल्या ग्रामस्थांनी वर्षातुन एकदा मुलींना माहेरी पाठवायची गळ घातली. म्हणुन कोकणस्थांनी योगेश्वरीला कुलदेवी मानली आणि वार्षिक भेट/दर्शनाची प्रथा ठेवली असे म्हणतात.(जाहीरात)
http://misalpav.com/node/32373
आपले मूळ शोधायची उत्सुकता सगळ्यांमध्ये उपजतच असते/असावी. त्याच उत्सुकते पोटी लिहिलेला लेख(जाहीरात)
http://misalpav.com/node/42524
5 Aug 2021 - 11:47 am | अनिरुद्ध.वैद्य
ही उत्पत्ती जास्त लॉजीकल वाटते.
5 Aug 2021 - 9:23 pm | धर्मराजमुटके
बाकी काही असो पण "ब्राह्मण" विषय आला की एकंदरीत पब्लीकला भलताच चेव चढतो हे पाहून अंमळ मौज वाटते. माझ्या ब्राह्मण मित्रांना गंमतीने मी म्हणतो देखील की बाबांनो तुम्ही कार्याचे (मंगल कार्य वगैरे) पैसे नाही कमवत तर शिव्या खायचे पैसे कमावता. ते देखील हसून सहमती दर्शवितात.
6 Aug 2021 - 5:35 am | चौकस२१२
ते देखील हसून सहमती दर्शवितात.
आता हि साता उत्तराची कि काय म्हणतात ती कहाणी येथेच थांबवूयात का सगळे जण,,, मूळ लेख एक अ भ्यास म्हणून वाचा आणि सोडून द्या... त्यात लेखाचा हेतू वाईट नसावा फक्त थोडी मिसल झाली आहे मेहंदळे यांनी सुचवल्याप्रमाणे असे वाटते
लेखाचा मूळ मुद्दा वर्णन करायाच झालं तर ते माझ्य मते असा असावा कि
" हा "रिव्हर्स रेसिसम" चा हा प्रकार ... कोणत्याही समाजाने आपल्या संस्था चालवल्या, जातीचं झेंडयाखाली आले ( मराठा महासंघ, सारस्वत सभा, सीकेपी मंडळ ) तर ते चालते मग या एकाच जातीवर निशाण का ?
२०२१ वर्षी मधेय सुद्धा सावरकर आणि त्यांची जात यावर बोलले जाते म्हणजे ती जात You can hate them but can't ignore them "या सदरात मोडते असे म्हणू शकतो ..
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो
6 Aug 2021 - 6:37 pm | राघव
मला वाटतं चातुर्वर्ण्य हा प्रकार, मुळात माणसाच्या वृत्तीशी निगडीत असावा. त्याची जात कधी बनली असेल हा प्रश्न अनेकदा पडतो.
जे जाती व्यवस्था नको म्हणून सांगतात, त्यातील अनेकांना स्वतःच्या पोरीबाळींसाठी रोटी-बेटी व्यवहार जातीतूनच लागतात हे प्रत्यक्ष पाहण्यात आहे. त्यामुळे त्यात काही विशेष तथ्य उरत नाही.
अर्थात् जाती व्यवस्था नको म्हणून ती काही संपणारी नाही. कितीही आगपाखड केली तरीही. आणि खरं सांगायचं तर त्याची तशी गरजही नाही.
त्यापेक्षा या जातीव्यवस्थेच्या उत्क्रांतीबद्दल विचार व्हायला हवा, जेणेकरून समाजव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.
कोकणस्थ आणि इतर असा वाद निर्माण होण्याचं कारणच मुळात "श्रेष्ठ कोण" या चुकीच्या विचारात आहे.
हे म्हणजे सैन्यातल्या विविध रेजिमेंट मधे "कोणती रेजिमेंट श्रेष्ठ?", असा प्रश्न विचारण्यासारखे झाले. अरे ते योग्य आहे का? देश प्रथम ही भावना तिथे महत्त्वाची असते की नाही? रेजिमेंट बद्दल आदर असतोच आणि असायलाच हवा. पण देशासाठी सगळे एका ध्वजाखाली एकत्र येतातच ना?
मग तसेच समाजव्यवस्थेचे का नसावे? आपल्या जातीबद्दल आदर असण्यात काहीच गैर नसावं. पण कोणतीही एक जात दुसर्या जातीपेक्षा श्रेष्ठ कशी होऊ शकेल? तो विचारच मुळात योग्य नाही. समाजातील तेढ विनाकारण वाढण्याशिवाय त्यातून काहीही निष्पन्न होत नाही.
श्रेष्ठत्त्वाचा विचार करायचा झाल्यास, व्यक्तीचं कर्तुत्व श्रेष्ठ असू शकेल. शिवरायांमुळे मराठा श्रेष्ठ होत नाही आणि बाजीरावांमुळे ब्राह्मण श्रेष्ठ होत नाही. ज्याचं त्याचं आपापलं कर्तुत्व श्रेष्ठ ठरतं. त्या व्यक्तींची किंवा त्यांच्या कर्तुत्वाची तुलना देखील चुकीची आहे. "कोणाचं परमवीरचक्र श्रेष्ठ?" असा प्रश्न चुकीचा होईल ना? तस्सं. ते केवळ अतुल्य असतं! त्यातून फक्त प्रेरणा घ्यायची असते. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या शिकायच्या असतात, आचरणात आणायच्या असतात.
बाकी आरक्षण वगैरे बद्दल काही बोलून वेळ दवडण्यात अर्थच नाही. सर्व जाती-धर्म मिळून, केवळ आर्थिक स्थितीवर आरक्षण असायला हवं हे बहुदा आता सगळ्यांनाच पटतं. लोकांना वेगवेगळ्या स्वार्थप्रेरीत कारणांसाठी हेतूपुरस्सरपणे ते मान्य करायचं नाही हा भाग निराळा.
इत्यलम्
8 Aug 2021 - 6:44 pm | टर्मीनेटर
उत्तम प्रतिसाद राघवजी!
प्रत्येक वाक्याशी सहमत आहे 👍
7 Aug 2021 - 7:38 pm | Rajesh188
बुद्धिमान माणूस कोणाला म्हणायचे,फक्त बुध्दी वान असेल की यश मिळते का?
आपले मनमोहन सिंग जी बुद्धिमान होते पण बेफिकीर,बेधडक नव्हते.त्या मुळे स्वतःचे वलय ते निर्माण करू शकले नाहीत.
जिद्द,धडाडी,बेफिकीर पना,निर्णय घेण्याची क्षमता, हे सर्व गुण असेल तर च यश मिळते.
मग ते युद्धात,प्रेमात,धंद्यात,सवर ठिकाणी .
फक्त बुध्दी आहे आणि वरील कोणतेच गुण नाहीत तर तो व्यक्ती यशस्वी होत नाही.
त्या मुळे फक्त बुध्दी चा गर्व नको.
वरील चर्चे चा निष्कर्ष असा काढला पाहिजे की जसे म्हसी मध्ये .
जाफराबादी,पंढरपुरी,गावठी.
जसे गायी मध्ये
.
जर्सी,देशी,खिल्लारी,हॉस्टेल,गिर.
अशा जाती आहेत आणि प्रतेक जाती ची शारीरिक क्षमता वेगळी आहे,दूध देण्याची क्षमता वेगळी आहे.रोग प्रतिकार शक्ती वेगळी आहे.उंची,लांबी वेगळी आहे.
गुण वेगळे आहेत.
तसेच प्रकार माणसात पण आहेत .
ह्या वर काही सभासद ठाम आहेत असे दिसते.