(नाठाळ मुलांसाठी) बालकविता

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
28 Dec 2007 - 2:40 am

अरे अरे शेंबड्या गंपा
तुझ्याकडे रुमाल नाही?
तो कशासाठी बाप्पा -
शर्टाला जर आहे बाही.

गाल फुगवून बसली आहे
कोपर्‍यामध्ये रुसूबाई
रडून कहर केल्यापेक्षा
परवडले हे रुसू बाई

लवकर लवकर उठायाचे
शाळेत जायचे झटपट आटपून
कशाला या उठाठेवी -
मास्तर रोजच काढणार झोडपून

बालगीत

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

18 Aug 2009 - 7:07 pm | लिखाळ

अर्रे वा :)
मस्त कविता..

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

दशानन's picture

18 Aug 2009 - 7:11 pm | दशानन

लहानपण आठवलं !

8}

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2009 - 7:19 pm | प्रकाश घाटपांडे

तो कशासाठी बाप्पा -
शर्टाला जर आहे बाही.

बाहीला शेंबुड पुसु पुसु त्यो मिलचा शिक्का बी घालुन टाकायचो आमच्या जीवन शिक्शन मंदिरात.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

एकदम शीलबंद मामला! ;)

ञतुरंग

अनुप कोहळे's picture

19 Aug 2009 - 3:44 am | अनुप कोहळे

कडक झालेले.....
=))

मीनल's picture

19 Aug 2009 - 4:09 am | मीनल

कविता मजेशीर आहे.
मीनल.