आधार घेते

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
16 Jun 2021 - 9:18 pm

रेंगाळलेली सांज होतांना
नभीधुंद जरा माघार घेते,
चांदण्याची रात होतांना
तुझ्या मिठीचा आधार घेते||१||

दवांत भिजलेला गुलाब
पहाटे खुडण्याचा अपराध करते,
नको थांबवू तुझ्यासाठी
काट्याचाही घाव एकवार घेते||२||

नाजूक वात तेवतांना
देवाला कधी प्रश्न विचारते?
उमलू दे तुझे नेत्रदीपक
उरला जरी मी अंधार घेते||३||

बांधून रहस्य गाठोडे
पाऊलवाट प्रवासाला निघते,
विसावशील मन गाभारी
तुझा अनमोल व्यापार घेते||४||

कविता

प्रतिक्रिया

Shubham vanve's picture

17 Jun 2021 - 8:42 am | Shubham vanve

छोठ होत वय माझ,
‌ पण खोट नवत प्रेम प्रिये .
माध्यमिकच्या त्या बाल वयातील
तू माझ पहिल पहिल प्रेम प्रिये.
शाळेच्या पहिल्याच दिवशी
पाहून तुज आकर्षिले माझे मन प्रिये .
तुझ पाहण्याची मज असायची ओढ प्रिये.
तुज पाहता शाळेच्या आदोगर,
हृदयाचा पडायचा टोल प्रिये.
तुझ्या येण्याने Classroom म्हणजे,
जणू बहरलेला मोगराच प्रिये
तुझ्या समवेत class मधे Inglish History ही वाटे गोड प्रिये.
तू नसताना Class मध्ये संगीतही वाटे बोर प्रिये.
हे सर्व घडायचे माझ्या मनी पण,
तुज कोठे होते ठाऊक प्रिये.
✍️#Shubham_1way

Shubham vanve's picture

17 Jun 2021 - 8:54 am | Shubham vanve

छोठ होत वय माझ,
‌ पण खोट नवत प्रेम प्रिये .
माध्यमिकच्या त्या बाल वयातील
तू माझ पहिल पहिल प्रेम प्रिये.
शाळेच्या पहिल्याच दिवशी
पाहून तुज आकर्षिले माझे मन प्रिये .
तुझ पाहण्याची मज असायची ओढ प्रिये.
तुज पाहता शाळेच्या आदोगर,
हृदयाचा पडायचा टोल प्रिये.
तुझ्या येण्याने Classroom म्हणजे,
जणू बहरलेला मोगराच प्रिये
तुझ्या समवेत class मधे Inglish History ही वाटे गोड प्रिये.
तू नसताना Class मध्ये संगीतही वाटे बोर प्रिये.
हे सर्व घडायचे माझ्या मनी पण,
तुज कोठे होते ठाऊक प्रिये.
✍️#Shubham_1way