कसाही बरसला, तरी मजा ती संपली.
मन घाबरे घाबरे, जीव झाला व्याकुळ
कुठे दिसेना रस्ता, सर्व अंधार अंधार.
कधी शित सरी मध्ये, नाहुनी निघालो
सवगड्यांच्या संगे, चिंब चिंब झालो
कधी थंड वारा अंगास झोंबला
अंगातल्या रगेने,तो ही तिथे शमला
पण आज तुला पाहताना, दूर दूर पळालो
जीवाच्या आकांताने, घरा मधे धावलो
कुठे आशेचा किरण, हळुच डोकावला
काळया कुट्ट ढगा मध्ये, लख्ख विजेचा प्रकाश
रोज ऐकुन नवीन नवीन, माणूस सरावला
जीवाचा काय तो मोल, गेलेे सारे विसरून
कोडग्या मनाला, आता काय ती भीती
कसा ही बरसला, तरी मजा ती संपली.