आज जागतिक चहा दिनानिमित्त हे स्फुरले. गोड मानून घ्या. आवडले/न आवडले तरी कळवा.
जुना विषय काढण्यासाठी, विचारले मी चहा घेणार?
तोच विषय टाळण्यासाठी, विचारते ती चहा घेणार?
नको वाटले छप्पर आणि नको वाटले काही काही,
खरे छान वाटले जेव्हा म्हणालास तू, चहा घेणार?
फिके पडावे अत्तर ऐसा गंध हे पेय धारण करते,
उकळीन ह्याला आले घालूनी, तू थोडा चहा घेणार?
कारण नसता भेटीसाठी, कशास उगाचच भेटायाचे ,
तरी कुठूनसा येईन मी बघ, विचार फक्त चहा घेणार?
चर्चांसाठी, वादासाठी किंवा आणखी कशाहीसाठी,
निमित्तमात्र एक बुलावा, ऐक ना रे चहा घेणार?
कामामध्ये व्यग्र असू दे हरेक माणूस घरातला,
कान तरी आतुर ऐकण्या एक पुकारा, चहा घेणार?
महत्त्व आता ह्या प्रश्नाचे तुम्हास आहे कळले म्हणता?,
मित्र बनूया, हसून पाहूया, या बसा, चहा घेणार?
-आगाऊ म्हाद्या
जागतिक चहा दिवस २१ मे २१
प्रतिक्रिया
21 May 2021 - 6:23 pm | चौथा कोनाडा
मी चहा घेणार ? द्या की, का नाही घेणार ?
☕
21 May 2021 - 6:34 pm | आगाऊ म्हादया......
21 May 2021 - 8:29 pm | चौथा कोनाडा
आम्हा साहेब,
फर्मास तरतरीत कविता!
आता तुम्ही आगाऊ म्हटल्यावर थोडा आगाऊपणा करावा !
- आगाऊ चौको
22 May 2021 - 10:39 pm | आगाऊ म्हादया......
धन्यवाद चौको
21 May 2021 - 6:28 pm | सुरिया
छानच.
चहा आवडतोच केंव्हाही.
21 May 2021 - 6:36 pm | आगाऊ म्हादया......
21 May 2021 - 6:29 pm | मुक्त विहारि
पुरूषांनी चहाला नाही म्हणू नये
21 May 2021 - 6:37 pm | आगाऊ म्हादया......
21 May 2021 - 6:40 pm | कॉमी
ऑ ?
21 May 2021 - 6:33 pm | गॉडजिला
पण वेळेला चहा लागतोच... लागतो.
21 May 2021 - 6:38 pm | आगाऊ म्हादया......
21 May 2021 - 6:43 pm | कॉमी
आणि चहा gifs पण छान !
21 May 2021 - 6:46 pm | आगाऊ म्हादया......
:-)
21 May 2021 - 7:29 pm | प्राची अश्विनी
कडक ताजी तरतरीत कविता!
22 May 2021 - 9:15 am | आगाऊ म्हादया......
आपले प्रतिसाद पाहून परत काहीतरी लिहावसं वाटू लागलंय, शिवाय काहीतरी वाचण्याजोगं लिहितोय असंही वाटू लागलं आहे.
21 May 2021 - 9:51 pm | प्रसाद गोडबोले
22 May 2021 - 9:16 am | आगाऊ म्हादया......
हो पाहिलाय मी हा, आणि उसाचा रस वाला सुद्धा.