सिझेरिअन प्रसूती : इतिहास व दंतकथा

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
12 Apr 2021 - 11:34 am

गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यजन्म हे मानवी पुनरुत्पादनातले महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय आकुंचन पावू लागते. यालाच आपण ‘कळा’ म्हणतो. त्यांची गती वाढत वाढत अखेरीस योनिमार्गे प्रसूती होते. परंतु हे नैसर्गिक भाग्य सर्वांनाच लाभत नाही. काही ना काही कारणाने जेव्हा नैसर्गिक प्रसुतीत अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचे पोट प्रत्यक्ष फाडून व गर्भाशयात छेद घेऊन बाळास बाहेर काढले जाते. वैद्यकातील संशोधन व प्रगतीनुसार ही शल्यक्रिया आता सहज आणि झटपट केली जाते. याचा लाभ अनेक स्त्रिया घेत असून त्यामुळे बाळ-बाळंतीण सुखरूप राहतात.

या महत्त्वाच्या आणि मूलभूत शल्यक्रियेचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. त्याला ‘सिझेरिअन’ हे नाव कसे पडले हा तर कुतूहलाचा आणि काथ्याकुटाचा विषय आहे. अनेक आख्यायिका या नावाभोवती गुंफलेल्या आहेत. रोमन सम्राट ज्युलियस सिझरचा आणि या शल्यक्रियेच्या नावाचा नक्की संबंध काय आहे, यावर वाद झडत राहतात. खुद्द इतिहासकारांमध्येही त्याबद्दल प्रवाद आहेत. त्या वादात न शिरता संबंधित उगमकथांचा निखळ आनंद वाचकांनी घ्यावा हा या लेखाचा हेतू आहे. त्याचबरोबर सुमारे सहाशे वर्षांच्या आधुनिक इतिहासात वैद्यक प्रगतीनुसार ही शल्यक्रिया अगदी रांगडेपणापासून पुढे कशी शास्त्रशुद्ध व सुलभ होत गेली याचाही आढावा घेतो.

या संदर्भातील पौराणिक कथा आपण सोडून देऊ आणि थेट आधुनिक इतिहासात येऊ. यशस्वी सिझेरिअनचा पहिला पुरावा इसवीसन १५०० मधील आहे. पण तो जाणून घेण्यापूर्वी त्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती पाहू. ही परिस्थिती बरीच विचित्र होती आणि तेव्हाचे कायदेकानूही तसेच होते. नैसर्गिक प्रसूती न झाल्याने बाळंतीण दीर्घकाळ अडून राही आणि मरणपंथाला लागे. वेळप्रसंगी तिचा मृत्यूसुद्धा होई. तेव्हाच्या दंडकानुसार गर्भवतीच्या अशा अखेरच्या किंवा मृतावस्थेत कसेही करून तिचे पोट फाडले जाई आणि जिवंत मूल मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाई. यात कधी यश तर कधी अपयश पदरी येई. मूल जगले तर ते समाजाला (लोकसंख्यावाढीसाठी) हवेच ही तेव्हाची प्राथमिकता होती. आईचाही जीव वाचला पाहिजे हा दृष्टिकोन नव्हता. जर का या झटापटीत स्त्री व मूल हे दोन्ही मृत झाले तर त्यांचे स्वतंत्रपणे दफन करायचे ही धार्मिक रीत होती. त्यासाठी का होईना ही पोट फाडण्याची क्रिया आवश्यक मानली जाई.

इसवीसन १५०० मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेली अशा प्रकारची शल्यक्रिया हा या विषयातील पहिला लिखित पुरावा मानला जातो. ही घटना घडली होती जेकब नुफर या डुक्करपालक माणसाच्या घरी. या गृहस्थाच्या व्यवसायाचा एक भाग डुक्कर माद्यांची बीजांडे व गर्भाशय काढून टाकणे (sow gelder) हा होता. त्यामुळे मादीच्या प्रजनन इंद्रियांबद्दल त्याला प्राथमिक ज्ञान होते. तर एकदा या जेकबची बायको गरोदरपण संपून बाळंतपणाच्या अवस्थेत येऊन ठेपली. बिचारी कळांवर कळा देत होती पण प्रत्यक्षात प्रसूती काही होत नव्हती. तेरा सुईणींच्या मदतीने काही दिवस यावर शर्थीचे प्रयत्न चालू होते ! पण पदरी अपयशच. अखेर तिची वेदनामय अवस्था न पाहवून जेकबने स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडून तिचे पोट फाडण्याची परवानगी मिळवली. अडलेल्या बाळंतिणीस मोकळी करण्यासाठी आता तो स्वतः हे धाडसी पाउल घरीच उचलणार होता. मग त्याने बायकोला सरळ घरातील ओट्यावर ठेवले आणि त्याच्या जवळील आयुधे वापरून शल्यक्रिया केली. त्याच्या हाताला यश आले आणि बाळ-बाळंतीण सुखरूप राहिले. याच माउलीने पुढील आयुष्यात पाच अपत्यांना नैसर्गिकपणे जन्म दिला. ते सिझेरिअन बाळ देखील तब्बल 77 वर्ष जगले ! जेकबच्या या घटनेत रुग्णास ‘बेहोष’ केले होते की नाही याचा मात्र उल्लेख केलेला नाही.

ok

आता इथे आपण सिझेरिअन या शब्दाच्या व्युत्पत्तीकडे जाऊ. सर्वप्रथम ज्यूलियस सीझरबद्दल. काही शब्दकोशांसह अन्य संदर्भांनी असे म्हटले आहे, की हा सम्राट जगात सर्वप्रथम या प्रकारे पोट फाडले जाऊन जन्मला म्हणून त्याच्या स्मरणार्थ हे नाव दिले आहे. परंतु हे ऐतिहासिक परिस्थितीशी विसंगत असल्याने पुढे अमान्य केले गेले. वर उल्लेख केल्याप्रमाणे तत्कालीन समाजात ही शल्यक्रिया, जेव्हा गर्भवती मृत्युपंथाला लागली असेल तेव्हाच केली जाई आणि त्यात बहुतांशवेळा तिचा मृत्यू होई. वास्तवात सिझरची आई Aurelia त्याच्या जन्मानंतर दीर्घकाळ जिवंत होती.

मग सिझेरिअन शब्द आला तरी कुठून ?
तर त्याचे उत्तर लॅटिन भाषेत मिळते. Caedare या शब्दाचा अर्थच कापणे/ छेद घेणे हा आहे. याप्रकारे जी मुले मृत मातेचे गर्भाशय फाडून बाहेर काढली जात त्यांना caesones असे नाव पडले. ज्यूलियसचा संबंध यानंतरच्या काळात येतो. तो सम्राट असताना त्याने या संदर्भात असा फतवा काढला, की बाळंत होताना ज्या स्त्रिया मृतवत होतील त्यांची पोटे फाडून आतले मूल बाहेर काढावे. म्हणून ही शस्त्रक्रिया ठरली ‘सिझेरिअन’ (कायदा).

एक पर्यायी आख्यायिका अशीही आहे:
सम्राट ज्युलिअस सीझरच्या जन्माच्या बऱ्याच पूर्वी ज्युलिअस सीझर याच नावाचा एक माणूस त्याच्या वंशात जन्मला होता. तो ‘अशा’ पद्धतीने जन्मल्याने त्याच्या आडनावापुढे सीझर हे बिरूद लागले. पुढे त्याच्या वंशातील सर्वांनी ते कायम ठेवले.
सध्या सिझेरिअन या शब्दाचा सामान्य व्यवहारात ‘सीझर’ असा सुटसुटीत उल्लेख केला जातो. तर भारतातील निमशहरी भागांत त्याचा ‘सिझरिंग’ असा मजेशीर अपभ्रंश रूढ झाला आहे.

जेकब या वराहपालकाने केलेली शस्त्रक्रिया आई व बाळ या दोघांसाठी यशस्वी होणे हा या संदर्भातील पथदर्शक टप्पा ठरला. दरम्यान मानवी शरीराचा चिकित्सक अभ्यास एकीकडे होत होता. इ.स. १५४३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शरीररचना ग्रंथात स्त्रीच्या गर्भाशय आणि संबंधित जननमार्गांचे व्यवस्थित वर्णन केले गेले. पुढे १६००मध्ये सिझेरियन न करताही अडलेले बाळ मोकळे करण्याचा एक नवा प्रयोग चेंबरलेन यांनी केला. त्यात त्यांनी शास्त्रीय ‘फोर्सेप्स’ योनिमार्गात लावून तिथूनच प्रसूती करण्यात यश मिळवले. एव्हाना प्रसूतीशास्त्रातील महत्त्वाच्या अशा क्रियांचे शोध पुरुषांनीच लावले असल्यामुळे या क्षेत्रावर एक प्रकारे पुरुषी वर्चस्व निर्माण झाले. हा प्रांत आता निव्वळ सुईणींचा राहिला नाही. आतापर्यंत केलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियाना ऑपरेशन असे म्हटले जाई. १५९८ मध्ये एका वैज्ञानिकाने प्रसूतीशास्त्राचे पुस्तक लिहिले आणि त्यात त्याने प्रथमच सिझेरिअन सेक्शन हा शब्दप्रयोग वापरला आणि पुढे तो कायमचा रूढ झाला.

पुढे अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध या दीर्घ कालखंडात मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सिझेरिअन शल्यक्रिया पुरुषच करीत होते. तेव्हा स्त्रियांना रीतसर वैद्यकीय प्रशिक्षण मिळत नसे. परंतु १८१५ ते ते २१ या दरम्यान कधीतरी एका ब्रिटिश स्त्रीने ही शल्यक्रिया केली आणि ती इंग्लंडमधील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया मानली जाते. या शल्यक्रियांदरम्यान संबंधित स्त्रीला बेहोष कसे करीत याचे फारसे उल्लेख सापडत नाहीत. १८७९ मध्ये युगांडात केलेल्या एका सिझरच्या वेळी त्या स्त्रीला केळांपासून केलेली वाईन ढोसण्यात आली होती. या शल्यक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी करण्यासाठी cautery या तंत्राचा वापर केला गेला. कापलेल्या गर्भाशयाला न शिवता तसेच ठेवले गेले. पोटावरील छेद लोखंडी सुया वापरून शिवला गेला आणि शेवटी मलमपट्टी म्हणून जडीबुटीची पेस्ट वापरली गेली. या घटनेचा कित्ता गिरवत पुढच्या अशा क्रिया अधिक सफाईने होऊ लागल्या. स्त्रीला बेहोष करण्यासाठी विविध वनस्पतींचे अर्क वापरले जाऊ लागले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप-अमेरिकेत खास स्त्रियांच्या समस्यांसाठी स्वतंत्र रुग्णालये उभी राहिली. १८४६ मध्ये रुग्णाला संपूर्ण भूल देण्यासाठी ‘इथर’चा वापर केला गेला. ही एक क्रांतिकारी घटना होती. लवकरच त्याचा वापर शल्यक्रियामध्ये वाढू लागला. पण गमतीची गोष्ट म्हणजे सिझेरियनसाठी मात्र स्त्रिया त्याचा स्वीकार करेनात ! यासाठी एक अंधश्रद्धा कारणीभूत होती. इव्हच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून स्त्रीने अपत्यास जन्म देताना असह्य वेदना सोसल्याच पाहिजेत ही समजूत रूढ होती. याचे निराकरण करणे आवश्यक होते. अखेरीस खुद्द व्हिक्टोरिया राणीने १८५३ व ५७ मध्ये आपल्या दोन अपत्यांना जन्म देताना भूल म्हणून क्लोरोफॉर्मचा स्वीकार केला. त्याचे अपेक्षित पडसाद समाजात उमटले आणि मग भूलशास्त्राचा सिझेरियनसाठी नियमित वापर सुरू झाला.

एव्हाना शस्त्रक्रिया सुधारली होती आणि भूलीचा वापरही सुरू झाला होता पण तरीही अशा अनेक बायका शल्यक्रियेनंतर जंतुसंसर्गाने मरत. पॅरीस मध्ये १७८७ – १८७६ या कालखंडात सिझेरियन झालेली एकही स्त्री जगली नव्हती ! या क्रियांमध्ये तेव्हा मूल काढल्यानंतर प्रत्यक्ष गर्भाशय काही शिवले जात नव्हते. गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावून पुढे तो छेद आपोआप बुजेल अशी त्यामागे (गैर)समजूत होती. परंतु प्रत्यक्षात तसे होत नसल्याने कित्येक स्त्रिया रक्तस्त्रावाने मरण पावत.
आता यावर तोडगा म्हणून एका डॉक्टरने सिझेरिअन झाल्यानंतर गर्भाशय पण काढून टाकावे हा मार्ग अवलंबला होता. परंतु हा काही या परिस्थितीवर तोडगा नव्हता. १८८२ मध्ये M. Saumlnger यांनी सिझेरिअन नंतर गर्भाशय शिवलेच पाहिजे हा आग्रह धरला. सुरुवातीस तसे करताना टाके घालण्यासाठी त्यांनी चांदीच्या पातळ तारा वापरल्या. या शल्यक्रियेच्या इतिहासातील हा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरला.

एव्हाना या शल्यक्रिया यशस्वी होत असल्या तरी त्या नंतरचा जंतुसंसर्ग ही मोठी समस्या होती. पुढे 1940 मध्ये त्या उपचारांसाठी आधुनिक प्रतिजैविके उपलब्ध झाली आणि हा प्रश्न सोडवला गेला. दरम्यान भूलशास्त्रातील संशोधनानेही वेग घेतला होता. आतापर्यंत या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण शरीराला भूल दिली जाई जी अनावश्यक होती. भूलशास्त्रातील एका विशिष्ट प्रकारानुसार शरीराचा फक्त कमरेखालील भाग बधीर केला जाऊ शकतो. आता या नव्या तंत्राचा सर्रास वापर होऊ लागला. त्यामुळे शल्यक्रिये दरम्यान रुग्ण जागी राहू शकते. तसेच बाळ बाहेर काढल्यानंतर तिचा त्याच्याशी संपर्कही लवकर प्रस्थापित करता येतो. आता गर्भाशय शिवण्याची प्रक्रिया आधुनिक शास्त्रशुद्ध धागे वापरून केली जाते.

असा आहे हा या क्रांतिकारी शल्यक्रियेचा इतिहास. सहाशे वर्षांपूर्वी जेव्हा सिझेरिअनचा उगम झाला तेव्हा ती शस्त्रक्रिया बरीच रांगडी होती. त्या अर्धवट प्रयत्नातून बहुतांश वेळा माता व बालक दोघेही मृत्युमुखी पडत. अनेक संशोधकांच्या अथक प्रयत्नांनंतर या तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि आज ती एक सुलभ शल्यक्रिया झालेली आहे. तिच्या सुयोग्य वापरामुळे बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आणि मजेत असे आनंदी चित्र आपल्यापुढे आहे.

लेखाच्या शीर्षकात स्पष्ट केल्यानुसार सिझेरिअनचा इतिहास आणि त्या शब्दाच्या रंजक उगमकथा सांगणे एवढाच या लेखाचा हेतू आहे. प्रत्यक्षात ही शल्यक्रिया कधी करणे योग्य वा अयोग्य, तिचा निर्णय कुठल्या निकषांवर घेतला जातो हा पूर्णपणे प्रसूतीतज्ञांच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यांच्या सहभागाशिवाय या मुद्द्यांवर चर्चा करण्यात अर्थ नाही. या अनुषंगाने येणारे विशिष्ट प्रश्न प्रतिसादात टाळावेत ही विनंती.
............................................................................................................................................................................
चित्र जालावरुन साभार !

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 12:01 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

बेकार तरुण's picture

12 Apr 2021 - 12:04 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणे रोचक माहिती असलेला लेख....
धन्यवाद..

Bhakti's picture

12 Apr 2021 - 12:18 pm | Bhakti

चांगली माहिती!
बायकांचं जवळचा विषय,नार्मल की सिझर.

बापूसाहेब's picture

12 Apr 2021 - 5:51 pm | बापूसाहेब

सुंदर सादरीकरण आणि रोचक माहिती कुमार सर.

धन्यवाद.

सौंदाळा's picture

12 Apr 2021 - 6:23 pm | सौंदाळा

आडवे /तिरके असलेले बाळ मसाज करुन सरळ करणार्‍या सुईणी पुर्वी भारतात पण होत्या. मात्र आता असे केले जाते का?
स्त्रीरोग तज्ज्ञांना असे प्रशिक्षण मिळते का?
आठव्या महिन्यातल्या सोनोग्राफीत बाळाची पोझिशन बघुन निर्णय घेतला जातो. भारतात सिझेरियनचे प्रमाण खुपच वाढले आहे. पाश्चात्य देशांमधे मात्र अजुनही नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण जास्त आहे, हे खरे आहे का?

गुल्लू दादा's picture

30 Apr 2021 - 5:40 pm | गुल्लू दादा

आडवे असलेले बाळ जशी प्रसूती जवळ येते तसे बाह्य भागावर दाब देऊन सरळ करण्याचा प्रयत्न जरूर होतो फक्त अट अशी की बाळाचा कुठलाही भाग प्रसूतिमार्गात अडकलेला असू नये. याला external cephalic version असे म्हणतात वैद्यकीय भाषेत. वरील सगळं सोनोग्राफीच्या निगराणीत होतं. भारतात सिझेरियनच प्रमाण वाढलंय खरं पण त्याला बरेच पैलू आहेत. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय असेल इथे तो जमायचा नाही. मी या विषयातील तज्ञ नाही पण शिकत असताना या गोष्टी वरिष्ठ मंडळी करताना पाहिलंय जरूर म्हणून प्रतिसाद दिला. बाकी कुमार सर म्हणतात तशी चर्चा भटकू नये या प्रतिसादाने म्हणजे झालं. धन्यवाद.

कुमार१'s picture

12 Apr 2021 - 6:32 pm | कुमार१

सौंदाळा,
प्रसूतिशास्त्राशी माझा विशेष संपर्क राहिलेला नसल्यामुळे मी हा लेख फक्त एका रंजक दृष्टीकोनापुरताच लिहीलेला आहे. तसे लेखात शेवटी नमूद केले आहे.

तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा जाऊ नये असे मला वाटते.
अर्थात कोणी संबंधित तज्ञ असल्यास त्यांनी अधिक सांगायला काहीच हरकत नाही.

सौंदाळा's picture

12 Apr 2021 - 8:46 pm | सौंदाळा

तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा जाऊ नये असे मला वाटते.
क्षमस्व

कंजूस's picture

12 Apr 2021 - 6:59 pm | कंजूस

असणाऱ्या सिझेरिअन सेक्शन बाळंतपणास भविष्यकाळही उज्ज्वल आहे.

प्रसाद गोडबोले's picture

12 Apr 2021 - 8:23 pm | प्रसाद गोडबोले

सोळाव्या शतकात सिझेरियन म्हणजे किमान माझ्यातरी कल्पनेच्या पार आहे . सोळ्याव्या शतकात मॉर्फिन चा तरी शोध लागला होता का ? किंव्वा बॅक्टेरिया चा तरी शोध लागला होता का? अगदी शस्त्रक्रिया लांबची बात , पण एकोणिसाव्या शतकात "नॉर्मल प्रेगनन्सि च्या आधी सुईणीने / डोक्टरने हात धुतले पाहिजेत" असे मत मांडणार्‍या डॉक्टर इग्नाझ सेमेल्वाईझ ला लोकांनी यड्यात काढले होते म्हणे!

बाकी आजकाल मात्र सिझेरियन चा धंधा सुरु केला आहे डॉक्टरांनी . लोकं एक किंव्वा दोन पेक्षा जास्त अपत्यांना जन्म देत नाहीत आणि त्यामुळे सिझेरियन सहज खपुन जाते असे स्पष्ट लॉजिक आहे . नॉर्मल प्रेगनसीला जिथे २०ते २५ ह खर्च येतो तिथे सिझेरियन च्या नावाखाली ७० ते ७५ ह सहज छापता येतात असे सोप्पे अर्थकारण आहे ! अर्थात सगळेच डॉक्टर असे करत असतील अस्से नाही पण अनेक करतात . शिवाय बायकाही जास्त त्रास नको म्हणुन पटकन सिझेरियन आटोपुन घ्या असे म्हणायला लागल्या आहेत . नॉर्मल प्रेगन्स्सी नंतर ५-७ दिवसात रिकव्हरी होते अन तरी काही काही बायकांना महिनाभर अंथरुणाला खिळुन रहायची हौस का असते हे अनाकलनीय आहे !

आणि मेडीकल इन्श्युरन्स वाले तर सगळ्यात क्युतिया लोकं आहेत . माझ्या , स्वतःच्या अनुभवात , मेडीकल इन्शुरन्स कंपनीने सिझेरियन केस असुनही अ‍ॅनास्थेशिया डॉक्टरच्या फी चा क्लेम नाकारला होता . ह्या लोकांना अक्कल नसते की जाणीवपुर्वक असे वागतात हा मला अजुनही न सुटलेला प्रश्न आहे ! पण यशस्वी प्रेगनन्सी नंतर, बाळ बाळंतीण सुखरूप असल्याने सगळेच आनंदात असतात , कोणीही भांडायच्या मनःस्थितित नसतो , त्याचा गैरफायदा उचलणारे हे लोकं . सिरियसली पिपल लाईक दीज डिझर्व करोना !

बाकी हे अवांतर असो.
लेख आवडला ! ह्या विषयावर असेच लेख वाचायला आवडतील. मझे स्वत्:चे क्षेत्र फायनान्स अणि ब्यँकिन्ग असले तरी ह्या मेडीकल क्षेत्रा विषयी खुप उत्सुकता आहे . अनेक प्रश्न आहेत उदा : क्रोमोझोम्स मध्ये माहीती नक्की कशी साठवली जाते ? किंव्वा प्रेगनन्सी मध्ये एक स्पर्म आणि एक एग्ग मिक्श झाल्यावर जी सेल तयार होते त्यात माहीती कोठे असते ? कोणता सेल ब्रेन होणार अन कोणता हार्ट अन कोणता बोन्स हे कसे ठरते ? किंवव्वा लहान मुलांना जन्मतःच ओठांचे मसल्स वापरुन दुध प्यायचे हे ज्ञान आपोआप कसे प्राप्त होते ? माणसांमध्ये नाही पण इतर प्राण्यांमध्ये जन्म जाल्यापासुन काही मोजक्याच मिनिटात प्राणी स्वतःच्या पायावर उभा रहातो, how does brain cells, neurons learn that ?

असो

पुढील लेखनासाठी शुभेछा !

क्रोमोझोम्स मध्ये माहीती नक्की कशी साठवली जाते ? किंव्वा प्रेगनन्सी मध्ये एक स्पर्म आणि एक एग्ग मिक्श झाल्यावर जी सेल तयार होते त्यात माहीती कोठे असते ? कोणता सेल ब्रेन होणार अन कोणता हार्ट अन कोणता बोन्स हे कसे ठरते ?

>>>>
हे प्रश्न मूलभूत जीवशास्त्राशी निगडीत असून रोचक आहेत. सवडीने विचार करेन.
धन्यवाद !

गॉडजिला's picture

12 Apr 2021 - 9:25 pm | गॉडजिला

:(

उपयोजक's picture

12 Apr 2021 - 10:34 pm | उपयोजक

लेख! छान!

वकील साहेब's picture

13 Apr 2021 - 5:49 pm | वकील साहेब

कुमार सर, नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण लेख, धन्यवाद.

आता २०२१ मध्ये तरी आपण सिझेरियन प्रसूती शास्त्रात प्रगतीच्या सर्वोच्च टप्प्यावर आहोत का ? कि अजून ५० वर्षांनी मिपा वर सिझेरियन प्रसुतीवर लेख लिहिला गेला तर त्यात अशी वाक्य असतील का ?
की, "बाळ बाळंतिणीला वाचवण्या साठी सोळाव्या शतका पासून सुरु झालेली पोट फाडून बाळ बाहेर काढण्याची पद्धत अगदी एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चालू होती. पण सिझेरियन प्रसूती कितीही संकटमोचक वाटत असली तरी ती अनैसर्गिक होती आणि म्हणून नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी खूप संशोधन होऊन सिझेरियन प्रसूती करावी लागण्याची जी काही कारणं होती त्यावर यशस्वीरित्या मात करण्यात आली आहे. आता मुहूर्त पाहून बाळाला या जगात आणणाऱ्या मातेची प्रसूती वगळता अन्य कोणाचीच सिझेरियन प्रसूती करण्याची वेळच येत नाही."
थोडक्यात काय तर येत्या काळात या प्रकरणात अजून संशोधन होऊन हि प्रक्रिया अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत काय ?

येत्या काळात या प्रकरणात अजून संशोधन होऊन हि प्रक्रिया अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत काय ?
>>>

प्रामाणिकपणे सांगायचे तर वैद्यकाच्या या शाखेशी माझा फारसा संपर्क नाही आणि तितके वाचनही नाही.
सवडीने तज्ञांशी काही बोलून उपयुक्त माहिती मिळाल्यास जरूर लिहीन.
हा लेख मी इतिहासाचे स्मरणरंजन इतक्या पुरताच मर्यादित ठेवला आहे.

बरीच उत्तम माहिती मिळाली, छान लेख.

लई भारी's picture

13 Apr 2021 - 9:44 pm | लई भारी

सिझरिंग

अगदी खरे आहे :-)

तुषार काळभोर's picture

15 Apr 2021 - 2:33 pm | तुषार काळभोर

अंगावर काटा आणणारा इतिहास!
देव त्या सर्व डॉक्टरांचं कल्याण करो!

कुमार१'s picture

16 Apr 2021 - 4:19 pm | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
वर वकील साहेब यांनी एक चांगला प्रश्न उपस्थित केला आहे:

भविष्यात कोणाचीच सिझेरियन प्रसूती करण्याची वेळच येणार नाही, हे शक्य आहे का ?

>>
यासंदर्भात मानवी उत्क्रांतीशी संबंधित एक रोचक मुद्दा आहे. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा चतुष्पाद प्राण्याचा माणूस होण्यास सुरुवात झाली तेव्हा शरीर रचनेत दोन महत्त्वाचे बदल झाले :

१. चतुष्पाद ते द्विपाद अवस्था.
२. मेंदूचा मोठा आकार .
त्यामुळे गरोदरपणात स्त्रीचा जननमार्ग आणि बालकाचे डोके हे एकमेकात अगदी घट्ट बसू लागले. या कारणास्तव योनिमार्गे नैसर्गिक जन्म होताना देखील बाळाला पुढे सरकत असताना गोल वळावे लागते ( रोटेशन).

निसर्गानुसार काही टक्के स्त्रियांत कायमच जननमार्गातील जागा आणि बाळाचे डोके यांचे प्रमाण ‘मिसफिट’ राहणार.
या मूलभूत जीवशास्त्रीय कारणाने असे जन्म हे शल्यक्रियेद्वारे करावे लागतात.

सुधीर कांदळकर's picture

20 Apr 2021 - 7:55 am | सुधीर कांदळकर

नेहमीप्रमाणे मुद्देसूद आणि रंजक. धन्यवाद.

एका नर्सने असे सांगितले की. सिझेरिअन करण्यापूर्वी कण्यात टोचून भूल देतात. त्यामुळे भविष्यात लंब्रायटीस होण्याची शक्यता असते. हे खरे कां?

कुमार१'s picture

20 Apr 2021 - 8:38 am | कुमार१

धन्यवाद.

पाठदुखीचा मुद्दा. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत प्रसूतीनंतर आठवडाभरात ती थांबते. ज्यांची थांबत नाही त्यांच्या बाबतीतली कारणे तशी अस्पष्ट आहेत. त्यामध्ये स्थूलपणा ( BMI > ३२) हे एक कारण आहे.

प्रत्यक्ष भूल देण्याच्या तंत्रामुळे पाठदुखी मागे लागते का, हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे. त्यावर सरसकट लागू होईल असे स्पष्ट उत्तर नाही.

सुबोध खरे's picture

7 May 2021 - 7:52 pm | सुबोध खरे

प्रसूती आणि पाठदुखी

३३ % बायकांना प्रसूती नंतर पाठदुखी असल्याचे आणि ३७ % बायकांना सिझेरियन नंतर पाठदुखी असल्याचे आढळून आले आहे.

या ४ % अतिरिक्त पाठदुखी पैकी २.२ % स्त्रियांना पाठीत इंजेक्शनने भूल दिली होती आणि १.८% याना नाका वाटे भूल दिली होती.

म्हणजे पाठीत इंजेक्शन दिल्या मुळे सिझेरियन नंतर होणारी पाठदुखी हि नगण्य प्रमाणात जास्त आहे असे आढळून आले आहे.

अनेक स्त्रियांना गरोदरपणात पाठदुखी असते. ज्या (३३ टक्के) स्त्रियांना प्रसूती नंतर ६ महिने पेक्षा जास्त काळ पाठदुखी होते त्याची बरीच कारणे आढळून आली.

त्यात लठ्ठपणा, प्रसूतीनंतर व्यायामाचा अभाव, यात ४० दिवस खाटेवरून न उठणे (उत्तर भारतात हे मोठ्या प्रमाणात दिसते) चुकीच्या तर्हेने स्तनपान करवणे ( बाळाला हातावर घेण्याऐवजी पुढे वाकून स्तनपान देणे) अशी अनेक कारणे आढळून आली.

याशिवाय निम्न आर्थिक गटात अतिश्रमाची कामे आणि एका पेक्षा जास्त प्रसूती हि कारणे आढळून आली.

प्रसूतीनंतर २ वर्षे झाल्यानंतर असलेल्या पाठदुखीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रसूती मध्ये वाढलेले वजन कमी न होणे हे आढळले आहे.

प्रसूती नंतर सुरवातीला सर्वच स्त्रियांना अशक्तपणा जाणवतो. परंतु बहुसंख्य स्त्रियांचा अशक्तपणा हा सात ते दहा दिवसात बराच कमी होतो.

परंतु बाळंतपण आहे म्हणजे विश्रांती घेणे हा आपला हक्क( ENTITLEMENT) आहे असे स्त्रियांच्या मनावर बिम्बवले जाते.

त्यातून मुलगी पहिल्या बाळंतपणात माहेरी आली कि तिच्यावर आपले प्रेम दाखवणे म्हणजे तिला इकडची काडी तिकडे करू न देणे किंवा सासरी काम करायचेच आहे म्हणून आता विश्रांती दिलीच पाहिजे या मनोवृत्ती मुळे स्त्रिया अजिबात व्यायाम करत नाहीत.

यामुळे गरोदरपणात ढिले पडलेले स्नायू परत मूळ पदावर यायला अधिकच वेळ लागतो. त्यातून बाळंतिणीला दिलेले सकस अन्न यामुळे वजन आणि पोटावर चरबी वाढत जाते( जी नंतर फारच क्वचित उतरते).

आपण बाळंतिणीला विश्रांती जरूर द्या परंतु शरीर ढिले पडणार नाही इतका व्यायाम/ योगाभ्यास स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने जरूर करा.

प्रसूती आणि बाळाचा जन्म हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचं टप्पा असतो त्यामुळे त्यावेळेस झालेला कोणताही प्रसंग हा आयुष्यभर लक्षात राहतो यामुळे यानंतर होणाऱ्या पाठदुखीसाठी कारण हे एकतर प्रसूती किंवा पाठीत इंजेक्शन दिल्यामुळे असेच स्त्रियांना लक्षात राहते.

कुमार१'s picture

25 Apr 2021 - 6:35 pm | कुमार१

एका थरारक सिझेरियनची कथा :

डॉ बेलखोडे : अभिनंदन !

गामा पैलवान's picture

7 May 2021 - 2:14 am | गामा पैलवान

कुमारेक,

दुवा तुटला आहे. कृपया ईपेपर चे दुवे शक्यतो टाळावेत. ते बेभरवशाचे असतात व सहसा ठीक चालंत नाहीत. गुग्गुळाचार्यांच्या मदतीने डॉक्टर बेलखोडे यावर शोध घेतला. तेव्हा हा दुवा सापडला : https://www.esakal.com/saptarang/team-sfa-writes-about-life-saving-pregn...

हाच का तो?

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

7 May 2021 - 8:01 am | कुमार१

होय, हाच.
धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

7 Jul 2021 - 2:32 pm | टर्मीनेटर

मध्यंतरीच्या काळात वाचायचा राहून गेलेला हा एक मस्त लेख!
माहिती खूपच रोचक आहे.

अवांतर : मागे एक हिंदीत डब केलेला दाक्षिणात्य सिनेमा पहिला होता. त्यात नव्याने लग्न झालेले एक जोडपे आपले होणारे अपत्य अतिशय हुशार आणि सर्वगुणसंपन्न असावे म्हणुन प्रसूतीपर्यंतच्या सर्व गोष्टी ज्योतिष्याच्या सल्ल्याने करत असतात. अगदी अचूक मुहूर्तावर बाळ जन्माला यावे म्हणुन डॉक्टरशीही सेटिंग लावून ठरलेल्या वेळी सिझेरियन करुन प्रसूती होते. जन्माला आलेले बाळ अर्थातच अलौकिक असते आणि लहानपणापासूनच आई वडिलांच्या डोक्याला प्रचंड ताप देते 😀
नाव नाही आठवत पण सिनेमा मस्त होता...
त्या साऊथवाल्यांच्या स्टोरीत असते त्याप्रमाणेच तुमच्या लेखाच्या विषयातही मस्त वैविध्य असते 🙏

तर बाळाचा काय दोष म्हणा ;)

टर्मीनेटर's picture

7 Jul 2021 - 3:09 pm | टर्मीनेटर

😂 😂 😂
युट्युबवर आहे... सहज सापडला तर लिंक पेस्टवतो.
खूप मजेशीर सिनेमा आहे पण!

कुमार१'s picture

7 Jul 2021 - 3:13 pm | कुमार१

धन्यवाद
जरूर द्या
बघायला मजा येईल !

टर्मीनेटर's picture

7 Jul 2021 - 4:31 pm | टर्मीनेटर

सापडला... 🙂
https://youtu.be/w4K18ud0d2U