गोष्ट लहानपणची
लहानपणी ऐकली होती एक गोष्ट
हाकामारी तीच नाव खुप होती दुष्ट
खुप घाबरलो होतो ऐकल्यावर
पण खरी होती कळले मोठे झाल्यावर
एक दिवशी आई म्हणाली
लवकर घरी ये हाकामारी येईल
रस्त्यावर दिसलास तर तुला उचलून नेईल
विचारल हाकामारी म्हणजे ग काय ?
कधीतरी येतो तीचा फेरा गावावर
आणी फुली मारते दारावर
हवेत येती ,मुलं धरती नसतात तीला पाय
आशी म्हणली होती तेव्हा माझी माय
साऱ्या लहान थोरांना आहे तीचा धाक
तीला फक्त तोंड आसत नसतात तीला पाय
आवाज देईल तुला पण ओ नको देऊ
नाहीतर घेऊन जाईल तुला पकडून तुझा पाय
आठवतं मला आस म्हणाली होती माय
जरी मोठा झालो तरी सगळ आठवतं
हाकामारीच्या नावाने आजुन मन घाबरतं
अंधाराच्या आधी गाव घरात लपायचे
दारांचे अडसर सुद्धा चिडीचूप व्हायाचे
एक दिवस अचानक दंवडी झाली
शाळा कॉलेज मंदिराची दार बंद झाली
वरतून हुकुम आला बाहेर पडू नका
घरून काम करा अन घरूनच शिका
हाथ धुवा मास्क लावा काळजी घ्या
सुरक्षित रहा सरकारी तंबी आली
आला करोनाचा फेरा जग तीने व्यापले
तीच्या धाकाने सगळ्याना कापरं भरले
भरले दवाखाने ओस पडले बाजार
मरू लागले पटापटा पसरला चहूकडे आजार
तेव्हां कळले की हाकामारी आसती
आणी आईची गोष्ट कधी खोटी नसती
आसती माझी माय तर विचारल असतं तीला
हिच का ग हाकामारी जिच्या पासून तू वाचवल होतं मला ........
३-११-२०२०
प्रतिक्रिया
27 Apr 2021 - 11:54 pm | रंगीला रतन
आसती माझी माय तर विचारल असतं तीला
हिच का ग हाकामारी जिच्या पासून तू वाचवल होतं मला
नि:शब्द!!
28 Apr 2021 - 9:43 pm | चित्रगुप्त
लहानपणीची आठवण आणि सध्याची भीषण परिस्थिती यांची घातलेली सुरेख सांगड आवडली.
30 Apr 2021 - 4:18 pm | माहितगार
हाकामारीच्या गोष्टीने मुलांना अनोळखी लोकापासून दूर राहून सुरक्षीत रहाता यावे असा अप्रत्यक्ष उद्देश्य असेलही पण प्रत्यक्षात ती एक अंधश्रद्धा होती, हाकामारीच्या अफवेला लहानच नाही मोठेही घाबरत स्वतःच्या घरातल्या माणसांना दरवाजा उघडणार नाहीत एवढी दहशत होती कारण अंधश्रद्धेनुसार हाकामारी रामायणातील मारिच कथे स्टाईल घरातल्यांच्या आवाजातून हाक देई असाही काही भाग या अंधश्रद्धेत असावा.
अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक तथ्य यांना एकाच तागडी तोलण्याचा मोह शक्यतोवर टाळणे अधिक श्रेयस्कर असावे असे वाटते.
30 Apr 2021 - 7:47 pm | गॉडजिला
असे लिहायची वेळ येइल नाही ;)
21 May 2021 - 4:08 pm | कर्नलतपस्वी
हाकामारी हा लहानपणीचा अनुभव, महामारी हा मोठेपणाचा. तरी संदेश एकच घरी रहा सुरक्षित रहा. साहित्या कडे शास्त्र म्हणून न पहाता भावना म्हणून बघितल्यास अंधश्रद्धा व विज्ञान या मध्ये गल्लत होणार नाही.
30 Apr 2021 - 4:25 pm | कॉमी
कविता छान.
हाकामारी आणि महामारी असे सरळसोट यमक टाळल्याचे अभिनंदन.
=)
21 May 2021 - 4:13 pm | कर्नलतपस्वी
गोष्ट आसल्यामुळे यमक, अनुप्रास वैगेरेची जरूरच भासली नाही. मोठेपणीचा अनुभव बघता मन लहानपणात गेले आणि दिवंगत आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले, त्यामधुन सुचलेले विचार.
27 Sep 2024 - 10:04 pm | अमरेंद्र बाहुबली
आवडली.
29 Sep 2024 - 11:01 pm | नठ्यारा
वर माहितगार म्हणालेत ते खरंय :
करोना ही एक अंधश्रद्धाच आहे.
-नाठाळ नठ्या