आज काय घडले... मार्गशीर्ष व. ६ शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. ६ या दिवशी भारतीय युद्धांतलि कौरवां- कडील विख्यात सेनापति भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला.

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
5 Jan 2021 - 5:54 pm

आज काय घडले...

मार्गशीर्ष व. ६
शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. ६ या दिवशी भारतीय युद्धांतलि कौरवां- कडील विख्यात सेनापति भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला.
नऊ-दहा दिवस युद्ध होऊनहि पांडवांकडील कांहीं हानी होत नाहीसे पाहून जेव्हां दुर्योधन कर्णाकडे सेनापतिपद देण्याचा विचार करूं लागला त्या वेळी भीष्म संतप्त होऊन बोलले, 'उद्यां मी मरेन नाहीं तर पांडव तरी मरतील, उद्यां मी असे युद्ध करतो की, त्याची आठवण हजारों वर्षे लोक काढत राहतील. वीरश्रीच्या आवेशांत आचार्य कौरवसेनेस मागे टाकून बरेच पुढे गेले. रक्षक मागे राहिले, ही संधि साधून श्रीकृष्णाच्या सल्ल्यावरून अर्जुनानें शिखंडीचा रथ पुढे केला, आणि अर्जुनाने बाण टाकण्यास सुरुवात केली. शिखंडीवर बाण टाकावयाचे नाहीत ही भीष्मांची प्रतिज्ञा होती! शिखंडीला पुढे पाहून भीष्मांनी धनुष्य खाली ठेवले होते; त्या वेळी शेकडों बाण कवच फोडून त्यांच्या अंगांत घुसले. 'यांतील अर्जुनाचे बाण माझी मर्मे तोडीत आहेत' असे स्वतःशी म्हणत म्हाताऱ्या भिष्माने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. तोंच तें अर्जुनानें तोडून टाकले. दुसरें उचललें तेंहि तोडले. या अवधीत भीष्मांच्या अंगांत इतके बाण शिरले होते की, रिकामी जागा दोन बोटेहि नव्हती. शेवटी प्राण कासावीस होऊन सूर्यास्ताच्या सुमारास भीष्म रथांतून पूर्वेकडे डोके होऊन खाली पडले.
पण अंगांत घुसलेल्या बाणांमुळे ते अक्षरशः 'शरपंजरी 'च राहिले. दोनहि पक्षांकडील वीरश्रेष्ठ भीष्माभोंवर्ती जमले. 'डोके लोंबकळत आहे' असें म्हणतांच काहींनी मोठमोठ्या उशा आणल्या; पण भीष्मांनी त्या नाकारल्या. तेव्हां अर्जुनाने तीन बाण मारून त्या बाणांनी भीष्माचे डोके सांवरून धरलें भीष्म क्षीण स्वरांत बोलले, माझे शव बाणांवरच असूं द्या. उत्तरायण होईपर्यत मी असाच प्राण धरून ठेवणार आहे. पिताजींच्या आशीर्वादाने भी इच्छामरणी आहे." या सर्व व्यवस्थेनंतर भीष्माचार्यांनी दुर्योधनास उपदेश केला की, “ दुर्योधना, हे तुझें भांडण भीष्माबरोबरच नाहीसे होऊ दे."
-२७ ऑक्टोबर इ. स. पू. १९३१

इतिहास