साहित्य:
फिश मॅरीनेट आणि फ्राय करण्यासाठी:
फिश फिलेट ५०० ग्रॅम
मीठ १/२ टिस्पून
हळद १/२ टिस्पून
लाल तिखट २ टिस्पून
धणेपूड १ टिस्पून
मिरपूड १/२ टिस्पून
गरम मसाला १ टिस्पून
आले लसूण पेस्ट २ टिस्पून
लिंबाचा रस १ टेबलस्पून
मोहरी तेल २ टेबलस्पून
ग्रेव्हीसाठी:
तेल १ टेबलस्पून
बटर १ टेबलस्पून
धणे १ टिस्पून
जिरे १/२ टिस्पून
कांदा १ मोठा किंवा २ लहान
काजू १० ते १२ नग
टोमॅटो १
तमालपत्र १
दालचिनी २ लहान तुकडे
लवंगा २
आले लसूण पेस्ट १ टिस्पून
काश्मिरी लाल तिखट १ टेबलस्पून
गरम मसाला १ टिस्पून
कसुरी मेथी १ टिस्पून
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
पाककृती:
- मासा स्वच्छ धुवून त्याची स्किन काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याला वरील प्रमाणे साहित्य छान चोळून घ्यावे.
- साधारण १५ ते २० मिनिट हे तुकडे मॅरीनेट होऊ द्या.
- कांदा आणि टोमॅटोच्या उभ्या फोडी करून घ्याव्यात. एका भांड्यात तेल तापवून त्यावर धणे आणि जिरे परतावेत. त्यावर चिरलेला कांदा घालावा तो थोडा गोल्डन ब्राउन झाल्यावर काजू आणि टोमॅटो परतून घ्यावेत.
- हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
- त्यानंतर एखादे ग्रील पॅन अथवा कोणत्याही पसरट भांड्यात मोहरीचे तेल घ्यावे. हे तेल मात्र जरा जास्त गरम म्हणजेच चांगला धूर येई पर्यंत गरम करून मग गॅस मंद करून त्यात माश्याचे तुकडे घालावेत पण त्यानंतर मध्यम मोठ्या आचेवर ते परतून घ्यावेत.
- एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल आणि बटर घेऊन त्यात तमालपत्र, दालचिनी आणि लवंग घालावेत. त्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर घालावी आणि लगेचच वाटलेले मिश्रण घालून घ्यावे. १० ते १५ मिनिट हे मिश्रण चांगले परतून घ्यावे
- त्यात चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून हे मिश्रण पुन्हा ५ ते १० मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवावे.
- त्यात भाजलेले माश्याचे तुकडे आणि कसूर मेथी टाकून एक ५ मिनिटं वाफ येऊ द्यावी.
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम फुलके, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावी.
आम्ही इथे स्नेकहेड फिश घेतला आहे. त्याऐवजी इतर माश्याचे फिलेट देखील वापरू शकतो. याआधी आम्ही सुरमई आणि सॅल्मन वापरूनही हि पाकृ केलीय.
प्रतिक्रिया
5 Jan 2021 - 10:01 pm | बाप्पू
छान रेसिपी. पण अश्या सफाईदार पद्धतीने मासे कापून भेटत नाहीत शक्यतो.
13 Jan 2021 - 1:36 pm | मुक्त विहारि
मिपाच्या पाककृती खजिन्यात अजून एक भर पडली