फिश टिक्का मसाला (व्हिडिओ सोबत)

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
3 Jan 2021 - 3:25 pm

साहित्य:
फिश मॅरीनेट आणि फ्राय करण्यासाठी:

फिश फिलेट ५०० ग्रॅम
मीठ १/२ टिस्पून
हळद १/२ टिस्पून
लाल तिखट २ टिस्पून
धणेपूड १ टिस्पून
मिरपूड १/२ टिस्पून
गरम मसाला १ टिस्पून
आले लसूण पेस्ट २ टिस्पून
लिंबाचा रस १ टेबलस्पून
मोहरी तेल २ टेबलस्पून

ग्रेव्हीसाठी:
तेल १ टेबलस्पून
बटर १ टेबलस्पून
धणे १ टिस्पून
जिरे १/२ टिस्पून
कांदा १ मोठा किंवा २ लहान
काजू १० ते १२ नग
टोमॅटो १
तमालपत्र १
दालचिनी २ लहान तुकडे
लवंगा २
आले लसूण पेस्ट १ टिस्पून
काश्मिरी लाल तिखट १ टेबलस्पून
गरम मसाला १ टिस्पून
कसुरी मेथी १ टिस्पून
कोथिंबीर
मीठ चवीनुसार

पाककृती:

  • मासा स्वच्छ धुवून त्याची स्किन काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याला वरील प्रमाणे साहित्य छान चोळून घ्यावे.
  • साधारण १५ ते २० मिनिट हे तुकडे मॅरीनेट होऊ द्या.
  • कांदा आणि टोमॅटोच्या उभ्या फोडी करून घ्याव्यात. एका भांड्यात तेल तापवून त्यावर धणे आणि जिरे परतावेत. त्यावर चिरलेला कांदा घालावा तो थोडा गोल्डन ब्राउन झाल्यावर काजू आणि टोमॅटो परतून घ्यावेत.
  • हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
  • त्यानंतर एखादे ग्रील पॅन अथवा कोणत्याही पसरट भांड्यात मोहरीचे तेल घ्यावे. हे तेल मात्र जरा जास्त गरम म्हणजेच चांगला धूर येई पर्यंत गरम करून मग गॅस मंद करून त्यात माश्याचे तुकडे घालावेत पण त्यानंतर मध्यम मोठ्या आचेवर ते परतून घ्यावेत.
  • एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल आणि बटर घेऊन त्यात तमालपत्र, दालचिनी आणि लवंग घालावेत. त्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर घालावी आणि लगेचच वाटलेले मिश्रण घालून घ्यावे. १० ते १५ मिनिट हे मिश्रण चांगले परतून घ्यावे
  • त्यात चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून हे मिश्रण पुन्हा ५ ते १० मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवावे.
  • त्यात भाजलेले माश्याचे तुकडे आणि कसूर मेथी टाकून एक ५ मिनिटं वाफ येऊ द्यावी.
  • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम फुलके, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावी.

आम्ही इथे स्नेकहेड फिश घेतला आहे. त्याऐवजी इतर माश्याचे फिलेट देखील वापरू शकतो. याआधी आम्ही सुरमई आणि सॅल्मन वापरूनही हि पाकृ केलीय.

प्रतिक्रिया

छान रेसिपी. पण अश्या सफाईदार पद्धतीने मासे कापून भेटत नाहीत शक्यतो.

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 1:36 pm | मुक्त विहारि

मिपाच्या पाककृती खजिन्यात अजून एक भर पडली

जेम्स वांड's picture

10 Dec 2021 - 10:59 am | जेम्स वांड

उत्तमच आहे ही रेसिपी, फिलेज थोडे डेलिकेट पडतील न पण ? म्हणजे लगेच तुकडा मोडतो फ्राईड/रोस्टेड फिलेजचा हा अनुभव आहे माझा तरी, ट्युनाचे थोडे मोठे (पनीर टिक्का साईज) क्यूब्ज वापरले तर ? बेसिकली ट्युना फिशचा स्वाद पण मटणाच्या जवळ जाणारा असतो, त्यामुळे एकदा हा सेम प्रयोग तुम्ही नमूद केलेले सगळे घटक पदार्थ घेऊन ट्युना क्यूब्स सीयर/ रोस्ट करून बनवून बघावा म्हणतो, अर्थात मुहूर्त लागेल कधी हेच अधांतरी आहे आमचं

&#129368 &#129368 &#129368

चौकस२१२'s picture

10 Dec 2021 - 11:57 am | चौकस२१२

सॅल्मन वापरून?

क्षमा करा पण या जातीच्या माशाला अश्या भरगच्च मसाल्यात डुबवून त्याची अंगची चव बिघडते / लोपून जाते असे वाटते त्यात तो बऱ्यापैकी महाग हि असतो त्यामुळे टायची मूळ चव अशी मारू नये असे वाटते

सामन मासा एक तर धृरी देऊन ( स्मोकइड ) सुशी मधून किंवा कच्चा खाण्यात त्या माशाची स्वतःची चव कळते मारली जात नाही .
किंवा फक्त लसूण काली मिरी व्हाईट वाईन मध्ये शिजवावा
किंवा टायची कांड्या बरोबर हसूच माफक मसाल्याची भाजी करून पुढे फिश पाय करावी ..

चौकस२१२'s picture

10 Dec 2021 - 12:00 pm | चौकस२१२

त्याची कांदया बरोबर अश्याच माफक मसाल्याची .. असे म्हणायचे होते मला .. या गुगल मराठी ( गॉगल माताही असे झाले हे पण ) इनपुट ची काय भानगड होते कळत नाही