आज अचानक आलास आणि
सगळं काही चिंब करुन टाकलंस
तु येशील याचा अंदाज होता खरंतर
पण तरीही अवचितच आलास
खिडकीच्या काचेतून पलीकडे बघत होते मी
तुला कोसळताना
आणि माझ्या लक्षात आलं
की मी तर फक्त पाहतेय
मी दुसरीकडे बघितलं तेव्हा
मला तो दिसला पावसात भिजताना
त्याला बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल्याचं जाणवलं
कडा ओलावल्या आणि मन पुन्हा आठवणींपाशी गेलं
न भिजूनसुद्धा भिजवून टाकलंस तू
ते म्हणतात ना
बुंदे कुछ यूह गिरी की
कुछ खयाल भिग गये
पावसात भिजणारा तो आता दिसत नाहीये खाली मला
आणि मी मगाशी लावलेले पडदे बाजूला सारले
वीज चमकली आणि क्षणभर का होईना
पण प्रकाशुन गेलं सारं
YouTube वर स्वानंद किरकिरेंचं बावरा मन लावलं
आणि मन पुन्हा चिंब होऊन गेलं...
प्रतिक्रिया
15 Oct 2020 - 8:32 pm | आंबट चिंच
कविते पेक्षा मुक्तक वाटलं. मिपावर स्वागत.
छान आहे. लिहिते रहा.