आज बेत काय करावा?

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
10 Oct 2020 - 5:35 am
गाभा: 

रोज जेवणाचा बेत काय करावा हा प्रश्न रोजच्या रोज आ वासून समोर उभा असतो. खिचडी, पिठले आणि बटाट्याची भाजी असे तेच ते खाऊनही कंटाळा येतो. अनेकदा फक्त वेगळे काहीतरी हवे असते जे आपण बर्‍याच दिवसात केलेले नसते. पण ते नवीन सहज सुचतही नाही. पण कुणीतरी सुचवले तर मात्र नवीन गोष्टी करायला उत्साह येतो. म्हणून अशा जेवणाच्या बेतासाठी हा धागा आहे.

आता यात पिझ्झा मागवला. आज आम्लेट पाव ते आज जेवायला वरणभात, शेपुची भाजी आणि पोळी असे ही असू शकते. अनेकदा वरणभातासारख्या पदार्थात अनेक वेगळे प्रकार असतात. जसे कुकरचा वरण भात वेगळा लागतो तर भाताचे पाणी काढून केलेला फडफडीत भात वेगळा लागतो. वरणाला कधी कढीपत्त्याची फोडणी तर कधी चिंच गुळ घालून केले वरण. असे अनेक बेत तयार होऊ शकतात.

कधीकधी आपले जेवणाचे बेत फसतात आणि त्यातून भलतेच अनपेक्षित बेत तयार होतात. कधी उरलेल्यातून भन्नाट चविष्ट प्रकार बनतात. जसे उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा. असे सगळे प्रकारही येथे चालतील.

जेवणात जोडीला कोणकोणत्या कोशिंबीरी घेता की फक्त कच्चा कांदा ते ही लिहा. वेगळे काही देणार असाल तर यात पाककृती छायाचित्रांसहीत आल्या तर बरे हे वेगळे सांगायला नकोच!
या शिवाय नाश्त्याचे पदार्थ पण आले तरी उत्तम.
चला तर एक जंत्री तयार करू या.
तर मंडळी सांगा काय करायचे आज जेवायला.

प्रतिक्रिया

शा वि कु's picture

10 Oct 2020 - 12:42 pm | शा वि कु

कोशिंबीर आणि भरीत हे अत्यंत आवडते पदार्थ. ह्यातले खालचे पदार्थ फार आवडतात:
दह्यातल्या कोशिंबिरी/भरीत:
दुधीचा अवकुरा, भेंडीचे भरीत , बटाट्याचे भरीत , काकडीची कोशिंबीर, बिटची कोशिंबीर, वांग्याचे दह्यातले भरीत, मुळ्याच्या पानांची कोशिंबीर, फक्त दही कांदा सुद्धा आवडतो. जर ठेचा असेल तर दही ठेचा, नाहीतर लसणीची चटणी आणि दही. काहीच नसले तर नुसतं दही. सोबत मुद्दा भाजी असेल तर आणखी छान :) (पण मग कढीपण पाहिजे.)

बिन दह्याचे:
कोबीची कोशिंबीर, बिटची कोशिंबीर, कोबीचे सॅलड, कांदा-टोमॅटो-लिंबू सॅलड, काकडीची आंबट कोशिंबीर.

गवि's picture

10 Oct 2020 - 12:56 pm | गवि

दुधीचा अवकुरा

हे ऐकलं नव्हतं . रोचक वाटत आहे. काय असतं ते कुणी सांगितल्यास उत्तम होईल.

शा वि कु's picture

10 Oct 2020 - 3:50 pm | शा वि कु

बहुतेक आंध्रातला शब्द असावा, अवकुरा. त्यामुळे मराठवाड्यात प्रचलित आहे.

दुधी भोपळ्याच्या चौकोनी ढोबळ फोडी (साल काढून) फोडणीत हलके वाफवून घ्यायच्या. गार झाल्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, दाण्याचा कूट, कोथिंबीर आणि दही घालून गारच खायचा.

Gk's picture

10 Oct 2020 - 6:27 pm | Gk

दुधीचे भरीत

शाबुदाण्याची बिर्याणी करा एक प्रयोग म्हणून:)

गवि's picture

10 Oct 2020 - 1:06 pm | गवि

नेमके कसे करणार?

बादवे..

साबुदाण्याच्या खिचडीला नेहमीची हिंग हळद फोडणी, वाटल्यास कढीलिंब वगैरे टाकून बिन उपवसाची चेन्ज म्हणून आवडू शकते.

चलत मुसाफिर's picture

10 Oct 2020 - 1:30 pm | चलत मुसाफिर

आमच्या घरात साप्ताहिक मेनू बनवून तो फलकावर लावलेला आहे. अगदी तसेच काही सबळ कारण असल्याखेरीज त्यात आम्ही बदल करत नाही. दुसऱ्या दिवशीच्या सैपाकाची तयारी आदल्या रात्री करून ठेवली जाते. बाजारहाटही आपोआप मेनूला अनुसरून होते. आम्ही शाकाहारी असल्यामुळे चांगले मासे न मिळणे, पापलेटऐवजी तिसऱ्या मिळणे वगैरेचा परिणाम पाकसिद्धीवर होत नाही. त्यामुळे "आज काय बरे बनवावे?" हा प्रश्न आमच्या घरातून तरी हद्दपार झालेला आहे.

उरलेल्या पोळ्यांचा कुट्टा तर सर्वमान्य शिळी सप्तमीतला आवडता पदार्थ ,पण त्या पोळ्या ना कात्रीने कापायच्या सरळ सरळ पट्ट्या करायच्या.मस्त तळायच्या.वरून तिखट मीठ चवीनुसार टाकायचे.एकदम क्रिस्पी.

शेर भाई's picture

10 Oct 2020 - 4:34 pm | शेर भाई

गरमागरम पाव हा एक Common factor ठेऊन खालील जंत्री बनू शकते.
गरमागरम पाव – व्हेज अंडा आम्लेट / गरमागरम पाव – अंडा आम्लेट / गरमागरम पाव – मिसळ / गरमागरम पाव – बटाटा वडा / गरमागरम पाव आणि बरच काही

निनाद's picture

12 Oct 2020 - 10:10 am | निनाद

व्हेज अंडा आम्लेट कसे आणि कशाचे बनवतात?

तुषार काळभोर's picture

10 Oct 2020 - 6:58 pm | तुषार काळभोर

सकाळी नाश्त्याला ब्रेड चहा.
दुपारी जेवायला चपाती - मेथी - कारले मसाला - गवार (मी खाल्ला नाही, पण वरण भात होता)
संध्याकाळी नाश्त्याला चहा आणि दुपारची एक चपाती
आज रात्री चपाती - रस्सा भाजी मटकी - सुक्की टोमॅटो चटणी - वरण भात.

उद्या सकाळी नाश्त्याला पोहे किंवा उपिट किंवा शिरा (अजून तांदूळ भिजत नाही घातले म्हणजे इडली डोसा नक्की नाही).

कोणतीही आमटी / रस्सा / पातळ भाजी (व्हेज - नॉनव्हेज ) असल्यावर कांदा मस्ट. रोज रात्री काकडी किंवा टोमॅटो किंवा दोन्ही असतंच. corona मुळे काही महिने झाले लोणचे आणि दही टाळतोय. त्यामुळे कोशिंबीर नसते. बऱ्याचदा हिरव्या मिरचीचा ठेचा असतो तोंडी लावायला.

नावातकायआहे's picture

10 Oct 2020 - 7:28 pm | नावातकायआहे

उद्या:
पुरण पोळी, बटाट्याची भाजी, नारळाची चटणी, कटाची आमटी, वरण, भात, तूप, लिंबु आणि नंतर अनंत काळ.... आडवा.कॉम!
संडे स्पेशल!!

कपिलमुनी's picture

10 Oct 2020 - 11:24 pm | कपिलमुनी

मिपाचे माबो होत आहे काय ??

कच्चा कांदा, गूळ, भाजलेले शेंगदाणे, जीरे, मीठ, लाल तिखट आणि थोडेसे क्रीमी टेक्श्चर आवडत असल्यास शेंगदाण्याच्या २५% प्रमाणात काजू. असे मिक्सरमधून काढावे.
एक दोन दिवस टिकेल अशी चटणी होईल.

वरील पदार्थांचे प्रमाण बदलून आपल्याला हवी तशी टेस्ट अ‍ॅडजस्ट करुन घेता येईल.

निनाद's picture

12 Oct 2020 - 10:09 am | निनाद

यात दही आणि कढीपत्ता पण छान लगतो.

निनाद's picture

15 Oct 2020 - 8:56 am | निनाद

जेवणाचे बेत ही काय फक्त माबोची मक्तेदारी असावी का? मिपावर पण सदस्य जेवत असतात ना?
मग रोज रोज नव नवीन पदार्थ मिळाले तर हवेच आहेत ना...

निनाद's picture

11 Oct 2020 - 4:49 am | निनाद

काकडीचे खमंग थालिपीठ वर लोणी आणि शिवाय दही.

दुपारचा मेनु म्हणजे, हरबर्‍याच्या डाळीचे कढिपत्त्याची फोडणी दिलेले वरण आणि भात. जोडीला काकडी आणि शेवटी कलिंगडाची फोड.

चौकस२१२'s picture

12 Oct 2020 - 9:22 am | चौकस२१२

आठवड्यात
- सकाळचा नाश्ता : बिन तिखट, बेदाणा टोस्ट / इतर तयार ओट (दालचिनी + बदाम ब्राझील नट, pikan नट इत्यादी ) फळे + दही ,
- २-३ वेळा भाजी पोळी वरण किंवा आमटी आणि इतर भारतीय पदार्थ ( पण शक्यतो एकच मुख्य भाजी सर्व लवाजमा नसतो, वेळ असले तर कोशिंबीर
- २ वेळा चिनी थाई/ व्हिएतनामी पद्धतीचे काहीतरी ( घरी बनवलेलं)
- १-२ वेळा इटालीय पद्धतीचे / १-२ वेळेस मेक्सिकन टॅको किंवा नाचों
-२ वेळातरी ओव्हन मध्ये भाजलेले काहीतरी ( मास किंवा मग भोपळ्याचा काप किंवा तंदुरी मसाल्यातले फ्लावर, गोड करायचं इतर फळे भाजून त्यात बदाम कूट वगैरे )
- एखाद्वेळीस फिश आणि चिप्स
याशिव्या वेगवेगळी चीज
आठवडा अखेरी : नष्टता आणि जेवण एकाच , पोहे/ उपमा/ किंवा बेकन + टोस्ट + अंडे किंवा सामन माश्याचे काप + क्रीम चीज + सलाड
संध्याकाळी BARBEQ शाकाहारी आणि मांसाहारी
अधून मधून काहीतरी वेगळे म्हणजे कोरियन / ब्राझिलियन

आळसामुळे राहून गेलेले : आता सुरु करायचं आहे = घरी केलेले पाव आणि स्वतःचा मागील तंदूर

निनाद's picture

12 Oct 2020 - 10:08 am | निनाद

घरी केलेले पाव आणि स्वतःचा मागील तंदूर भारी!!

चौकस२१२'s picture

12 Oct 2020 - 11:10 am | चौकस२१२

स्वतःचा मागील // लै चुका करतो मी लिहिताना आणि मग अर्थाचा अनर्थ होतो ...
" स्वताकच्या घरातील मागील दारी" असे म्हणायचे होते

महासंग्राम's picture

12 Oct 2020 - 12:30 pm | महासंग्राम

आयडी बदलायचा राहिला का खिक्क

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2020 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संशय होताच..... =))

-दिलीप बिरुटे

शा वि कु's picture

17 Oct 2020 - 5:04 pm | शा वि कु

इस्कटून सांगा की.

निनाद's picture

18 Oct 2020 - 6:18 am | निनाद

नाय हो. असे काही करायची गरज नाही.
एकाच देशात असल्याने काही सारखेपणा असू शकेल.
पण शहरे काय राज्ये सुद्धा वेग-वेगळी आहेत. सुमारे दोन हजार किमी चे अंतर आहे आमच्यात. पण टाईम झोन एकच आहे.

आणि काय सर गुंडोपंतावर जेव्हा संशय घ्यायचा होता तेव्हा घेतला नाही.
आता काय उपयोग? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Oct 2020 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल बहलाने के लिये कुछ खयाल अच्छे होते है. टाइम झोन मधे प्रतिसाद सुद्धा याने लिहायचे तर त्याने लिहिल्या जाऊ शकतात.... असे होऊ शकते. =))

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

17 Oct 2020 - 6:20 pm | तुषार काळभोर
चौकटराजा's picture

12 Oct 2020 - 3:48 pm | चौकटराजा

ब्रेक्फास्ट
आठवडा १ व ३
रविवार ----- मिसळ ( वाटण करून )
सोमवार ------ उपमा
मंगलवार ------ मुगाचे डोसे
बुधवार ------- कान्दे पोहे /बटाटे पोहे/वान्गी पोहे/कोबी पोहे पैकी १
गुरुवार------ इडली साम्बार
शुक्रवार------- राईस नुडल उपमा
शनिवार ------वाफवलेले मूग

आठवडा- २ व ४
रविवार ----- वडा साम्बार
सोमवार ------ आप्पे
मंगलवार ----- कान्दा उत्तपा
बुधवार ------- तिखटमिठाचा शिरा
गुरुवार------ शेंगोळे वा भाजणी वडे
शुक्रवार------- तान्दळाच्या पापड्या
शनिवार ------ सन्ड्विच

रोज सकाळी जेवणात पोळी ( चपाती ) , कसली तरी कोशिन्बीर. उसळ वा परतून पालेभाजी वा फळभाजी , मुगाचे वरण वा साधे वरण ( तुरीचे) वा
वान्ग्याची,टोमॅटो ची वा मुळ्याची आमटी
बरोबर माईन मुळीचे लोणचे, आम्ब्याचे ,लिम्बाचे वा हळदीचे ,लसून चटणे सोलापुरी चटणी, कडेपत्ता चटणी, जवसाची चटणी खाराची मिरची यापैकी १

सायंकाळी अठवड्यातून दोन वेळा ज्वारीची भाकरी एकेक दिवस रव्याचे धिरडे,टोमॅटोओम्लेट,भाजणीचे वा ज्वारीचे थालीपीठ ,साधा डोसा,तिहट मिठाच्या पुर्या असे काहीतरी .त्याबरोबर दाणे खोबरे चटणी
कधी पानीपुरी दही भात ,कधी रगडा पॅटिस दही भात ,कधी हक्का नूडल दही भात. कधी मुगडाल खिचडी व कढी
भाकरी असेल तर झुणका,मेथीची गोळा भाजी, उडदाचे घुटे ई चे कालवण असते.
सायकाळी, भेळ,दडपे पोहे .पोह्याची लाटी ,चिवडा असे काही तरी

दररोज कोणते तरी फळ खाणे कम्पलसरी.

कंजूस's picture

12 Oct 2020 - 9:24 pm | कंजूस

पण राजाने गोडधोड खाण्याचे सोडले काय?

चौकटराजा's picture

13 Oct 2020 - 9:05 am | चौकटराजा

मधुमेह असल्याने गोड खावेसे वाटते पण क्वचितच खातो. केळे हे फळ आजिबात खात नाही. मिसळ खाल्ली तर दोन पाव खात असे आता फक्त मिसळ खातो .पाव बन्द !

पानीपुरी दही भात हा कॉम्बो भन्नाट आहे. असा विचार कधी केलाच नव्हता!

निनाद's picture

13 Oct 2020 - 4:46 am | निनाद

धिरडे मी नेहमी भाजणीच्या अथवा तांदळाच्या पीठाचे करतो.

रव्याचे धिरडे कसे करायचे?
ताक घालून?

तुम्ही कसे करता?

चौकटराजा's picture

13 Oct 2020 - 9:11 am | चौकटराजा

रव्याचे धिरडे .. हा पर्याय सायंकालच्या चपातीला आहे. एरवी तो गहूच ! पाण्यात रवा भिजवतो पण थोडेसे ताक घातले तर चव येते. रवा बारीक हवा. चवीला मीठ .वाटलेली मिरची पुरेशी होते. याने फायदा एक होतो की आता भाजी कोणती करावी बरे " हा प्रश्न उदभवत नाही ! तांदुळाचे धीरडेही मस्त !

निनाद's picture

13 Oct 2020 - 4:48 am | निनाद

मुगाचे डोसे कसे करायचे याची पाकृ देता का कुणी?

चौकटराजा's picture

13 Oct 2020 - 9:16 am | चौकटराजा

हिरवे मूग मोड आणून घ्यावे. ते व एक वाटी भिजलेले तांदूळ मिक्सर मध्ये वाटावे .मिरची लसूण जिरे व मीठ चवीला. डोसा कडक डोशासारखा होतो. बरोबर दाणे खोबरे ओली चटणी .

निनाद's picture

13 Oct 2020 - 9:28 am | निनाद

हिरवे मूग मोड आणून घ्यावे. हे आवडलेले आहे. मोड आलेले सगऴ्ए पदार्थ वेगळेच लागतात. जास्त चविष्ट वाटतात.
डोसा कडक डोशासारखा होतो. बरोबर दाणे खोबरे ओली चटणी . करून पाहतो. कळवेन काय होते ते.

निनाद's picture

13 Oct 2020 - 4:51 am | निनाद

रात्रीच्या जेवणाला व्हाईट सॉस व्हेज पास्ता केला होता - ऑलिव्ह तेलात भरपूर भाज्या घालून वर ईट्लियन हर्ब आणि मिरपूड घातली. भाज्या वेगळ्या परतून घेतल्या आणि पास्ता मिठाच्या पाण्यात उकडून घेतला होता. चाईट सॉस साठी पीठ आणि दूध वापरले होते.
पास्ताचा फन्ना उडाला. लेक आज शाळेत डब्याला पण घेऊन गेली! :)

निनाद's picture

14 Oct 2020 - 4:27 am | निनाद

भेंडीची भाजी पोळी + गरमागरम वरणभात वर तूप आणि लिंबु!

निनाद's picture

14 Oct 2020 - 10:01 am | निनाद

पावभाजी सोबत काकडी आणि शेवटी कलिंगड

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Oct 2020 - 2:18 am | माम्लेदारचा पन्खा

जंगी बेत होईल !

निनाद's picture

15 Oct 2020 - 4:31 am | निनाद

अळूचं फदफदं करायला अळू मिळायला हवा...

निनाद's picture

15 Oct 2020 - 8:54 am | निनाद

आज सांबार भात, जोडीला मक्याचे कणीस उकडलेले, थोडे अ‍ॅस्प्रेग्स ओलिव्ह तेलात फ्राय करून आणि गोड शेवट - आंबा!!
साधा सोपा मेनु - आणि हेल्दी! &#128515

निनाद's picture

16 Oct 2020 - 8:38 am | निनाद

राजमा चावल - पण भात मात्र लाल तांदळाचा केला होता. मस्त लागतो!

निनाद's picture

17 Oct 2020 - 4:13 pm | निनाद

लाल भोपळ्याची खोबर्‍याचा कीस आणि तीळ घालून परतून केलेली खमंग भाजी. आणि मिश्र पीठाची पोळी.
जोडीला काकडी.

निनाद's picture

19 Oct 2020 - 3:39 pm | निनाद

आज भरपूर भाज्या टाकून नूडल्स वर एक ऑम्लेट.

निनाद's picture

21 Oct 2020 - 5:43 am | निनाद

पालक पनीर - पण पालक अगदी बारीक केलला नाही. वर क्रीम आणि लिंबू पिळलेला, जोडीला तूप लावलेल्या पोळ्या आणि कांदा.

आज दही बुत्ती भात आणि पेस्तो रोस्ट पंपकीन फेटा रिसोनी असा बेत झाला.
माझी भूमिका मदतनीस इतकीच होती. पेस्तो रोस्ट पंपकीन फेटा रिसोनी बनवायला वेळ लागला पण मस्त लागत होते. शेवट आंब्याने झाला. अगदी गोड!

निनाद's picture

22 Oct 2020 - 6:41 am | निनाद

पेस्तो रोस्ट पंपकीन फेटा रिसोनी चा फोटो!

Risoni

निनाद's picture

22 Oct 2020 - 6:39 am | निनाद

काल वड्यांची मसालेदार भाजी केली होती. जोडीला सॅलड होते.
शेवटी गोड म्हणून रसाळ खजूर खाल्ले.

vada

निनाद's picture

26 Oct 2020 - 3:27 am | निनाद

विजयादशमी चे खास म्हणून शेवयांची खीर आणि नारळाच्या दूधातील दुधीची भाजी.
shevaya

निनाद's picture

28 Oct 2020 - 3:14 am | निनाद

आज साधी मुगाची खिचडी त्यावर तूप.
शिवाय लसणाचे तिखट. जोडीला भरापुस सॅलड. शेवटी गोड म्हणून एक लहानसे आईस्क्रीम.
साधा बेत

निनाद's picture

2 Nov 2020 - 4:20 am | निनाद

चिकन बिर्याणी आणि शोरबा, सोबत शोरबा,आणि सॅलड

चिकन बिर्याणी

निनाद's picture

2 Nov 2020 - 4:22 am | निनाद

शोरबा असा होता. काळा मसाला... एकदम जबरदस्त!

शोरबा
biryani
salad

निनाद's picture

4 Nov 2020 - 10:03 am | निनाद

कोथिंबीर वडे

कोथिंबीर वडे सोबत टॉमॅटो सॉस चिंचेची चटणी आणि श्रीरचा सॉस.

निनाद's picture

11 Nov 2020 - 3:22 am | निनाद

का ब र झणझणीत वर लिंबू,
लोखंडी कढईत केलेली लसणाच्या फोडणीची चवळीची उसळ आणि लाल भात.
आज सॅलड काही नव्हते फक्त टामाटू!
काबर

तुषार काळभोर's picture

21 Nov 2020 - 7:13 pm | तुषार काळभोर

मसाले भात आणि कोशिंबीर
- शनिवार असल्याने बाकी सगळे शाकाहारी, मी एक ऑमलेट खाणार :P