मिसळपाव वरचे विनोदी धागे कोणते आहेत?

Primary tabs

डीप डाईव्हर's picture
डीप डाईव्हर in काथ्याकूट
9 Oct 2020 - 6:19 pm
गाभा: 

मला विनोदी लेखन वाचायला आवडते. इथे सर्च करता येत नसल्याने असे धागे शोधणे अवघड जात आहे.
मिसळपाव च्या जुन्या नव्या सभासदापैकी जर कोणी अशा विनोदी धाग्यांचा संग्रह केला असेल किंवा वाचन खुणा साठवल्या असतील तर कृपया त्यांच्या लिंक प्रतिसादात द्याव्या अशी विनंती.

प्रतिक्रिया

हा धागा व त्यावरचे प्रतिसाद महाविनोदी आहेत 😀 😀 😀

शा वि कु's picture

9 Oct 2020 - 7:09 pm | शा वि कु

फारएन्ड यांचे चित्रपट परीक्षण धागे भारी आहेत. मी ही वाचले नव्हते, पण छापील दिवाळी अंकात तिरंगाचे परीक्षण वाचताना हसून हसून पुरेवाट झाली.नंतर इतरही वाचले.
प्रिटेन्शियस मुव्ही रिव्यूज सारखे.

फारएन्ड यांचे धागे आता शोधून वाचतो,

🙏

कंजूस's picture

9 Oct 2020 - 8:35 pm | कंजूस

गडकिल्ले भटकंती धागे संग्रह करून समाजाला काय उपयोग झाला? त्यापेक्षा ही शोधाशोध करायला हवी होती.
पेप्रात सिनेमा रिव्यूत एक हेडेक मिटरची डायल दाखवलेली असते ती प्रत्येक विनोदी लेखाला द्यावी अशी मी विनंती श्री टर्मिनेटर यांना करतो. त्या डायलमध्ये सिनेमा किती मनोरंजक आणि किती सॉरिडॉन डोकेदुखी घालवणाऱ्या गोळ्या घ्याव्या लागतील हे दाखवतो. तशी डायल हवी लेखाखाली.

---------------
महाराष्ट्राची हास्यजत्रा - सोनी मराठी पाहा.
सध्याची टॉपची कलाकार आहे - नमा. नम्रता संभेराव.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Oct 2020 - 10:36 pm | अमरेंद्र बाहुबली

मिपा वरच्या धाग्यांपेक्षा प्रतिसाद हे जास्त विनोदी असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिसाद विनोदी असायला मूळ धागा विनोदी आहे कि नाही ह्याचा काहीही फरक पडत नाही.

नेटफ्लिक्स च्या ह्या नवीन भयकथेला चांगले प्रतिसाद येत आहेत आणि मी संपूर्ण सिरीस काल पाहून संपवली. मी ह्या परीक्षणात विशेष असे स्पॉईलर्स दिलेले नाहीत.

भयकथा हे थोडे addiction प्रमाणे आहे. किंवा कुणी तरी म्हटल्या प्रमाणे थोडे पॉर्न प्रमाणे आहे. पहिल्यांदा आम्ही जेंव्हा भयकथा पाहतो तेंव्हा अगदी प्यासा हैवान किंवा १०० डेज सुद्धा आमचा थरकाप उडवतो. पण हळू हळू कुठल्याही भयकथेचे भय वाटत नाही. मग काही तरी नवीन प्रकारची भयकथा पाहावीशी वाटते. त्यामुळे इतर कुठल्याही कथा प्रकारा पेक्षा "भयकथा" ह्यांत अनेक नानाविविध सब-जनर्स आहेत. गॉडझिला पासून रागिणी mms पर्यंत आणि कॅनिबल होलोकास्ट पासून saw पर्यंत अनेक भयकथा कल्पक लोकांनी TV वर आणल्या आहेत. काहीतरी नवीन प्रकाराने दर्शकांना धक्का द्यायचा आणि घाबरावयाचे आणि ह्या नवीन प्रकारच्या शोधांत विविध निर्माते, लेखक दिग्दर्शक इत्यादी धडपडत असतात.

नेटफ्लिक्स ची हि नवीन मालिका गॉथिक हॉरर ह्या प्रकारांत मोडते. ड्रॅक्युला हि एक खूप लोकप्रिय गॉथिक होर्रर् कथा आहे. गॉथिक भयकथांत बहुतेक करून प्रकाश कमी वापरला जातो, इथे सर्वांत महत्वाचे स्थान असते एक प्रचंड मोठा वाडा अथवा किल्ला, मूळ कथानकाला थोडी प्रेमकथेची झालर सुद्दा असते. आणि सर्वांत महत्वाची बाब म्हणजे इथे भयकथा एखाद्या घटनेशी संबंधित नसताना लोकांच्या संपूर्ण आयुष्याशी संबंधित असते. अनेक कथानकांत आपले नायक नायिका चुकीच्या वेळी चुकीच्या जागी पोचतात आणि त्यांच्या बरोबर वाईट घटना घडतात आणि संपूर्ण प्रकार काही दिवसांत संपतो. पण इथे नाही. इथे वाडा अनंत काळा पासून झपाटलेला असतो आणि लोकांना त्यांचे परिणाम खूप वर्षे पर्यंत भोगावे लागतात. मायिक फ्लॅनागन ह्यांनी हि मालिका निर्माण केली आहे.

संपूर्ण कथा एक वृद्ध महिला एका लग्नाच्या समारंभाच्या आधी सांगते. आदल्या रात्री सर्व लोक शेकोटीच्या जवळ बसून

ब्लाय मॅनॉर हे लंडन पासून दूर एका गांवातील प्रचंड मोठे मॅनॉर (वाडा) आहे. विन्ग्रेव्ह ह्या गर्भश्रीमंत घराण्याचा हा वाडा आहे. एका अपघांतातं वाड्याचा मालक आणि त्यांची पत्नी ह्यांचा भारतात फिरायला गेलेले असताना मृत्यू होतो. ह्यांची दोन निरागस आणि गोंडस मुले मात्र घरीच असतात त्यामुळे ती वाचतात. त्यांची जबाबदारी त्यांचे काका हेन्री ह्यांच्यावर येते. हेन्री लंडन मध्ये राहतात आणि नेहमीच दारूच्या नशेत असतात.

हेन्री ह्या मुलांच्या देखरेखी साठी दाना ह्या अमेरिकन मुलीची निवड करतात. दानाने ह्या मुलांसोबत ब्लाय मध्ये राहायचे, त्यांना शिक्षण आणि संस्कार द्यायचे असे हे काम असते.

मग दाना ब्लाय मध्ये उपस्थित होते आणि कथेची खऱ्या अर्थानं सुरुवात होते. ब्लाय ह्या प्रचंड वाड्यांत हन्नाह हि कृष्णवर्णीय महिला प्रॉपर्टी किपर म्हणून असते, भारतीय वंशाचा ओवेन शर्मा हा कुक आणि जेमी हि युवती माळी म्हणून कामाला असते. खेडेगांव असल्याने तिथे विशेष अशी काहीच वर्दळ नसते.

वाडा झपाटलेला असतो का ? ह्याचे उत्तर विविध पात्रांच्या स्वभावातून देण्याचा प्रयत्न आधीच्या भागांत होतो. सर्वच पात्रे काही प्रमाणात झपाटलेली वाटतात. विशेष करून दोन्ही मुले काही तरी लपवत आहेत असे वाटते. मग सावल्यांचा स्वरूपांत आम्हाला भुतांचे दर्शन होऊ लागते. हि खरी बहुतेक आहेत कि सावल्यांचा खेळ कि विविध पात्रांच्या मनातील समजुती ? हे आधीच्या भागांत समाजात नाही पण नंतरच्या भागांत प्रत्येक पात्राची पार्श्व् कथानक दाखवले जाते ज्यातून आम्हाला सर्वचन्ह उलगडा होत जातो. फ्लॅनागन ह्यांची जी शैली आहे त्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे ते काही तरी अतींद्रिय गोष्टी किंवा एखादे भूत अगदी "हिडन इन द प्लॅन साईट" ठेवतात, थोडे सिस्कस्थ सेन्स ह्या चित्रपटा प्रमाणे. ह्याची जाणीव बहुतेक दर्शकांना पहिल्या भागापासूनच होईल पण त्यांत सुद्धा फ्लॅनागन तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

पहिल्या ४ भागांत जे अनेक धागे उलगडले जातात त्यांची टोके एक एक करून शेवटच्या काही भागांत बांधली जातात. शेवटचा भाग, जिथे कथा सुरु झाली तिथे येऊन संपतो म्हणजे एक वृद्ध महिला एका लग्नाच्या घरांत आधीच्या रात्री हि कथा अनेकांना सांगत आहे. मग ऐकणारी नववधू त्या कथा सांगणाऱ्या महिलेला म्हणते "आपण हि भूतकथा आहे असे म्हणून कथा सांगितली, पण मला मात्र ती एक प्रेम कथा वाटली", ती सुरकुतलेल्या चेहेर्याची महिला मग थोडा विचार करून म्हणते "बहुतेक वेळा त्यांत काहीही फरक नसतो".

ह्या एका वाक्यांत संपूर्ण कथेचे सार आहे असे दर्शकांना सुद्धा वाटेल.

मालिकेची उजवी बाजू म्हणजे अत्युच्च दर्जाचा अभिनय आणि विशेषतः बाल कलाकारांचा अभिनय. संपूर्ण सिरीज थोडी लो बजेट आहे आणि बाहेरून वाडा प्रचंड दाखवला असला तरी आतील शूटिंग फक्त काही थोडक्याच खोलीत होते. बाकी कुठल्याही भयकथेला लागणारा मसाला इथे माफक प्रमाणात टाकला आहेच. विचत्र दिसणारे चेहेरे, सूडाच्या भावनेने फिरणारे आत्मे, अडकलेले आत्मे, खून करणारे माणूस, द्रव्यलोभाने वाईट गोष्टी करणाऱ्या व्यक्ती, थोडे फार प्रमाणात सेक्स, इत्यादी अनेक गोष्टी तुम्हाला ह्या सिरीज मध्ये पाहायला मिळतील.

मालिकेची वाईट वाटलेली बाजू म्हणजे, मुख्य कथानक अगदी साचेबद्ध वाटते. फ्लॅनागन आपल्या जुन्याच ट्रिक्स वापरत आहे असे वाटते. भयचकित करणारी प्रत्येक गोष्ट ह्या आधी आपण हे आणखीन कुठे तरी अनुभवले आहे अशी जाणीव करून देते. मालिकेत एक संकल्पना आहे ती म्हणजे "tucked away". जिवंत तसेच मृत व्यक्ती काही ना काही कारणास्तव एका आठवणींच्या दुनियेत जातात आणि तिथे एका लूप मध्ये पडतात, हे नक्की का होते आणि कसे होते हे दर्शकांना समजणार नाही. हि संकल्पना नवीन नसली तरी त्याचा ह्या मालिकेतील प्रयोग अगदी फेल आहे. माझ्या मते कथानकातील कच्चे दुवे लपवण्यासाठी हि संकल्पना त्यात टाकली गेली आहे.

भयकथांचे प्रेमी हि मालिका आवडीने पाहतील, डोके भिंतीवर आपटावे असे ह्यांत काहीच नाही त्यामुळे तशी मालिका सुसह्य आहे पण त्याच वेळी आयुष्यभर आठवणीत राहावी असे सुद्धा ह्या मालिकेत काहीच नाही.

जिन्क्स's picture

13 Oct 2020 - 11:54 am | जिन्क्स

गल्ली चुकली काय हो??

चौथा कोनाडा's picture

16 Oct 2020 - 12:59 pm | चौथा कोनाडा

त्यांनी छान लिहिलंय, वेगळा धागा काढायला हवा त्यांनी.
एहढं छान लिखाण प्रतिसादात शोभत नाही !
Olectraytub

विजुभाऊ's picture

13 Oct 2020 - 12:09 pm | विजुभाऊ

http://www.misalpav.com/node/25166
माझा एक छोटासा प्रयत्न

विजुभाऊ's picture

13 Oct 2020 - 12:11 pm | विजुभाऊ

ऑल टाइम हिट्ट हवे असेल तर
हा अजरामर धागा पहा.
https://www.misalpav.com/node/6332
मोकलाया दाहि दिश्या......

ब्रिटिश यांचे धागे म्हणजे विनोदाची पर्वणी असत.
http://www.misalpav.com/user/1509/authored

ब्रिटिश यांचे सर्व लेख धमाल विनोदी आहेत. त्यातला हा एक http://misalpav.com/node/५३२३
बाकीचे धागे इतर मिपाकर देतीलच किंवा तुम्हीहि शोधू शकता

श्रीरंग_जोशी's picture

14 Oct 2020 - 12:09 am | श्रीरंग_जोशी

भडकमकर मास्तर यांचे सर्व लेखन - यापैकी खळखळून हसवणारे लेखन बरेच आहे.

कंजूस's picture

14 Oct 2020 - 5:59 am | कंजूस

हा सुद्धा त्रोटक विनोदी असतो.

श्वेता२४'s picture

16 Oct 2020 - 1:26 pm | श्वेता२४

कसे विसरुन चालेल? दुर्देवाने त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. परंतु त्यांच्या धाग्यावरचे प्रतिसाद हे निश्चितच विनोदी असत.