तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?

Primary tabs

ताजे प्रेत's picture
ताजे प्रेत in काथ्याकूट
20 Sep 2020 - 11:20 pm
गाभा: 

तुम्हालाहीडिप्रेशनआलंय_का?
**

प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.
रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.

समुपदेशकांचे आपल्या विशिष्ठ शैलीतले समुपदेशन सुरु झाले. त्यांनी सर्वप्रथम रमेशच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीला बाहेर बसायला सांगीतले. आता त्या केबिनमध्ये समुपदेशक आणि रमेश असे दोघेच बसले होते. समुपदेशकांनी दोन-चार हलकेफुलके प्रश्न विचारुन रमेशचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरादाखल रमेशची रडकथा सुरु झाली.
रमेश सांगत होता - " मी खूप त्रासलो आहे चिंतेनं माझ्या काळजावर प्रचंड दाब आला आहे नोकरीतल्या कामाचं टेन्शन, मुलांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना चांगली नोकरी मिळेल की नाही याची चिंता, बायकोची हौस मौज, घरासाठी घेतलेलं कर्ज, गाडीचे हप्ते, माझं आजारपण, पाहुण्यांची वर्दळ... "

रमेश पुढं बोलतच होता - "या सगळ्या काळज्यांमुळे मी सैरभैर झालोय. कशातच मन लागत नाही. लोकांना वाटतंय माझं छान टुमटुमीत चाललंय. पण माझं मलाच माहित.. मी हे सगळं कसं करतोय ते. रात्री नीट झोप लागत नाही. जेवायला बसलो की अन्नावरची वासना उडून जाते. का कुणास ठाऊक, पण माझं काही खरं नाहीं. मी प्रचंड निराश झालोय!" असं सांगत रमेशनं आपलं सारं दुखणं नि:संकोचपणे मांडलं होतं.

रमेशचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतानाच समुपदेशकाच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं.
रमेशचं बोलणं थांबल्यावर समुपदेशकांनी रमेशला विचारलं-
"तुमचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं?"
रमेशनं त्याच्या प्राथमिक शाळेचं नाव सांगीतलं. रमेशला हा प्रश्न अप्रस्तुत वाटल्यानं त्याचा चेहरा त्रासिक झाला होता. समुपदेशकांनी मात्र त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करुन हलकेच हसत म्हटलं-
"तुम्हाला त्या शाळेत एकदा जावं लागेल. जमेल का तुम्हाला त्या शाळेत जायला?"
रमेश हे ऐकून आणखी त्रासला होता. परंतु तरीही तो म्हणाला-
"मला त्या शाळेत जायला जमेल, पण त्यानं माझा प्रश्न सुटणार आहे का? कशासाठी जायचं मी त्या शाळेत?"
समुपदेशक म्हणाले- "त्या शाळेत तुम्ही चौथीच्या वर्गात शिकत असताना तुमच्या वर्गात कोण कोण विद्यार्थी होते, त्यांची सर्वांची नावं तिथल्या एका रजिस्टरमध्ये लिहीलेली असतील. त्या रजिस्टरची एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. पुढच्या वेळी माझ्याकडे येताना ती तुम्ही सोबत घेवून यायची आहे."

रमेशला या त्रासिक वाटणाऱ्या गोष्टीचीही थोडी गंमत वाटली आणि त्यानं शाळेतून अशी यादी आणायला होकार दिला.

रमेशने समुपदेशकांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांच्या शाळेत जाऊन चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची यादी आणून समुपदेशकांकडे सुपूर्द केली.

यादीवरुन नजर फिरवित समुपदेशक रमेशला म्हणाले- "हे सर्व जण तुमच्या सोबत शिकत होते. आता तुम्ही एकेक करुन सर्वांना भेटा, त्यांचं सध्या काय चाललंय याची माहिती मिळवा. ही तुम्हाला मिळालेली माहिती एका स्वतंत्र वहीमध्ये लिहा आणि एक महिन्याच्या आत ती वही मला दाखवायला घेवून या."

रमेशने यादी परत हातात घेतली. त्यात सुमारे १५० नावे होती. या सर्वांना भेटण्यासाठी रमेशने रात्रीचा दिवस केला. खूप फिरुन सुद्धा रमेशला त्यातील फक्त १२० जणांची भेट घेणं शक्य झाली होती.

महिन्याभराने या भेटीतून मिळालेल्या माहितीचा सर्व तपशील घेवून रमेश समुपदेशकांकडे गेला. सोबतची वही समुपदेशकांच्या हाती दिली. समुपदेशकांनी वहीतील माहिती वरुन नजर फिरवली. त्यांचा हेतू साध्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता!

समुपदेशकांनी ती वही पुन्हा रमेशच्या हाती सोपवत त्या माहितीचे मोठ्या आवाजात वाचन करायला सांगीतले.
रमेशने त्या वहीतील माहितीचे वाचन केले. १२० जणांना भेटून रमेशने मिळविलेल्या माहितीचा साधारण तपशील खालीलप्रमाणे होता -
१) ३७ जणांचा मृत्यू झालेला होता. आणि कारणे खाली येतीलच
२) २८ मुली विधवा झालेल्या होत्या. ४ मुलींनी आपल्याच नवर्याला मारले होते.
३) १३ जण घटस्फोटीत होते.
४) १५ मुले दारुच्या व्यसनात पूर्ण अडकली होती. आणि काही मरण पावली होती
५) एकाला इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळाले नाही म्हणून नैराश्य आले होते .
६) १९ मुले मुली वेगवेगळ्या ड्रगज च्या व्यसनात होते आणि त्यातले काही मरण पावले होते
७ ) १५ मुले विधूर झाली होती. तिघांनी आपल्याच बायकोला मारले होते. एकाने दोन बायकांना मारले होते .
८ ) ४ जणांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती, त्यात एक जण मरण पावला होता,
९) ५ जण गँगस्टर झाले होते आणि २ जण विरोधी गॅंग चे असल्याने त्यांनी एकमेकांना ठोकले होते . अजून एकाला वर्गातल्याच कमिशनर झालेल्या मुलाने एन्काउंटर मध्ये उडवले होते. वर्गातील काहींची मुले हि वेगवेगळ्या गॅंग मध्ये होती
१० ) २ जण चोरून अणुबॉंम्ब विकताना पकडले म्हणून युनो ने खटला चालवून त्यांना युनेस्को मधल्या तुरुंगात टाकले होते.
११) ४ जण समलैंगिक झाले होते आणि त्याचे हि ब्रेक अप झाले होते.
१२ ) २ जण करोना काळात मास्क चा काळाबाजार करताना पकडले गेल्याने त्यांना खूप हप्ते द्यावे लागत होते
१३) १ जण पेंगवीन विकत घ्यायला चुकून उत्तर ध्रुवावर गेला ( ते दक्षिण ध्रुवावर असतात ) त्यामुळे त्याला धंद्यात खोट आली होती
१४) ३ जण ब्रेन ट्रान्सप्लांट मध्ये मेंदू चा काळाबाजार करतांना पकडले गेले होते
१५) ७ जण करोना ने मरण पावले होते . ३ जणांची फुफुसे बदलावी लागली होती .
१६) २ जण नोटबंदी च्या रांगेत मरण पावले होते
१७) एकाच्या कानाचे ऑपरेशन डेंटिस्ट ने चुकीच्या प्रकारे केल्याने त्याला कमी दिसू लागले होते .
१८) ४ जणांना मुल-बाळ झालेलं नसल्यानं त्यांच्या दवाखान्याच्या / बाबा -बुवांच्याकडे चकरा सुरु होत्या.
१९) २३ जणांना मधुमेहाचा आजार जडला होता.
२०) ६ जणांना वेगवेगळ्या कॅन्सरने पछाडले होते.
२१) ९ जणांच्या मुलाबाळांचं शिक्षण अर्ध्यातच सुटलं होतं.
२२) ४ जणांना काहीतरी अपघात होऊन अपंगत्व आलेलं होतं.
२३) १२ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.
२४) ११ जणाची मानसिक स्थिती बिघडून त्याला वेड लागले होते.
२५) ४ जण इतके गरिब होते की त्यांना रोजच्या खाण्यापिण्याचीही भ्रांत होती.
२६) ५ जण खूप श्रीमंत आणि त्यामूळेच खूप गर्विष्ठ झाले होते.
२७) १ जण आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने त्याचे अद्यापही लग्न झाले नव्हते.
२८) १ जण असा होता की ज्याची तीन लग्ने होऊनही तो समाधानी नव्हता.

ही माहिती मोठया आवाजात वाचून पूर्ण झाल्यावर रमेशने समुपदेशकांकडे नजर टाकली. हलकेच स्मित करीत समुपदेशकांनी रमेशला विचारले- " आता सध्या तुमची निराशा काय म्हणतेय?"

समुपदेशकांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? यासाठी रमेश स्वतःशी विचार करु लागला-
"मी नको त्या गोष्टींचा नको तितका बाऊ करतोय. त्यामुळेच आपल्याला नैराश्याने ग्रासलं आहे. खरंतर माझी परिस्थिती इतर सगळ्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे. माझ्या हाती चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी आरोग्याच्या दृष्टीनं अगदी ठणठणीत आहे. माझे सारे कुटूंबिय आनंदी आहेत. माझी मुलं हुषार आहेत. त्यांना शिक्षणात आणि अभ्यासातही चांगली रुचि आहे. मी इतरांपेक्षा नक्कीच सुखी आहे."

आपण आजवर चुकीच्या पध्दतीने विचार करुन, चूकीचे वागून आपल्याच सुखाचा चोळामोळा केला आहे! हे लक्षात आल्यानं रमेश खजील झाला होता!

तुम्हालाही असं नैराश्य आलं आहे का? तुम्हाला डिप्रेशन आलंय का?

जर तुम्हालाही निराशाग्रस्त वाटत असेल, तुम्ही डिप्रेस्ड झाला असाल तर तुम्हीही एकदा तुमच्या शाळेत जाऊन यायला हवं. रमेशनं केलेला प्रयोग एकदा तुम्हीही करुन पहायला हवा.

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

21 Sep 2020 - 1:47 am | Rajesh188

स्वप्न विलास
कथेत वर्णन केलेली परिस्थिती कधीच कुठे
अस्तित्वात नसते.

कानडाऊ योगेशु's picture

21 Sep 2020 - 1:51 am | कानडाऊ योगेशु

हेच म्हणतो.
लेख कुठल्यातरी हुच्चभ्रु इंग्रजी लेखाचा अनुवाद असावा वा त्यावरुन प्रेरित तरी असावा.
माझ्या शा़ळकरी मित्रांचा कायप्पावर समूह आहे आणि ऑल आर डूईंग वेल.

तुषार काळभोर's picture

21 Sep 2020 - 8:09 pm | तुषार काळभोर

४ मुलींनी आपल्याच नवर्याला मारले होते.

दुसऱ्या पॉइंट ला हे वाचले आणि

लेख कुठल्यातरी हुच्चभ्रु इंग्रजी लेखाचा अनुवाद असावा वा त्यावरुन प्रेरित तरी असावा.

हे मनात आले.
पुढे उत्तर ध्रुवावर पेंग्विन, इंजिनियरिंग नोबेल, अणुबॉम्ब, ५३व्या वर्षी निराधार, इत्यादी वाचून तो हूच्चभ्रू इंग्रजी लेखक सुद्धा भरकटल्याची जाणीव झाली.

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2020 - 12:53 pm | चौथा कोनाडा

@कानडाऊ योगेश + १
हेच म्हणतो,

बा़की

ताजे प्रेत

हे नाव बघुनच नैराश्य आलं, शेजारच्या बाळ्यांनं तातडीनं गायछाप आणि जुना दिल्या म्हणुन लगेच नॉर्मल झालो !

कंजूस's picture

21 Sep 2020 - 5:29 am | कंजूस

पैसे कमी पडले घर चालवायला,
- तर त्रास होतो.

पण आजुबाजूच्यांंकडे मात्र रग्गड दिसले ,
-तर दु:खी होतो.

पण समुपदेशकाची फी देण्याएवढे असले ,
- तर डिप्रेशन येतं.
??????

दुर्गविहारी's picture

21 Sep 2020 - 9:11 am | दुर्गविहारी

मुद्दा चांगला मांडला आह,, पण खाली दिलेली कारण काहींच्या काही आहेत. एका वर्गात इतके सगळे वाईट लोक होते??
बाकी गँगस्टर का,, अणुबॉम्ब का,, ड्रग का,, हे सगळे इतके सहज मिळत??
ह,, आता नाही म्हणायला १६ वा मुद्दा धोकादायक आहे. नोटबंदी म्हणल्यावर भक्तगण चालून येतील. लवकरच धाग्याचा टी. आर. पी. वाढेल याची खात्री आहेच. :-)

आनन्दा's picture

21 Sep 2020 - 9:37 am | आनन्दा

माझ्या पण 2 समिधा -

>> १२ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.

53व्या वर्षी मुलांनी सांभाळणे म्हणजे जरा अतीच..

आनन्दा's picture

21 Sep 2020 - 9:41 am | आनन्दा

माझ्या पण 2 समिधा -

>> १२ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.

53व्या वर्षी मुलांनी सांभाळणे म्हणजे जरा अतीच..

धाग्याचा गाभा चांगला आहे, पण चरबी वाढली आहे..

डॅनी ओशन's picture

21 Sep 2020 - 9:42 am | डॅनी ओशन

जर म्या अठ्ठाविस मुद्द्यांमध्ये बसत अशेन तर काय करावे ?
😖

मला २६ व्या मुद्द्यात असायला फार आवडेल.

लाजाळू चे झाड कसे अतिशय संवेदनशील असते थोडा स्पर्श केला की लगेच पान मिटून घेते..
असे संवेदनशील मन असणाऱ्या व्यक्ती लवकर निराशेने ग्रस्त होतात.
त्यांना कोणती ही कारणे चालतात.
अगदी शुल्लक कारणांनी सुद्धा जीवन संपवतातात किंवा व्यासणी होतात.
माणसांनी निगर गठ्ठ असावे,अगदी बेशरम पण असावे.
अशा व्यक्ती कधीच निराश होत नाहीत.

निनाद's picture

22 Sep 2020 - 12:01 pm | निनाद

अगदी शुल्लक कारणांनी सुद्धा जीवन संपवतातात किंवा व्यासणी होतात.
शुल्लक म्हणजे काय? क्षुल्लक असा शब्द माहित आहे.

क्षुल्लक शब्दाचा अर्थ दाते शब्दकोश असा देतो:
न. क्षुद्र पहा. -वि. १ लहान; कमती; अल्प; थोंडें. २ (ल.) हलकें; कमी दर्जाचें ; कवडी किंमतीचें; क्षुद्र; (किरकोळ, माणूस कृति, काम, बाब). [सं.]
संदर्भः http://bruhadkosh.org/words?words?shodh=क्षुल्लक
शुल्लक असा शब्द मला सापडला नाही. काय अर्थ अपेक्षित आहे/असतो?

तसेच व्यासणी असा शब्द पण सापडला नाही. व्यास ऋषी संबंधित काही आहे का? हा संस्कृत शब्द आहे का? माझा संस्कृतचा अभ्यास नाही.

विजुभाऊ's picture

21 Sep 2020 - 5:29 pm | विजुभाऊ

काका तुमच्या मिपावरच्या नावामुळे मला डिप्रेशन आले होते.
" ताजे प्रेत " हे कसले नाव घेतलय

तिमा's picture

22 Sep 2020 - 9:56 am | तिमा

त्यामुळे आपण चांदोबा वाचल्याचा फील येतो.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2020 - 4:02 pm | टवाळ कार्टा

काहीही....मी लहान असताना चांदोबा बर्याचदा वाचले आहे, त्यात असे काही नसायचे

ताजे प्रेत's picture

22 Sep 2020 - 4:05 pm | ताजे प्रेत

त्यात शिळी प्रेते असायची का ?

खेडूत's picture

21 Sep 2020 - 5:58 pm | खेडूत

😂

रमेश धरून १ ते २८ मधे २४५ लोक्स होतात.. पण रमेशच्या बरोबर यादीनुसार १५० च मुले होती!
डिप्रेशनमुळे विदा गडबडला असावा...

Gk's picture

23 Sep 2020 - 9:07 pm | Gk

एक व्यक्ती अनेक गटात असू शकेल की

म्हणजे घटस्फोटित , दारूच्या व्यसनातही आणि नोबेल न मिळालेला.

असा एकच मनुष्य असू शकेल , पण 3 दा कौंट झाला

मराठी कथालेखक's picture

21 Sep 2020 - 5:58 pm | मराठी कथालेखक

१२० पैकी ३७ जणांचा मृत्यू वयाच्या ५३/५४ व्या वर्षी ? आणि २८ मुली विधवा ?
मुद्दा ठीकठाक असला तरी तो पटवण्याकरिता काहीच्या काही लिहिलंय.
तसंच डिप्रेशन हे फक्त विचारांवर अवलंबून नसतं मेंदूत रासायनिक बदल घडून डिप्रेशन हे येतं. एखाद्याचं आयुष्य कितीही चांगलं चालू असेल तरी त्याला/तिला अशा रासायनिक बदलांमुळे डिप्रेशन येवू शकतं.
बाकी धागालेखकाने असा विचित्र आय डी घेतला आहे त्यामुळे त्यांच्या मानसिक अवस्थेबद्दल संभ्रम निर्माण होतो आहे.
आपण केवळ गमती खातर असा आय डी घेतला असेल अशी आशा करतो.

संजय क्षीरसागर's picture

21 Sep 2020 - 6:11 pm | संजय क्षीरसागर

दुसर्‍याचं किती वाईट झालं अशा विचारानं डिप्रेशन बापाजन्मात जाणार नाही. उलट जे यशस्वी झालेले दिसतील त्यांच्यामुळे डिप्रेशन आणखी वाढेल.

आयडी अत्यंत दळभद्री घेतला आहे; तो प्रशांत या आयडीला व्यनि करुन ताबडतोप बदलून घ्या

कंजूस's picture

22 Sep 2020 - 9:39 am | कंजूस

यशस्वी झालेले दिसतील त्यांच्यामुळे डिप्रेशन आणखी वाढेल. हो.

आइडी इथला जुना आहे.

शा वि कु's picture

21 Sep 2020 - 6:26 pm | शा वि कु

वरील २८ कारणांमधून डिप्रेशन आले तर चालते. नाहीतर नाही. मग माणूस खजील होतो
मग happily ever after.

सुक्या's picture

22 Sep 2020 - 2:19 am | सुक्या

१७) एकाच्या कानाचे ऑपरेशन डेंटिस्ट ने चुकीच्या प्रकारे केल्याने त्याला कमी दिसू लागले होते .

मी ४ दा वाचले. अजुन समजले नाही.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2020 - 4:06 pm | टवाळ कार्टा

एकाच्या कानाचे ऑपरेशन (कानाच्य डॉक्टरऐवजी) डेंटिस्ट ने (अर्थातच) चुकीच्या प्रकारे केल्याने (आणि त्यामुळे चिडलेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी बेदम बडवल्याने डोक्याला मार बसून) त्याला कमी दिसू लागले होते .

असे वाचा बरे ;)

Rajesh188's picture

22 Sep 2020 - 9:59 am | Rajesh188

पाहिले तर दिलेली लिस्ट ही 120 पेक्षा जास्त आहे .
120 लोकांना भेटले तर 120 पेक्षा जास्त लोक कोठून आणली.
मेंदूचा काळाबाजार हा काय प्रकार असतो .
अणु बोंब ची गोष्ट तर अगदी आकलनाच्या पलीकडे आहे.
उत्तर ध्रुवावर पण काही जावून आले मग अजुन काही जणांना प्लुटो वर शुक्र ग्रहावर पाठवून तिकडेच गायब करायला काय हरकत होती.
एकदा सूर्याच्या जवळ गेल्या मुळे मेला हे पण चालले असते.
घेतले असते वाचकांनी समजून.

कंजूस's picture

22 Sep 2020 - 10:51 am | कंजूस

कारण काही जण इतर घटनांमध्येही आहेत.

तेजस आठवले's picture

22 Sep 2020 - 12:32 pm | तेजस आठवले

जसे जसे २८ पर्याय वाचत गेलो माझे डिप्रेशन कमी होऊ लागले

४ जणांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती, त्यात एक जण मरण पावला होता

ठ्ठो!

तेजस आठवले's picture

22 Sep 2020 - 1:14 pm | तेजस आठवले

१८) ४ जणांना मुल-बाळ झालेलं नसल्यानं त्यांच्या दवाखान्याच्या / बाबा -बुवांच्याकडे चकरा सुरु होत्या.

हे तेच चौघे का लिंगबदलवाले? मग बरोबर आहे. कोणी काय करायचे आणि कुठली पोझिशन घ्यायची ते समजले नसणार. डॉक्टर काय करणार

तेजस आठवले's picture

22 Sep 2020 - 12:38 pm | तेजस आठवले

२) २८ मुली विधवा झालेल्या होत्या. ४ मुलींनी आपल्याच नवर्याला मारले होते.
७ ) १५ मुले विधूर झाली होती. तिघांनी आपल्याच बायकोला मारले होते. एकाने दोन बायकांना मारले होते .

डिप्रेशन मुळे असे मुडदे पडतात का मुडदे पडल्यामुळे डिप्रेशन येते ?

५) एकाला इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळाले नाही म्हणून नैराश्य आले होते .

इंजिनिअरिंग मध्ये नोबेल ? केट्या काढायचं बघ म्हणावं आधी

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2020 - 12:56 pm | चौथा कोनाडा

१३) १ जण पेंगवीन विकत घ्यायला चुकून उत्तर ध्रुवावर गेला ....

हो, भेटला होता मला तो. मी स्वस्तात घेऊन दिला पेंगवीन ! आता म्हणे मुंबैच्या एका बागेत गारगार दालनात ठेवलाय म्हणे त्याला :)

कपिलमुनी's picture

22 Sep 2020 - 1:48 pm | कपिलमुनी

सदर गृहस्थ यादी मिळेल का याची चौकशी करत होते

d

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2020 - 2:14 pm | चौथा कोनाडा

MHNA

श्वेता२४'s picture

22 Sep 2020 - 3:54 pm | श्वेता२४

या धाग्यावरचे प्रतिसाद डिप्रेशन घालवणारे आहेत एवढे नक्की! मोकलाया नंतर आज एवढं हसू आलं.

उन्मेष दिक्षीत's picture

22 Sep 2020 - 4:29 pm | उन्मेष दिक्षीत

😂 👌

इति श्री श्री सोंदीप मोहेश्वरी

बबन ताम्बे's picture

22 Sep 2020 - 11:31 pm | बबन ताम्बे

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Sep 2020 - 11:02 am | अमरेंद्र बाहुबली

१ जण पेंगवीन विकत घ्यायला चुकून उत्तर ध्रुवावर गेला ( ते दक्षिण ध्रुवावर असतात ) त्यामुळे त्याला धंद्यात खोट आली होती藍

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Sep 2020 - 11:02 am | अमरेंद्र बाहुबली

) २ जण चोरून अणुबॉंम्ब विकताना पकडले म्हणून युनो ने खटला चालवून त्यांना युनेस्को मधल्या तुरुंगात टाकले होते.
हहपुवा.

सुबोध खरे's picture

25 Sep 2020 - 10:35 am | सुबोध खरे

विकणाऱ्याने स्वतः तयार केले कि कुठून चोरले?

आणि

चोरून विकत कोण घेत होता ?

ह ह पु वा

बहुतेक तो पाकिस्तानी (कादिर?) अणू शास्त्रज्ञ त्यांच्या वर्गात असेल. आणि गिर्हाईक म्हणजे उत्तर कोरियाचा त्यावेळचा हुकूमशहा. पण युनोत खटला चालून ते युनेस्कोच्या तुरुंगात खितपत पडले ही बातमी काय वाचली नाही ☺

अभिजीत अवलिया's picture

23 Sep 2020 - 6:36 pm | अभिजीत अवलिया

उत्तम लेख. भविष्यात कधी डिप्रेशन आले तर हा लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचेन.

कोहंसोहं१०'s picture

26 Sep 2020 - 8:19 am | कोहंसोहं१०

चला आता सर्वांनी venn diagram काढून प्रत्येक गटात किती unique माणसे होती हे पटापट काढा....

उत्तर काढता नाही आले तरी निराश व्ह्यायचे काही कारण नाही. चुकुन झालाच तर ज्यांनी प्रयत्न केला त्या सर्वाना जाउन विचारा...तुम्हाला आढळेल-
१. १००० वाचकांमध्ये गणित सोडवण्याचे कष्ट फक्त १०० लोकांनीच घेतले असतील
२. त्या १०० पैकी ७० जण शाळेत गणित विषयात काठावर पास झालेले असतील
३. ५० लोकांना शाळा शिकूनही venn diagram काय असते हे लक्षात नसेल
४. ७० जण फक्त वही पेन घेऊन बसतील पण पुढे कसे जायचे हेच त्यांना आठवत नसेल
५ . ४० जण ४ मुद्दे वाचून आकृती काढण्याचे कष्ट सोडून देतील
६. १० जणांनी ज्या फुटकळ ४-५ आकृत्या काढल्या असतील त्याचा उपयोग त्यांच्या मुलांनी चित्रकलेचे रंग भरायला केलेला असेल

आता स्वतःला विचारा "आता सध्या माझी निराशा काय म्हणतेय"? हाही प्रयोग एकदा करून बघा.

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2020 - 4:58 pm | चौथा कोनाडा

धाग्याला "गणित" या विषयाकडे भरकटवून वाचकांच्या मनात धडकी भरवण्याचा विचार दिसतो, यांनं डिप्रेषन आलं तर कोण जबाबदार ? :))

ज्यांना डिप्रेशन येईल त्यांनी ह्या धाग्यावरच्या प्रतिक्रिया परत वाचाव्यात

चौथा कोनाडा's picture

23 Oct 2020 - 5:49 pm | चौथा कोनाडा

😆

प्राची अश्विनी's picture

26 Sep 2020 - 8:40 am | प्राची अश्विनी

बापले! घाबल्ले ना मी....

चलत मुसाफिर's picture

1 Oct 2020 - 1:03 pm | चलत मुसाफिर

मिपावर पुरेशा कॉमेंट मिळत नसल्यामुळे मी दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये गेलो आहे. कृपया जाणकार समुपदेशकांनी उपाय सांगावा.

सागर गुरव's picture

1 Oct 2020 - 1:17 pm | सागर गुरव

"एक जगह ठहरने वाले मुसाफिर" बना, एव्हढे बोलुन मी खाली बसतो... =)

चौथा कोनाडा's picture

10 Oct 2020 - 5:56 pm | चौथा कोनाडा

FLWR0420

सागर गुरव

दुर्गविहारी's picture

3 Oct 2020 - 11:18 am | दुर्गविहारी

धाग्यावरच्या बेभान फटकेबाजी वाचुन अनेकांना आलेली निराशा पळून गेली अशी आमच्या गुप्त सूत्रांचे म्हणणे आहेत. (कृपया ही गुप्त सूत्र कोण हे विचारू नये. )
बाकी बऱ्याच दिवसांनी मुक्तपीठवरचा लेख वाचल्याचा फील आला. :-)

आजच एकाने ऑनलाईन मोबाईल मागवला त्यात फसवले गेल्याने आत्महत्या केली. त्याने हा लेख वाचला असावा असे वाटते. वर्गातल्या 119 जणांना ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक झालेली नसावी.

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Oct 2020 - 2:17 am | माम्लेदारचा पन्खा

डिप्रेशनपेक्षा प्रतिसाद वाचून मनोरंजनच अधिक झालं !